*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 180*
12 जून 2024, बुधवार
*उपविभाग 124*
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट © लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/
भोजन करताना कोणत्या क्रमाने कोणत्या चवीचे पदार्थ खावेत ?
प्रथम मधुर रसाचे पदार्थ खावेत.
म्हणजे गोड चवीचे पदार्थ खावेत.
हल्ली स्वीट डिश किंवा डेझर्ट हे शेवटी खाण्याचा प्रघात आहे ... परंतु ही युरोपियन पद्धत आहे.
युरोपातील लोक हे उत्तर ध्रुवाच्या जवळ राहतात, त्यामुळे तेथील सर्वसाधारण तापमान हे शून्य ते पंधरा इतके कमी असते. त्यामुळे त्यांची पचनशक्ती अतिशय प्रचंड असते. त्यामुळे त्यांनी कोणतेही पदार्थ कोणत्याही प्रकारे कुठल्याही क्रमाने कितीही खाल्ले तरी प्रायः त्यांना अपचन होणे असे होत नाही.
आपल्याकडे मात्र प्रत्येक ऋतू नुसार तापमान बदलते आणि पचनशक्ती ही कमी जास्त होते. आपली पचनशक्ती ही थंडीच्या चार महिन्यात म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात उत्तम असते , त्या काळात प्रमाण प्रकार अशी पथ्ये नाही पाड
ळली तरी प्राय चालते. म्हणूनच दिवाळीच्या सणात आपण अनेक प्रकारचे गोड पचायला जड तेलकट अशा प्रकारचे फराळाचे पदार्थ करून आवर्जून खातो.
परंतु मार्च ते ऑक्टोबर या काळात आपली भूक ही मंदावत जाते आणि पचनशक्ती क्षीण/दुर्बल असते.
कारण आपण विषुववृत्ताच्या जवळ राहतो, म्हणून या काळात म्हणजे मार्च ते ऑक्टोबर = वर्षातल्या दोन तृतीयांश काळात, आपण भोजन करताना अन्नाचा प्रकार, त्याचे प्रमाण, त्याच्यावर झालेले स्वयंपाकाचे संस्कार, त्याचा क्रम याचा विचार करणे हे आरोग्य दृष्ट्या आवश्यक असते.
म्हणूनच आपण ज्या प्रदेशात राहतो तेथे मधुर रस म्हणजे गोड चवीचे पदार्थ सुरुवातीला खावेत.
अर्थातच मधुर रस गोड चवीचे पदार्थ हे पृथ्वी जल प्रधान म्हणजे पचायला जड असतात.
म्हणजेच पचनाला जड असणारे पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत.
त्याचप्रमाणे फळांचे सेवन सुद्धा जेवणाच्या सुरुवातीला करावे कारण फळे ही प्रायः मधुर रसाची आणि पल्प आणि फ्लूड = पाणी आणि लगदा म्हणजेच पृथ्वी आणि जल म्हणजेच पचायला जड अशी असतात ...
जर मधुर गोड चवीच्या पदार्थांचे सेवन जेवणाच्या शेवटी केले, तर ते पचायला जड असल्याने शरीरात कफाचे प्रमाण वाढते आणि नाभीच्या, छातीच्या, गळ्याच्या, डोक्याच्या भागातील कफाच्या आजारांचे होणे संभवते
म्हणजेच अम्लपित्त अपचन उलटी मळमळ जळजळ छातीत कफ होणे ओला खोकला होणे कफ पडणे घसा धरणे, घसा सुजणे दात किंवा हिरड्या सुजणे कान फुटणे सर्दी होणे डोके गच्च होणे वारंवार पडसे होणे डोके जड होणे डोके दुखणे *अशा प्रकारचे कफाचे रोग, हे जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ किंवा जड पदार्थ खाल्ल्याने होण्याची शक्यता असते*.
मुळात ज्यांना असे आजार आहेत , त्यांनी पण जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ किंवा जड पदार्थ किंवा द्रव पदार्थ पातळ पदार्थ किंवा पाणी यासारख्या अन्नपदार्थांचे सेवन करतो का? हे पाहावे ...
तसे होत असल्यास ते त्वरित थांबवावे.
म्हणून जेवणाच्या शेवटी किंवा जेवण झाल्यानंतर रात्री उशिरा झोपेपर्यंत केव्हाही ...
गोड पदार्थ = श्रीखंड आईस्क्रीम दूध कुल्फी किंवा बाहेरून मागवलेला वाढदिवसाचा मैद्याचा अंड्याचा पेस्ट्री चा केक किंवा त्यासोबत पिले जाणारे कोल्ड्रिंक वडापाव सामोसे कचोरी यासारखे तळलेले जड पदार्थ किंवा त्यावेळेला प्यायले जाणारी कोल्ड कॉफी किंवा चहा कॉफी सारखे पातळ पदार्थ किंवा एखादे डेझर्ट अशा गोष्टी निश्चितपणे टाळल्या पाहिजेत
आणि ज्यांना मुळातच कफाचे आजार आहेत डायबिटीस आहे शुगर आहे कोलेस्टेरॉल आहे बीपी आहे वजन खूप वाढलेले आहे अंगावरती अनेक ठिकाणी लोंबकळणारा मेद म्हणजे सस्पेंडेड फॅट आहे लूज वेट आहे ...
अशांनी जेवणानंतर गोड चवीचे पदार्थ जड पदार्थ चिकट पदार्थ खाणे हे निश्चितपणे टाळावे
म्हणून मधुर रसाचे गोड चवीचे पचायला जड पल्प फ्लूईड लगदा चिकटपणा पातळपणा असणारे सर्व पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत
*अगदी ज्यांना डायबिटीस शुगर कोलेस्ट्रॉल बीपी वाढते वजन असे आहे, त्यांनी सुद्धा आपली इच्छा मारायची नाही मन मारायचे नाही, म्हणून जे काही अपथ्य स्वरूपातील थोडेफार गोड पदार्थ खायचे आहेत, जसे की आमरस किंवा फळे शिकरण श्रीखंड या बाबी इच्छा पेक्षा निम्म्या /एक तृतीयांश किंवा एक चतुर्थांश (1/2 , 1/3 , 1/4) प्रमाणात *जेवणाच्या सुरुवातीला खाव्यात म्हणजे तेवढे जड गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खाल्ल्याने, एकूण जाणाऱ्या जेवणातील चार सहा घास निश्चितपणे कमी जातात आणि शुगर वाढण्याची शक्यता थोडी कमी राहते*.
जेवणाच्या सुरुवातीला मधुर गोड जड पातळ असे पदार्थ खाल्ल्यानंतर ...
जेवणाच्या मध्ये आंबट आणि खारट पदार्थ खावेत म्हणजे लोणचे पापड
आणि जेवणाच्या शेवटी कडू तिखट आणि तुरट पदार्थ खावे म्हणजेच आमटी चटण्या असे पदार्थ जेवणाच्या शेवटी खावेत
आणि जेवण झाल्यानंतर तुरट पदार्थ म्हणजे सुपारी बडीशेप विडा असे पदार्थ खावेत
शास्त्रीय दृष्ट्या जरी सुरुवातीला मधुर मध्ये आंबट खारट आणि शेवटी तिखट कडू तुरट असे पदार्थ खावे असे सांगितलेले असले, तरी प्रत्यक्षात मात्र व्यवहारात जेवताना सुरुवातीला वरण भात , वरण आमटी , दूध भात कढी भात असे खाल्ले जाते किंवा जेवणाच्या सुरुवातीला पोळी भाजी भाकरी भाजी असे खाल्ली जाते
आणि हे मुख्य जेवण जेवत असताना मध्ये मध्ये खारट अशा स्वरूपातील पापड कुरडया खाल्ल्या जातात ... तसेच मध्ये मध्ये चवीत बदल व्हावा / रुचिपालट या अर्थी लोणचं चटण्या या चाखल्या जातात.
जेवणातील मुख्य पदार्थ म्हणजे भात चपाती भाकरी हे पचायला जड आणि गोड चवीचे असतात ...
तर सर्व प्रकारच्या भाज्या आणि उसळी या प्रायः, मूलतः कडू तुरट चवीच्या असतात आणि त्याला फोडणी देऊन चटणी मीठ घालून त्या बऱ्यापैकी चमचमीत सणसणीत झणझणीत तिखट असे त्या त्या घराच्या कुटुंबाच्या व्यक्तीच्या आवडीप्रमाणे रूढीप्रमाणे केलेले असते...
म्हणून जरी शास्त्रामध्ये
सुरुवातीला मधुर,
मध्ये आंबट खारट आणि
शेवटी कडू तिखट तुरट
असा क्रम सांगितलेला असला तरी ...
आलटून पालटून प्रायः सर्व चवी खाल्ल्या जातात!
ज्याच्यामध्ये मधुर चवीचे प्रमाण सर्वाधिक आणि आंबट तिखट कडू यांचे प्रमाण कमी, तर खारट याचे प्रमाण अत्यल्प असते, हा व्यवहार आहे!
हे आपण सर्वजण जाणतोच ...
तरीही यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणाच्या शेवटी मधुर गोड पचायला जड पातळ असे कफवर्धक पदार्थ शेवटी खाऊ नयेत
आणि अर्थापत्तीने दुसरे असे की ...
*जेवणाच्या सुरुवातीला तिखट झणझणीत झणझणीत चमचमीत अग्नी प्रधान असे पदार्थ खाऊ नयेत*...
कारण जेवणाची सुरुवात जर अशा प्रकारच्या अग्नी प्रधान तिखट मसालेदार पदार्थांनी केली, तर कालांतराने मलावरोध अम्लपित्त जळजळ पोटात आणि संडासच्या जागेला दाह क्वचित संडासवाटे रक्त पडणे मूळव्याध भगंदर फिशर यांचा त्रास होणे ...
अशा उष्णताजन्य तक्रारी होतात ...
अंगावरून पाळीच्या वेळेला अधिक रक्तस्राव होणे किंवा अधिक दिवस रक्तस्राव होत राहणे , असेही होऊ शकते.
याचबरोबर उन्हाळी लागणे, लघवी थेंब थेंब होणे, वारंवार संडासला जावेसे वाटणे, संडासच्या जागेची आग होणे अशाही तक्रारी होऊ शकतात.
म्हणून सर्वसाधारणतः जेवणाची सुरुवात ही मधुर रसाने गोड चवीच्या पदार्थांनी करावी, हे बरे
आणि जेवणाच्या मध्ये मध्ये आलटून पालटून आंबट खारट तिखट असे पदार्थ रुचिपालट = चव बदलण्यासाठी खावेत
आणि जेवणाच्या शेवटी ज्यांना शक्य आहे त्यांनी सुपारी बडीशेप पान विडा तांबूल यांचे सेवन करणे हे आरोग्यासाठी हितकारक आहे
संत वाङ्मयामध्ये
साच जोडी शेवटी गोड घास ।।
असा उल्लेख आहे ..
परंतु _शेवटचा घास_ गोड घेण्यापेक्षा ...
जीवनातील *शेवटचे दिवस हे खऱ्या अर्थाने गोड* म्हणजे आरोग्य संपन्न आणि स्वावलंबी होवोत; परावलंबी होऊ नयेत / हॉस्पिटलमध्ये खितपत पडावे लागू नये ... म्हणून _शेवटचा घास गोड घेण्याऐवजी_ *जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ खाणे हे हितकर असते*
याजसाठी केला होता अट्टाहास ।
*शेवटचा दिस गोड व्हावा* ।। ✅️
🙏🏼🪔🪷
*या उपक्रमात लिहिल्या जाणाऱ्या लेखांमध्ये असणारी विधाने ही आयुर्वेद सिद्धांत व संहिता ग्रंथ यावर आधारित शास्त्रीय सत्य तथ्य अशा स्वरूपाची प्रायः असतात. _परंतु या लेखांमध्ये काही विधाने काही रूढी परंपरा इतिहास याविषयीची माहिती सामाजिक माहिती मनोरंजन वैयक्तिक मत वैयक्तिक आकलन वैयक्तिक समजूत अशा स्वरूपाची सुद्धा असू शकतात_*
*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।*
आणि
*न पीडयेत् इंद्रियाणि*
हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.
_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_
त्वदीय वस्तु गोविंद
तुभ्यम् एव समर्पये ।
तेरा तुझको अर्पण
क्या लागे मेरा ।
श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।
🙏🏼
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/
No comments:
Post a Comment