Thursday, 23 January 2025

*भोजन कसे करावे? जेवताना कसे जेवावे? Dining Table Etiquettes?* 😇

*भोजन कसे करावे? जेवताना कसे जेवावे? Dining Table Etiquettes?* 😇

*सुखमुच्चैः समासीनः समदेहोऽन्नतत्परः । अन्नम् अश्नीयात्*

*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 181* 13जून 2024, गुरुवार *उपविभाग 125* 


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट © लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


भोजन कसे करावे? जेवताना कसे जेवावे? 

Dining Table Etiquettes? 😇


सुखमुच्चैः समासीनः समदेहोऽन्नतत्परः । 

अन्नम् अश्नीयात्


अन्नम् अश्नीयात् म्हणजे अन्न खावे, भोजन करावे जेवण घ्यावे अन्न सेवन करावे


*सुखमुच्चैः समासीनः* ... म्हणजे 


जमिनीपासून थोडे उंचावर आरामदायक पद्धतीने उजवे डावे अंग तिरके वाकडे होणार नाही अशा पद्धतीने समसमान पातळीत बसावे म्हणजे आपल्याकडे मागील काही पिढ्यांमध्ये पाटावर बसून जेवणे ही पद्धत होती ही जमिनीपासून थोडेसे उंचावर या अर्थी योग्य होते परंतु त्यावेळेला ताट हे पाटा पेक्षा खालच्या पातळीवर म्हणजे जमिनीवर ठेवलेले असायचे त्याच्याऐवजी जर ते साधारणता नऊ इंच ते 12 इंच इतक्या उंचीवर म्हणजे चौरंगावर ठेवलेले असेल तर ते अधिक उचित होय. त्यामुळे आजकाल आपण जे डायनिंग चेअरवर बसतो की जी साधारणतः जमिनीपासून 18 इंच उंच असते आणि डायनिंग टेबलची पातळी ही साधारणतः 30 इंचापर्यंत किंवा 32 इंच पर्यंत असते ते योग्य आहे. आपले दोन्ही कोपर हे सहजपणे टेबलाच्या पृष्ठभागावर टेकतील असे बसता यावे. डायनिंग चेअर ही 90 अंश काटकोनात सरळ पाठ राहील, अशी असते... हे अतिशय योग्य आहे.

यालाच वरील श्लोकामध्ये समासीन म्हणजे सम पद्धतीने बसलेला म्हणजे पाठीला बाक न येऊ देता, पोक न काढता, कुबड न काढता, पुढे न वाकता बसणं हे योग्य आहे. अभ्यासाला बसताना सुद्धा, भगवान श्रीकृष्णाने *समं काय शिरो ग्रीवम्* असे बसायला सांगितलेले आहे. भोजन हे सुद्धा एक यज्ञ कर्म असल्यामुळे, तेव्हा सुद्धा *समासीन* म्हणजे आज डायनिंग चेअर जी काटकोनात 90 अंशात असते ते योग्य आहे.

पाट आणि चौरंग हे जमिनीपासून उंच असणे, हे योग्य आहे. कारण त्यामुळे वाढायला येणाऱ्या व्यक्तीच्या चालण्याने, त्याच्या पावलाने उडू शकणारी धूळ किंवा त्याच्या पायाच्या जवळपास रुळणारे लोळणारे वस्त्र यामुळे उडणारी धूळ ही ताटापर्यंत पोहोचणे टळते.


परंतु पाठ आणि चौरंग या तुलनेत, डायनिंग टेबल आणि डायनिंग चेअर ही व्यवस्था अधिक सुरक्षित व स्वच्छ अशी निश्चितपणे आहे


युरोपामध्ये अतिशय थंडी असल्याने जमीन खूप गार पडते. म्हणून त्या प्रदेशात जमिनीवर बसणे, ही पद्धत नाही. उलट तेथे जमिनीवर लाकडी आवरण म्हणजे वूडन फ्लोरिंग असते.

म्हणून ते लोक प्रायः जमिनीवर मांडी घालून बसण्यापेक्षा, जमिनीपासून वरती साधारणता 18 इंच उंच आसनावर म्हणजे खुर्चीवर /चेअर वर /सोफ्यावर बसणे योग्य समजतात, ते उचित आहे.


आपल्याकडेही सर्व देवता या सिंहासनावर बसलेल्या दिसतात. असे उच्चासनावर बसणे, हे भोजन समयी स्वच्छतेच्या दृष्टीने योग्यच आहे !


*अन्न तत्परः*


कार्यतत्पर म्हणजे कामाविषयी निष्ठा समर्पण असणारा कामाशी एकाग्र असणारा तसे ...


अन्न तत्पर म्हणजे अन्ना विषयी, ताटात वाढलेल्या अन्नपदार्थांविषयी, जेवणाविषयी, भोजनाविषयी ...

आदर एकाग्रता समर्पण निष्ठा सद्भावना असणारा!


*अन्न तत्परः* याला चरक संहितेमध्ये *तन्मना भुञ्जीत* म्हणजे अन्नाकडेच लक्ष ठेवून /अन्नाकडेच मन ठेवून/ अन्न वगळता अन्य विचार न करता ... तत्पर म्हणजे अन्नविषयक एकाग्रता ठेवून जेवावे !


याचाच अर्थ मौन राखून जेवावे 


जेवताना मध्ये मध्ये बोलू नये 


अपूर्वाई या पु ल देशपांडे यांच्या पुस्तकात युरोपातील दोन देशांच्या परस्पर विरुद्ध पद्धती बद्दल सांगितले आहे, की फ्रेंच की ब्रिटिश (?) माणूस हा जेवताना अजिबात बोलत नाही आणि तद्विपरीत देशातील माणूस हा फक्त जेवतानाच बोलतो ... असे काहीसे वर्णन त्यात आहे.


परंतु आपल्या शास्त्रात आणि परंपरेत जेवताना बोलणे हे निषिद्ध आहे 


किंबहुना जेवताना मध्येच बोलल्यास, तिथून पुढचे भोजन तसेच ठेवून, ताटावरून उठावे व हात धुवावेत, असा नियम आहे 


याचा अर्थ जेवताना बोलणे / हसणे ...

हे निषिद्ध वर्ज्य त्याज्य आहे.


आता हल्ली मात्र डायनिंग चेअर वर बसून जेवतानाच, सर्व कुटुंबाने गप्पा गोष्टी हास्य विनोद करत जेवावे ...

असे सांगितले जाते !

*हे आरोग्यदृष्ट्या योग्य नाही*


प्राण नावाच्या वायूच्या गतीने, अन्न हे तोंडातून पोटाकडे जाते ...

तर उदान = उद् आन म्हणजे वरती आणणारा , वरच्या दिशेने जाणारा उदान नावाचा वायू हा आपली वाणी शब्द उलटी स्मृती सामर्थ्य यांना *शरीरातून बाहेरच्या दिशेने* ढकलत असतो.


त्यामुळे प्राण हा आत जाणारा ...

तर उदान हा बाहेर येणारा ,

असे परस्पर विपरीत वायूंचे कर्म एकाच वेळेस होणे योग्य नव्हे ...


म्हणून जेवताना प्राणाचे म्हणजे तोंडाकडून पोटाकडे जाण्याच्या दिशेचे कर्म होणे योग्य आहे ...

यासाठी जेवण करत असताना, 

बोलणे आणि हसणे हे निश्चितपणे टाळले पाहिजे!!! 


यालाच *अन्न तत्पर किंवा तन्मना भुञ्जीत* असे म्हटलेले आहे 


जसे बोलणे आणि हसणे टाळले पाहिजे ... त्याचप्रमाणे जेवत असताना टीव्ही पाहणे , मोबाईल पाहणे , मोबाईलवर बोलणे , रिल्स पाहणे याही गोष्टी टाळल्या पाहिजेत ... कारण जेवण म्हणजे *उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म* अशा भावनेने अन्न सेवन केले ... तरच *जीवन करी जीवित्वा* हे फळ मिळते आणि ते अन्न आपल्याला *पूर्णब्रह्म म्हणजे जगातील आणि जीवनातील सर्व लाभ प्राप्त करण्याइतपत समर्थ बनवते*


तिसरी साधी, सोपी, सरळ, शास्त्रीय नसलेली, गुंतागुंतीची नसलेली गोष्ट म्हणजे ...

जी माऊली गृहिणी, घरातील स्त्री, आई पत्नी सून बहिण मुलगी हे अतिशय कष्टाने ...

त्यांचा सर्व जीव ओतून ,

आपल्या घरातल्या माणसाने सुखाने चार घास खावेत, त्याला उत्तम स्वाद लाभावा...

यासाठी सकाळपासून राबत असतात, कष्टत असतात, खपत असतात ...

त्यांच्या परिश्रमाचे आपण अवमूल्यन केले असे होते, जर आपण जेवताना त्या अन्नाकडे , त्याच्या वासाकडे/ चवीकडे /रंगाकडे /वाढण्याच्या मांडण्याच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करून ... 

केवळ उदरभरण करत असू किंवा

भोजन सोडून अन्य विषयांवरती गप्पा मारत असू किंवा 

टीव्ही वरती सिरीयल क्रिकेट धर्म राजकारण किंवा 

मोबाईल वरती रील्स whatsapp facebook insta यात गुंगून जात असू ...


तर ...आपल्या घरातील जी अन्नपूर्णा आपल्या ताटात उत्तम प्रकारचे अन्न यावे व 

आपले जीवन आरोग्य संपन्न राहावे समर्थ रहावे,

म्हणून सकाळपासून ते अन्न तयार करण्यासाठी मनापासून समर्पितपणे राबलेली असते,

तिचा आपण धडधडीत अपमान केल्याप्रमाणे व 

तिच्या कष्टांकडे दुर्लक्ष केल्याप्रमाणे होत असते.


आपल्या घरातील स्त्रीने तयार केलेला *स्वयंपाक हा महाप्रसाद आहे* अशी भावना ठेवून, तिच्या त्या कष्टांची जाणीव ठेवून, त्या केलेल्या स्वयंपाकाशी कृतज्ञ राहून, जर आपण अन्न सेवन केले तर ... घरामध्ये सुख समृद्धी शांती आनंद आरोग्य प्रीती अशा उच्च जीवन मूल्यांची जपणूक व वाढ निरंतर निश्चित होत राहील


*या उपक्रमात लिहिल्या जाणाऱ्या लेखांमध्ये असणारी विधाने ही आयुर्वेद सिद्धांत व संहिता ग्रंथ यावर आधारित शास्त्रीय सत्य तथ्य अशा स्वरूपाची प्रायः असतात. _परंतु या लेखांमध्ये काही विधाने काही रूढी परंपरा इतिहास याविषयीची माहिती सामाजिक माहिती मनोरंजन वैयक्तिक मत वैयक्तिक आकलन वैयक्तिक समजूत अशा स्वरूपाची सुद्धा असू शकतात_*


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

  

No comments:

Post a Comment