चय प्रकोप प्रशम = पुनर्विचार पुनर्मांडणी ... दोष संबंधित ऋतू आणि अष्टांग संग्रहातील विशिष्ट संदर्भ या अनुषंगाने
लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
🤔⁉️
दोषोपक्रमणीय हा अध्याय अनेकांना माहिती असतो. हा अष्टांग हृदय सूत्रस्थान 13 येथे वर्णन गेला आहे ... याचे मूळ उगमस्थान चरक विमान मध्ये आहे तेथील गद्य परिच्छेदाचे अष्टांग हृदयामध्ये पद्य रूपांतर झालेले आहे
परंतु चरक आणि अष्टांगहृदय या दोन्ही मध्ये नसलेली *एक विशेष गोष्ट* अष्टांग संग्रहाच्या सूत्र स्थानाच्या 21व्या अध्यायात दोषोपक्रमणीय या अंतर्गत येते ती म्हणजे ...
✨ कफाचा उपक्रम वसंत ऋतूप्रमाणे सांगितलेला आहे ... अर्थात कफाचा प्रकोप वसंत ऋतूत होत असल्यामुळे कफदोषाचा उपक्रम वसंत ऋतूप्रमाणे असणे हे स्वाभाविक आणि सुबोध आहे
1️⃣
परंतु वाताचा प्रकोप वर्षा ऋतूत होतो असे असूनही, वाताचा उपक्रम हा हेमंत ऋतुचर्यप्रमाणे सांगितलेला आहे
2️⃣
आणि पित्ताचा प्रकोप शरद ऋतूत होतो, असे असूनही ... पित्ताचा उपक्रम ग्रीष्म ऋतुचर्येप्रमाणे सांगितलेला आहे
3️⃣
खरं पाहता ग्रीष्म हा तीक्ष्ण उष्ण अशा गुणांचा ऋतू असल्यामुळे तोच खरंतर पित्तप्रकोपाचा ऋतू असायला हवा ...
कारण त्याच्या आधीही वसंत ऋतूत उष्णता वाढलेलीच असते आणि ग्रीष्मानंतर येणारा वर्षा ऋतू हा जलप्रधान 🌧️असल्याने तो अग्नि🔥 प्रधान पित्ताचे निश्चितपणे शमन करेलच!
4️⃣
त्याचप्रमाणे हेमंत (व शिशिर) ऋतू हा शीत रूक्ष असल्याने त्यात वाताचा प्रकोप होणे निश्चितपणे शक्य आहे आणि त्यानंतर येणारा वसंत ऋतू हा उष्ण असल्याने त्यात वात शमन होणे, हे अगदीच योग्य आहे
5️⃣
तर आयुर्वेदात वर्णन केलेले दोषांचे चयप्रकोप्रशम आणि ऋतू यांचा संबंध एकदा पुनर्विचार आणि पुनर्मांडणी करण्याजोगा आहे ...
अष्टांग संग्रहातील व्यावहारिक अभिनव आणि विलक्षण संदर्भाच्या आधारे
आणि प्रत्यक्ष वर्षभरात ऋतूनुसार जे पेशंट येतात त्यानुसार प्रत्येक वैद्याला येणाऱ्या अनुभवानुसार सुद्धा!
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट © लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/
Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है
डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.
Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.



No comments:
Post a Comment