*भोजन करण्याची योग्य रीत = जेवण्याची उचित पद्धत* 😇
*काले सात्म्यं लघु स्निग्धम् उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।*
*बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् मात्रावद् विदितागमः ।*
*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 182*
14 जून 2024, शुक्रवार
*उपविभाग 126*
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट © लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/
*भोजन करण्याची योग्य रीत = जेवण्याची उचित पद्धत* 😇
*काले सात्म्यं लघु स्निग्धम् उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।*
*बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् मात्रावद् विदितागमः ।*
अन्नम् अश्नीयात् म्हणजे अन्न खावे, भोजन करावे जेवण घ्यावे, अन्न सेवन करावे
अन्न कधी खावे? याचं सगळ्यात पहिलं योग्य नैसर्गिक उत्तर म्हणजे *भूक लागलेली असतानाच खावे* ... वेळ झाली आहे , समोर दिसतं आहे, उपलब्ध आहे, आवडतं आहे, पुढे वेळ मिळणार नाही, पुढे गाडी थांबणार नाही, वाटेत सोय होणार नाही ... अशा कारणांसाठी , *_भूक नसताना_* अन्न खाऊ नये.
*काले = योग्य काळ*
भूक लागलेली असताना सुद्धा, *योग्य काळ कोणता*, असे आरोग्य दृष्ट्या हितकर सविस्तर सांगता येते
भारतातील वातावरणानुसार ...
साधारणता मध्याह्न म्हणजे सूर्य डोक्यावर असताना म्हणजे दुपारी बारा वाजता या वेळेच्या अलीकडे/ पलीकडे दीड तास या वेळात जेवण करावे = 10.30 ते 1.30 किंवा खरंतर साडेदहाच्या 10.30 च्या सुमारास जेवण करावे... जेणेकरून पुढील पित्तप्रकोपाच्या / पित्त कार्यक्षमतेच्या उत्तम व सुयोग्य काळात त्या वेळेत खाल्लेल्या अन्नाचे घेतलेल्या आहाराचे व्यवस्थित पचन होऊन, त्याचे योग्य त्या शरीर घटकांमध्ये व्यवस्थित रूपांतर होणे, सहजपणे निसर्गतःच संभवते.
त्या पुढील भोजन तीन तासाच्या आत करू नये
आणि
आधीच्या सकाळच्या भोजनानंतर, सहा तासांपेक्षा अधिक वेळ/काळ, रिकामे पोटी राहू नये
म्हणजे साधारणता सकाळच्या भोजनानंतर पुढील भोजन सायंकाळचे भोजन किंवा रात्रीचे भोजन हे साडेचार - पाच ते साडेसात - आठ (4.30-5 ते 7.30-8) या वेळात करावे
*सात्म्य = मानवणारे, सवयीचे*
आपण घेणार असलेला आहार हा *सात्म्य म्हणजे आपल्याला मानवणारा / परिचयाचा / सवयीचा असावा.
उगीचच काहीतरी फॅन्सी/ व्हरायटी/ नाॅवेल्टी/ ट्राय करायची म्हणून ...
काहीही तोंडात / पोटात "कोंबू" नये ...
पास्ता पिझ्झा बर्गर मोमो शवर्मा मंचुरियन चायनीज नूडल्स हे भारतीय वातावरणात व भारतीय संस्कृतीला आणि शतकानुशतकांच्या भारतीय पचनसंस्थेला सात्म्य नसलेले/ न मानवणारे / सवयीचे नसलेले अन्नपदार्थ आहेत.
त्यामुळे उगीचच अशा गोष्टी "ट्राय करू नयेत".
कारण त्याचे दीर्घकाळानंतर/कालांतराने दुष्परिणामच होतात. अशा सर्व गोष्टी ह्या आरोग्याला आवश्यक नसतात / जीवनावश्यक नसतात.
म्हणून अगदी एखाद्या वेळेला / मनाची उत्सुकता- कुतूहल शमवण्यासाठी म्हणून / चवीपुरते / थोडेसे हे अन्नपदार्थ चाखून पाहणे ...
आणि त्यानंतर "हे अन्नपदार्थ", आपण *"खाण्यायोग्य नव्हेत"* अशा कॅटेगरीमध्ये ... त्यांचे आपल्या मेमरीमध्ये ...
निगेटिव्ह रजिस्ट्रेशन किंवा
खरंतर डी-रजिस्ट्रेशन किंवा
डिलीट फॉर ऑल किंवा
परमनंटली डिलीट / शिफ्ट डिलीट असे करायला हवे!
अशा प्रकारचे डी-रजिस्ट्रेशन हे अनेक अनावश्यक आणि अहितकारक अन्नपदार्थांबाबत करणे, निश्चितपणे आवश्यक आहे.
यामध्ये मैद्यापासून बनणारे सर्व बेकरी पदार्थ ...
यामध्ये अतिपरिचित असलेला वडापाव पावभाजी बर्गर पिझ्झा कॉर्न फ्लोअर मेयोनी स्पिनर बटर बटर ची विविध प्रकारचे तळलेले वेफर्स चटपटीत स्पायसी हवाबंद पॅक मध्ये तीन किंवा सहा महिन्यापूर्वी पॅक केलेले विविध प्रकारची बिस्किटे केक की दुकान बंद केल्यानंतर त्याच्यावर झुरळे माशा चिलटे काय फिरते याचे शाश्वती नसलेले पदार्थ ज्या देहावरती ज्या अन्नावरती आपला देह लहानपणापासून पोचलेला आहे अशा प्रकारच्या आहाराचा अन्नपदार्थांचा आपल्या रोजच्या भोजनामध्ये समावेश असणं हे सुरक्षित आरोग्य रक्षक आणि शरीर वर्धक असते म्हणून घरात तयार होणारी पोळी भाकरी, भात भाजी भरड आमटी उसळ कोशिंबीर यांना प्राधान्य द्यावे त्यात आपले सुगरणीचे कौशल्य वापरून किंवा स्वतःच्या पाकक कौशल्याला आव्हान देऊन विविध प्रकारचे प्रयोग घरच्या घरी स्वच्छ शुद्ध पवित्र मंगल अशा साधने अन्नघटक आणि स्थान म्हणजे किचन या ठिकाणी करून पहावे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी विकत आणलेले किंवा रस्त्यावरचे टपरीवरचे ढाब्यावरचे हॉटेलचे ऑनलाइन मागवलेले असे पदार्थ आपल्या पवित्र यज्ञविधी मध्ये म्हणजे आपल्या उदरस्थ अग्नीमध्ये टाकू नये
लघु स्निग्धम् उष्णं =
लघु = पचायला हलके, स्निग्ध = योग्य तितकी स्निग्धता असणारे आणि उष्ण = नुकतेच तयार केलेले असल्यामुळे गरम उबदार (= एकदा तयार केल्यानंतर, काही वेळाने गार झाले, म्हणून पुन्हा गरम केलेले ... असे उष्ण नको उष्णीकृतम् पुनः असे अभिप्रेत नाही, रि-हीटेड Re-Heated असे नव्हे) असे अन्नपदार्थ खावेत.
एखादा अन्नपदार्थ त्याच्या चवीमुळे किंवा निसर्गतःच गुरु म्हणजे पचायला जड असू शकतो ... तर त्याचे प्रमाण हे आपल्याला जितके खावेसे वाटते , त्याच्या निम्मे किंवा एक तृतीयांश (½ or ⅓) असावे.
असे जड अन्नपदार्थ अगदी पोट भरून पोटाला तडस (satiety) लागेपर्यंत हावरेपणाने खाऊ नयेत.
कारण त्याचे पचन करणे शरीराला जड जाते वेळ लागतो अवघड होते किंवा त्यातून अपचन उलटी मळमळ जळजळ गॅसेस पोट गच्च होणे जुलाब होणे पोट दुखणे अशा प्रकारचे पचनसंस्थेचे मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचे त्रास होऊ शकतात पचायला जड आणि पचायला हलके ही संकल्पना आपल्या शरीरात तो पदार्थ गेल्यानंतर त्याच्या पचनासाठी लागणारा वेळ यावर अवलंबून असते पाण्यावर तेल तरंगते तेलावर भजी तरंगतात म्हणजे भजी हे हलके आहेत असा त्याचा अर्थ नव्हे ब्रेड किंवा खारी हे जाळीदार किंवा दिसायला हलके दिसतात म्हणजे ते पचायला हलके असतात असे नसते त्यामुळे एखादी गोष्ट शरीराबाहेर वजनाला किंवा दिसायला हलकी वाटली तरी ती पचायला सोपी असेल असे नसते हे आपल्या घरातील ज्येष्ठांच्या किंवा आरोग्य तज्ञांच्या किंवा रुढीपरंपरेने माहीत असलेल्या अनुभवानुसार ठरवावे प्राया हा सर्व गोड पदार्थ तळलेले पदार्थ मैद्याचे पदार्थ सर्व प्रकारचे मांसाहारी नॉनव्हेज पदार्थ जमिनीखाली तयार होणारे बटाटा साबुदाणा रताळे बीट यासारखे कंद पदार्थ अंडरग्राउंड फूड आयटम्स बेकरीचे पदार्थ आंबून फर्मेंटेशन करून तयार केले जाणारे दक्षिणात्य पदार्थ कुकरमध्ये शिजवले जाणारे पदार्थ हवाबंद डब्यात रिझर्वेटिव्ह घालून साठवलेले पदार्थ हे सर्व पचायला जड असतात म्हणून असे जड पदार्थ कधीतरी थोड्या प्रमाणात चवीपुरते मनाची उत्सुकता कुतूहल समवन्या पुरतेच खावेत अशा जड पदार्थांच्या खाण्याचे प्रमाण आणि वारंवारिता कॉन्टिटी आणि फ्रिक्वेन्सी ही शक्य तितकी कमी असावी
आपण अन्न खाल्ल्यानंतर ते पचनसंस्थेतून 22 फुटांचा प्रवास करून पचन प्रक्रिया पूर्ण होऊन मळविष्ठा पुरुष फिकल मटेरियल या स्वरूपात बाहेर पडेपर्यंत ते आतड्याच्या पृष्ठभागावरून सरफेस वरून सहजपणे पुढे सरकले पाहिजे घसरले पाहिजे स्लाईड झाले पाहिजेत यासाठी आतड्याचा पृष्ठभाग आणि अन्नपदार्थ यामध्ये पुरेशी स्निग्धता तेलकटपणा गुळगुळीतपणा गुळगुळीत पणा स्मूदनेस असायला हवा त्याच्यामध्ये कोरडेपणा अडथळा संकोच कुठेही असता कामा नये म्हणून आपण खात असलेले अन्नपदार्थ हे अतिशय कोरडे, शुष्क रुक्ष ड्राय असू नये ते पुरेसे स्निग्ध तेल तूप लोणे यांनी युक्त असावे चीज बटर हे सुद्धा स्निग्ध पदार्थ असले तरी त्याच्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्याने ते आरोग्यासाठी तितकेसे योग्य नसतात म्हणून चीज बटर यांचा वापर कमी करून घरात लोणी विरघळवून केलेले लोणकढही साजूक तूप शुद्ध देसी घी विकत आणलेले सुद्धा बाहेरचे आयते मिळणारे गीर गाईचे तूप हे विश्वासार्ह असेलच याची कोणतीही खात्री देता येत नसते म्हणून तू स्वतः गृहिणीने दुधापासून विरजण दही ताक लोणी घरात घडवणे या पद्धतीने करणे हे तिच्या घरातील सर्वांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी निश्चितपणे आवश्यक आणि पायाभूत आहे असे जाणारे सर्व गोष्टी विकत मिळतात म्हणजे त्या गुणवत्तापूर्ण असतात असे नव्हे सोय सुविधा याचा स्वीकार करताना आपण आपली पारंपारिक कौशल्य गमावत आहोत आणि आळशीपणाकडे ऐदीपणाकडे वाटचाल करत आहोत असे होऊ देऊ नये जे पदार्थ पटपट खाल्ल्यानंतर घास बसतो तोटरा बसतो सफोकेशन होते असे पदार्थ वृक्ष आहेत असे जाणारे जसे की इडली मैद्याचे सर्व पदार्थ कुरमुरे चुरमुरे लाह्या फुटाणे वाटाणे शेंगदाणे इत्यादी म्हणून या पदार्थांना शक्यतो तुपाची फोडणी देऊन ते पदार्थ खावेत किंवा त्याच्याबरोबर दर घासायला घोटघोटभर सिप बाय सिप पाणी पीत राहावे
आपण कितीही कोलेस्टेरॉल फॅट लिपीड याचा बागुलबुवा केला तरीही हे सत्य विसरून चालत नाही की शरीरातील प्रत्येक पेशी सेल याचे जे आवरण आहे ते प्रोटीन आणि फॅट यांनीच बनलेले असते त्यामुळे स्निग्ध पदार्थ खाण्याचे पूर्णतः टाळणे किंवा त्याची उणीव कमतरता करणे हे सर्वांगीण शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने निश्चितपणे घातक असते युरोपातील लोकांना भारतीय पद्धतीने केलेले तू ही प्रक्रिया ज्ञात नाही नव्हती गायीने म्हशीने खाल्लेला हिरवा चारा हा एकदा मानवी शरीराप्रमाणे पूर्णतः अन्नपचन होऊन तिच्या वासराच्या पोषणासाठी दूध या स्वरूपात गाई म्हशीच्या शरीरातून बाहेर येत अशा दुधाला विरजण लावून म्हणजे एक प्रकारची रासायनिक प्रक्रिया करून त्याचे दह्यात रूपांतर होते त्या दह्यातील घट्ट भागावरती घुसळणे ही यांत्रिकी मेकॅनिकल क्रिया होऊन ताकाची निर्मिती होऊन त्यातून लोणी हा पदार्थ तयार होतो या लोण्यावरती निर्द्रावीकरण डीहायड्रेशन अशी अग्नीची पुन्हा प्रक्रिया होऊन तूप तयार होते ज्याला युरोपीय लोक क्लारीफाईड बटर म्हणतात ही प्रक्रियाच मुळात चार ते पाच वेगळ्यावेगळ्या स्थित्यंतरातून जाते त्यामुळे अशा प्रकारे निसर्गतः त्याच्यावर इतके संस्कार झालेले आहेत ते तू प्राणीजन्य असल्यामुळे मानवी देहाला हानिकारक नसते. अर्थात नवीन शास्त्राच्या संशोधनाप्रमाणे शरीरातील किंवा आहारातील एकूण स्निग्ध पदार्थांचे प्रमाण हे 10 ते 40% इतके असावे 60 ते 70 किलो वजनाच्या माणसाला 60 ते 70 ग्रॅम पर्यंत रोज स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते आपण निश्चितपणे आज आपल्या आहारामध्ये इतके स्निग्ध पदार्थ घेत नाही म्हणून शक्य होईल तितके तेलाचे प्रमाण कमी करून घरी वरील भारतीय पारंपरिक शतकानू शतकांच्या पद्धतीप्रमाणे तयार केलेले तूप वापरणे चांगले बाजारात मिळणारी बहुतांश तूप ही दूध घुसळून तयार झालेल्या क्रीम पासून मिळणारे तू या स्वरूपाचे आहे बाजारात विकत मिळणारे डबाबंद तू हे दूध दही ताक लोणी तूप या पारंपारिक प्रक्रियेतून आलेले नसते त्यामुळे विकतच्या तुपावरती भले ते कितीही महाग असले तरीही किंवा गीर गायीचे असले तरीही विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या घरात जे कोणते दूध येते ते खळखळा उकळून त्यातील साईला योग्य पद्धतीने दीड ते दोन दिवस विरजण लावून त्याचे घट्ट पातळ असे विभाजन होईल इतके चांगले दही झाल्यानंतर त्यात समभाग ते दुप्पट पाणी घालून ते ब्लेंडर ने नव्हे रिपरणे नव्हे तर दोन्ही बाजूंनी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरणाऱ्या रवीने घुसळून त्याचे ताक करून त्यावर येणाऱ्या ताज्या लोण्याला कडून त्यातील बेरी गाळून येणारे रवाळ अतिशय सुगंधी किंचित पिवळसर पांढरे असे तूप आहारात निश्चितपणे प्रतिदिनिप्रती आहार उपयोगात आणावे.
स्निग्धता लिपीड फॅट तेल तूप लोणी साय दूध हे अल्प प्रमाणात काही प्रमाणात मर्यादित प्रमाणात शरीराला आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निश्चितपणे आवश्यक आहे परंतु चीज बटर चॉकलेट मेयोनीज पेस्ट्री सॉस अशा स्वरूपातील फॅट मात्र शरीराला निश्चितपणे वर्ज आहे रेडमी याच्यामध्ये कोलेस्टेरॉल असते असा बागुलबुवा भीती अपसमज गैरसमज प्रवाद समाजामध्ये पसरलेला आहे परंतु त्याविषयी पुढील भागात सविस्तर आणि सहजपणे पटेल असे स्पष्टीकरण पाहूया
*या उपक्रमात लिहिल्या जाणाऱ्या लेखांमध्ये असणारी विधाने ही आयुर्वेद सिद्धांत व संहिता ग्रंथ यावर आधारित शास्त्रीय सत्य तथ्य अशा स्वरूपाची प्रायः असतात. _परंतु या लेखांमध्ये काही विधाने काही रूढी परंपरा इतिहास याविषयीची माहिती सामाजिक माहिती मनोरंजन वैयक्तिक मत वैयक्तिक आकलन वैयक्तिक समजूत अशा स्वरूपाची सुद्धा असू शकतात_*
*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।*
आणि
*न पीडयेत् इंद्रियाणि*
हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.
_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_
त्वदीय वस्तु गोविंद
तुभ्यम् एव समर्पये ।
तेरा तुझको अर्पण
क्या लागे मेरा ।
श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।
🙏🏼
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/
No comments:
Post a Comment