निरात्मन् (Nir-atman), निर्दोष (Nir-dosha), निरोजस् (Nir-ojas) , निःस्रोतस् (Nis-srotas), निर्मनस् (Nir-manas), निर्मर्म (Nir-marma), चतुर्भूत (4bhoota), षड्धातु (6dhatu), द्विमल (2mala), शून्यदोष (zero-dosha)
1.
वाताचे स्थान पक्वाशय असेल तर ते फक्त रेक्टम एवढेच घ्यायचे का? की नाभीच्या खालचे सर्व अवयव घ्यायचे? लार्ज इंटेस्टाईन जे अपेंडिक्स सिकमपासून सुरू होते आणि पुढे रेक्टम च्या जवळ असेंडिंग ट्रान्सव्हर्स डिसेंडिंग अशा प्रकारे संपते ते पक्वाशय आहे की आमाशय आहे ? कारण लार्जेंटिस्टाइन चा 70 टक्के भाग हा नाभीच्या वरती आहे
मग त्याला आमाशय म्हणायचं का पक्वाशय म्हणायचं ?
आमाशय म्हणायचं तर त्यात पक्व अन्न असतं
पक्वाशय म्हणायचं तर ते नाभीच्या वर असतं
समजा खूप पोट सुटलेल्या माणसाची नाभी खूप खाली आली साधारण तर ती इलियाक बोच्या लाईनला आली तर मग वाताचे क्षेत्र कोठे मानायचे पित्ताचे क्षेत्र कोठे मानायचे ?
2.
वात उर्ध्वगामी असेल तर तो शरीराच्या अधोभागात कसा राहतो ?
द्रव्यमूर्ध्वगमं तत्र प्रायोऽग्निपवनोत्कटम्।
3.
अधोभागात नाभीच्या खाली पाहिलं तर जल प्रधान मूत्र , पृथ्वी प्रधान पुरीष , पृथ्वी प्रधान गर्भ , अग्नि प्रधान जल प्रधान आर्तव, मांस प्रधान म्हणजेच पृथ्वी प्रधान नितंब सक्थि पिंडिका, सोम/जल प्रधान शुक्र वृषण हे सगळे आहेत असं असताना .. नाभीच्या खाली वातस्थान आहे, असं म्हणण्याऐवजी , अधोगामी असलेल्या पृथ्वीजलांचे कफाचे अधिष्ठान तिथे आहे हे योग्य आहे
अधोगामि च भूयिष्ठं भूमितोयगुणाधिकम्॥
4.
हृदयाच्या वर कफाचे स्थान आहे असे म्हटले तर
हृदयाच्यावर दोन्ही फुफ्फुस हृदय कंठ मुख शिर सायनस सर्व इंद्रिय अधिष्ठान ही पोकळ आहेत सायनस युक्त आहेत आकाश महाभूत प्रधान आणि त्यात गती प्रधानता आहे जन्माच्या पहिल्या क्षणापासून ते मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत... म्हणजे ते वाताचे स्थान आहे गतीचे स्थान आहे छिद्रांचे स्थान आहे असे असताना
त्याला कफाचे स्थान म्हणण्यात काहीही अर्थ नाही
वात हा उर्ध्वगामी आहे त्यामुळे हृदयाच्या उर्ध्वभागात सगळीकडे वात वात आणि वातच दिसतो
5.
अशा परिस्थितीत दोषांची स्थाने ही निसर्गतःच आयुर्वेद शास्त्रामध्ये चुकलेली आहेत
3
मुळात आहारातून दोष निर्माण होतात हेच भयंकर अविश्वसनीय आहे
4
दोष ही संकल्पना आयुर्वेदाचा प्रति तंत्र सिद्धांत आहे
महाभूत, इतर सप्तधातू, दोन मल, इतकंच काय तर सिरा स्नायु रज यांचा उल्लेख सुद्धा ... आयुर्वेदेतर दर्शनशास्त्र साहित्य नाट्य काव्य यात सुद्धा आढळतो ... पण आयुर्वेदातील दोष ही संकल्पना केवळ आणि केवळ आयुर्वेदातच आहे !!!
5
आहार सेवन केल्यानंतर सार किट्ट विभाजन होऊन सारभागापासून सहा धातू (रस नव्हे) आणि दोन मल (तीन नव्हे , स्वेद नाही) असे स्पष्ट तयार होताना "दिसत" असताना, यातून आहारातून दोष निर्माण व्हायला जागा/शक्यता च कुठेही नाही
6.
जर रोज आहारातून कफ पित्त निर्माण होत असतील तर त्यांची वृद्धी लक्षणे दिसायला हवीत
7.
आणि जर रोज वातवृद्धी होत असेल तर वाढलेल्या कफ पित्ताचा क्षय व्हायला पाहिजे
8
हालचाल झाल्यानंतर नेमकं काय होतं ?
वात वाढतो की कफ पित्त कमी होतात??
हालचाल ही खरंच वाताने होते का मांसाने होते ?
बलमांस क्षय झाल्यानंतर असाध्यता का येते?
त्यामुळे गती ही मांसामुळे होते असे स्पष्ट असताना उगीचच वाताला त्याच्यामध्ये आणणं हे आवश्यकच नाही
9.
आकाश नावाचे महाभूत याचा आयुर्वेद शास्त्राला काही उपयोग नाही कारण ते वाढत नाही घटत नाही देता येत नाही घेता येत नाही डेमॉन्स्ट्रेबल नाही डिस्पेन्सिबल नाही
10.
तरी या सर्व शंका कुशंका प्रश्न संदेह गोंधळ शक्यता वस्तुस्थिती यांचा विचार करून, आपले मत यावर सांगावे, ही नम्र विनंती🙏🏼
11.
कफ म्हणजे पृथ्वी जल हे अधोगामी आहे
अधोगामि च भूयिष्ठं भूमितोयगुणाधिकम्॥
त्यामुळे त्याचे स्थान नाभीच्या खालीच असायला पाहिजे आणि तसेच भाव पदार्थ नाभीच्या खाली आहेत सुद्धा त्यामुळे उगीचच कफाचे स्थान हृदयाचे वर आहे असे म्हणणे अशास्त्रीय आहे आणि वस्तुस्थितीला सोडून आहे
12.
अन्नपचन होतानाही जे सगळ्यात कठीण स्थूल भाग आहेत, ते सगळ्यात शेवटी विलग व्हायला पाहिजेत, जे सगळ्यात विरळ आणि सूक्ष्म भाव आहेत, ते आधी मुक्त व्हायला पाहिजेत ... म्हणजे प्रथम अवस्था पाकात वात निर्माण व्हायला पाहिजे आणि तृतीयावस्था पाकात कफ निर्माण व्हायला पाहिजे
13.
एकदा, प्रथम अवस्था पाक & द्वितीय अवस्था पाक यात, कफ & पित्त निर्माण झाले की ... पुन्हा रसाच्या मलाच्या स्वरूपात , रक्ताच्या मलाच्या स्वरूपात ... पुन्हा कफ पित्त निर्माण होतात म्हणजे हे कुठले होतात? नेमके कुठे होतात? रसाचे रक्तात रूपांतर यकृतात होत असेल तर मग काय कफाचं निर्माण यकृतात होतं का ? आणि रक्ताचे रूपांतर मांसात कुठे होतं नेमकं ? ते जिथे होतं तिथे पित्ताचं निर्माण होत असेल , तर तिथे दाह वगैरे का होत नाही?
14.
जर कफ आणि पित्त दोघेही अवस्था पाकातही निर्माण होतात आणि धातूंच्या मलांच्या रूपातही निर्माण होतात ...
तर मग वात सुद्धा अवस्था पाकाच्या बरोबरच एखाद्या धातूच्या मलाच्या स्वरूपात का बरे निर्माण होत नाही
15.
द्रवत्व सोडलेलं पित्त म्हणजे अग्नि!
अग्नि महाभूत, जलमहाभूत म्हणा ना, सोपं आहे!
अम्लपित्त मध्ये जळजळ झाली तर अग्नि महाभूत ,
मळमळ झाली तर जलमहाभूत
16.
स्तंभन करतो थांबतो तो शीत
प्रेरणा करतो चालतो तो चल
आणि चल = गति, शीत = स्तंभ हे दोन्ही परस्पर विपरीत गुण एकाच वातात असतात म्हणजे थांबवणाराही तोच चालवणाराही तोच हे कसे शक्य आहे हे प्रत्यक्ष आपल्याच दिसत असताना हे असले उठपटांग विचार काय उपयोगाचे आहेत?
17.
95 टक्के सारभागाचे अब्साॅर्प्शन हे लहान आतड्यात पूर्ण होत असताना, मोठ्या आतड्यात काहीही ॲब्साॅर्ब होत नाही, ही वस्तुस्थिती असताना बस्तीत तेल तूप मध thick dense imulsion घालून काय साध्य होणार आहे ? आणि खरंच एवढे महागडे मोठे निरूह अनुवासन त्या पक्वाशयात घालून, त्यातून खरंच (एवढ्या कानाकोपऱ्यातून, देहाच्या) गोष्टी 45 मिनिटांत रिव्हर्स येणार आहेत, हे सत्य आहे का... इतकी शरीरातील मेटाबोलिझम फिजिओलॉजी सर्क्युलेशन हा सोपा आहे का?
18.
त्यापेक्षा, विरेचन ही जी अगदी स्पष्ट नैसर्गिक स्वाभाविक सुकर प्रक्रिया आहे ती करणं अधिक चांगलं !
19.
तसेही वातव्याधीच्या चिकित्साच्या सुरुवातीला विरेचन द्यावे असेच लिहिलेय आणि जो दुर्बल अविरेच्य असतो , त्याला बस्ती द्यावा असं सांगितलंय
20
काहीतरी भयानक बेसिक लेव्हलला चुकत आहे! ते तसं नसतं तर पंचकर्माचा इतका लोप झाला नसता की लोक ते पूर्ण विसरून गेले आहेत .. आणि नंतर मग त्याचा प्रचार प्रसार करून मागच्या वीस वर्षात, हॅपनिंग ट्रीटमेंट फील गुड ट्रीटमेंट मसाज मालिश स्पा या स्वरूपात, त्याचं पुनःस्थापन पंचकर्म = शोधन = Show Dhan असे केले गेलेले आहे, ज्याच्या शास्त्राशी शून्य संबंध आहे!
निर्दोष शून्यदोष षड्धातुक द्विमल *चतुर्भूत* निरात्म निर्मनस् निरोजस् निर्मर्म निःस्रोतस् निष्कला निर्धात्वग्नि , असे शरीर हे अधिक सुगम सुबोध सुकर सुलभ सुचिकित्स्य आहे

No comments:
Post a Comment