कॉन्स्टिपेशन🚽 ॲसिडिटी 🔥होण्याची अन्नपचन न होण्याची खूप जास्त पाणी 🌧पिणे अवेळी ⌚️खाणे आणि इतर कारणे
अत्यम्बुपानाद्विषमाशनाद्वा सन्धारणात् स्वप्नविपर्ययाच्च ।
कालेऽपि सात्म्यं लघु चापि भुक्तमन्नं न पाकं भजते नरस्य ।।
ईर्ष्याभयक्रोधपरिक्षतेन लुब्धेन शुग्दैन्यनिपीडितेन ।
प्रद्वेषयुक्तेन च सेव्यमानमन्नं न सम्यक् परिणाममेति ।।
*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 188*
9 एप्रिल 2025, सोमवार
*उपविभाग 130*
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/
नमस्कार 🙏🏼💐
काले सात्म्यं लघु स्निग्धम् उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।
बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् मात्रावद् विदितागमः ॥
आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत होतो!
प्रदीर्घ कालावधीनंतर आपण हा उपक्रम पुन्हा सुरू करत आहोत, तर वरील श्लोकाच्या अनुषंगाने पूर्वी पोस्ट केलेल्या सर्व लेखांच्या लिंक, आजच्या लेखाच्या शेवटी दिल्या आहेत. त्या क्रमशः वाचून घ्याव्यात... ते वाचून झाल्यानंतर आपण पुन्हा याच श्लोकाकडे परत येऊया ... म्हणजे विषयाची सुसंगती लागेल !!!
पाणी कधी कसे किती प्यावे याबाबत आपण शास्त्रीय संदर्भानुसार मागील लेखात सविस्तर पाहिले
https://mhetreayurved.blogspot.com/2025/03/blog-post_2.html
आणि ते अतिशय सुबोध आणि व्यावहारिक म्हणजे सहज कळण्याजोगे आणि प्रॅक्टिकली आचरणात आणण्याजोगी आहे प्रत्येकासाठी प्रतिदिनी
खूप पाणी प्यावे, वॉटर थेरपी, सारखे सारखे पाणी प्यावे, दिवसभरात सात-आठ लिटर पाणी प्यावे ... असेही अपसमज समाजात दृढ आहेत
परंतु पाणी खूप अधिक प्रमाणात, गरजेपेक्षा जास्त प्रमाणात पिल्याने सुद्धा, अन्नाचे पचन होत नाही !!!
अगदी मग ते अन्न सर्व नियम पाळून, योग्य वेळी, सवयीचे सात्म्य असलेले , पचायला हलके ... असे अगदी अनुकूल असले ... तरीही "आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिल्यास" अन्न पचत नाही ...
कारण जल 🌧 हे अग्नीच्या 🔥विरुद्ध आहे, त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी, हे अग्नी = पचनक्षमता यांची बलहानी करते , त्यांची क्षमता कमी करते!
मॉडर्न सायन्सच्या नुसार अन्नपचन जेथे होते तेथे दोन पीएच हायड्रोक्लोरिक ॲसिड (2pH HCl) म्हणजे अत्यंत तीव्र तीक्ष्ण करोजिव्ह असे ॲसिड असते !
जर पाणी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात पिले गेले तर हे ॲसिड डायल्युट होते, त्याचे कॉन्सन्ट्रेशन कमी होते त्यामुळे अन्नपचन हे मंदावते ... म्हणून गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये आणि आवश्यकतेपेक्षा कमीही पाणी पिऊ नये
म्हणूनच मागील लेखात ...
https://mhetreayurved.blogspot.com/2025/03/blog-post_2.html
दर चार-पाच घासांनंतर, आपले तोंड धुतले जाईल, जिभेवरचा अन्नलेप निघून जाईल, तोंड रिंझ होईल इतपतच, घोट घोटभर पाणी, मध्ये मध्ये पीत राहावे आणि "जेवण झाल्यानंतर सुद्धा" युक्तीपूर्वक म्हणजे योग्य प्रकारे, आवश्यक तेवढेच पाणी "पुन्हा प्यावे" हे आचरणात आणण्यास सगळ्यात सोपे आणि आरोग्य टिकवण्यासाठी उपयोगी आहे. ✅️
खूप पाणी पिल्यामुळे जसे अन्नपचन होत नाही ...
तसेच इतरही काही कारणे यासोबतच या श्लोकात सांगितलेली आहेत ... त्यातील पहिले म्हणजे
1.
विषम अशन = विषमाशन = म्हणजे "अकाले बहु च अल्पं वा" म्हणजे a)भूक लागलेली नसताना किंवा b)भूक लागलेली असताना सुद्धा खूप जास्त प्रमाणात आवश्यकतेपेक्षा अधिक किंवा c) खूप कमी प्रमाणात म्हणजे भुकेपेक्षा खूप कमी ...
असे अन्नग्रहण करणे म्हणजे विषमअशन
अकाल याचा अर्थ भूक लागलेले नसताना खाणे ...
म्हणजे वेळ झाली आहे, लंच टाईम आहे, शाळेत जायचं आहे, ऑफिसला जायचं आहे, ड्युटीवर जायचं आहे ... अशा "घड्याळाला बांधलेल्या वेळेला अन्न खाणे" की ज्यावेळेला तुमचे "जैविक घड्याळ = बायोलॉजिकल क्लॉक, भूक लागलेली आहे असे सांगत नसते" ... तेव्हा खाणे हे, अन्नपचन न होण्यासाठी मुख्य कारण आहे
आणि आज सर्रास सगळीकडेच हे घडताना दिसते की भूक लागलेली आहे , त्यावेळेला अन्न खाण्यापेक्षा ... सोयीच्या वेळेला "पोट भरणे / पोटात काहीतरी कसेबसे ढकलणे" असे सर्वत्र चालते
आणि त्यामुळेच आज 90 टक्के लोकांना ज्या पचनविषयक तक्रारी असतात त्या म्हणजे ॲसिडिटी कॉन्स्टिपेशन ... जळजळ मळमळ आंबट कडू तिखट कोरडे ढेकर घशात जळजळ छातीत जळजळ पोटात जळजळ गॅस साठणे गॅस पास न होणे संडासला चिकट होणे संडासला दोन-तीन वेळा जाऊन सुद्धा समाधान न मिळणे संडास खूप कठीण खडे होणे खूप प्रेशर द्यायला लागणे किंवा बोटाने काढावे लागणे संडासच्या जागी खूप आग होणे दुखणे सुजणे बसायला चालायला अवघड होणे , ब्लोटिंग ... या सर्व तक्रारींचे मुख्य कारण म्हणजे "जैविक घड्याळ = बायोलॉजिकल क्लॉक", आपलं शरीर जेव्हा "भुकेचा कॉल" देतं, तेव्हा न खाता ... आपल्या "सोयीनुसार", घड्याळाच्या वेळेनुसार , नैसर्गिक भुकेच्या आधी किंवा नंतर, खूप वेळ अंतर राखून खाणे , हे विषम अशन = अन्नपचन न होण्याचे , आजच्या व्यवहारातले सर्वात प्रमुख कारण आहे ...
दुसरे वेळेवर जेवून सुद्धा ...
जर ते गरजेपेक्षा खूप जास्त प्रमाणात, "जे जे फुकट , ते पौष्टिक" असे म्हणून, लग्नामध्ये रिसेप्शनमध्ये पार्टीमध्ये "आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खाणे कोंबणे, ठूंसना" हे अन्नपचन न होण्याचं अजून एक कारण आहे
याच्यामध्ये मोह आवरता न येणे , हा असंयम किंवा धीर धैर्य नसणे हे मुख्य कारण आहे !
त्यामुळे आवडते ती गोष्ट, प्रमाणापेक्षा जास्त खाणे ... यापेक्षा भूक लागलेली असताना आवडणारी गोष्ट सुद्धा, इच्छे पेक्षा "दोन घास कमी खाणे" हे आरोग्य टिकवण्यासाठी उपयोगी आहे !!!
दुसरा प्रकार म्हणजे भूक लागलेली असताना जेवले परंतु ...
शरीराच्या आवश्यकतेपेक्षा खूप कमी प्रमाणात जेवणे , हे अनेक गृहिणींच्या बाबतीत किंवा अत्यंत बिझी असलेल्या विशेषतः फिरतीचा व्यवसाय असलेल्या लोकांच्या बाबतीत घडते !!!
पोळी भाजी वरण-भात असं सर्व पोषणमूल्य असणारा आहार घेण्याऐवजी , वडापाव सामोसा मोमोज सँडविच रोल कोल्ड्रिंक चहा बिस्कीट क्रीम रोल भेळ पाणीपुरी चाट ... अशा प्रकारचे "अल्पमात्रेतले फास्ट फूड जंक फूड खाणे", हेही पुन्हा "भुकेपेक्षा कमी" प्रमाणात खाल्ले जात असल्यामुळे, अन्नपचन न होण्यासाठी मुख्य कारण ठरते आणि पुन्हा कॉन्स्टिपेशन ते ऍसिडिटी व्हाया ब्लोटिंग अशा अनेक तक्रारी उद्भवतात!
अपचन होण्याची तिसरे मुख्य कारण म्हणजे वेग धारण आपण सध्या जे लेख पाहतो आहोत वाचतो आहोत लिहितो आहोत ते वेग ह्या विषयाशी सुसंगतच आहेत आपण पूर्वी वात अधोवात गॅसेस पुरुष संडास मूत्र लघवी रज मेंसेस या वेगान विषयी नॅचरल कॉल अर्जस याविषयी पाहून सविस्तर झालेले आहे याच तेरा वेगांच्या मालिकेमध्ये आपण शोधा या वेगाच्या अंतर्गत हे सर्व अन्न आहार पचन याविषयीचे लेख वाचत आहोत
2.
अत्यंबुपान = खूप जास्त पाणी पिणे आणि विषमाशन = अवेळी खूप कमी खूप जास्त खाणे ... या दोघांच्या नंतर,
अन्न पचन न होण्याचे तिसरे मुख्य कारण म्हणजे ...
वेग धारण !!!
त्यातही विशेषतः संडास लघवी अधोवात म्हणजे पुरीष मूत्र गॅसेस यांचे नॅचरल कॉल्स अडवणे,
त्याचबरोबर ...
क्षुधा = भूक या वेगाचे धारण करणे म्हणजे भूक लागलेली असताना वेळेवर न जेवणे आणि
क्षुधा या वेगाचे उदीरण करणे म्हणजे भूक लागलेली नसताना सुद्धा उगीचच काहीतरी खात राहणे मंचिंग करणे चघळणे गिळणे ...
या चार वेगांच्या धारणामुळे किंवा उदीरणामुळे म्हणजे त्या वेग = नॅचरल अर्जेस / नॅचरल कॉल चे योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे, याच अन्नमार्गाशी संबंधित असलेल्या अन्नपचनांमध्ये अडथळे येतात ...
अर्थात या व्यतिरिक्त सुद्धा जे वेग आहेत, त्यामध्ये छर्दी म्हणजे उलटी , शुक्र म्हणजे वीर्य सेक्स , क्षवथु म्हणजे शिंक , कास म्हणजे खोकला , उचकी म्हणजे हिक्का, निद्रा म्हणजे झोप, थकल्यानंतर येणारा श्वास सुस्कारा, अश्रू , जांभई म्हणजे जृम्भा ... याही वेगांच्या धारणामुळे किंवा उदीरणामुळे "अन्नपचन नीट होत नाही" ...
अर्थात या वेगां विषयी आपण पुढे सविस्तर पाहूया ... भविष्यात !!!
3.
अन्नपचन न होण्याचे अजून एक मुख्य कारण, जे व्यवहारात आजकाल प्रायः सर्वांच्या बाबतीत आढळते ते म्हणजे *"स्वप्न विपर्यय*' ...
अर्थात , "जेव्हा झोपायला हवे तेव्हा जागरण करणे" म्हणजे रात्री उशिरापर्यंत साडेबारा एक ही तर सध्या सगळ्यांची जणू संध्याकाळची वेळ झालेली आहे व तिथून पुढे दीड दोन अडीच तीन पर्यंत जागरण करत, रील फेसबुक इन्स्टा नेटफ्लिक्स किंवा ओटीटी वरील वेब सिरीज पाहणे ... हे अनेकांच्या बाबतीत सध्या घडत असते
दुसरं म्हणजे "दिवसा झोपणे" ... दिवस हा खरंतर जागं राहून सक्रियपणे विविध उद्योग करणे यासाठी नैसर्गिकपणे योजलेला आहे ...
तरीही आळसामुळे ज्यांना संधी मिळते, ते लोक "दिवसा सुद्धा", दहा-पंधरा मिनिटांच्या "पाॅवर नॅप" पासून तर दोन-तीन तासाची चांगली "ताणून देण्यापर्यंत", झोप घेतात.
दिवसा झोपल्यामुळे शरीरातील सर्व प्रकारच्या क्रिया मंदावतात ... मेटाबोलिक रेट खाली येतो !
त्याच पद्धतीने पचनाची गती सुद्धा मंदावते ... कारण सर्व वाहिन्या ह्या थोड्याफार प्रमाणात संकोच पावतात.
म्हणून,
रात्री जागून वात आणि पित्त वाढवून अन्नपचन बिघडवणे
किंवा
दिवसा कारण नसताना झोपून कफ पित्त वाढवून अन्नपचन बिघडवणे ,
असे होत असते ... म्हणून रात्री जागरण आणि दिवसा झोपणे , या दोन्ही बाबी कसोशीने टाळायला हव्यात
आजच्या लेखाच्या प्रारंभी दिलेल्या श्लोकातील पूर्वार्धामध्ये अन्नपचन न होण्याची ही काही शारीरिक कारणे आपण पाहिली ... ही कारणे जरी अन्नाचे सेवन हे योग्य वेळी, सवयीच्या सात्म्य असणाऱ्या, पचायला हलके असणाऱ्या अन्नाचे केलेले असले ... तरीही अन्नपचन बिघडवतात
याच प्रस्तुत श्लोकाचा उत्तरार्ध ...
अन्नपचन न होण्याची , वैचारिक बौद्धिक भावनिक कारणे स्पष्ट करतो ...
त्याबाबत पुढील लेखात सविस्तरपणे पाहूया
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/
नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत होतो! आज प्रदीर्घ कालावधीनंतर आपण हा उपक्रम पुन्हा सुरू करत आहोत, तर वरील श्लोकाच्या अनुषंगाने पूर्वी पोस्ट केलेल्या सर्व लेखांच्या लिंक, आजच्या लेखाच्या शेवटी दिल्या आहेत. त्या क्रमशः वाचून घ्याव्यात... ते वाचून झाल्यानंतर आपण पुन्हा याच श्लोकाकडे परत येऊया ... म्हणजे विषयाची सुसंगती लागेल !!!तोपर्यंत ...
भोजन विधीशी संबंधित ,
पूर्वप्रकाशित लेख , खालील दिलेल्या लिंक चा उपयोग करून , हळूहळू वाचून घ्या ... जेणेकरून मूळच्या श्लोकाची संगती लक्षात येईल🙏🏼
*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।*
आणि
*न पीडयेत् इंद्रियाणि*
हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.
_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_
त्वदीय वस्तु गोविंद
तुभ्यम् एव समर्पये ।
तेरा तुझको अर्पण
क्या लागे मेरा ।
श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।
🙏🏼
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

No comments:
Post a Comment