Thursday, 23 January 2025

रेड मीट Red Meat याच्यामध्ये कोलेस्टेरॉल असते , असा बागुलबुवा भीती अपसमज गैरसमज प्रवाद समाजामध्ये पसरलेला आहे ...

 *स्निग्ध पदार्थांचे भोजनातील प्रमाण : तेल तूप फॅट चरबी मेद लिपिड* 😇




~काले सात्म्यं लघु~ *स्निग्धम्* ~उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम्~ ।।

~बुभुक्षितो~ *अन्नम् अश्नीयात्* ~मात्रावद् विदितागमः~ ।


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 183*

15 जून 2024, शनिवार  

*उपविभाग 127* 


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट © लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


*स्निग्ध पदार्थांचे भोजनातील प्रमाण : तेल तूप फॅट चरबी मेद लिपिड* 😇


~काले सात्म्यं लघु~ *स्निग्धम्* ~उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम्~ ।।

~बुभुक्षितो~ *अन्नम् अश्नीयात्* ~मात्रावद् विदितागमः~ ।


काल आपण वरील श्लोका मधील *काले सात्म्य लघु आणि बुभुक्षित* या चार शब्दांविषयी पाहिले होते.


*स्निग्ध* याबाबत आपण पुरेसे स्पष्टीकरण पाहिले.


कालच्या भागात व्हाईस टायपिंग करत असताना बरेचसे एडिशन संपादन शाब्दिक चुका सुधारण्याचे राहून गेले , त्याबद्दल खेद आहे.🙏🏼


अन्नम् अश्नीयात् म्हणजे अन्न खावे, भोजन करावे जेवण घ्यावे, अन्न सेवन करावे


 रेड मीट Red Meat याच्यामध्ये कोलेस्टेरॉल असते ,

असा बागुलबुवा भीती अपसमज गैरसमज प्रवाद समाजामध्ये पसरलेला आहे ...

परंतु त्याविषयी आजच्या भागात सविस्तर आणि सहजपणे पटेल असे स्पष्टीकरण पाहूया


आधुनिक वैद्य किंवा मॉडर्न मेडिसिन याचे सर्व रिसर्च हे प्रायः युरोप अमेरिका येथून आपल्याकडे पोहोचतात. मॉडर्न मेडिसिन मध्ये भारतातील स्थानिक डॉक्टरांनी काही भरीव रिसर्च केल्याची उदाहरणे अत्यल्प आहेत. त्यामुळे भारत किंवा महाराष्ट्र येथील वातावरणाशी सुसंगत अशा प्रकारचे आरोग्य नियम असणे किंवा ते युरोप अमेरिकेतील वातावरणानुसार असले, तरी आपल्याला लागू पडणारे आहेत की नाही, याची पडताळणी करणे, आवश्यक आहे.


रेड मीट मध्ये कोलेस्ट्रॉल असते हे युरोपीय अमेरिकन माणसांच्या दृष्टीने योग्य निरीक्षण आहे. कारण तेथे जे रेड मीट खाल्ले जाते, ते प्रायः पोर्क म्हणजे डुक्कर, बीफ म्हणजे बैल म्हैस किंवा लॅम्ब शीप मेंढी याचे असते.

आपण कधीतरी डुक्कर बैल मेंढी यांना कृश किडकिडीत बारीक असे पाहिले आहे का ?

तर कधीच नाही !!

हे तीनही प्राणी बऱ्यापैकी पुष्ट असे असतात.

आयुर्वेद शास्त्रात तर पुष्ट होणे याला ... वराह इव पुष्यति ... डुकराप्रमाणे पोषण होणे पोसला जाणे = जाड होणे, अशीच उपमा आहे.


तर युरोप अमेरिकेमध्ये ज्या प्रकारच्या प्राण्यांचे मांस खाल्ले जाते, ते प्राणी मुळातच लठ्ठ जाड गुबगुबीत अधिक मेद असणारे असेच असतात...

परंतु भारतामध्ये प्रायः किमान महाराष्ट्रामध्ये तरी आपण बकरी बोकड शेळी याचे मांस अधिक्याने खातो.


आपण कधीतरी शेळी जाडजूड गुबगुबीत लठ्ठ पाहिली आहे का ?

तर नाही ... शेळी ही सतत इकडे तिकडे फिरत असते आणि प्रायः ती कडवट पाला खात असते ... त्यामुळे शास्त्रामध्ये शेळीचे मांस हे लघु म्हणजे पचण्यास सहज हलके असे सांगितले आहे 

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेळीच्या शरीरातील सर्वच अवयव सर्वच धातू घटक हे मनुष्य शरीराप्रमाणे असतात, असे आयुर्वेद शास्त्र सांगते.


शरीर धातु सामान्यात् अनभिष्यन्दि बृंहणम्


याच्या अगदी विरुद्ध ... मेंढीचे म्हणजे बोलाईचे म्हणजे लॅम्ब शीप हिचे मांस असते ... आणि नेमके अशाच प्रकारचे लॅम्ब शीप किंवा त्याहीपेक्षा अधिक चरबी फॅट मेद असलेले मांस युरोप अमेरिकेमध्ये खाल्ले जाते.


प्राण्यांच्या शरीरातील मांसाचा मसलचा जाडपणा जितका जास्त, जितका त्यातून येणारा कोलेस्टेराॅलचा अंश जास्त असतो ... त्यामुळे डुक्कर बैल मेंढी यांच्या मांसातून म्हणजे सो कॉल्ड रेड मीट मधून कोलेस्टेरॉल वाढणे हे शक्य असते, हे युरोप अमेरिकेतील माणसांच्या दृष्टीने योग्य निरीक्षण आहे !


*परंतु भारतातील किंवा महाराष्ट्रातील शेळी बोकड बकरी अशा प्रकारचे कृश कमी जाडीचे मसल मांस खाणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारच्या कोलेस्टेरॉलची भीती बाळगण्याचे कारण नाही.*


त्यातही ज्यांना अधिकच साशंकता आहे सावधानता बाळगायची आहे ...

त्यांनी शेळीचे सुद्धा मांस खाताना , गर्दन मांडी खिमा असे जाडजूड मसल्स असलेले बोनलेस मांस खाण्याऐवजी ...

शक्यतो सीना चाॅप अशा प्रकारातील मणके व बरगड्या यांच्याशी जोडलेले पातळ कमी जाडीचे मसल असणारे मांस खाणे आरोग्यासाठी हितकर आहे 


आणि त्यातून कोलेस्टेरॉल वाढणार नाही ...

उलट चांगल्या प्रतीचे प्रोटीन शरीराला हितकारक आरोग्य रक्षक असा अन्न अंश त्यातून लाभतो.


जोपर्यंत आपण रॉजर डेव्हिड जॉन मायकेल यांनी युरोप अमेरिका येथे बसून लिहिलेल्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवू ...

तोपर्यंत आपल्याला आपल्याकडील आहाराबाबत साशंकता येणार विश्वास राहणार नाही 


परंतु त्या त्या वातावरणातील तीव्रतेनुसार 

त्या त्या ठिकाणचे स्थानिक आरोग्य नियम हे अनुकूल प्रतिकूल अशा पद्धतीने बदलू शकतात ,

हे लक्षात घेणे आवश्यक आहे.


अत्यंत थंडी असल्यामुळे युरोप अमेरिकेतील माणसे थ्री पीस सूट घालतात , नेक टाय लावतात , सॉक्स घालतात , शूज घालतात, वूडन फ्लोअर वापरतात, सिगरेट फुंकतात , मद्य पितात, घरामध्ये त्यांच्या सतत लाकडी ओंडके जळत ठेवलेले असतात ... याचाच अर्थ अत्यंत थंडीपासून बचावाचे सर्व उपाय ते करतात ...


म्हणजे मग येथे भारतात महाराष्ट्रात चाळीस डिग्री 40° मध्ये सुद्धा भर मार्चमध्ये लग्न करत असताना लाजा होम करताना समोर अग्नि पेटलेला असताना, आपण थ्री पीस सूट घालून बसावे हे हास्यास्पद नव्हे का ???


हाच नियम युरोप अमेरिकेतून येणाऱ्या मॉडर्न मेडिसिनच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व बाबींना लावून पहावा ... त्याची पडताळणी आपल्या येथील स्थानिक वातावरण , उपलब्ध अन्नपदार्थ याच्याशी सुसंगतपणे करून, मगच त्यांच्या स्वीकार किंवा त्यात योग्य तो बदल करावा, हे सुज्ञपणाचे होय 


*अर्थात मी या लेखामध्ये असे लिहिले म्हणजे लगेच उद्या क्रांती होईल आणि संपूर्ण भारतभरातील लोकांचे मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांचे किंवा मुळात ज्यांच्या डोक्यात घट्ट गैरसमज बसलेले आहेत , त्यांचे मत बदलेल , असा माझा समज नाही ...*

परंतु जे योग्य आहे , ते मांडण्याचा प्रयत्न करणे समाज हिताच्या दृष्टीने, मी माझे कर्तव्य समजतो.


स्निग्ध याच्याबाबत , पुढे ...

जसे चांगले स्निग्ध पदार्थ म्हणजे तूप आहे 


तसे सर्व तेले वाईटच असतात असे जाणावे. खाण्यायोग्य तसे आज मार्केटमध्ये कुठलेही तेल उपलब्ध नाही.

सर्व विकत मिळणाऱ्या तेलांमध्ये अनेक प्रकारची तेले ब्लेंड मिक्स केलेली असतात. पाम तेल हे तर बहुतांश तेलाचा अंश असतेच असते.


त्यामुळे तेल कुठले चांगले ? याचे उत्तर *कुठलेही नाही* असेच द्यावे लागते. 


तेल हा शब्द मुळात तिळ यापासून आलेला आहे. म्हणजे तिळाचे तेल वापरावे असा त्याचा अर्थ होतो. पण महाराष्ट्रासारख्या प्रदेशात तिळाचे तेल उष्ण पडते. आणि उत्तर भारतात त्यापेक्षा उष्ण असलेले मोहरीचे म्हणजे सरसो का तेल वापरले जाते. तर अति उष्ण असलेल्या दक्षिणेकडच्या किनारी भागात शीत थंड असणारे खोबरेल तेल वापरले जाते. मागील दोन-तीन पिढ्यापासून महाराष्ट्रात शेंगदाणा तेल वापरले जात असे ... तर या पिढीमध्ये सर्रास सनफ्लॉवर किंवा दर महिन्याला तेल बदलणे असेही उद्योग केले जातात.


परंतु खऱ्या अर्थाने जर आरोग्याची जपणूक करायची असेल तर ...


*तेलाचा वापर शून्य टक्के करून*

*शंभर टक्के घरी तयार केलेल्या दूध विरजण दही ताक लोणी तूप या प्रक्रियेतून घरात तयार केलेल्या शुद्ध साजूक तुपाचा स्वयंपाकासाठी फोडणीसाठी तळण्यासाठी वापर करणे हे आरोग्य दृष्ट्या 100% सुरक्षित आहे*.


तुपाव्यतिरिक्त बाजारात मिळणारी सर्व तेले ही आरोग्यासाठी हितकर नसतील तर ...

त्या व्यतिरिक्त बाजारात असणारे अनेक प्रकारचे स्निग्ध पदार्थ म्हणजे बटर चीज वनसपति तूप = हायड्रोजनेट ऑईल खवा क्रीम स्प्रेड याबाबत तर काही बोलायचीच आवश्यकता नाही. 


वनस्पती तूप = ज्याला मागच्या पिढीमध्ये डालडा म्हणत असत परंतु डालडा हे वनस्पती तुपाचे ब्रँड नेम आहे ... जसे दात घासायच्या पेस्टला सर्रास कोलगेट किंवा धुण्याच्या पावडरला निरमा म्हणण्याची पद्धत होती, इतके ते ब्रँड नेम त्या वस्तूशी एकरूप झालेले होते.


या सर्वांचे प्रमाण हे केव्हातरी आणि अत्यल्प = क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी या दृष्टीने कमीत कमी नगण्य किंवा खरंतर शून्य असणे हेच योग्य आहे.


तेल आणि तूप यांच्या बाबत शास्त्रात एक वैशिष्ट्यपूर्ण भेद सांगितलेला आहे ते म्हणजे तुपात तयार केलेले सर्व पदार्थ हे दृष्टीसाठी हितकर असतात आणि तेलात तयार केलेले सर्व पदार्थ दृष्टीसाठी हानिकारक असतात अर्थात यातील तेल हे तिळतेल अभिप्रेत आहे आज मात्र इतक्या प्रकारची तेले वापरली जातात की त्यांचा दृष्टीवर काय परिणाम होतो हा संशोधनाचा विषय आहे परंतु *तुपात पदार्थ तयार केले असता ते आपल्या दृष्टीला दीर्घकाळपर्यंत सक्षम ठेवतील ही लाभाची गोष्ट त्यातून लक्षात घेण्याजोगी व आचरणात आणण्याजोगी निश्चितपणे आहे*


स्निग्ध किंवा प्रत्यक्ष तेलकट तळलेले फ्राईड असे पदार्थ न खाता सुद्धा ...

शरीरात तेलकट पदार्थ = मेद = फॅट = लिपिड हे तयार होतातच !!!


आपण जी शुगर ग्लुकोज कार्बोहायड्रेट खातो ...

परंतु ते आपल्या हालचालीसाठी व्यायामासाठी वापरत नाही ... तर त्याचे रूपांतर हळूहळू तेलामध्ये/fat/lipid होत जाते म्हणजे लिपिड्स मध्ये होत जाते.


म्हणूनच हळूहळू ढेरी सुटते , सीट चा आकार वाढतो, कमरेचा घेर वाढतो, लोंबळणारे टायर दिसू लागतात, दंड थुलथुलित होतात , डबल चीन दिसते ,मानेभोवती मेद जमा होतो ...

आणि एकूणच माणसाचा आकार गोल गरगरीत होत जातो.


त्याचे कारण ...

तो प्रत्येक वेळेला तेल तूप खातो असे नसून...

त्याच्या हालचालीला व्यायामाला आवश्यक आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात, 

गोड पदार्थ दूध फळे ड्रायफ्रूट किंवा अगदी रोजची भाकरी चपाती पोळी रोटी भात यातूनही ...

जी शुगर ग्लुकोज कार्बोहायड्रेट शरीरात जाते ... 

ती जर रोजच्या व्यायाम हालचाल यासाठी वापरली गेली नाही ...

*तर त्याचे रूपांतर हळूहळू शरीरातील चरबी मेद फॅट लिपिड यामध्ये होत असते.*


साधारणतः माणसाच्या वजनाच्या प्रति किलो 1 ग्रॅम पर्यंत फॅट प्रतिदिनी आहारात असायला हवे, असे शास्त्र सांगते. याचा अर्थ सर्वसाधारण 60 किलो वजन असलेल्या माणसाने रोज 60 ग्रॅम पर्यंत स्निग्ध पदार्थ = खरंतर घरी तयार केलेले लोणकढी शुद्ध साजूक तूप आपल्या आहारात खायला हवे. हे त्याच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी हितकारक आहे, अर्थात यासोबत प्रतिदिनी एक तास सर्वांगीण मस्क्युलर व्यायाम करणे आवश्यक आहे, _सायकलिंग जिम रनिंग किंवा योगा प्राणायाम नव्हे!_


म्हणून स्निग्ध भोजन घ्यावे याचा अर्थ एकूण आहाराच्या म्हणजे जेवणातील एकूण अन्नपदार्थांच्या दहा ते वीस टक्के पर्यंत, घरी तयार केलेल्या लोणकढी शुद्ध साजूक तुपाचा वापर आपल्या आहारात भोजनात असावा ...


या व्यतिरिक्त चे सर्व प्रकारचे स्निग्ध पदार्थ फॅट असलेले पदार्थ हे टाळावेतच , हेच योग्य आहे


*या उपक्रमात लिहिल्या जाणाऱ्या लेखांमध्ये असणारी विधाने ही आयुर्वेद सिद्धांत व संहिता ग्रंथ यावर आधारित शास्त्रीय सत्य तथ्य अशा स्वरूपाची प्रायः असतात. _परंतु या लेखांमध्ये काही विधाने काही रूढी परंपरा इतिहास याविषयीची माहिती सामाजिक माहिती मनोरंजन वैयक्तिक मत वैयक्तिक आकलन वैयक्तिक समजूत अशा स्वरूपाची सुद्धा असू शकतात_*


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

 

No comments:

Post a Comment