https://youtube.com/clip/UgkxZIP3b3GVU9oJrjRfrElxqmNVamKfnQ6a?si=z5ia_KkHAdCh89PT
Or click this link
https://youtu.be/cMgEjB-qO2I?si=lGQ04AdSsX5hiOR5
👆🏼
इंजिनिअरिंग क्यूं किया?! ... 🫏
आयुर्वेद में भी ऐसे 🫏 होते है
👇🏼 https://www.facebook.com/share/p/1D9pSPUZCc/
थ्री इडियट मध्ये करीनाचा होऊ घातलेला पती सुहास बद्दल आमिर खान म्हणतो की, "पहले इंजिनिअरिंग किया , फिर अमेरिका जा के एमबीए किया और अब बँक मे नौकरी कर रहा है... अगर बँक मे ही नौकरी करना था, तो इंजिनियरिंग कायकू किया?"
जर संहितेमध्ये एमडी करून, रसशास्त्राचीच भलामण करायची असेल, रसशास्त्राचीच प्रॅक्टिस करायची असेल, तर संहितेत एमडी केलंच कशासाठी?
चरकस्तु चिकित्सिते म्हणायचं , चरकाच्या ज्वर चिकित्सा सूत्रावरती दीड तास लेक्चर द्यायचं आणि ज्वराचा पेशंट आला की त्याला ट्रिकी द्यायची आणि स्वतःचं जय मंगल करून घ्यायचं, हा किती स्वतःलाच फसवण्याचा दांभिकपणा आणि दुटप्पीपणा आहे!?
येन केन प्रकारेण, काहीही करून, पेशंटला माझ्याकडूनच बरं वाटलं पाहिजे, असा हट्टाग्रह करण्यासाठी, म्हणून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्यांनी , स्वतःला वैद्य म्हणून घेणाऱ्याने, रसकल्प वापरण्यासाठी पळवाट शोधणे, असं करण्यापेक्षा स्वतःला आर एम पी RMP म्हणवून घ्या, स्वतःला वैद्य किंवा आयुर्वेद प्रॅक्टिस करणारा म्हणवून घेऊ नये ...
आणि आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो असं म्हणायचं असेल, स्वतःला वैद्य म्हणायचं असेल, तर मग त्या माणसाने रसकल्प किंवा आयुर्वेदाच्या बाहेरच्या गोष्टी (योगा मंत्र नाडीपरीक्षा गर्भसंस्कार विद्ध वर्म मर्मचिकित्सा) वापरू नये ... तितकी कट्टरता शुद्धता आपल्या आचरणात ठेवायला हवी
स्वतःला वैद्य म्हणून घ्यायचं आयुर्वेद प्रॅक्टिस करतो म्हणायचं ... आणि रसकल्प वापरायचे हे म्हणजे किराणा दुकान चालवणाराने आत मध्ये केस कापण्याचा व्यवसाय करण्यासारखं आहे ...
शुद्ध शाकाहारी भोजनालय अशी पाटी लिहून उकडीचे मोदक देण्या ऐवजी चिकन मोमोज आणि खिमा पाव विकण्यासारखं आहे
येन-केन प्रकारेण, काहीही करून, माझ्याकडे आलेला पेशंट मी सोडणारच नाही, यासाठी मला जमत नसल्यामुळे, मी संहितोक्त कल्प सोडून, आयुर्वेदाच्या नावाखाली ... रसकल्प विद्ध वर्म मर्म योगा मंत्र असलेही अन्य कुठलेही उपचार बिनदिक्कत करेन, अशी जर वृत्ती असेल तर, स्वतःला आयुर्वेद वैद्य किंवा त्याचा प्रॅक्टिशनर असे म्हणवून न घेता, स्वतःच्या दुकाना वरती "ट्रीटमेंट मॉल / ट्रीटमेंट मार्ट" असे टायटल लावावे आणि स्वतःची डिग्री सगळोपॅथी पाॅलीपॅथी गोधडी वाकळ भेळ मिसळ गाठोड अशी लिहावी, हे बरे!
बरं ... संहितोक्त कल्प सोडून रसकल्प वापरण्याचं पुन्हा समर्थन करायचं की, रसशास्त्रातील द्रव्यांचा चरकामध्ये उल्लेख आहे, मग ते अगदी वेदांपासून तर आत्तापर्यंतचे सगळे संदर्भ द्यायचे, किती द्रव्य किती वेळेला उल्लेख केलेले त्याचा डाटा द्यायचा!
अरे पण, चरका मध्ये मांसाचे प्रकार दिलेत , मग तुम्ही उद्या मांस विक्रीचे दुकान थाटणार का? चरका मध्ये वास्तुविद्या कुशल असा शब्द आलाय, म्हणून मग तुम्ही आर्किटेक्टचं काम करणार का किंवा इंटिरियर डिझायनरचं?!
चरकामध्ये महानस शब्द आलाय, मग तुम्ही पोळ्या लाटण्याचं स्वयंपाक करण्याचं काम करणार का चार घरांमध्ये जाऊन ??? किंवा एखादी नाश्त्याची गाडी लावणार का रस्त्याच्या कडेला???
एखाद्या गोष्टीचा चरका मध्ये उल्लेख आहे म्हणजे आपल्याला त्याचा व्यवसाय व्यापार धंदा दुकान चालवण्याचं परमिट मिळालं, असा अर्थ होतो का??? नाही ना!?
तरीही, ते सत्त्वावजयवाल्यांनी दुकान चालू केलेलं आहेच! मनाच्या उपचारांबाबत चरक म्हणतो, "तद्विद्य सेवा" म्हणजे ज्याला सत्त्व याविषयी कळतं, त्यांचं मार्गदर्शन घ्या = त्यांच्याकडे रेफर करा ... पराधिकारेषु न विस्तरोक्तिः!!! ... तर यांनी सत्त्वावजय आयुर्वेदातच कोंबला !!!
अशी कोंबाकोंबी झोंबाझोंबी रसशास्त्र नाडीपरीक्षण विद्ध सुवर्णप्राशन शिरोधारा जानुबस्ति हृद्बस्ति कटीबस्ति, सर्विक्सच्या पलीकडे गर्भाशयाच्या आत दिला जाणारा दोन एम एल चा उत्तर बस्ति, जगातल्या सगळ्या रोगांवर एकमेव रामबाण उपचार असलेला अत्यंत चमत्कारपूर्ण अग्निकर्म, गर्भसंस्कार सौंदर्यशास्त्र केस आणि त्वचा यांची मेकप उत्पादन खपवण्याचा उद्योग ... हे सगळं आयुर्वेदात कोंबणं सुरूच आहे!!!
आपण जर संहितेमध्ये एमडी केलेले आहे किंवा
संहितेतले एमडी राहू द्या, पण आपण संहिता वाचून बीएएमएस शिकलेलो आहोत ... बी एम एस डिग्री राहू द्या , पण आपण संहिता वाचून आयुर्वेद शास्त्र शिकलेलो आहोत ... संहितेत लिहिलेल्या हेतुस्कंध आणि लक्षणस्कंध यापलीकडे आयुर्वेदातलं निदान अस्तित्वात नाहीये ... योग्य निदानाविना औषध सुचणं शक्य नाहीये ... असं असताना ज्या संहिता ग्रंथांमध्ये पेशंटचे हेतुस्कंध पेशंटचे लक्षणस्कंध लिहिलेले आहेत, त्याच संहिता ग्रंथात लिहिलेल्या त्याच हेततलक्षणांसाठी लिहिलेल्या औषध स्कंध चा उपयोग करून पेशंटला बरा करता येणं ही नैतिकता आहे स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे obvious आहे ऑफकोर्स आहे ...!
"असं सरळ साधं सहज सोपं असताना" ... ज्या ग्रंथांमध्ये हेतुस्कंध लक्षण स्कंध यांचा उल्लेखच नाही, ज्या औषधांची भैषज्य कल्पना ही आयुर्वेदाच्या 5विध कषाय कल्पनांशी आणि संयुक्त कल्पनांशी अजिबात सुसंगत नाही, उलट टोकाची विसंगत आहे, अशा ग्रंथांमधली जादूगिरी ची किमयागिरीची औषधं म्हणजे रसकल्प हे आयुर्वेदाचेच आहेत, असं "मुरगळून" वापरायचं आणि आपण आयुर्वेद करतो, असं स्वतःला समाधान द्यायचं आणि लोकांना सांगायचं, ही पेशंटशी केलेली प्रतारणा वंचना फसवणूक आणि लुबाडणूक आहे, दिशाभूल आहे !!!
रसशास्त्र हे कुठल्याही प्रकारे आयुर्वेदाचा भाग नाहीच्च!!!
1
आयुर्वेदाची दैवी परंपरा आणि रसशास्त्राची आदि परंपरा या भिन्न आहेत
2
आयुर्वेदातले द्रव्याचे वर्गीकरण आणि रस शास्त्रातील द्रव्यांचे वर्गीकरण यांचा एकमेकांशी कुठेही मेळ बसत नाही
3
आयुर्वेदात औषध तयार करण्याच्या मूलभूत 5विध कषाय कल्पना व संयुक्त कल्पना आणि एकूणच भैषज्य कल्पनांचा मूलाधार हा "जलामध्ये औषध उकळणे (water extract)" या स्वरूपाचा आहे. रसशास्त्रामध्ये अशाप्रकारे जला मध्ये उकळलेली औषधे आणि त्यांचा जलामध्ये आलेला एक्सट्रॅक्ट अशी कल्पनाच नाहीये ...
त्यामुळे रसशास्त्रातल्या चार दोन द्रव्यांचा, आयुर्वेदाच्या संहिता ग्रंथात जुजबी नाममात्र उल्लेख असला म्हणजे आपल्याला रसशास्त्र वापरण्याचा सातबारा कुलमुखत्यारपत्र पाॅवर ऑफ ॲटर्नी मिळते , असे जे लंगडं जस्टिफिकेशन केलं जातं ते स्वतःच्या तेजोहीनतेचं दुर्बलतेच अगतिकतेचं आणि भणंग दरिद्रीपणाचं प्रतीक आहे!!!
एखादी गोष्ट बीएमएस कोर्समध्ये आहे म्हणजे ती आयुर्वेद शास्त्रात आहे असा अर्थ अजिबात होत नाही
एखादी गोष्ट औषध म्हणून वापरण्याचा आपल्याला शासकीय कायद्याने परवाना आहे म्हणजे ते नैतिक असतंच असं नाही !!!
मद्यविक्री, तंबाखू विक्री, देहविक्रय याही बाबींना शासकीय कायद्याने परवानगी आहे, पण म्हणून ते नैतिक आहे असं होत नाही.
बी ए एम एस डिग्री च्या सिल्याबस मध्ये आहे आणि शासकीय कायद्याने परवानगी आहे असे असूनही, जर आपण मॉडर्न मेडिसिन वापरणाऱ्याला अशुद्ध आयुर्वेद म्हणत असू, तर मग रसशास्त्र वापरणे हेही तितकंच अनैतिक आहे
रसशास्त्र वापरणं हा आयुर्वेद शास्त्राशी विश्वासघात फितुरी गद्दारी आहे
संहितोक्त कल्प देऊन पेशंट बरा होत नाही, म्हणून रसशास्त्रातलं औषध द्यावंच लागतं असं आमच्या काही सन्मित्रांचं जस्टिफिकेशन आहे!
बरं, रसशास्त्रातला औषध देऊन पेशंट बरा "होईलच" याची काय शंभर टक्के गॅरंटी आहे का?
समजा एखाद्या पेशंटला रस शास्त्रातलं औषध देऊनही तो बरा नाही झाला तर मग काय करता!? मॉडर्न कडे रेफर करताच ना!? किंवा तो पेशंटच तुम्हाला सोडून लाथ घालून मॉडर्न कडे स्वतःच निघून जातो ... जातो ना!? वस्तुस्थिती मान्य करा ना!?
मग संहिता कल्पां बाबतच्या तुमच्या ज्ञानाच्या मर्यादामुळे किंवा चला क्षणभर तुमच्या समजूतीसाठी मान्य करू की, संहितोक्त कल्पांच्या सामर्थ्याच्या मर्यादेमुळे, पेशंट नाही बरा झाला ... आणि त्याला तुम्ही मॉडर्न रेफर केलं ... तर काय फरक पडेल असा !?
दादरला उतरून सीएसटी ला गेलात काय आणि माटुंगाला उतरून सीएसटी ला गेलात काय ... तर असं काय मोठा फरक पडणार आहे???
रसशास्त्र हा आयुर्वेदाचा भाग नाही, हे स्वतःच्या बुद्धीला सहजपणे पटत असताना सुद्धा, तसं स्पष्टपणे मान्य करण्याची धमक हिम्मत धैर्य धाडस सामर्थ्य तेज आपल्यात का असू नये!?
आणि जर रसशास्त्र मुरगळून आयुर्वेदात कोंबायचंच असेल ... तर मॉडर्न ने काय अपराध केलाय??
आयुर्वेदाच्या तत्त्वांची विसंगत असलेले रसकल्प आपल्याला चालत असतील पेशंट बरा व्हायचाय म्हणून, तर मग मॉडर्न ने तर नक्की पेशंट बरा होणारेय रसकल्पांच्या तुलनेत ... मग, ते मॉडर्न स्वीकाराला काय हरकत आहे!? पण नाही ... मॉडर्न चं नाव काढलं की तो आयुर्वेदाचा वैद्य हा शास्त्रद्रोही झाला अस्पृश्य झाला अशुद्ध आयुर्वेद झाला इंटिग्रेटेड झाला
आणि रसशास्त्राशी हातमिळवणी करून आयुर्वेदाशी गद्दारी फितुरी करता आहात, तो विश्वासघात नाहीये प्रतारणा नाहीये !?
एकदा शांतपणे बसा आणि खरं खरं काय आहे ते फक्त स्वतःला उत्तर द्या ... जाहीर रित्या नाही दिले तरी चालेल !!!
उलट रसशास्त्र हा आयुर्वेदाचा भाग नसल्यामुळे, रस शास्त्राला स्वतंत्र शास्त्र म्हणून मान्यता मिळावी, त्याची स्वतंत्र कौन्सिल असावी, AYUSH आयुष मध्ये जसं, A आयुर्वेद Y योग U युनानी S सिद्ध H होमिओपॅथी, सोवा रिग्पा असे अनेक प्रकार आहेत चिकित्सांचे ... तसे "रस शास्त्र नावाचं एक अजून मेडिसिन सायन्स = चिकित्सा शास्त्र" समाविष्ट करायला सांगावे. त्यामुळे रसशास्त्राला स्वतंत्र ओळख मिळेल, स्वतंत्र अस्तित्व मिळेल ... त्याचा आयुर्वेदावरचं अवलंबित्व नष्ट होईल ... उलट यामध्ये रसशास्त्राचंच चांगभलं आहे, कल्याणच आहे!!!
Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है
डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.
Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.
No comments:
Post a Comment