जल💧🌧 जो ना होता, तो ये जग 🌏 जाता जल🔥
पाणी : जेवणाच्या आधी ? मध्ये ? नंतर ? किती दिवसभरात एकूण किती?!
पुनश्च हरिः ॐ !!!
काले सात्म्यं लघु स्निग्धम् उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।
बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् मात्रावद् विदितागमः ॥
*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 187*
31 मार्च 2025, सोमवार
*उपविभाग 129*
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/
नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत होतो! आज प्रदीर्घ कालावधीनंतर आपण हा उपक्रम पुन्हा सुरू करत आहोत, तर वरील श्लोकाच्या अनुषंगाने पूर्वी पोस्ट केलेल्या सर्व लेखांच्या लिंक, आजच्या लेखाच्या शेवटी दिल्या आहेत. त्या क्रमशः वाचून घ्याव्यात... ते वाचून झाल्यानंतर आपण पुन्हा याच श्लोकाकडे परत येऊया ... म्हणजे विषयाची सुसंगती लागेल !!!
तोपर्यंत ... भोजन विधीशी संबंधित आणि तितकाच महत्वपूर्ण विषय म्हणजे जलपान अर्थात पाणी पिणे!!! पाणी पिण्याविषयी समाजामध्ये अनेक समज अपसमज रूढ आणि दृढ आहेत. याबाबत सोशल मीडिया वरती "तथाकथित सेलिब्रिटींनी" (ज्ञान अधिकार अनुभव नसताना) अकारण तारे तोडल्यामुळे, गोंधळात अधिकच भर पडली आहे!
तरी या सर्व समज अपसमजांच्या गोंधळातून बाहेर येऊन , आरोग्यशास्त्र मुळातून काय म्हणते, ते पाहूया ...
प्रक्षालयेदद्भिरास्यं भुञ्जानस्य मुहुर्मुहुः । ...
जेवण करताना मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी प्यावे त्यामुळे जीभ स्वच्छ होते
... विशुद्धे रसने तस्य रोचतेऽन्नमपूर्ववत् ।।
जीभ स्वच्छ झाल्याने त्याच्यावरील उपलेप = कोटिंग निघाल्यामुळे पुढचा घास पुन्हा तितकाच रुचकर वाटतो
स्वादुना तस्य रसनं प्रथमेनातितर्पितम् । न तथा स्वादयेद् अन्यत् ...
सलग पाच-सहा घास खाल्ले की पुढच्या घासाला चव जाणवत नाही कारण ती चव सवयीची होते
तस्मात् प्रक्षाल्यमन्तरा ।। ...
म्हणून जेवताना दर चार-पाच घासानंतर मध्ये मध्ये थोडे थोडे घोटभर पाणी पीत रहावे
अत्यम्बुपानान्न विपच्यतेऽन्नं
निरम्बुपानाच्च स एव दोषः |
तस्मान्नरो वह्निविवर्धनाय
मुहुर्मुहुर्वारि "पिबेद् अभूरि"
जेवताना खूप अधिक पाणी पिले किंवा पाणी अजिबातच पिले नाही, तर अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. अग्नीची क्षमता = पचनशक्ती उत्तम राहावी, यासाठी जेवताना मध्ये मध्ये (अभूरि म्हणजे) थोडे थोडे पाणी दर चार-पाच घासा नंतर पीत राहावे ...
पाण्याचे सुद्धा पचन व्हावे लागते !
पीतं जलं जीर्यति
यायामयुग्माद्यामैकमात्राच्छृतशीतलञ्च
तदर्धमात्रेण शृतं कदुष्णं पयः प्रपाके त्रय एव कालाः
साधे नेहमीचे रूम टेंपरेचर चे टॅप वॉटर चे पाणी पिले तर त्याचे पचन होण्यासाठी दोन याम म्हणजे सहा तास लागतात पाणी उकळून गार करून पिले तर ते पाणी पचण्यासाठी एक याम म्हणजे तीन तास लागतात आणि पाणी उकळून (साधारण निम्मे 12 किंवा एक तृतीयांश 13 किंवा एक चतुर्थांश ¼ आटवून, गरम गरम) पिले तर असे पाणी पचण्यासाठी अर्धा याम म्हणजे दीड तास लागतो !!!
वरून तोंडाने पाणी पिले म्हणजे ते किडनीवाटे फ्लश होऊन निघून जाते, हा अपसमज आहे ! शरीर म्हणजे बेसिन नाही ... त्यामुळे दीड लिटरपेक्षा जास्त पाणी विनाकारण तहान नसताना पिऊ नये
अशितश्चोदकं युक्त्या ... भुञ्जानश्चान्तरा पिबेत् ।।
जेवण झाल्यानंतर लगेचच युक्ती पूर्वक म्हणजे पुरेसे आणि जेवताना सुद्धा दर चार-पाच घासानंतर मध्ये मध्ये थोडे थोडे घोट घोटभर पाणी पीत राहावे
*प्रक्षालयेदद्भिरास्यं भुञ्जानस्य मुहुर्मुहुः ।*
जेवताना मध्ये मध्ये पाण्याने तोंड आतल्या आत धुवावे म्हणजे आजच्या सोप्या इंग्रजीमध्ये rinse करावे
*विशुद्धे रसने तस्य रोचतेऽन्नमपूर्ववत् ।।*
असे केल्याने जेव्हा जीभ स्वच्छ शुद्ध होते, त्यामुळे त्यानंतर खाल्लेला घास जणू काही जेवणाच्या सुरुवातीला घेतलेल्या पहिल्या घासाप्रमाणेच रुचकर लागतो
त्यामुळे जेवणाच्या सुरुवातीला पाणी प्यावे , जेवणाच्या शेवटी पाणी प्यावे , जेवताना अजिबात पाणी पिऊ नये, जेवण झाल्यानंतर पाऊण तासाने पाणी प्यावे ... हे सर्व अपसमज आहेत , ते अशास्त्रीय आहेत !!!
शास्त्र सांगते की ,
जेवताना मध्ये मध्ये म्हणजे साधारण चार ते पाच घास खाल्ल्यानंतर, एक घोटभर पाणी प्यावे ... जेणेकरून जिभेवर खाल्लेल्या घासांचा लेप बसल्यामुळे , तीच तीच चव पुन्हा पुन्हा घेतल्यामुळे, अन्नाची चव लागत नाही! म्हणून मध्येच घोटभर पाणी पिले असता, जिभेवर खाल्लेल्या घासांचा अन्नाचा जो लेप बसलेला असतो, तो पाण्यासोबत निघून जातो, पोटामध्ये जाऊन मिसळतो. त्यामुळे जीभ स्वच्छ आणि अन्कोटेड जणू काही कोरी पाटी प्लेन कॅनव्हास अशी स्वच्छ होते. त्यामुळे त्यानंतर खाल्लेला घास हा जणू काही जेवणाच्या प्रारंभी खाल्लेल्या पहिल्या घासाप्रमाणेच पुन्हा चविष्ट रुचकर हवाहवासा वाटतो.
अजून सोपे उदाहरण म्हणजे समजा श्रीखंड एक बोटभर चाटून खाल्ले की ते खूप छान वाटते! 🙂 पहिल्यांदा दुसऱ्या बोट साठवून खाल्लं तरी सुद्धा ठीक वाटतं ... तिसऱ्या चौथ्या बोटाला मात्र त्याची चव तितकीशी आनंददायक नसते आणि पाचव्या बोटाला नुसता श्रीखंडाचा जिभेला स्पर्श होतो, त्यातून जो चवीचा आनंद मिळाला पाहिजे , तो मिळत नाही!!! म्हणून महाराष्ट्रात आपण व्यंजन म्हणजे तोंडी लावण्याचा पदार्थ मध्येच थोडासा खातो किंवा चाटतो, जसे पापड लोणचे चटणी कोशिंबीर कुरडई ...
त्यामुळे सातत्याने खात असलेल्या गोड चवीमध्ये दुसरी चव आल्याने जिभेचे जे सेन्सिटायझेशन झालेले असते, जिभेला तीच तीच चव घेण्याची सवय झालेली असते, ती बदलते आणि त्या व्यंजनानंतर म्हणजे चटणी पापड लोणचं कोशिंबीर यानंतर, पुन्हा श्रीखंड बोटभर चाटले तर पुन्हा पहिल्यासारखाच श्रीखंडाच्या चवीचा आनंद मिळतो.😃
व्यंजन या शब्दाचा अर्थच व्यक्त करणारे अर्थात तोच तोच चवीचा घास खाऊन जिभेला काही वेळाने त्या घासाची चव समजेनासे होते, कारण त्या घासाचा उपलेप कव्हरिंग कोटिंग जिभेवरती बसते, म्हणून आपण त्यावेळेला पुन्हा तीच चव व्यक्त व्हावी समजावी कळावी, त्या चवीचा आनंद मिळावा म्हणून ... मध्येच पापड लोणचे कोरडे चटणी कोशिंबीर असे थोडेसे खातो किंवा चाटतो आणि मग त्यानंतर पूर्वीच्याच पदार्थाचा घास हा पुन्हा चवदार चविष्ट रुचकर आनंददायक होतो.
हीच बाब पाण्यामुळे सुद्धा होते ...
परंतु पाणी पिल्याने जीभ स्वच्छ होण्याबरोबरच, चव नव्याने कळण्याबरोबरच ...
अन्नामध्ये दर चार घासांनंतर पुरेसे पाणी मिसळले गेल्यामुळे, पोटामध्ये अन्नाचे घुसळणे त्याचे मिश्रण होणे त्याचे चर्निंग होणे हे सोपे जाते !!!
जसे मिक्सरवर चटणी वाटण करत असताना, त्यामध्ये गृहिणी (सुगरण) मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी घालते आणि मिक्सर पुन्हा पुन्हा फिरवते, तेव्हा ती चटणी योग्य त्या घनतेची= कन्सिस्टन्सीची होते !
तीच बाब पोटातील अन्न मिसळण्याच्या घुसळण्याच्या प्रक्रियेला लागू आहे.
म्हणून फक्त चवीसाठी किंवा जीभ स्वच्छ होण्यासाठी नव्हे तर ...
अन्नामध्ये पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थ = पाणी मिसळून त्याचे घुसळणे चर्निंग चांगले होण्यासाठी, दर चार ते पाच घासानंतर, घोटभरच पाणी प्यावे ... एकदम फुलपात्र भरून किंवा ग्लास भरून पाणी प्यावे , असे नव्हे !!!
स्वादुना तस्य रसनं प्रथमेनातितर्पितम् ।
न तथा स्वादयेदन्यत्तस्मात् प्रक्षाल्यमन्तरा ।।
एखाद्या पदार्थाच्या चवीने चार-पाच घास खाल्ल्यानंतर जीभ त्या चवीला सवयीची होते म्हणजे जिभेला त्या घासाच्या चवीची अति तृप्तता येते ...
त्यामुळे त्या घासाची चव पहिल्यासारखी लागत नाही म्हणून "अंतरा" म्हणजे मध्ये मध्ये जीभ पाण्याने धुतली पाहिजे स्वच्छ केली पाहिजे = तिच्यावरचं कव्हरिंग कोटिंग घालवलं पाहिजे ... थोडक्यात घोटभर पाणी पिऊन, जीभ आणि तोंडाचा आतला भाग रिंझ केला पाहिजे, असे वरील श्लोक सांगतो ... जे आपण आधी सविस्तर पाहिले आहे
अशितश्चोदकं युक्त्या भुञ्जानश्चान्तरा पिबेत् ।।
👆🏼सुश्रुत संहिता
जेवण झाल्यानंतरही युक्तीने म्हणजे पुरेसे पाणी प्यावे आणि *भुंजानः* म्हणजे जेवत असताना व्हाईल डायनिंग ing चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे "जेवण करत असताना , मध्ये मध्ये , थोडे थोडे पाणी प्यावे" असे सुश्रुत संहिता सांगते .
याचा अर्थ जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये , असे जे सांगतात; ते अशास्त्रीय आहे, तो अपसमज आहे.
म्हणून जेवण झाल्यानंतर पुरेसे पाणी "निश्चितपणे प्यावे".
साधारणता आपल्या पोटाचे आपल्या भुकेच्या क्षमतेचे अंदाजे चार भाग मानावेत.
त्यातील एक भाग हा पाण्याने किंवा द्रव पदार्थांनी,
दोन भाग हे घनपदार्थांनी म्हणजे भाकरी पोळी भाजी भात आणि
उर्वरित एक भाग हा घन+द्रव पदार्थांच्या मोकळेपणाने घुसळण्यासाठी संचारासाठी रिकामा ठेवावा म्हणजेच त्यात एक चतुर्थांश अवकाश = रिकामी जागा असू द्यावी... म्हणूनच मागील पिढीतले लोक "सावकाश" जेवा, असे म्हणायचे !
सावकाश चा अर्थ हळूहळू असा जरी रूढार्थाने घेतला जात असला तरी ...
"सावकाश" याचा खरा अर्थ स + अवकाश म्हणजे अवकाश रिकामी जागा ठेवून भोजन करावे ...
पोट गच्च भरेपर्यंत , तडस लागेपर्यंत , अति तृप्तता येईपर्यंत = सौहित्य असं त्याला म्हणतात = सटायटी असे इंग्लिश मध्ये म्हणतात ... एवढं जेवू नये.
आपल्या भुकेपेक्षा चार घास कमी खावेत !
अन्यथा लोक इतकं दाबून जेवतात की तोंडात बोट घातलं तर घशामध्ये खाल्लेलं अन्न बोटाला लागेल ...😆 यातला विनोद सोडून दिला तरी ...
सर्वसामान्य माणसाने आपल्या पोटाच्या खाण्याच्या भुकेच्या क्षमतेच्या 50% घनपदार्थ 25% द्रव पदार्थ आणि 25% जागा पोटात रिकामी असू द्यावी इतकेच जेवावे
1 द्रव + 2 घन + 1 अवकाश = 4 भाग पोट
25% liquid + 50% solid + 25% empty = capacity of stomach
अत्यम्बुपानान्न विपच्यतेऽन्नं निरम्बुपानाच्च स एव दोषः ।
तस्मान्नरो वह्निविवर्धनाय मुहुर्मुहुर्वारि पिबेदभूरि ॥
पीतं जलं जीर्यति यामयुग्माद्यामैकमात्राच्छृतशीतलञ्च ।
तदर्धमात्रेण शृतं कदुष्णं पयःप्रपाके त्रय एव कालाः ॥
👆🏼भावप्रकाश संहिता
खूप पाणी प्यावे , दिवसभरात सात ते आठ लिटर पाणी प्यावे, हायड्रेटेड राहावे , वॉटर थेरपी , किडनी फ्लश ... अशा अपसमजांपोटी , अशास्त्रीय सल्ल्यांमुळे ... समाजामध्ये "आवश्यकतेपेक्षा खूप जास्त" पाणी पिले जाते.
भावप्रकाश संहिता म्हणते की,
खूप जास्त पाणी पिल्ले तर अन्न पचत नाही, कारण अन्न पचवणाऱ्या स्रावांचे = एंझायम्सचे = पोटात असलेल्या 2pH हायड्रोक्लोरिक ॲसिडचे डायलूशन होते म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कमी होते अर्थात त्याची पचवण्याची क्षमता कमी होते म्हणून अन्न पचत नाही.
अजिबातच पाणी पिलं नाही किंवा पान पाणी फारच कमी पिलं तर ...
अन्नाचे घनघास हे योग्य प्रकारे घुसळले जात नाहीत, एकमेकात मिसळले जात नाहीत, त्यामुळे त्यांच्या कणाकणापर्यंत पाचक स्राव पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे पुन्हा अन्नाचे पचन योग्यरीत्या होत नाही ...
म्हणून, 1.जेवत असताना आणि 2.जेवण झाल्यानंतर मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी पीत राहावे ... पिबेद् अभूरि याचा अर्थ खूप जास्त नाही असे म्हणजेच "थोडे थोडे अल्प घोटभर घोटभर" ... एकदम गटगट ग्लासभर तांब्याभर पाणी एकदम शेवटी पिणं , हे चुकीचं आहे.
जेवण सुरू असताना दर चार-पाच घासानंतर मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी पीत राहिल्यामुळे , अग्नीची पचनक्षमता सुधारते टिकून राहते, अन्नाचे पचन योग्य प्रकारे होते , पोटातील पाचक स्राव = टू पीएच इतके तीव्र संहती = कॉन्सन्ट्रेशन असलेले हायड्रोक्लोरिक ॲसिड, आपण खाल्लेल्या अन्नाच्या कणाकणापर्यंत व्यवस्थित पोहोचते ... त्यामुळे पचनाची डायजेशनची प्रक्रिया ही नैसर्गिक रित्या ... सुकर, वेळेत आणि चांगली होते
शरीर हे बेसिन नाही की पाणी वरून ओतलं आणि खालैन किडनीतून फ्लश होऊन गेलं 🚽❌️ असं होत नाही
प्रत्यक्ष तोंडाचा आणि किडनीचा = मूत्रमार्गाचा थेट संबंध नाही.
आपण तोंडावाटे पिलेले पाणी पोटात जातं, तिथून त्याचं पचन होतं ... हो , पाण्याचं सुद्धा पचन व्हावं लागतं, हेच वरच्या श्लोकात सांगितलेलं आहे ... तर अन्ना प्रमाणेच पाण्याचं = द्रव पदार्थांचही पचन होऊन, ते संपूर्ण शरीरात शोषले जातात ... रक्तासोबत सर्व शरीरभर फिरतात ... आणि शेवटी किडनीमध्ये येऊन त्यांचं फिल्टरेशन गाळण ही प्रक्रिया होते
आणि त्यातून शरीराला आवश्यक नसलेलं अधिक झालेलं एक्सट्रा असलेलं पाणी किंवा द्रव पदार्थ हे मूत्र स्वरूपात बाहेर टाकले जातात!
याचा अर्थ आपण एक घोट पिलेलं पाणी, पोटामध्ये जाऊन बसतं, शरीरात शोषलं जातं, रक्ताबरोबर संपूर्ण शरीराचा प्रवास करतं ... आणि किडनीमध्ये हृदयातील रक्तदाबापेक्षा जास्त दाब देऊन ते गाळले जातं ... एका घोटासाठी शरीराला एवढा उद्योग परिश्रम करावे लागत असतील तर आपण शरीराला आवश्यकता नसताना तहान लागली नसताना, केवळ किडनी फ्लश ... वॉटर थेरपी. हायड्रेशन अशा चुकीच्या प्रोपोगंडा पोटी गरजेपेक्षा खूप जास्त पाणी पीत असतो !
असे खूप जास्त पाणी पिल्यामुळे पचनक्षमता कमी होणे, ॲसिडिटी जळजळ मळमळ होणे, अतिसार म्हणजे जुलाब होणे, अंगावर सूज येणे, सर्दी होणे, छातीत कफ होणे, घशात कफ साठणे, कान फुटणे कानात पू होणे ... असे शरीरात पाणी साठण्याचे आजार होतात !!
जगातली कुठलीही सर्वाधिक निरोगी माणसाची किडनी सुद्धा, एका मिनिटाला साधारण एक एम एल ... इतकंच मूत्र तयार करते !!!
त्यामुळे 24 तासात कितीही प्रयत्न केला, तरी जास्तीत जास्त चौदाशे चाळीस मिली म्हणजे साधारण दीड लिटर इतकी मूत्र प्रवृत्ती होणे हे स्वाभाविक नैसर्गिक आहे.
त्यापेक्षा अधिकचे काम किडनीला करायला लावणे , हे अनैसर्गिक व आरोग्यनाशक आणि किडनीची क्षमता कमी करणार आहे.
आपण किडनीला बळजबरीने काम करायला लावल्यासारखे आहे! बैलाला झेपणार नाही एवढं ओझं बैलगाडीत घालून, बैलाला चढावर चढायला लावून, त्याला चाकाचे फटकारे देत ... ते ओझं वाहायला लावण्यासारखं आहे.
शरीराला कुठल्याही ऋतूमध्ये साधारणता दीड लिटर अधिक उणे 10% इतक्या पाण्याची गरज असते म्हणजे उन्हाळ्यात दीड लिटरपेक्षा दीडशे दोनशे मिली जास्त आणि थंडीमध्ये दीड लिटर पेक्षा 150 200 मिली कमी असे ... साधारणपणे जाणावे.
तर आधी सांगितलं त्याप्रमाणे पाण्याचं सुद्धा पचन व्हावे लागते ...
आपण जे नेहमीचं टॅप वॉटर , रूम टेंपरेचरला असलेले पाणी पितो ... त्या पाण्याचे पचन होण्यासाठी दोन याम म्हणजे "सहा तास लागतात" 😳😱
शृतशीत = उकळून गार केलेले पाणी असेल बॉईल्ड अँड कूल्ड तर असे पाणी पचन होण्यासाठी , एक याम म्हणजे तीन तास लागतात...
आणि जर पाणी खळाखळा उकळून निम्मे किंवा एक तृतीयांश किंवा एक चतुर्थांश आटवले (reduce) असेल , तर असे पाणी गरम गरम पिले असता ... अशाही पाण्याचे पचन होण्यासाठी अर्धा याम म्हणजे दीड तास लागतो !!!
याचाच अर्थ आपण ढसाढसा घडाघडा पाणी पिलं, म्हणजे ते बेसिनमध्ये ओतल्याप्रमाणे , किडनीतून फ्लश होईल , हा गैरसमज काढून टाका आणि ...
1.
जेवताना दर चार घासांनंतर थोडं थोडं घोट घोट सिप बाय सिप पाणी प्या
2.
जेवणाच्या शेवटी पुरेसं पाणी प्या आणि
3.
दिवसभरात एकूण पाण्याचं प्रमाण हे दीड लिटर (1500ml) च्या आसपास राहील, अशी सवय स्वतःला लावा
👆🏼
हे तुमच्या फक्त पचनाच्याच नव्हे, तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी हितकारक आहे...
पाणी या विषयाबाबत चरकसंहिता सुश्रुत संहिता अष्टांग हृदय भावप्रकाश या सर्व ग्रंथांमध्ये अतिशय सविस्तर आणि सोप्या शब्दात माहिती दिलेली आहे ...
ती क्रमशः पाहूया, पुढील काही लेखांमध्ये
तोपर्यंत ...
भोजन विधीशी संबंधित ,
पूर्वप्रकाशित लेख , खालील दिलेल्या लिंक चा उपयोग करून , हळूहळू वाचून घ्या ... जेणेकरून मूळच्या श्लोकाची संगती लक्षात येईल🙏🏼
पुनश्च हरिः ॐ !!!
1
काहीही खा! कसंही खा! कितीही खा! कधीही खा! मजा करा !! ऐश करा !!! 🙃😇😃
👇🏼
https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_23.html
*ड्राय फ्रुट खावेत , ड्राय नट्स नव्हे ... स्निग्ध पदार्थांचे भोजनातील प्रमाण* 😇
👇🏼
https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_24.html
मटण रेड मीट Red Meat याच्यामध्ये कोलेस्टेरॉल असते , असा बागुलबुवा भीती अपसमज गैरसमज प्रवाद समाजामध्ये पसरलेला आहे ...
👇🏼
https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/red-meat.html
*भोजन करण्याची योग्य रीत = जेवण्याची उचित पद्धत* 😇
👇🏼
https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_89.html
*भोजन कसे करावे? जेवताना कसे जेवावे? Dining Table Etiquettes?* 😇
👇🏼
https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/dining-table-etiquettes.html
*भोजन करताना कोणत्या क्रमाने कोणत्या चवीचे पदार्थ खावेत ? Sweet Dish Dessert कधी खावेत?*
👇🏼
https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/sweet-dish-dessert.html
नैवेद्य समर्पण आणि राजासाठीचे भोजन
👇🏼
https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_28.html
शुचि सुसंस्कृत गुप्त अन्न म्हणजे काय?
👇🏼
https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_63.html
काय कधी किती कसे खावे? / खाऊ नये?
👇🏼
https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_75.html
पचनशक्ती अन्नग्रहणक्षमता अग्नि भूक क्षुधा
👇🏼
https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_30.html
प्रीपेड मोबाईलचा रिचार्ज = जितनी चाबी भरी राम ने , उतना चले खिलौना !
👇🏼
https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_53.html
*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।*
आणि
*न पीडयेत् इंद्रियाणि*
हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.
_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_
त्वदीय वस्तु गोविंद
तुभ्यम् एव समर्पये ।
तेरा तुझको अर्पण
क्या लागे मेरा ।
श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।
🙏🏼
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/
No comments:
Post a Comment