🔥
ज्या काळी वैद्य हा दुकान मांडून बसत नव्हता ...
तो त्या गावामध्येच राहून, मागच्या दोन आणि पुढच्या दोन पिढ्या पहात होता... तेव्हा त्याच्या समोर तिथल्या स्वयंपूर्ण खेड्यामध्ये तिथला बहुतेक प्रत्येक माणूस अनेक वर्षां करता असायचा... प्रत्यक्ष तो व्याधित = रोगी होण्यापूर्वीपासून त्याच्या नजरेसमोर असायचा
अशा परिस्थितीत त्या वैद्याला त्या रुग्णाची किंवा व्यक्तीची प्रकृती माहीत असणं, हे शक्य आणि शास्त्रीय होतं
आज जगाच्या कुठल्या कोपऱ्यातून किती शे km वरून "पेशंट" तुमच्यासमोर "पहिल्यांदाच" येऊन बसलेला आहे ... तोही त्याच्या "रोगा"साठी आलेला आहे ... त्याला तुम्ही पंधरा मिनिटे ते 30 मिनिटे जास्तीत जास्त , एक "पेशंट" म्हणून देणार आहात... अशा त्या "पेशंट" मधलं प्रकृती (= निर्विकारिणी दोष स्थिती) नावाचं परीक्षण, मी किती मिनिटात करणार???
खरंच ते "प्रकृती परीक्षण" करणे "शक्य आहे का"?
जन्माच्या वेळेस ची वायेबल= जगण्यायोग्य अशी "असंतुलित दोषल प्रकृती ... सो कॉल्ड"!!
याच्यावरती जन्मानंतर पुढे
वय
देश
कुल
यांची नैसर्गिक पुटं layers स्तर चढतात!
त्याच्यापुढे सात्म्य नावाचं एक, "आरोग्य आणि निदान यांच्यामधलं", खूप "स्ट्रॉंग" असं पुट चढतं!!
त्याच्यानंतर मग निदान सेवन
मग प्रत्यक्ष रोग व त्यानंतर
उपद्रव
रोगसंकर
अरिष्ट ...
अशी साधारणतः "सात्म्य ते अरिष्ट या स्पेक्ट्रम" मध्ये असलेला "पेशंट" आपल्यासमोर बसलेला असताना ... त्या पेशंटच्या शरीरावरची ही सगळी पुटं लेयर्स स्तर काढून,
"प्रत्यक्ष जन्माच्या वेळची असंतुलित दोष स्थिती" की जी त्याला "जगायला अलाऊ" करते "ती दोषस्थिती" मला कळते समजते ... त्या प्रकृतीचे मी परीक्षण करतो ... हा केवढा मोठा विनोद 🤣😆आणि अशक्य प्राय अशी गोष्ट😳😱 आहे, हे का कळत नाही !?
Prakruti : a rebel thought ek nayee soch ek bandakhor vichaar ... To listen to actual rebel thought you may jump to 37.50 minutes or to listen to the essence of this lecture you may jump to 40.50 or 46 or 49 minutes ...
👇🏼
https://youtu.be/F6SWPNvgee4?si=-2GI7mVtFv3rgEvo
जेव्हा अशा प्रकारचं राष्ट्रीय स्तरावरचे प्रकृती परीक्षण नावाचं काहीतरी सुरू करायचं ठरलं, तेव्हा तिथं आयुर्वेद @ द कोअर जाणणारी माणसं नव्हती का...? त्यांनी त्याला विरोध का केला नाही ??
एका यांत्रिक ॲप मध्ये दहा वीस प्रश्न विचारून, पुढच्या पंधरा-वीस मिनिटात , त्याला "ऑटोमेटेड प्रकृती सांगणे ", हे एक उपक्रम हॅपनिंग गोष्ट इव्हेंट सेलिब्रेशन दिखावा "काहीतरी केलं" , शासकीय स्तरावरचे कागदी घोडे ... यासाठी ठीक आहे...
पण शास्त्रीय दृष्ट्या ते अत्यंत चुकीचं दिशाभूल करणारं vague असत्य मुख्य म्हणजे निरुपयोगी असं आहे , असं आपल्याला का पटत नाही आणि ज्यांना हे स्पष्टपणे माहिती आहे, त्यांनी या सगळ्याला का विरोध करू नये, ठामपणे एक अधिकारी म्हणून, अध्यापक म्हणून, एखाद्या संघटनेचे पदाधिकारी म्हणून, वैद्यांच्या समूहाचे प्रतिनिधी म्हणून ... कारण माझ्यासारख्या एकट्यादुकट्या वैयक्तिक माणसाने याला विरोध केला तर तो शास्त्रद्रोह होईल !!!
प्रत्येक गोष्टीत असा सगळा कचरा विचका गुंता ... एकही गोष्ट स्पष्ट सरळ छान सुंदर नाही!!!
दीडशे दोनशे वर्षात, मॉडर्न मेडिसिन ने, आयुर्वेदाचा सगळा जनाधार घालवला ... आज पेशंट येतो, तो मला "मॉडर्न नुसार अमुक रिपोर्ट अमुक रोग झालाय, त्याच्यावर तुमच्याकडे काही इलाज आहे का, ते सांगा" म्हणून येतो !!!
शंभरातला एक तरी पेशंट, मला वात पित्त कफ स्रोतस् धात्वग्नि धातु असे दुष्टी झाली, म्हणून येऊ शकतो का? सव्वाशे वर्ष झाले तुम्ही आयुर्वेद शिकवता येथे... तुमची परिभाषा रुजली आहे का? दहा वर्षात मोबाईलची परिभाषा लहान मुलांपासून मरणाऱ्या माणसा पर्यन्त प्रत्येकाच्या तोंडात आलेली आहे ???
काय तुमच्या अस्तित्वाला अर्थ आहे ?!
आणि तुम्ही "ग्लोबल हेल्थ साठी आयुर्वेद" अशा पोकळ वल्गना करता!!! 👇🏼
https://mhetreayurved.blogspot.com/2025/02/blog-post_88.html
बेडकीचा बैल होणार आहे का???
स्वतःच्या मर्यादा मान्य नाहीत, ज्ञात नाहीत, स्वीकारायची इच्छा तयारी नाही!!! सगळा भंपकपणा ...
जिकडे बघावं, तिकडं ढोंग लबाडी
"सोचेगा" कोई नही ... "बेचेगा" हर एक आदमी ... अशी घाणेरडी अवस्था आहे या शास्त्राची आणि या क्षेत्राची ... अत्यंत निषेधार्ह 👎🏼😔☹️😏
💐🙏🏼
No comments:
Post a Comment