महाशिवरात्रीला रताळे का खाल्लं जाते? कारण रताळं हा एक कंद आहे. कंद हे पचायला अत्यंत जड असतात. एकदा हे कंद खाल्ले की पुढे बराच काळ भूक लागत नाही. म्हणजे दिवसात दोन वेळा किंवा तीन वेळा खाण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी वेळ द्यावा लागत नाही, डिस्टर्ब होत नाही. म्हणून ऋषीमुनी त्याकाळी कंदमुळे खात असत, की जेणेकरून लवकर भूक लागणार नाही आणि अखंड तपःसाधना आराधना जप हे करता येईल! आज आपण गृहस्थाश्रमामध्ये कंदमूळ म्हणजे रताळा बटाटा साबुदाणा हे खातो; ते पचायला अत्यंत जड असतं! त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस पचनसंस्थेचे वाट्टोळे होते! ॲसिडिटी होते, कॉन्स्टिपेशन होतं, पोट साफ होत नाही, गॅसेस होतात, जळजळ मळमळ उलटी भूक न लागणे डोकं दुखणे अशा तक्रारी होतात.
ज्याला खरंच उपवास करायचा आहे , त्याने उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, म्हणजे देवाच्या जवळ राहणे, असे आचरण करायला हवे !!
त्याचा आपण काय खाल्लं, याच्याशी काही संबंध नाही !!
अनेक लोक असे म्हणतात की गीतेमध्ये सात्विक राजस तामस आहार दिलेले आहेत ... असं काहीही गीतेमध्ये दिलेलं नाही. ते आहार हे सात्विक राजस तामस "अशा लोकांना प्रिय असणारे आहार" आहेत ! प्रत्यक्षात आहार सात्विक राजस तामस नसतो , तो त्या त्या प्रकृतीच्या लोकांना प्रिय असलेला आहार असतो, इतकंच!!
त्यामुळे उद्याच्या महाशिवरात्रीला अकारण आपले पोट बिघडेल असे प्रचंड जड, न पचणारे अन्न म्हणजे रताळे साबुदाणा बटाटे यापासून बनलेले पदार्थ खाऊ नयेत!!
अर्थात ज्यांना हे स्वतःच्या टेस्टसाठी चेंज साठी व्हरायटीसाठी चवीसाठी रुचिपालट म्हणून खायचेत, त्यांच्यासाठी ही पोस्ट नाही !!!
ज्यांना आरोग्य शास्त्र यातलं काहीतरी कळतं , बुद्धी शाबूत आणि जागृत आहे , त्यांच्यासाठी ही पोस्ट लिहिलेली आहे!!
अर्थात हे पटलं नाही तर समाजात रूढी म्हणून जे चालतं, त्याच्यामागे गतानुगतिकपणे अगतिकपणे जात राहा.
बुद्धी जागृत असेल आणि हे पटलं तर नेहमीचाच आहार करावा, त्याच्या पेक्षा हलका आहार करणे याचा अर्थ साळीच्या लाह्या खाणे हे योग्य होय !!
साळीच्या लाह्या हा उपासाचा सर्वोत्तम पदार्थ आहे!!
म्हणून नागपंचमीला आपण साळीच्या लाह्या, लक्ष्मीपूजनाला साळीच्या लाह्या हा नैवेद्य किंवा प्रसाद म्हणून वापरतो !!!
शास्त्राभ्यास नको श्रुति पढुं नको *तीर्थासि जाऊं नको* ।
योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको ।
काळाचे भय मानसीं धरुं नको दुष्टांस शंकूं नको ।
*ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडू नको* ॥ श्रीशिवस्तुति ॥
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि
आटापिटा करून प्रवास करून तीर्थयात्रा करण्यापेक्षा मनापासून पंचाक्षरी किंवा षडाक्षरी नाम जप करणे हे अधिक श्रेयस्कर आहे
मन चंगा ... तो कठौती मे गंगा
क्यू पानी में मल मल नहाये
मन की मैल उतार , ओ प्राणी
शंकर हा नीलकंठ म्हणजे फक्त गळा काळा निळा असलेला असा आहे
तो सर्वांगाने निळा नाही
शंकराची आरती करताना "कर्पूर गौर" असं म्हटलं जातं ... म्हणजेच तो कापराप्रमाणे शुभ्र गोरा आहे ... स्नो व्हाईट = हिमगौर
लेखक : ©️ © Copyright वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/
Superb explanation Sir
ReplyDeleteVery nice Sirji 🙏🏻
ReplyDelete