शिरोभ्यंग मशीन ...
होय म्हटलं तर व्यापार💰💵🪙 ...
नाही म्हटलं तर विनोद😇😃😆 ...
पढकर "बेचो" 💵 या हँसकर "सोचो"
जो मर्जी आये करो
जसे आयुर्वेदात कांस्य थाळी पादाभ्यंग... आता कांस्य थाळी हस्त अभ्यंग ... अशी गोल फिरणारी मशीन यंत्र आलेली आहेत ... तसे एक यंत्र "डोक्याच्या मसाज = शिरोभ्यंग" साठी करता येईल !!
डोक्यात बसेल / डोक्यावर बसेल , अशा आकाराचे मोठ्या वाटीसारखे किंवा कढई सारखे पात्र करून , आत मधून त्याला काही उंचवटे करावेत ... जसे पादाभ्यंग हस्ताभ्यंग मशीनला असतात तसेच... आणि ते वाटी कढई सारखे यंत्र डोक्यावर मालिश करेल अशा पद्धतीने फिरत राहील अशी व्यवस्था करावी!
म्हणजे आयुर्वेदाला, अजून एक "शिरोभ्यंग नावाचा सोपा बिजनेस" मिळेल ...
ज्यामध्ये शिरोधारेसारखा खूप मोठा सेटअप करावा लागणार नाही ...
थेरपीस्टही लागणार नाही
नुसतं बटन दाबलं की ते डोक्यात बसणारे वाटी कढई सारखं मशीन फिरेल
आणि अभ्यंग झाल्यामुळे पेशंटला ही छान बरं वाटेल !!!

No comments:
Post a Comment