गर्भसंस्कार : मर्यादा व वस्तुस्थिती : मराठी भाषा 😇🤔⁉️🤫🫣🫢🙃🤦♂️🤷🙆
सुवर्ण प्राशन या अशास्त्रीय परंतु आकर्षक व यशस्वी मार्केटिंग केल्या गेलेल्या उद्योगाप्रमाणेच दुसरा "लोकप्रिय व फोफावणारा उद्योग" म्हणजे "गर्भसंस्कार"
चरक आणि सुश्रुत यात उल्लेखित गर्भिणी परिचर्येशी अजिबात साम्य/संबंध नसलेला आणि जो आपला अधिकार नाही, त्या मंत्र योग यांच्या आधाराने "सजवलेला" गर्भसंस्कार ... हाही उद्योग याच प्रकारचा आहे
Pregnancy is not a disease... it is a celebration of life !!!
गर्भावरती काही संस्कार होऊ शकतात ही गोष्टच मुळात अशास्त्रीय आहे. ठीक आहे की, शारीरिक प्रशस्ती किंवा शरीराशी संबंधित काही अवयव यांची उत्तम स्थिती यासाठी गर्भिणीला काही उपचार करणे, हे शक्य आवश्यक आणि काही प्रमाणात शास्त्रीय आहे.
परंतु गर्भसंस्कार केल्यामुळे बुद्धी स्मृती अशा अशारीरिक अमूर्त बाबी अपेक्षित पद्धतीने वाढवता येतात/ चांगल्या करता येतात ; अशा प्रकारचा प्रचार मात्र अवास्तव, अशास्त्रीय आणि मार्केटिंगच्या अंगाने केवळ धनार्जनासाठी केला जाणारा स्वार्थी आणि दिशाभूल करणारा उद्योग आहे.
मुळात आयुर्वेद शास्त्रामध्ये गर्भसंस्कार असा शब्द किंवा विधी कुठेही उल्लेख केलेला नाही
गर्भिणी परिचर्या असे वर्णन सविस्तर उपलब्ध आहे ज्यामध्ये अगदी गर्भधारणे पूर्वीपासून तर प्रसूती होऊन बाळाला दूध पाजेपर्यंत, सर्व कालावधीसाठी, सविस्तर आहार विहार विषयक मार्गदर्शन आहे.
परंतु यात कुठेही योगासने व्यायाम ध्यानधारणा मंत्र आणि अगदी तुरळक अपवाद वगळता औषधे यांचा उल्लेख किंवा मार्गदर्शन नाही.
आयुर्वेद शास्त्राच्या तीनही ग्रंथांमध्ये ज्या पद्धतीची गर्भिणी परिचर्या सविस्तर वर्णन केलेली आहे, प्रत्येक महिन्यासाठी ... त्या पद्धतीने आज कोणी वैद्य आपल्या गर्भिणी असलेल्या पेशंटला सांगत असेल, असे वाटत नाही ... आणि एखादा वैद्य तसे सांगत असला, तरी त्या प्रकारच्या आहारीय बाबी आजचा पेशंट सलग नऊ महिने, त्या क्रमाने सेवन करेल, ही शक्यता फारच धूसर आहे.
त्यामुळे आयुर्वेदात ग्रंथात संहितांमध्ये वर्णन केलेली गर्भिणी परिचर्या, जी मासानुमासिक म्हणजे प्रत्येक महिन्यासाठी वेगवेगळी आहे, ती प्रॅक्टिकली आज अवलंबिली जाते असे नाही !!!
याउलट आयुर्वेद शास्त्र शिकलेले असताना किंवा बी ए एम एस किंवा एमडी आयुर्वेद ही डिग्री घेतलेली असताना, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला अधिकार अनुभव ज्ञान प्रमाणपत्र शासकीय अनुमती समाज मान्यता यापैकी काहीही नाही, अशा मंत्र योगासने ध्यान धारणा व्यायाम याबाबत , "गर्भसंस्कार" या आर्थिक फायद्याच्या उद्योगांमध्ये, समाजातील आई होऊ घातलेल्या would be mother अशा स्त्रियांना, त्यांच्या भावनिक दुर्बलतेचा हळवेपणाचा इमोशनल vulnerabilityचा गैरफायदा घेऊन, त्यांना त्यात गुंतवणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे/ मिळवणे, हे नैतिकदृष्ट्या योग्य नव्हे !!!अभिमन्यूला किंवा अष्टावक्राला किंवा मच्छिंद्रनाथांना गर्भामध्ये ज्ञान प्राप्त झाले ह्या पुराणातल्या कथा आहेत, ज्या श्रद्धेसाठी म्हणून ठीक आहे ! परंतु वास्तवात शास्त्रीय दृष्टीने असे काहीही होत नाही.
आणि खरोखरच कुठल्याही आईला तिच्या होणाऱ्या अपत्याचे जीवन अभिमन्यू किंवा अष्टवक्र किंवा मच्छिंद्रनाथ यांच्याप्रमाणे असलेले चालणार आहे का???
पहिला व्यावहारिक स्पष्टीकरणाचा भाग म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर , आपली सर्व इंद्रिय बुद्धी ही व्यवस्थित काम करीत असताना देखील, वयाच्या साधारण तीन साडेतीन वर्षापर्यंतच्या , कुठल्याही स्मृती आपल्याला पुढील आयुष्यात शिल्लक राहत नाहीत!!!
वयात जन्मापासून वयाच्या तीन साडेतीन पर्यंत, आपण स्वतः पाहिलेले ऐकलेले अनुभवलेले शिकलेले आपल्याला शिकवलेले असे कोणतेही बुद्धी स्मृती विषयक विषय मोठेपणी शिल्लक राहत नाहीत!!
असे असेल तर , आपण जन्माला येण्यापूर्वी , जेव्हा आपली इंद्रिय बुद्धी ही सुप्त किंवा अ-जागृत अवस्थेत असतात, त्या काळात आईने ऐकलेल्या पाहिलेल्या अनुभवलेल्या केलेल्या गोष्टींमुळे, आपल्या बुद्धी आणि स्मृतीमध्ये बदल सुधारणा वाढ होईल, ही गोष्ट ... साध्या , न शिकलेल्या माणसाला सुद्धा न पटणारी आहे, सहज समजणारी आहे !!!
असे असताना आपण आपली बुद्धी शिक्षण बाजूला ठेवून, गर्भसंस्कार नावाच्या गोष्टीला बळी पडतो, हा अशिक्षितपणा आहे , निरक्षरपणा आहे, अडाणीपणा आहे!!!
याबाबत ... दुसरे शास्त्रीय स्पष्टीकरण असे की आयुर्वेदाच्या संहितांमध्ये, असे स्पष्टपणे लिहिलेले आहे की, जीवनाच्या सुरुवातीला आणि जीवनाच्या शेवटी म्हणजे जन्म आणि मृत्यू यावेळी , महत्तम = मोठा अंधार अशा स्वरूपाचा *मोह म्हणजे अज्ञान*, या प्रकारचा ज्वर येतो, जो मागील जन्मातील सर्व बुद्धी स्मृती या पुसून टाकतो ... *मोहस्वभावाद् एव अन्यजन्मजं कर्म प्राणी न स्मरति।* याचा अर्थ बाळाच्या जन्मापूर्वी , ते बाळ गर्भात असताना , आपण कोणतेही संस्कार केले , तरीही ते शरीरापुरते उपयोगी होऊ शकतात , परंतु ते बुद्धी स्मृती या अर्थाने लाभदायक होऊ शकत नाहीत!!!
संस्कार या नावाने पुंसवन हा संस्कार आयुर्वेद ग्रंथांमध्ये लिहिलेला आहे, परंतु पुंसवन या संस्कारावरती आज गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याने बंदी आहे, त्यामुळे गर्भसंस्कार यामध्ये, संस्कार या नावाने, निश्चितपणे उल्लेखित असलेला , पुंसवन संस्कारच शासकीय दृष्ट्या आज बंदी खाली आहे !!! त्यामुळे अजून इतर कुठला संस्कार , गर्भसंस्कार या नावाने करता येईल, अशी शास्त्रीय शक्यता निश्चितपणे नाही
आयुर्वेदात संहिता ग्रंथात गर्भिणीसाठी नऊमासांचे क्रमानुसार सांगितलेले आहार
महिना : आहार
प्रथम : मधुर शीत द्रव आहार
द्वितीय : मधुर शीत द्रव आहार
तृतीय : मधुर शीत द्रव आहार, साठे साळीचा भात आणि दूध
चतुर्थ : साठे साळीचा भात आणि दही, दुधातून काढलेले लोणी आणि बकरीचे मांस शेळीचे मटण
पंचम : साठे साळीचा भात आणि दूध , दुधातून काढलेले तूप
षष्ठ : साठे साळीचा भात आणि तूप, गोखरू सिद्ध तूप किंवा कढण पेज
सप्तम : औषधि सिद्ध तूप किंवा कढण पेज
अष्टम : बस्ति काढायचा आणि तेलाचा असे दोन्ही प्रकारचे
नवम : स्निग्ध पेज कढण, मटण
वरील प्रमाणे प्रत्येक महिन्याचा आहार जर सुचवला जात असेल, तर तो निश्चितपणे शास्त्रीय आहे, असे जाणावे
परंतु, असा आहार न सुचवता , मंत्र योगा व्यायाम आसने मेडिटेशन , असे "हॅपनिंग" उद्योग , या गर्भसंस्कार उपक्रमात चालत असतील, तर तो आयुर्वेदाचा भाग नसून, ते आयुर्वेदाच्या अधिकाराच्या स्कोपच्या आवाक्याच्या बाहेरचं , काहीतरी वेगळंच चालू आहे, असे जाणावे
*गर्भाशयातील बाळाला रक्तपुरवठा कमी पडत होता असे सोनोग्राफी मध्ये कळाले. ही एक गंभीर बाब आहे. याला Placental Insufficiency असे म्हणतात. ही केस आयुर्वेद उपचारांनी1 महिना7 दिवसांत बरी झाली. सोबत दोन्ही रिपोर्ट जोडले आहेत. पेशन्ट व त्यांचे कुटुंबीय यांनी ठेवलेला संयम व विश्वास याबद्दल त्यांचे आभार!
https://www.facebook.com/share/p/161VpxC2ou/
Placental Insufficiency:*
Placental insufficiency (also called placental dysfunction or uteroplacental vascular insufficiency) is an uncommon but serious complication of pregnancy. It occurs when the placenta does not develop properly, or is damaged. This blood flow disorder is marked by a reduction in the mother's blood supply.
👆🏼
Corrected within 1month 1 week by Ayurveda Treatment
www.MhetreAyurved.com
Clinics @ Pune & Clinic
97A Patil Plaza Mitramandal Chauk Near Sarasbag PUNE
DK Nagar Gangapur Road near Prasad Mangal Karyalaya NASHIK
#ayurveda #health #ayurved #nashik #nasik #pune #placentalinsufficuency #lowbloodflowpregnacy
Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है
डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.
Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.
No comments:
Post a Comment