Monday, 10 February 2025

आयुर्वेद version 4.0

आयुर्वेद version 4.0

आमचे म्हणणे असे की 4000 वर्षंपूर्वी 

जेव्हा शरीराच्या आत प्रत्यक्ष काय चालले आहे 

हे कळू शकत नव्हते दिसू शकत नव्हते 

तेव्हा केवळ तर्काच्या आधारे जे लिहिले गेलेले आहे की, स वायुः कुपितोऽग्नावुपहते *मूत्रस्वेदौ पुरीषाशयमुपहृत्य* 😇, ताभ्यां पुरीषं द्रवीकृत्य, अतीसाराय प्रकल्पते ।

 मूत्र आणि स्वेद हे पुरीष आशयात येतात 🤔⁉️

अशा प्रकारचा वस्तुस्थिती जन्य पुरावा ज्याला "असू शकत नाही" 

*अशा बाबी सोडून द्याव्यात*, 

आणि खरोखरच अशा गोष्टी वाग्भटाने सोडून दिलेल्या आहे 


यालाच शास्त्राचे अपडेटिंग, अद्ययावतीकरण, आधुनिकीकरण , युगानुरूप संदर्भ, प्रतिसंस्कार असे म्हणतात 


कितीही आदळ आपट केली तरी मूत्र आणि स्वेद हे पुरीषाशयात येणारच नाहीत, 

हे आज आपल्याला स्पष्टपणे माहिती आणि मान्य दोन्हीही आहे 


आता शल्याहरण अध्यायामध्ये दोरीला शल्य बांधून ती दोरी वाकलेल्या झाडाच्या फांदीला बांधून शल्य काढावे असे लिहिले म्हणून मग आजही त्यालाच घट्ट धरून बसणार का ?


शल्य शोधण्यासाठी लेप लावावा तूप ठेवावे लेप वाळेल तूप पातळ होईल तेथे शल्य असे समजावे असल्या गोष्टी आजही घट्ट धरून ठेवणार का? का x ray सोनोग्राफी MRI करून बघणार???


लिहिण्याचा उद्देश हाच होता की 

*मूत्र आणि स्वेद पुरीषाशयात येतात , असं काहीही होत नाही* हे आजच्या विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगा की ...

जे वाग्भटाने सांगितलं आहे 


वाग्भटाने, चरकातील अशा घटनेचा उल्लेख टाळला आहे 

यालाच आयुर्वेद वर्जन 3.0 असं म्हणतात 

आयुर्वेद वर्जन 3.0 = वाग्भट 

वाग्भट = (चरक + सुश्रुत) ÷ smartness 

बरं...

एक वात दुसऱ्या भावाला तिसऱ्या आशयात घेऊन येतो, याच्या उदाहरणासाठी जे उदाहरण दिलं मधुमेहाचं च सू 17 ... त्याच्याविषयी तर मला ठाम शंका आहे , जाम शंका आहे ...

तुम्ही उदाहरण दिलं, याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये 


अरे पण ते एकातरी माणसाने मागच्या चार हजार वर्षात मूत्रामध्ये आलेले ओज एकदातरी प्रत्यक्ष पाहायला हवं होतं ना ???

तरच त्याला तो मधुमेह म्हणेल 


ऐटीत थाटात आत्मविश्वासाने मधुमेह हे निदान लिहायचं 

आणि पेशंटच्या मूत्रामध्ये ओज कोणीही पाहिलेलेच नाही, हा जर 4000 वर्षांचा इतिहास असेल, 

तर त्या मधुमेह नावाच्या संज्ञा आणि त्याच्या संबंधित लक्षणाला काही अर्थ आहे का? 


तीच बाब त्या प्रमेहाची !!!


प्रभूत मूत्रता आविल मूत्रता म्हणायचं 

मूत्राचं प्राकृत प्रमाण किती, हेच माहीत नसेल ?

तर किती मूत्राला प्रभूत म्हणावं हे ठरू शकत नाही... 


आणि ते ठरू शकत नसेल तर त्याच्या आधारे होऊ शकणार प्रमेह नावाचं निदान होऊ शकत नाही 


उभ्या भारतातला आज एक तरी वैद्य एकातरी पेशंटचं मूत्राचं दिवसभराचं प्रमाण हे प्रभूत आहे, म्हणून प्रमेह निदान करू शकणार आहे का? 


समजा कोणी केलंच तर त्याला साष्टांग नमस्कार🙏🏼 घालूया 


पण "ते तसं केलेलं प्रमेह हे निदान निदान (withoutBSL report)" आज पेशंटला आजच्या सामाजिक स्थितीत स्वीकार्य ॲक्सेप्ट मान्य होणार आहे का ???


आणि उद्या तुम्ही तसं निदान त्या केलेल्या त्या पेशंट ला सांगितलं की तुझा प्रमेह बरा झालाय (withoutBSL report) तरी 

त्या पेशंटला ते पटणार समजणार कळणार मान्य स्वीकार्य होणार आहे का? 


मग अशा "अमेय" म्हणजे नॉन मेजरेबल नॉन काउंटेबल प्रभूत मूत्रता या लक्षणावर आधारलेलं "प्रमेह निदान" आणि ज्या ओजाला आजपर्यंत कोणी मूत्रात बघितलंच नाहीये, ते "मधुमेह निदान" *हे कालबाह्य आहे* ... असं स्पष्टपणे सांगण्याचं काम कोणाचं आहे ???

प्रॅक्टिस करणारे वैद्यांचं नसलं तर ...

आयुर्वेद संहिता शिकून एमडी केलेल्या संहिता शिकवणाऱ्या माणसांचं नक्की आहे ना ???


जो वायू इथून तिथून एकच आहे 

त्या वायूचे एकमेकांवरती आवरण होतं 

ही किती हास्यस्पद संकल्पना आहे??? 


काही अशी लक्षणे त्याकाळी आचार्यांना दिसले असतील की ज्याची उत्तरं त्यांना नेहमीच्या दोष धातू मल अग्नी या परिभाषेत सुसंगतपणे मांडता आले नाहीत 

म्हणून त्यांनी एक तर्क्य अनिर्देश्य अनुमान गम्य अंदाज पंचे आवरण नावाची संकल्पना मांडली 


बरं, त्या आवरण संकल्पनेची लक्षणे, आवरक किंवा आवृत अशा , सबल किंवा दुर्बल भावाशी, प्रत्येक वेळेला सुसंगतपणे जुळतात असे होत नाही 


बरं, कितीही आवरण निदान केलं तरी 

तद्गत आवरणाचे चिकित्सा 

जर पुन्हा जाऊन तद्गत वाताप्रमाणेच करायची असेल,


तर त्या आवरण नावाच्या निदानाचं वैशिष्ट्य आणि प्रयोजन आणि वेगळेपण काय शिल्लक उरतं ???


संपूर्ण शरीरात वात एकच आहे 


तो आमच्या "समजुती"साठी 'उपाधी' म्हणून प्राण अपान उदान असा सांगितला आहे 


जसे दिशा एकच आहे पण ती आमच्या संदर्भाने समजूतीने पूर्व पश्चिम समोर मागे वरती खालती अशी होते 


काळ हा एकच आहे पण तो आमच्या सोयीसाठी समजूतीसाठी भूत भविष्य वर्तमान दशविध औषध काल दिवस रात्र वसंत ग्रीष्म शरद असा होतो 


प्रत्यक्षात काळ हा एकसंध सलग एकच आहे 


त्यामुळे दिवसाचे रात्रीवर आवरण 

वसंताचे ग्रीष्मावर आवरण 

भूतकाळाचे भविष्यकाळावर आवरण 

पूर्वेस पश्चिमेवर आवरण 

ईशान्येचं आग्नेय वर आवरण 

ऊर्ध्व दिशेचे अधो दिशेवर आवरण

असलं काहीही होत नसतं ...

असं ठामपणे आजच्या काळामध्ये युगानुरूप संदर्भ म्हणून निश्चितपणे सांगायलाच हवं आहे 



बरे जाता जाता हे ही सांगून ठेवतो की चरक म्हणताना म्हणतो की मी बारा आवरणे सांगितली ... आठ तुम्ही समजून घ्या 

पण नीट मोजा ...

प्रत्यक्ष आठच आवरणं त्याने सांगितलीत 

आणि बारा तुम्हाला समजून घ्यायला सोडून दिलीत😇 


थोडक्यात काय तर चरक ही एक कालबाह्य संहिता आहे / होती


त्याच्यावरती युगानुरूप संदर्भ म्हणून 

वाग्भटाने "उचित संस्कार करून", 

एक चरकाच्या तुलनेत , निर्दोष संहिता आयुर्वेद version 3.0 तुमच्या हाती दिलेली आहे , अष्टांगहृदय (&/or अष्टांग संग्रह) ...

ती वापरा 

आयुर्वेद वर्जन 3.0 = वाग्भट 

वाग्भट = (चरक + सुश्रुत) ÷ smartness 

डायल क्रेडल टरटर करणारा फोन सोडून ,

तुम्ही नोकियाच्या बारा बटनांच्या फोनपर्यंत आले होते 


त्याच्यात सुधारणा करून , आता तुम्हाला स्मार्टफोन दिला आहे 


असे असताना आम्ही पुन्हा टरटर डायल क्रेडलचाच फोन वापरणार, असा अट्टाहास हास्यास्पद आहे 


म्हणून वाग्भट सोडून 

उलट पुन्हा 2000 वर्षे भूतकाळात चालत जाऊन चरक संहितेच्या मागे लागणं 

ही हास्यास्पद गोष्ट आहे ... अनावश्यक गोष्ट आहे ...

असं आपणच आता ठामपणे संहिता विभागाच्या लोकांनीच, *"किमान नव्या पिढीला"* तरी सांगायला पाहिजे 


आपली समकालीन समवयस्क आणि आपली ज्येष्ठ पिढी ते मान्य करणार नाही ,

ही वस्तुस्थिती आहे 

पण काळाच्या ओघात स्वभावोपरम वादा नुसार आपली ज्येष्ठ पिढी आणि आपली समवयस्क समकालीन पिढी ही नष्ट होणार आहे 


त्यामुळे पुढच्या पिढीला अपडेटेड आयुर्वेद version 3.0 म्हणजे वाग्भट कळू दे 

आयुर्वेद वर्जन 3.0 = वाग्भट 

वाग्भट = (चरक + सुश्रुत) ÷ smartness 

त्यांच्या डोक्यात कारण नसताना चरकातले गोंधळ घालू नयेत 


चरकाने आयुर्वेदात आवश्यकता नसताना दर्शन प्रमाण तत्त्वज्ञान स्टेजवर कसं बोलावं असल्या अनेक आयुर्वेद बाह्य विषयांची भरताड ही आयुर्वेदाच्या पुस्तकात करून ठेवलेली आहे 


परंतु हा सगळा पसारा सुश्रुतामध्ये केवळ एका अध्यायात गुंडाळण्यात आला सु शा 1 मध्ये 


*आणि वाग्भट अशा पसाराकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो


याचा अर्थ आयुर्वेदाचे अपडेटिंग = त्यातील अनावश्यक भाग गाळणे आणि उपयोगी शास्त्रीय भाग तेवढाच शिल्लक ठेवणे

अशी प्रक्रिया निरंतरपणे चालू होती 


पण आपण *अनावश्यक त्या अशास्त्रीय श्रद्धा भक्ती अशा भावनां पोटी* ... "बुद्धी आणि विचार बाजूला ठेवून"

अपडेटेड असलेला आयुर्वेद version 3.0 बाजूला ठेवून 

अपडेटेड आयुर्वेदापेक्षा जुनाट 2000 वर्षांचा चरक (आयुर्वेद version 1.0) वाचून स्वतःचा आणि आपल्यापुढे विश्वास ठेवून ज्ञानार्जन करायला बसलेल्या विद्यार्थ्यांचा गोंधळ करतो.


 त्यामुळे चरक सोडून, आधी वाग्भट वाचावा 

आयुर्वेद वर्जन 3.0 = वाग्भट 

वाग्भट = (चरक + सुश्रुत) ÷ smartness 

आणि वाग्भट वाचून ...

त्यातल्याही कालबाह्य गोष्टी वगळून सोडून गाळून...


आजच्या युगाला सुसंगत अशी नवीन हेतुस्कंधाची नवीन लक्षणस्कंधाची निर्मिती करून...

कालबाह्य अशी चरकातल्या चिकित्सेतली औषध स्कंध चा त्याग करून 

नवा औषध स्कंध आजच्या काळाला सुसंगत असा आयुर्वेद version 4.0 लिहून देणे ,

हे संहितेच्याच लोकांचं काम आहे 


भले ते आजच्या अस्तित्वात असलेल्या आपल्यापेक्षा ज्येष्ठ आणि आपल्या समकालीन समवयस्क वैद्यांना पटणार नाही ...आवश्यकही वाटणार नाही 

परंतु ते पुढे येणाऱ्या 20 30 50 100 वर्षातल्या पिढीसाठी निश्चितपणे उपयोगी ठरेल 


आजही आपल्या वरच्या पिढीला कॉम्प्युटर मोबाईल यूपीआय यांची आवश्यकता वाटत नाही 


पण आजच्या पिढीचं त्याच्या विना काहीही चालत नाही ... हेही माहिती हवं 


म्हणून समवयस्कांना समकालीनांना आणि ज्येष्ठांना चरका बद्दल आणि वाग्भट बद्दल फार आदर आहे, म्हणून चरकाला चिकटून राहणे आणि वाग्भट वाचत राहणे ...

यापेक्षा ते सगळं ज्यांनी वाचलेय, 

अशा संहितेच्या (क्षमता असलेल्या) लोकांनी युगाची काळाची गरज म्हणून ...

1.नवा हेतू स्कंध , 2.नवा लक्षणस्कंध आणि हो हो नवा औषध स्कंध सुद्धा... नव्या संहितेत *इंग्लिश मध्ये लिहिला पाहिजे

... _संस्कृत मध्ये नव्हे_

No comments:

Post a Comment