Friday, 7 February 2025

आयुर्वेद शास्त्राच्या आधुनिक विकासाचा पाया किंवा दिशा

आयुर्वेद शास्त्राच्या आधुनिक विकासाचा पाया किंवा दिशा


1.

निरपायि & ब्रॉडस्पेक्ट्रम (म्हणजे बहुकल्प बहुगुण संपन्न योग्य) असं सर्व एकाच वेळी ज्यामध्ये असू शकेल, 

असे कल्प "वापरात वितरणात उपलब्धतेत" आणणं, हे आवश्यक आहे 


2.

आणि त्याच वेळेला ते "पॅलेटेबल ट्रान्सपोर्टेबल ॲफाॅर्डेबल" असतील, असेही पाहायला हवं.


3.

 वचाहरिद्रादि गण हा अतिशय *संतुलित असा संतर्पणजन्य रोगांवरचा सर्वार्थसिद्धीकारक कल्प* आहे.


https://mhetreayurved.blogspot.com/2023/11/blog-post.html

वचाहरिद्रादि गण सप्तधा बलाधान टॅबलेट : डायबेटिस टाईप टू तथा अन्य भी संतर्पणजन्य रोगों का सर्वार्थसिद्धिसाधक सर्वोत्तम औषध


4.

जरी त्यातील *वचा हरिद्रा मुस्ता शुंठी हे कंद स्वरूपात असलेले उग्र वीर्य 4 घटक अत्यंत कार्मुक आहेत*... तरीही त्यांच्या उग्र वीर्यतेचा *धातुप्रक्षोभकारक दुष्परिणाम होऊ नये* म्हणून त्याच्यामध्ये इंद्रयव पृष्णिपर्णी यष्टी अशा प्रकारची स्निग्धद्रव्य सुद्धा आलेली आहेत.


5.

अशाच प्रकारे अपतर्पणजन्य रोगांसाठी ही संतुलित औषध कल्प "व्यवहारात वितरणात आणि उपलब्धतेमध्ये" आणायला हवा


त्यादृष्टीने *विदार्यादी गण* हा उपयोगी आहे 


6.

याच पद्धतीने उष्ण तीक्ष्ण या गुणांच्या वीर्यांच्या व तज्जन्य लक्षण रोग संप्राप्ति यांच्या विरोधात *सारिवादी गण किंवा नुसतं यष्टी सारिवा सप्तधा बलाधान* हे अशाच प्रकारे "बहुकल्प बहुगुण संपन्न योग्य प्रक्षोभनाशक प्रसादक" औषध कल्प म्हणून व्यवहारात वितरणात आणि उपलब्धतेत आणता येईल.


7.

सारिवादि गणातील अन्य द्रव्ये ही उपलब्धतेच्या दृष्टीने थोडी दुष्कर आहेत. त्यामुळे पहिले द्रव्य सारिवा आणि अंतिम द्रव्य यष्टी या दोनच द्रव्यांनी सारिवादि गणाची संपूर्ण फलश्रुती लाभू शकते, असा काही लाख *यष्टी सारिवा सप्तधा बलाधान टॅबलेट* उपयोगात व वितरणात आणल्यानंतर अनुभवाला आलेले आहे.


https://mhetreayurved.blogspot.com/2024/07/blog-post_6.html

सारिवादि/यष्टी+सारिवा *Stress, Irritation & Cancer स्ट्रेस अर्थात क्षोभ उद्वेग इरिटेशन ताण तणाव टेन्शन प्रेशर दडपण दबाव ... तथा कॅन्सर*


8.

मुख्य जी आठ वीर्य आहेत... गुरु स्निग्ध शीत मृदु आणि त्यांच्या विपरीत लघु रुक्ष तीक्ष्ण उष्ण या *आठ वीर्यांच्या विपरीत आठ कल्प* सर्वस्वीकृत उपलब्ध व व्यवहारात वितरणासाठी सिद्ध होणे आवश्यक आहे.


9.

औषधांची संख्या जितकी नेमकी निवडक (प्रिसाईज कन्साईज सिलेक्टेड) असेल आणि त्या बरोबरीने ती औषध जितकी "बहुकल्प बहुगुण संपन्न योग्य" या संहितोक्त चतुष्पादा/गुणां बरोबरच *पॅलेटेबल ॲफाॅर्डेबल ट्रान्सपोर्टेबल* असतील तितकं *आधुनिक औषध कंध हा वैद्य आणि रुग्ण दोघांसाठी उपकारक होऊ शकणार आहे* 


10.

जसे आठ वीर्यांच्या दृष्टीने विचार करता येईल ...

तसंच तो पंच5महाभूत ... खरंतर चारच 4महाभूत... आकाश हे डिस्पेन्सिबल नाही , तर म्हणून त्याचा विचार करणे, आवश्यक नाही. पृथ्वीची उपस्थिती आणि अनुपस्थिती म्हणजे आकाश महाभूत ... असे ते सापेक्ष / पॅसिव्ह आहे . असो 


11.

... तर आठ वीर्यांच्या विचाराप्रमाणेच ,

चार महाभूतांच्या विचाराने म्हणजे पृथ्वी जल अग्नि वायु (आकाश❌️) यांच्या वृद्धी आणि क्षय यासाठीची औषधं कल्प सिद्ध व स्वीकृत होणे आवश्यक आहे.


12.

थोडे पुढे जाऊन संपूर्ण आयुर्वेदीय निदान चिकित्सेचा जो पाया आहे, तो वाग्भट सूत्र स्थान 14, जिथे उपक्रम्य म्हणजे ज्याच्यावर उपचार करायचे आहेत, त्या दोनच गोष्टी आहेत (वृद्धि क्षय) आणि म्हणून तद्विपरीत उपचार या अर्थी चिकित्सा सुद्धा किंवा उपक्रम सुद्धा दोनच आहेत ते म्हणजे लंघन बृंहण अर्थात अपतर्पण आणि संतर्पण


13.

आणि हे दोन उपचार *भौमापम् आणि इतरत्* ... म्हणजे पृथ्वी+ जल आणि अग्नी+ वायू या गटांमध्ये विभागलेले आहेत. म्हणून खरंतर पृथ्वीजल वाढवणारे घटवणारे आणि अग्नी वायू वाढवणारे घटवणारे असे *चारच औषधी कल्प* हे खऱ्या अर्थाने मूलभूत चिकित्सा याअर्थी आवश्यक आहेत आणि त्यांचं डिझाईन त्यांचं वितरण त्यांची उपलब्धता आणि त्यांची स्वीकृती हा आयुर्वेद शास्त्राच्या आधुनिक विकासाचा पाया किंवा दिशा ठरू शकेल


वैद्य हृषीकेश म्हेत्रे

9422016871

No comments:

Post a Comment