Thursday, 23 January 2025

प्रीपेड मोबाईलचा रिचार्ज = जितनी चाबी भरी राम ने , उतना चले खिलौना !

प्रीपेड मोबाईलचा रिचार्ज = जितनी चाबी भरी राम ने , उतना चले खिलौना !


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 175*

 8 मार्च 2024, शुक्रवार

*उपविभाग 120* 


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/



इंद्रिय 

कर्मेंद्रिय 

गुद 

उपस्थ 

या अनुषंगाने ...


आधी 

अधोवात/farting

उद्गार ढेकर belching 

पुरीष शौचानंद bowels

मूत्र urine 

शुक्र

निद्रा 

रज पाळी मेन्सेस गर्भ स्तन्य=मातृदुग्ध

स्वेद 

असे विषय आपण आतापर्यंत सविस्तर पाहून झालेले आहेत. आता *वेग* या संकल्पनेतील पुढील विषय, क्रमशः , यथा शक्य ... *न अतिसंक्षेप न अतिविस्तर* ... या पद्धतीने पाहूया.


आयुर्वेद शास्त्रात उल्लेख केलेल्या 14 वेगांपैकी वरील वेगांचे आपण माहिती घेतली.

आता, उर्वरित वेग म्हणजे ...

क्षवथु= शिंक, तृष्णा= तहान, क्षुधा= भूक, कास= खोकला, श्रमश्‍वास= थकल्यानंतरचा सुस्कारा, जृम्भा = जांभई, अश्रू आणि छर्दि= उलटी ... 

या वेगांची माहिती क्रमशः पाहूया.


प्रीपेड मोबाईल ही पद्धत म्हणजे आधी पैसे भरा आणि मग वापरा जितके पैसे भरलेत तितक्या मूल्याच्या विनियोगापर्यंत वापर करता येईल किंवा पैसे द्या टोकन घ्या मगच तुम्हाला हवी ती डिश पदार्थ मिळेल अशी व्यवस्था असते 

म्हणजे एका जुन्या लोकप्रिय गाण्यामध्ये ...

जितनी चाबी भरी राम ने , उतना चले खिलौना !


प्रीपेड मोबाईलचा रिचार्ज संपत आला की, पुन्हा पुढील रिचार्ज करा यासाठीचा रिमाइंडर एसएमएस किंवा फोन या पद्धतीने येतो.


हीच व्यवस्था म्हणजे जीवनात निसर्गतःच आहे. 


शरीरातील ऊर्जा शक्ती सामर्थ्य म्हणजे आजच्या भाषेत एनर्जी संपत आली की त्याचं एक रिमाइंडर येतं, त्यालाच आपण भूक असे म्हणतो ... ज्याला आयुर्वेदात संस्कृत भाषेत क्षुधा, असा शब्द आहे.


बुभुक्षा म्हणजे भोक्तुम इच्छा ... खाण्याची इच्छा अर्थात भूक


जसे पाणी पिण्याची इच्छा, पातुम् इच्छा म्हणजे पिपासा = तृष्णा म्हणजे तहान शरीरात पाण्याचा अंश कमी पडायला लागला की पाणी पिण्याची इच्छा म्हणजे तहान ... तसे शरीरात इंधन शक्ती सामर्थ्य कमी पडू लागले की ते घेण्याची इच्छा म्हणजेच इंधन अर्थात अन्न घेण्याची इच्छा म्हणजे भोक्तुम् इच्छा म्हणजे बुभुक्षा = क्षुधा म्हणजे भूक!


*प्राणाः प्राणभृतामन्नमन्नं लोकोऽभिधावति ।*


अन्न हेच सर्व सजीवांचा प्राण आहे. सर्व जग हे अन्नाच्या मागेच पळत असते अन्न मिळवण्यासाठीच सर्व प्रयत्न करत असते. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविची जगदीशा पापी पेट का सवाल है


*वर्णः प्रसादः सौस्वर्यं जीवितं प्रतिभा सुखम् ॥*

*तुष्टिः पुष्टिर्बलं मेधा सर्वमन्ने प्रतिष्ठितम् ।*


आपल्या शरीराचा रंग तजेला तेज आपली प्रसन्नता आपला आवाज खणखणीत असणं आपलं सर्व आयुष्य आपले बुद्धी आपलं सुख आपलं तृप्त असणं आपलं पुष्ट होणं पोषण होणं शरीराची वाढ होणं आपलं सामर्थ्य आणि आपली समजूत आकलन शक्ती ... हे सर्व काही अन्नावरच अवलंबून आधारित आहे


*लौकिकं कर्म यद्वृत्तौ स्वर्गतौ यच्च वैदिकम् ॥*


वृत्तीकारक म्हणजे या जगामध्ये जगण्यासाठी जिवंत राहण्यासाठी अस्तित्वासाठी सर्वांसाठी जी लौकिक व्यावहारिक काम करायची आहेत ती आणि जी स्वर्ग प्राप्तीसाठी अलौकिक लाभासाठी जे वेदोक्त कर्म करायचे आहेत, ती करण्यासाठीच सामर्थ्य सुद्धा अन्नावरच अवलंबून आहे


*कर्मापवर्गे यच्चोक्तं तच्चाप्यन्ने प्रतिष्ठितम् ।*


इतकंच काय तर मुक्तीसाठी करावयाचे कर्म सुद्धा अन्नावरतीच अवलंबून आहे ...


अशी अन्नाची प्रशस्ती स्तुती चरकाचार्य करतात.


इच्छा कितीही असली म्हणून, केव्हाही कितीही काहीही खाल्लं , तरी ते शरीरात स्वीकारलं जातच , असं नाही ... कारण खाल्लेलं म्हणजे मुखावाटे पोटात नेऊन ठेवलेलं अन्न, पचलं तरच ते शरीरात स्वीकारले जातं.


थोडक्यात अन्न खाण्याची इच्छा आणि अन्न पचवण्याची क्षमता, या दोन वेगळ्या बाबी आहेत.


क्षुधा आणि अग्नि हे वेगळे विषय आहेत.


क्षुधा ही इच्छा आहे, तर अग्नि ही क्षमता शक्ती सामर्थ्य होय.


आयुर्वर्णो बलं स्वास्थ्यमुत्साहोपचयौ प्रभा ।

ओजस्तेजोऽग्नयः प्राणाश्चोक्ता देहाग्निहेतुकाः ॥३॥


म्हणून जरी वरील श्लोकांमध्ये अन्नाची कितीही प्रशस्ती वर्णन केलेली असली तरीही ... प्रत्यक्षात जीवन वर्ण तेज सामर्थ्य आरोग्य उत्साह शरीराची वाढ किंवा शरीराचे टिकणं तेज ओज आणि साक्षात जिवंत असणं प्राण हे अग्निवरतीच अवलंबून आहेत, ही वस्तुस्थिती आहे


शान्तेऽग्नौ म्रियते, युक्ते चिरं जीवत्यनामयः ।

रोगी स्याद्विकृते, मूलमग्निस्तस्मान्निरुच्यते ॥


पचनशक्ती म्हणजे अग्नि शांत होणे म्हणजे साक्षात मरण होय. जीवन थांबणे म्हणजे अग्नि नष्ट होणे. जोपर्यंत अग्नि हा युक्त म्हणजे योग्य प्रकारे काम करतो आहे, तोपर्यंत मनुष्याला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्याची प्राप्ती शक्य आहे. अग्नि विकृत झाला बिघडला योग्य प्रकारे काम करेनासा झाला, तर माणसाला विविध रोग होतात. म्हणून क्षुधा किंवा अन्न याहीपेक्षा अग्नि हे जीवनाचे मूल अधिष्ठान आहे.


क्षुधा म्हणजे खाण्याची इच्छा असे म्हटले की , पुढील काही प्रश्न हे अगदीच स्वाभाविक आहेत ...

काय खावे 

कधी खावे 

किती खावे 

कसे खावे


आणि या सकारात्मक प्रश्नांच्या बरोबरीनेच ...


काय खाऊ नये 

कधी खाऊ नये 

किती खाऊ नये

आणि कसे खाऊ नये 


अशा दुसऱ्या बाजूचा नकारात्मक प्रश्नांचीही उत्तरे माहिती असायला हवीत


क्षुधा हा एक वेग आहे ... म्हणजे अन्न शरीरात घेण्याची इच्छा आहे, ती एक गती आहे. ही अंतर्गामी गती आहे. 


आतापर्यंत पाहिलेले वात मूत्र पुरुष रज स्तन्य गर्भ शुक्र स्वेद हे शरीरातून बाहेर जाणारे भाव पदार्थ आहेत म्हणजेच हे वेग बहिर्गामी आहेत.


क्षुधा हा मात्र अंतर्गामी = शरीराच्या आत भाव पदार्थ घेण्याची स्वीकारण्याची इच्छा असणारा वेग आहे.


वेग म्हटले की त्याचे *धारण आणि उदीरण* अशा दोन्ही गोष्टी पाहणे आवश्यक आहे.


क्षुधा या वेगाचे धारण म्हणजे भूक लागलेली असून सुद्धा, न खाणे = उपास उपवास उपोषण करणे, लंघन करणे


आणि क्षुधा या वेगाचे उदीरण म्हणजे भूक लागलेली नसताना सुद्धा खाणे ... अनावश्यक खाणे , दिसलं म्हणून खाणे , आहे म्हणून खाणे , वेळ झालीये म्हणून खाणे , लोभ मोह यावर नियंत्रण ठेवता येत नाही म्हणून खाणे , धीर संयम पेशंस नाही म्हणून खाणे, अज्ञानापोटी खाणे, देवाने तोंड दिलंय म्हणून खाणे, गिळणे चरत राहणे हादडणे कोंबणे ठूंसना ... असे अनेक प्रकार क्षुधा या वेगाच्या *उदीरण* या बाजूस संभवतात.


वरील सर्व बाबी समाधानकारक विस्ताराने पुढील भागात पाहूया


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


No comments:

Post a Comment