*ड्राय फ्रुट खावेत , ड्राय नट्स नव्हे ... स्निग्ध पदार्थांचे भोजनातील प्रमाण* 😇
👆🏼🚫❌️⛔️👆🏼
👇🏼✅️👌🏼
~काले सात्म्यं लघु~ *स्निग्धम्* ~उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम्~ ।।
~बुभुक्षितो~ *अन्नम् अश्नीयात्* ~मात्रावद् विदितागमः~ ।
*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 184*
25 जून 2024, मंगळवार
*उपविभाग 128*
*ड्राय फ्रुट खावेत , ड्राय नट्स नव्हे ... स्निग्ध पदार्थांचे भोजनातील प्रमाण* 😇
अनेक जण आरोग्य विषयी अति जागरूक असतात! किंवा कुठेतरी वाचलेलं, फॅड/ फॅशन म्हणून... आरोग्याला चांगलं असतं अशा समजा पोटी, रात्री भिजवलेले बदाम खाणे किंवा काजू पिस्ता अक्रोड असे ड्रायफ्रूट(?) = नट्स खाणे अशी सवय असते.
प्रत्यक्षात बदाम काजू पिस्ता अक्रोड हे ड्रायफ्रूट नसून, *"ड्राय नट्स आहेत"* या चारही बिया कठीण कवचाच्या आत असतात, त्या फोडून काढाव्या लागतात ... म्हणून त्यांना ड्राय नट्स किंवा नट्स असे म्हणतात. खऱ्या अर्थाने ड्रायफ्रूट ही स्पर्शाला तुलनेने मऊ असतात, यामध्ये अंजीर काळे मनुके आणि जर्दाळू यांचा समावेश होतो.
ज्यांना मुळात ओबेसिटी शुगर कोलेस्टेरॉल बीपी आहे, त्यांनी असे ड्राय नट्स खाण्याचे टाळावे... कारण त्यांच्या शरीरात आधीच मोठ्या प्रमाणावर स्निग्ध पदार्थ कार्बोहायड्रेट्स साठून राहिलेले असतात ... तेच त्यांनी आधी योग्य तितका पुरेसा व्यायाम करून वापरून काढावेत. आधीच ओबेसिटी शुगर कोलेस्टेरॉल बीपी असताना पुन्हा अशा प्रकारचे खाणे म्हणजे साठलेल्या गोदामात अजून भर घालण्यासारखे असते.
वाढत्या वयातल्या मुलांना ड्राय नट्स द्यावेत असा एक समज असतो, परंतु त्यांची तेवढी पचनशक्ती आहे का... रोजची तेवढी हालचाल व्यायाम मैदानी खेळ आहे का ... त्यांना इतर उष्णतेचे आजार नाहीत ना ... याची खात्री करून, मगच अशा प्रकारचे ड्राय नट्स त्यांना द्यावेत.
मुळात उष्णतेचे आजार असतील, अपचन असेल, ॲसिडिटी मुळव्याध गॅसेस मलावरोध असे पचनाचे किंवा उष्णतेचे आजार असतील, तर ड्राय नट्स खाऊ नयेत.
ड्राय फ्रुट्स म्हणजे अंजीर आणि काळ्या मनुका ह्या योग्य ऋतूमध्ये ताज्या ओल्या स्वरूपातही मिळतात.
जेव्हा त्यांचा सिझन नसेल, तेव्हा सुके अंजीर आणि सुकलेले काळे मनुके हे रात्री भिजवून सकाळी खाणे योग्य असते.
अंजीर साधारण एक ते दोन रोज
आणि काळे मनुके हे प्रत्येकी 20 तीनही जेवणाच्या सुरुवातीला खावेत म्हणजे रात्री भिजवतानाच साठ 60 काळे मनुके (तपकिरी पिवळे बेदाणे सीडलेस नव्हे) भिजवून ठेवावेत.
सकाळी भिजवलेले पाणी ओतून द्यावे म्हणजे काळ्या मनुकांच्या वर मारलेले केमिकल त्यात विरघळून निघून जातात.
काजू पिस्ता बदाम अक्रोड हे ड्राय नट्स अतिशय उष्ण आणि पचायला खूप जड आहेत.
त्यामुळे हे चार पदार्थ खाण्याचा योग्य कालावधी म्हणजे थंडीचे चार महिने 15 नोव्हेंबर ते 15 मार्च! इतकाच असतो असे लक्षात असू द्यावे.
अन्य ऋतूंमध्ये हे चारही पदार्थ उष्ण पडतात (विशेषतः मार्च एप्रिल मे आणि ऑक्टोबर या काळात) तर वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात हे पचायला जड असतात ...
त्यामुळे मला परवडतात, मला सवय आहे असे म्हणून रेटून खाल्ले तरी प्रत्यक्ष शरीराला त्याचा काहीही उपयोग होत नाही ... ते फक्त कमोडवाटे वाहून जातात इतकंच !
वस्तुतः या अतिशय महागड्या ड्राय नट्सच्या तुलनेत, स्वस्त आणि निश्चितपणे समकक्ष पोषणमूल्य आणि आरोग्य लाभ असलेली अन्य आहार द्रव्ये म्हणजे तीळ, खोबरे , काही प्रमाणात शेंगादाणे हे आहेत.
या तीनही स्निग्ध पदार्थांमध्ये पुरेशा प्रमाणात फॅट प्रोटीन फायबर कॅल्शियम अशा सर्व आरोग्य रक्षक बाबी असतात.
हे स्निग्ध तीनही पदार्थ आपल्याला रोजच्या फोडणीमध्ये भाजी करताना किंवा त्याची चटणी करून व्यंजन म्हणून दोन-चार घासानंतर मध्ये मध्ये लेहन चाटण या स्वरूपात खाणे योग्य असते.
अशा चटण्यांसोबत तेल किंवा तूप घ्यावे तीळ हे उष्ण आहेत म्हणून थंडीच्या दिवसात खोबरे हे शीत आहे म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात आणि शेंगदाणे हे समशीतोष्ण आहेत म्हणून प्रायः बाराही महिने थोड्या प्रमाणात खाणे योग्य असते.
खोबरे हे ओले या स्वरूपात म्हणजे ओला नारळ (शहाळे नव्हे) फोडून त्याचे आठ भाग करून ते किसून किंवा खोवून किंवा तसेच किंवा समभाग गुळा बरोबर (मोदकाचे सारण करतात तसे करून) जेवणाच्या सुरुवातीला खाल्ले असता ... एका आठवड्यात एक ओला नारळ पूर्ण होतो ... अशा प्रकारचे सेवन हे अस्थि संधी मांस मेद मज्जा अशा सर्वच धातूंचे पोषण करणारे असते.
जेवणामध्ये किंवा मोदकाच्या सारणामध्ये काही प्रमाणात खसखस असणं, हे उपयोगी असतं ... परंतु खसखस ही अति प्रमाणात संडास घट्ट करणारी आणि गुंगी आणणारी आहे. काही मिडल ईस्ट देशांमध्ये याच्यावर पूर्णतः बंदी आहे.
अहळीव किंवा हळीव हे सुद्धा काही प्रमाणात उपयोगी आहेत पण थंडीच्या दिवसात !!!
अनेक लोक कुठेतरी वाचून फ्लेक्स सीड्स म्हणजे अतसी= अळशी च्या बिया खातात ... परंतु शास्त्रामध्ये या सर्वात कनिष्ठ किंवा वर्ज्य त्याज्य म्हणून सांगितलेले आहेत. म्हणून शक्यतो फ्लेक्स सीड्स खाऊ नयेत.
त्या पेक्षा, *प्रतिदिनी तीळ खाणे हा उत्तम पर्याय आहे* आपल्या एका मुठीत मावतील इतके तीळ (शक्य असल्यास काळे; न मिळाल्यास पांढरे ... काळे तीळ अनेकदा नकली असतात) दाताने चावून चावून खावेत... सकाळी रिकामी पोटी! त्यावर एक कप साधे पाणी प्यावे (गार गरम नव्हे)आणि त्यानंतर एक तास काहीही खाऊ नये ... अशा पद्धतीने शरीराची पुष्टी चांगल्या प्रकारे होते आणि दीर्घकाळपर्यंत दात मजबूत बळकट राहणे शक्य असते
*या उपक्रमात लिहिल्या जाणाऱ्या लेखांमध्ये असणारी विधाने ही आयुर्वेद सिद्धांत व संहिता ग्रंथ यावर आधारित शास्त्रीय सत्य तथ्य अशा स्वरूपाची प्रायः असतात. _परंतु या लेखांमध्ये काही विधाने काही रूढी परंपरा इतिहास याविषयीची माहिती सामाजिक माहिती मनोरंजन वैयक्तिक मत वैयक्तिक आकलन वैयक्तिक समजूत अशा स्वरूपाची सुद्धा असू शकतात_*
*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।*
आणि
*न पीडयेत् इंद्रियाणि*
हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.
_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_
त्वदीय वस्तु गोविंद
तुभ्यम् एव समर्पये ।
तेरा तुझको अर्पण
क्या लागे मेरा ।
श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।
🙏🏼
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


No comments:
Post a Comment