दोष an illusion. दोष नसतात. "Nir"Dosha Ayurveda "नि"र्दोष आयुर्वेद
Think rational. Quit illusion ते गुल्मनिदान आणि संप्राप्ती याच्यावर लेक्चर देणारे लोकांचे मला भयंकर कौतुक वाटतं! म्हणजे सशाला शिंग असतं, पुरुषाला गर्भाशय असतं !!! ... अशा "आश्रय असिद्ध" गोष्टींवरती लोक लेक्चर देतात, याच्याविषयी मला भयंकर आदर आहे!
ठीक आहे ...
म्हणजे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, म्हणून ते वाचायला पाहिजे, याबाबत काही शंका नाही
... पण काही गोष्टी कालबाह्य आहेत त्या अस्तित्वात असू शकत नाहीत, हे काही विशिष्ट कालावधीनंतर स्पष्टपणे मान्य करायला काय हरकत आहे ??
त्यातल्या त्यात वात दोष ही एक भयंकर अशक्य संकल्पना आयुर्वेदामध्ये आहे...
की आपण अन्न खाल्ल्यानंतर तिसऱ्या अवस्था पाकामध्ये वात "निर्माण" होतो...🤔⁉️
म्हणजे हे मला अजिबात आजपर्यंत न कळलेलं कोडं आहे की, जो वात शरीरामधल्या सगळ्या हालचाली घडवतो , की जो चल रूक्ष शीत अशा गुणांचा असतो, तो वात अन्नाच्या तिसऱ्या अवस्था पाकामध्ये आपण "खाल्लेल्या अन्नामधून निर्माण" होतो 😇
आता मूळ गोष्ट अशी आहे की, आपण जे अन्न खातो, ते अन्न पृथ्वी महाभूत प्रधान आहे, त्याच्या सोबत आपण थोडाफार पाणी पितो किंवा काही जेवणामध्ये द्रव पदार्थ असतात हे जल प्रधान आहेत ...णत्यामुळे त्यातून "शरीर अस्तित्वात ठेवणारे घटक = धातु" निर्माण होतात, हे निश्चितपणे मान्य करायला हवं ...
पण आपण खाल्लेल्या पृथ्वी जल प्रधान अन्नातून आपलं अख्खं शरीर चालवेल, गतिमान ठेवेल, असा "वातदोष निर्माण" होतो, ही अत्यंत प्राथमिक ज्ञान ज्याला आहे , त्याला सुद्धा न समजणारी, न कळणारी, न पटणारी गोष्ट आहे!!!
... वायूचे जर गुण रूक्ष चल शीत असे असतील तर अशा गुणांचा भाव पदार्थ निर्माण होणारे पदार्थ , आपण असे किती प्रमाणात खातो , की ज्यातून आयुष्यभर ... जन्मल्यापासून आपण मरेपर्यंत ... आपलं हृदय आपलं फुफ्फुस ही, "कधीही न थांबणारी दोन यंत्र सतत गतिमान राहतील?" ... आणि अन्य सर्व वेळेला आपण जागृत असतो तेव्हा आपल्या शरीरातील सर्व हालचाली ज्या आपल्याला ऐच्छिक दृष्टीने करायच्या, त्या करता येतात ... हे वातामुळे होतं एवढी अखंड अविरत गती, ज्या वाताला attribute करण्यात आलेली आहे , तेवढा वात, आपण खात असलेल्या अन्नातून निर्माण होत असेल, ही अशक्यप्राय गोष्ट आहे !!! ... एवढं रूक्ष एवढं चल आणि एवढं शीत गुण असलेलं अन्न आपण खातो, अशी वस्तुस्थिती अजिबात नाही...!!!
मुळात , "दोष हे अन्नातून निर्माण होतात", ही मूलभूत गोष्टच चुकीची आहे!!!
वातामुळे , चल गुणामुळे हालचाल होते? की हालचाल झाल्यामुळे, व्यायाम केल्यामुळे वात वाढतो ?
जर रोजच्या हालचालींमुळे, शारीरिक क्रियांमुळे ... वात वाढत असेल, (चल गुणामुळे) , तर हृदय आणि फुफ्फुस येथे जीवनभर हालचाल सुरू असते म्हणजे वात वाढलाच पाहिजे ! असं असताना , पुन्हा अन्नातून तिसऱ्या अवस्था पाकात वात निर्माण होत असेल, तर शरीर काही दिवसात "वायुरूपच" व्हायला पाहिजे!!!
शरीरात तीन (3) दोष नसतात ... शरीरात शून्य(0) दोष असतात ... शरीरात सहा धातू असतात ...अन्नापासून सहा(6) धातू निर्माण होतात आणि ते 6 धातू शरीर उभारतात, सांभाळतात आणि चालवतात ... अन्नातून त्यातून दोन(2)च मल निर्माण होतात, ते म्हणजे मूत्र आणि पुरीष ... एवढेच सत्य आहे !!!
बाकी तीन दोष = वात पित्त कफ नसतात !
रस नावाचा धातू नसतो
स्वेद नावाचा मल नसतो ...
4 महाभूत असतात
6 धातु असतात
2 मल असतात
स्रोतस् नसते, ओजस् नसते
हे आपण जोपर्यंत स्वीकारत नाही,
तोपर्यंत ही जी काही आयुर्वेदातली अनागोंदीची गोंधळाची परिस्थिती आहे ती बदलणार नाही!!!
Think rational. Quit illusion
शरीरात जी गती हालचाली होतात त्या मसल्स च्या आकुंचन प्रसारणामुळे होतात
मसल्स ना नेमकं काय म्हणायचं हा फार मोठा प्रश्न आहे. त्यांचं स्नायू हे भाषांतर आयुर्वेदातल्या शारीर कल्पनेची जुळत नाही आणि पेशी असं म्हणावं तर सध्या रूड भाषेत पेशी म्हणजे सेल cell असल्याने त्याच्याशीही जुळत नाही
सबब मसलला स्नायू किंवा पेशी म्हणण्याऐवजी मसल म्हणूया
मसल हे मांसापासून म्हणजे पृथ्वी महाभूतापासून बनतात ही गोष्ट सत्य आहे
त्यामुळे गती ही त्या मसल मांस पृथ्वी यामुळे असते आणि या आकुंचन प्रसारणाला जी एनर्जी ऊर्जा आवश्यक असते ती अन्ना मधूनच येते आणि अन्न हे पृथ्वी जल प्रधान असतं
कार किंवा टू व्हीलर पळते तेव्हा इंजिनामध्ये इंधनाचा स्फोट होतो
इंधन हे पेट्रोल डिझेल या स्वरूपातील असतं की जे पुन्हा पार्थिव मिनरल खनिज असंच आहे
अगदी एलपीजी किंवा सीएनजी असं म्हटलं तरी सुद्धा ते पार्थिव मिनरल खनिज असेच आहेत
पेट्रोल डिझेल किंवा गॅस या सगळ्यांना वजन आहे ते लिटर किंवा केजी मध्ये मोजले जातात म्हणजेच ते घन वस्तुमान मास असलेले पृथ्वी प्रधान भाव पदार्थ आहेत
त्यामुळे व्यवहारातली गती असो किंवा शरीरातली गती असो, ती कल्पना रम्य अस्तित्वहीन वातामुळे नसून, ती पृथ्वी जल अशा प्रत्यक्ष इंधनाच्या ज्वलनामुळे निर्माण होते, हीच वस्तुस्थिती आहे
जसे टू व्हीलर आणि कार यांची सर्व संरचना बॉडी कॉन्स्टिट्यूशन पार्टस हे सुद्धा मेटॅलिक किंवा प्लास्टिकचे असतात म्हणजेच पृथ्वी महाभूतांपासून बनलेले असतात
तसेच संपूर्ण शरीर घटक हे सुद्धा सहा धातूंपासून बनताना मुख्यतः मांस आणि मेद यापासून बनतात म्हणजेच प्रोटीन फॅट म्हणजेच पृथ्वी जल यापासून बनतात
त्यामुळे उगीचच कफ पित्त वात या अस्तित्वात नसलेल्या कल्पना रम्य , शास्त्रीय संज्ञा आणि लोकभाषेतील अर्थ या दोन्ही दृष्टीने "दोषच" असलेली, ही गोष्ट पूर्णतः त्याचे अस्तित्वहीन अशास्त्रीय कल्पनारम्य म्हणजेच इल्युजन आहे
Think rational. Quit illusion

No comments:
Post a Comment