जीवनाच्या इच्छा (Desires of Life)!
✒️ लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे
एम डी आयुर्वेद, एम ए संस्कृत
9422016871
आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे (रविवार) & नाशिक (बुधवार)
अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनाच्या ३ मुख्य गरजा किंवा जगण्याच्या प्रेरणा आहेत, असे आपण वाचले आहे!
आजकालची मुले म्हणतात... फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्सॲप🤣!! किंवा काही लोक म्हणतात... मोबाईल, वाय-फाय आणि रिचार्ज!!!
आयुर्वेद सांगतो की आहार, निद्रा आणि मैथुन हे ३ जीवनाचे आधार = उपस्तंभ = आधारस्तंभ आहेत!
पुढे आयुर्वेदाचे मुख्य ग्रंथकार चरक म्हणतात की जीवनात तीन एषणा म्हणजेच प्रेरणा (motives), प्रयोजन (purpose), जीवनाच्या इच्छा (desires of life) आहेत... प्राण, धन आणि परलोक!
आज तर मला वाटत नाही की कोणी परलोकासाठी काही करत असेल... कारण आजच्या जगण्याचीच इतकी भ्रांत आहे की परलोक किंवा त्या दृष्टीने प्रयत्न, प्रेरणा (motivation) किंवा जीवनाचे प्रयोजन (purpose of life) असूच शकत नाही!!
धन किंवा प्राण म्हणजेच पैसा हवा आहे आणि जिंदगी, जीव, जीवन-अस्तित्व (life existence) हवे आहे हे सत्य आहे, "असे आपल्याला वाटते".
मुंबई लोकलच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर रोज हजारोच्या संख्येने गर्दीत प्रत्येक माणूस जे काही करतो, ते पाहून वाटत नाही की प्राणाची त्याला काही काळजी/पर्वा आहे... जो पुणे, बंगळुरू, हैदराबादच्या रोजच्या ट्रॅफिकमध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, दोन-दोन तास प्रवास (travel) करतो... हे पाहून वाटत नाही की प्राणासाठी कोणी काही करत आहे... पाहताना तर असे दिसते की एकाच गोष्टीसाठी सर्व यातायात, परिश्रम, संघर्ष (struggle) केला जात आहे... सगळे जण ज्याच्यासाठी मरमर करत आहेत, ते केवळ धनप्राप्तीसाठी आणि पैशाच्या हव्यासापोटीच आहे.
मग असा विचार येतो की इतका सगळा संघर्ष (struggle) करून, जीवाचे रान करून, मेहनत आणि वेळ वाया घालवून... ज्या धनाला मिळवण्यासाठी ही सगळी धडपड, प्रयत्न सुरू आहेत... त्या धनाला मिळवून काय करणार??? स्वतः धन म्हणजे तर काही (उपभोग्य वस्तू) नसते... की त्या धनाला खाऊन घेऊ, पिऊन घेऊ, त्यावर झोपू शकू, त्यावर बसून प्रवास (travel) करू शकू, असे तर नाहीये! त्या धनाचे "काहीतरी" केले पाहिजे, तर धनाच्या विनिमयातून "काय" प्राप्त करायचे आहे ज्याच्यासाठी दिवसभराचा हा रोजचा इतका सगळा संघर्ष (struggle) प्रत्येक व्यक्ती करत आहे!?
धनाचा गरजेनुसार किंवा गरजेपेक्षा दहा पट, शंभर पट साठा करूनही काय करणार!?!? एकाच वेळी वीस पोळ्या खाऊ शकत नाही, एकावर एक चार शर्ट घालून, एकाच वेळी चार गाड्यांमध्ये बसून प्रवास (travel) करू शकत नाही, एकाच वेळी चार घरांमध्ये राहू शकत नाही!!!... मग धनातून जे प्राप्त होऊ शकते, ती काय त्याची एषणा = प्रेरणा (motives), प्रयोजन (purpose), जीवनाच्या इच्छा (desires of life) आहेत???
धनाच्या विनियोगाने ते अन्न, वस्त्र, घर, गाडी, दागिने, महागड्या जीवनशैलीच्या (lifestyle) वस्तू आणि प्रवास (travelling) प्राप्त/शक्य होऊ शकते, तर मग हे सर्व जीवनाचे प्रयोजन (purpose), प्रेरणा (motivation), हेतू (aim), ध्येय (goal), सार्थकता आहे का???
तर मग आपल्याला का शिकवले जाते की "प्राण, धन आणि परलोक या ३ एषणा आहेत"!!!
असे प्रत्यक्षात तर दिसत नाही... प्राण टिकून राहण्यासाठी जे शारीरिक आरोग्य हवे असते, त्याबद्दल तर कोणीही जागरूक नाही... धन मिळवण्यासाठी प्राणाचीही पर्वा केली जात नाहीये, आणि आजच्या काळात परलोक तरी कोणाला हवा आहे असे वाटत तर नाही. आणि ज्या धनाला मिळवण्यासाठी या सर्व गोष्टी केल्या जात आहेत, त्या धनातून जे काही प्राप्त होऊ शकते, ते तर जीवनाचे मूळ ध्येय, प्रपंच, हेतू (aim), लक्ष्य (goal) आहेच नाही... तर हे सर्व कथन काहीतरी अनाकलनीय/गोंधळाचे आहे; म्हणजेच परलोक कोणालाच नको आहे, प्राणाची काळजी कोणालाच नाही, प्रत्येक जण धन कमावण्याच्या मागे धावत आहे आणि त्या धनातून जे प्राप्त करायचे आहे, ते तर ३ एषणांमध्ये कुठे लिहिलेच नाहीये!? मग संहितेतून एषणा हा विषय वगळून (delete करून) टाकायचा का... तसेही या "वाग्वस्तुमात्र" विषयाचे वर्णन सुश्रुत आणि वाग्भट यांनी केलेलेच नाहीये!!!... किंवा मग नव्याने काही नवीन एषणा लिहिल्या पाहिजेत का?



No comments:
Post a Comment