Thursday, 25 December 2025

आयुर्वेदा सुद्धा आता, योगाच्याच मार्गाने ... !!

आजचे योगा YOGA याचे स्वरूप काय आहे!? ... तर अत्यंत लोकप्रिय = पॉप्युलर या अर्थी ✅️ किर्तीमंत = फेमस या अर्थाने नव्हे!!

Picture credit Google Gemini AI 

आज योगा जगभरात सगळीकडे पोहोचलेला आहे ... 

त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ती दखल घेतली जाते आहे!

"अगदी याच मार्गावरती" आयुर्वेदा Ayurveda याचीही अत्यंत वेगाने घोडदौड 🐎🐴 सुरू आहे ... येत्या काही वर्षात आयुर्वेद सुद्धा, आजच्या योगा याच स्वरूपात, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक लोकप्रिय होईल ... कीर्तीमंत नव्हे! 

जगात सगळीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर तो पोहोचलेला असेल ... पण आजचा योगा हा जसा मूळ योगदर्शन योगशास्त्र यापासून कित्येक शेकडो किलोमीटर लांब आहे, मूळ योगदर्शन योगशास्त्र आणि आजचा योगा यांचा दूरान्वयानेही एकमेकांशी काडीमात्र संबंध नाही... एक नामसाधर्म्य वगळले तर, मूळ योगदर्शन योगशास्त्र यांचे स्वरूप व प्रयोजन याचा, आजच्या योगा याच्याशी कसल्याही प्रकारचा सुतराम संबंध नाही!!! 

अगदी तस्सेच मूळ आयुर्वेद शास्त्र आणि आज ज्या गतीने उद्या कडे झेपावतो आहे "त्या आयुर्वेदाचेही" अगदी तस्सेच होणार आहे !!!

तस्सेच म्हणजे जसे मूळ योगदर्शन योगशास्त्र याच्या तुलनेत आजच्या योगाचे वाट्टोळे झालेले आहे ... अगदी तस्सेच मूळ आयुर्वेद शास्त्राच्या तुलनेत , "आज कडून उद्याकडे वेगाने झेपावत असलेल्या" आयुर्वेदाचेही निश्चितपणे अधिक विदीर्ण broken brittle स्वरूपात वाट्टोळे होणारच, यात काहीही शंका नाही 

मूळ योगदर्शन योगशास्त्र हे मनासाठी आहे, मनाचे दोष निरसन करण्यासाठी आहे, किंबहुना योगशास्त्र हे मोक्ष प्रवर्तक आहे म्हणजे मोक्षा कडे जाणारा मार्ग आहे ...

परंतु आजचा "योगा" अशा प्रकारचा मनासाठी किंवा मोक्षासाठी आहे असे नुसते म्हटले तरी ते अत्यंत हास्यास्पद🤣 व कुचेष्टाकारक😏😖 होईल कारण आजचा योगा हा फक्त आणि फक्त "शरीराला वाहिलेला" आहे 

आजचा योगा हा भगवान पतंजली महर्षी लिखित मूळ योगदर्शन किंवा पातंजल योगशास्त्र किंवा गेला बाजार भगवद्गीता हे सुद्धा ब्रम्हविद्यात्मक योगशास्त्र आहे... या सर्वांशी "आजच्या योगा"चा काहीही संबंध नाही!!!

 आजचा योगा हा , या मूळ योग विषयक ग्रंथांच्या , खूप नंतर आलेल्या व्यवहारिक आणि खरंतर भ्रष्ट & केवळ नाम साधर्म्य असलेल्या घेरंड संहिता किंवा तत्सम नंतरच्या काळातील ग्रंथांशी नाते सांगणारा आहे!

 मूळ योगदर्शन हे अष्टांग अशा स्वरूपाचे असून त्यातील , यम आणि नियम याच्यानंतर , आसन आणि प्राणायाम या दोन अंकांचा क्रम येतो आणि त्याही पुढे धारणा ध्यान प्रत्याहार आणि समाधी ही चार अंगे येतात 

परंतु आजचा योगा हा पहिली दोन अंगे तर अजिबातच विचारात घेत नाही ... 

किंबहुना यम आणि नियम यातील 10 बाबी ह्या आजच्या योगाचा अनुनये अवलंबन आचरण "प्रॅक्टिस" करणाऱ्या सर्वांना, मुळातच माहितीच नाहीत किंवा त्या जाणीवपूर्वक दुर्लक्षिल्या गेलेल्या आहेत किंवा बाजूला काढण्यात आलेल्य  हेत किंवा अडगळीत डस्टबिनमध्ये कचरापेटीत 🗑फेकून देण्यात आलेले आहेत ... कारण त्यामध्ये अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य असंग्रह ईश्वर प्रणिधान शौच अशा मानवी जीवन मूल्यांचा किंवा सद्गुणांचा समावेश होतो उल्लेख होतो 

या दहाही गोष्टींचा आजच्या व्यवहारिक जगातील माणसाला कसलाही उपयोग संबंध महत्व कन्सर्न जरा सुद्धा नाही 

आजचा योगा हा अनेकविध बॉडी पोस्चर्स पोजेस आणि विविध प्रकारचे फॅन्टसी फॅन्सी फॅड या स्वरूपातील अतिरंजित लाभ अति मानवीय लाभ किंवा खरंतर अशास्त्रीय धादांत खोटे लाभ मिळवून देणारा ब्रीदिंग एक्झरसाइज आहे कपालभाती भस्ररका इत्यादी बाबी आणि चित्रविचित्र प्रकारची इंग्लिश नावे मिळालेला आसनांचा नवीन स्वरूपातील अविष्कार, याला आज योगा असे सर्वसामान्य माणसे समजतात 

या गैरसमजाला खतपाणी घालणे किंवा अधिक दृढमूल करणे, यासाठी ऑफलाइन ऑनलाईन अशा प्रकारचे अनेक अति लोकप्रिय असे गुरु किंवा योग विक्रेते सेलर्स ट्रेडर्स मार्केटर्स सर्वत्र धुमाकूळ घालत आहेत 

त्यातून योगा जसा जमेल तसा, ज्याला वाटेल तसा, "विकून , पैसे आणि प्रसिद्धी मिळवणे" ... एवढाच त्यातील उद्देश आहे.

मूळ योगदर्शन ज्या प्रयोजनांनी प्रेरित उदित उपदिष्ट आहे , त्या मनःशांती किंवा मोक्ष किंवा मनोदोष निरसन याच्याशी , आजच्या योगा म्हणजे ब्रीदिंग एक्झरसाइज आणि फिजिकल पोस्चर्स पोजेस याचा काहीही संबंध नाही... असो 

योगदर्शन हा आपला अधिकार नसल्याने त्यावर सविस्तर बोलणे योग्य नाही ... परंतु या तुलने विना, आयुर्वेदाची जी घसरण अधःपतन भ्रष्टाचरण होत आहे आणि होतच जाणार आहे आणि भविष्यात आयुर्वेदाचे स्वरूप अधिकाधिक ओंगळ भेसूर केविलवाणे शास्त्रहीन आणि अधिकाधिक मार्केट ट्रेड सेल विक्री या स्वरूपाचे होत जाणार आहे, हे योगशास्त्राशी प्राचीन आणि सध्याचे स्वरूप याच्याशी तुलना केल्याविना सांगणे शक्य नाही !!!

जसे आपण आठ मजली एखाद्या बिल्डिंग मधील, तिसऱ्या मजल्यावर जायचे असेल तर, पहिले दोन मजले पायऱ्यांनी चढून जातो किंवा लिफ्टने गेलो तरी ते पहिले दोन मजले क्रॉस करून मगच तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट जाते... थेट ग्राउंड फ्लोअर वरून तिसऱ्या मजल्यावर आपण पोहोचत नाही ... त्याला एक विशिष्ट क्रम आहे... पहिला दुसरा आणि मगच तिसरा चौथा मजला ... परंतु आज मात्र यम नियम हे दोन पहिले अंग पहिले विभाग पहिले मजले टाळून , योगा करणारा प्रत्येक माणूस थेट आसन प्राणायाम या मजल्यांवरती उडी मारतो की जे चुकीचे सदोष आणि खरंतर दिशाहीन मूर्खपणाचे आहे 

शास्त्रातील मूळ तत्वे बाजूला ठेवून, जे आयुर्वेदच नाहीच अशा गोष्टींना आयुर्वेदाच्या नावाखाली , फक्त पैसे आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी खपवण्याचे , उद्योग सर्वत्र अतिशय बेधडकपणे निलाजरेपणे बेशरमपणे सुरू आहेत ... 

ज्याच्यामध्ये मसाज मालिश कॉस्मेटिक विकणे वुसर्णप्राशन भर्गसंस्कार शिरोढारा वेलनेश होम वेलणेस रिसॉर्ट आयुर्वेदिक दीनचर्या निवासी गुरुखूळ गुरुcool धन्वंतरीचे देहटॅग स्थल ...

ऑनलाईन ऑफलाइन कोणीही कुठलाही विषय कितीही दिवसात कितीही रुपयांना शिकवणे खरंतर विकणे, 

चवनप्राश ला एखाद्या हॉटेलमधील स्नॅक्स किंवा रेसिपी प्रमाणे विकणे, त्याच्यामधील आजच्या व्यवहारात आवळा आणि साखरेचे प्रमाण हे अत्यंत अशास्त्रीय आहे, याच्याकडे सोयीस्कर डोळे झाक करणे, 

नाडी परीक्षेला & रस शास्त्रातील औषधांना रेटून दाबून बळेच करून आयुर्वेदच आहे , असे खोटे नाटे सांगून "विकत राहणे", 

शास्त्रात कुठेही सांगितलेले नाही असे नाडीच्या तीन बोटांच्या स्पर्शांमध्ये दोषांचे पाच पाच प्रकार कळू शकणे , सर्व प्रकारे सर्व गोष्टींचे आलोचन परीक्षण करून मगच पेशंटचे निदान करावे असे स्पष्ट सांगितलेले असताना ... (अतोऽभियुक्तः सततं सर्वमालोच्य सर्वथा।) नाडी परीक्षणे सर्व काही कळते , असा भ्रम मुद्दाम पसरवणे ...

आयुर्वेद भैषज्य कल्पनांशी अत्यंत विसंगत विरुद्ध विलक्षण विपरीत असलेले रसकल्प की जे मूलतः 99% जळालेले करपलेले भस्म झालेले राख रांगोळी झालेले दग्धपाकी असे असतात , त्यांना आयुर्वेदाचाच भाग आहे , असे म्हणून विकत राहणे ... 

याव्यतिरिक्त ऍक्युपंक्चरला विद्ध म्हणून विकणे, 

शास्त्रात सांगितले नाही अशा प्रकारचे तथाकथित अग्नि कर्म करणे, 

मॉडर्न सायन्स ने तयार केलेल्या मशिन्सचा वापर करून... त्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट किंवा कॉस्मेटॉलॉजी म्हणणे ... गाल और बाल के प्रॉडक्ट विकणे, अभ्यंग तेल उटणं शाम्पू लिपबाम लिपस्टिक विकणे, अशा कितीतरी अनागोंदी अनियंत्रित अशासकीय अशासकीय अनीतीपूर्ण & ...

सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात वाईट म्हणजे अन्नदाता पेशंटला भुलवणारं फसवणारं लुबाडणारं अशा प्रकारचे व्यापारी जाळं तयार करून त्यात पेशंटला, कस्टमर क्लाएंट किंवा खरंतर बळीचा बकरा म्हणून अडकवून आणि त्याचं शोषण एक्सप्लाॅयटेशन दिशाभूल फसवणूक वंचना लुबाडणूक करणे हा आजचा सार्वत्रिक व्यवहार आहे

 अर्थातच या वर्णन केलेल्या परिस्थितीला अत्यंत दुर्लभ असे सन्माननीय अपवाद असू शकतात🙏🏼 

परंतु बहुतांश नव्याने येणारे विद्यार्थी, नव्याने वैद्य होणारे युवक आणि बहुतांश प्रस्थापित अस्तित्वात असलेले आयुर्वेद प्रॅक्टिशनर्स यांना, मूळ शास्त्रातील मूळ ग्रंथातील वाक्य नीटपणे वाचता सुद्धा येत नाहीत ... त्यामुळे ती समजणे कळणे हे अजूनच अशक्य असते ... आणि जे वाचताच येत नाही , जे कळलेलंच नाही ... त्याची "प्रॅक्टिस करणे" हा तर अत्यंत विनोदाचा विरोधाभासाचा खरंतर केविलवाणा आणि किळसवाणा प्रकार आहेत ...

परंतु याच्यावरती कोणाचेही नियंत्रण नाही... किंबहुना हे चुकीचे आहे असेही कोणाला जाणवत नाही 

जसे आज मूळ योगदर्शन योगशास्त्र यापासून ... आजचा योगा हा चित्रविचित्र आसने आणि अतिरंजित लाभ असलेले प्राणायाम... एवढ्या पुरताच मर्यादित आहे ...

अगदी तस्सेच आयुर्वेदाचे पूर्णपणे वाट्टोळे करून,  त्याची मूळ शास्त्रापासून फारकत घेऊन ... फक्त आयुर्वेदाचा व्यवसाय व्यवहार व्यापार पैसे मिळवण्यासाठी बेचना ट्रेड सेल मार्केट एवढेच सध्या तरी बहुतांश ठिकाणी चालू आहे ....

आणि येणारी प्रत्येक नवीन बॅच ही मूळ ग्रंथांपासून श्लोकांपासून मूळशास्त्रापासून अधिकाधिक दुरावलेली अपरिचित असलेली अज्ञानी अनोळखी अशीच येत राहणार आहे 

आणि शासकीय किंवा शासनाने अनुदान दिलेल्या कॉलेजांच्या तुलनेत, लाखोंची प्रचंड फी भरून प्रायव्हेट कॉलेजातून शिकणारी, सुमार बुद्धीची टुकार क्षमतेची आणि भिकार वृत्तीची येणारी प्रत्येक नवीन बॅच, ही शास्त्र समजणे वाचणे अशा क्षमतेची कॅपॅसिटीची असूच शकणार नाही ...

दुर्दैवाने ज्यांना आयुर्वेद शास्त्राची प्रॅक्टिस करून पेशंट बरे करून स्वतःचे जीवन चालवणे कदापिही शक्य नाही ... तशी शक्यता आणि क्षमता आणि आत्मविश्वास ज्यांच्यामध्ये नाही ... असेच लोक केवळ रोजगार रोजी रोटी एम्प्लॉयमेंट म्हणून ... गल्लोगल्ली जंगल घाट पर्वत नुक्कड खेडं तालुका असं कुठेही भूछत्राप्रमाणे मशरूम प्रमाणे उगवणाऱ्या नवनवीन प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये शिक्षक म्हणून जॉईन होत असतात... त्यातलेही 20 ते 80 टक्के शिक्षक हे ऑन पेपर म्हणजे घोस्ट = भूत = अस्तित्वहीन अशा प्रकारचे असतात ... त्यामुळे अशा प्रकारच्या शिक्षकांकडून अशा प्रकारच्या कॉलेजेस मधून ज्या प्रकारची उत्पादनं = प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर होतील ती किती माल्प्रॅक्टिस मालन्यूट्रिशन माल्नरिश्ड ... फाॅल्स एज्युकेडेट... खरंतर थर्ड ग्रेड रिजेक्ट करण्याजोग्या दर्जाचे असतील... हे सांगण्यासाठी विचार करण्याची आवश्यकता नाही!!! 

त्यामुळे इथून पुढे ... ज्यांच्या हातात आयुर्वेद जाणार आहे , ते लोक, शास्त्र कधीही न वाचलेले न जाणलेले न शिकलेले न समजलेले असेच लोक 99% असणार आहेत!!!

त्यामुळे जसे योगदर्शन योगशास्त्र याच्या तुलनेत आजच्या "योगा"चे पूर्णपणे मार्केटिंग झाल्यामुळे वाट्टोळे झालेले आहे... अगदी तस्सेच आयुर्वेदाचेही... त्याच्याही पेक्षा वाईट स्वरूपात वाट्टोळे होणार, हे अगदी 100 200 1000% निश्चित आहे !!!💯% ✅️


No comments:

Post a Comment