*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग ४*
*हिंसास्तेयान्यथाकामं* पैशुन्यं परुषानृते॥२१॥
सम्भिन्नालापव्यापादमभिध्यां दृग्विपर्ययम्।
*पापं कर्मेति दशधा (१० =) काय (३)* - वाङ् (४)- मनसै: (३) त्यजेत्॥२२॥
✍️🏼 वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
www.MhetreAyurveda.com
www.YouTube.com/MhetreAyurved/
आज, प्रथम *शारीरिक तीन पाप कर्मे*, या विषयी स्पष्टीकरण देऊया ... *हिंसास्तेयान्यथाकामं* ... हिंसा, स्तेय आणि अन्यथाकाम.
हिंसा = सजीवाचा प्राण नाश, मृत्युकारक पीडा.
स्तेय = चोरी, अपहार, लूट, दरोडा.
अन्यथाकाम = निषिद्ध किंवा विधिविरहित लैंगिक सौख्य.
हिंसा = पर उपघातन. हिंसा ही प्रत्येक वेळेला मृत्यूकारकच होईल असे नव्हे, तर हिंसा याचा अर्थ शारीरिक पीडा वेदना त्रास भय डिस्कम्फर्ट पेन होईल अशी कृती.
अहिंसा परमो धर्मः , असं म्हटलेलं आहे. अहिंसा ही गीतेतील दैवी संपत् सद्गुणांमध्ये आलेली आहे.
हिंसा ही प्रायः क्रोधजन्य असते. क्रोध आणि काम हे षड् रिपु मधले अग्रेसर होत. बाकी लोभ मोह मद मत्सर यांचाही मानवी जीवनातील नैतिक अधःपतनामध्ये सहभाग असतोच. पण गीतेमध्ये काम आणि क्रोध यांना मात्र अधिक ठळकपणे उल्लेख करण्यात आलेले आहे.
*काम एष क्रोध एष ... विद्ध्येनमिह वैरिणम्।*
किंवा पहिल्या तीन म्हणजे काम क्रोध लोभ यांना अधिक महत्त्व दिलेले आहे म्हणजे त्यांचे उपद्रव मूल्य अत्यधिक आहे.
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।
*कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्।*
षड् रिपुं पैकी हेच तीन, शारीरिक त्रिविध पापकर्मांचे जनक आहेत.
कामजन्य अन्यथा काम , क्रोधजन्य हिंसा आणि लोभजन्य स्तेय/चोरी.
जरी आध्यात्मिक तत्त्वज्ञान संत वाङ्मय या सगळ्यांमध्ये हिंसा / षड् रिपु हे वर्ज्य सांगितलेले असले तरी, व्यवहारात मात्र अनेकदा हिंसा ही संरक्षणासाठी (स्वतःच्या किंवा समूहाच्या) आवश्यक असते. हिंसेसाठी प्रवृत्त करणारा क्रोध, हाही त्यावेळेला आवश्यकच असतो. आपल्या कुटुंबीयांना कोणी विनाकारण शिवीगाळ करत असेल, त्रास देत असेल तर; त्याबद्दल आपल्याला क्रोध येणे व त्रास देणाऱ्या व्यक्तीला शासन करणे, इतपत सामर्थ्य आपल्याकडे असलंच पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती हिंसा करणे, हे समर्थनीय आहेच.
म्हणूनच काम क्रोध लोभ, हे अनेकदा लौकिक मानवी जीवनात, एका मर्यादित अर्थाने प्रेरणादायी सुद्धा असू शकतात.
*आपण या ग्रुपमध्ये जितके लोक आहोत, किंवा ज्या समूहांमध्ये पुढे इथल्या पोस्ट फॉरवर्ड होतील, त्याचेही वाचन करणारे लोक, हे प्रायः हिंसा आणि स्तेय या कर्मांपासून दूर असतात. हिंसा आणि स्तेय या बाबी आपल्यासारख्यांच्या जीवनात पांढरपेशा मध्यमवर्गीय मिडल क्लास माणसांमध्ये सहसा येत नाहीत ... पण काम किंवा स्त्री संग सेक्स हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा पण स्पष्टपणे न बोलला जाणारा नाजूक विषय असतो म्हणून आरोग्य शास्त्र आणि सामाजिक नीती नियम या दोघांनाही संमत असेल, अनुकूल होईल, अशा पद्धतीने त्याचे स्पष्टीकरण अष्टांग हृदय सूत्रस्थान 7 च्या आधारे समोर ठेवूया*
इथं व्यक्त करत असलेली माझी मते ही नेहमीच योग्य बरोबर उचित असतीलच, प्रत्येकाच्या मते / दृष्टीने असे नाही, पण एखाद्या श्लोकाच्या स्पष्टीकरणातील , एखादे विधान / एखादे मत हे एखाद्या व्यक्तीला न पटण्याजोगे, प्रस्थापित विचारांच्या विरोधी किंवा वेगळे असू शकते. तरीही पुढच्या एखाद्या श्लोकामधील स्पष्टीकरणातील एखादे विधान एखादे मत हे पटण्याजोगे असू शकते. कधीकधी मी व्यक्त केलेले मत , इथे लिहिलेले विधान , दिलेले स्पष्टीकरण हे सर्वांनाच व एखाद्या व्यक्तीला न पटण्याजोगे हे असू शकते पण त्यानिमित्ताने दिलेले वेगवेगळे संदर्भ किंवा इतर व्यक्तींच्या त्या विषयाबाबत आलेल्या पोस्ट ज्या आपण येथे पाठवतो त्या विचार प्रवर्तक लाभदायक असू शकतात. थोडंसं विलक्षण वेगळं बंडखोर असं मत मांडण्याचं वेड धाडस करण्याची वृत्ती आहे, जो सब करते है यारो वो हम तुम क्यू करे😇🙃 थोडं सोशली अन्करेक्ट राहण्याची रिस्क घेण्याची तयारी आहे! असो ... आयुष्य ही एक ST बस आहे असं आपण मागील पोस्ट मध्ये पाहिलं आहेच. योग असतात तोवर सहवास चालतो. शेष भगवंताची इच्छा!!!
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा
स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा
काम = इच्छा आशा आकांक्षा ध्येय स्वप्न हे असतील तरच मनुष्य कार्यरत राहू शकतो. जो समाधानी आहे, तो थांबला. जो तृप्त आहे, तो प्राय: निष्क्रिय होतो. म्हणून स्टीव्ह जॉब म्हणतो स्टे हंग्री, स्टे फूलिश
असेच अन्यायाविरुद्ध आपल्याला चीड क्रोध आलाच पाहिजे. तो आला तरच शिवाजी लोकमान्य टिळक ज्ञानेश्वर माऊली (? पुढे कधीतरी सांगू या) सावरकर भगतसिंग या व्यक्तींचा जन्म होऊ शकतो. म्हणून सदा सर्वकाळ पडती बाजू घेऊन, भिडस्तपणे दौर्बल्याकडे वाटचाल करू शकेल, अशी कामक्रोधादिंना त्याज्य ठरवण्याची वृत्ती, ही घातक होऊ शकते. त्याचप्रमाणे क्रोधजन्य हिंसा ही जर नष्ट झाली तर, अहिंसेचा अतिरेक हा केव्हाही मनुष्याला (आणि/किंवा त्याच्या समाजाला/समूहाला) दुर्बळ / सॉफ्ट टार्गेट या स्थितीला पोहोचवू शकतो. म्हणून अनुयायात् प्रतिपदम् सर्वधर्मेषु मध्यमाम् । कुठल्याही एका टोकाला जाऊ नये, एक्स्ट्रीमिटी गाठू नये, अहिंसेचा अतिरेक टाळावा; तसेच अनावश्यक हिंसेचे समर्थनही करू नये.
हिंसा म्हटलं की शाकाहार मांसाहार याही बाबी येतात ... पुढे त्याबाबत *आत्मवत् सततम् पश्येत अपि कीटपिपीलिकम्* या श्लोकामध्ये सविस्तर पाहूया.
आपण जर आध्यात्मिक किंवा तात्त्विक किंवा ब्रह्मज्ञान आत्मज्ञान किंवा निवृत्तीपरक अशी चर्चा करणारा उपक्रम चालवत असतो, तर निश्चितच हिंसेचे सर्वत्र वर्जन, अहिंसेचे ठाम समर्थन व षड्रिपुंना निंद्य/त्याज्य ठरवणं, हे आपण केलं असतं!
पण आपण व्यावहारिक लौकिक सामाजिक सदाचरण सद्वृत्त पाहत आहोत. त्यामुळे काही मर्यादेपर्यंत, जिथे आवश्यक तिथे, काम क्रोध हिंसा यांचं समर्थन, हे समाज धारणेसाठी आणि व्यक्तिगत सामर्थ्यासाठी आवश्यक असतेच. अन्यथा ...
अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।
अजापुत्रं बलिं दद्याद् देवो दुर्बल घातक:
अशी परिस्थिती ओढवू शकते.
स्तेय म्हणजे चोरी करणे. परस्व हरण. पर म्हणजे दुसरा. स्व म्हणजे मालकीचे स्वामित्वाचे. हरण म्हणजे काढून घेणे, त्याच्या नकळत किंवा बळजबरीने! टॅक्स यासाठी राजस्व हा शब्द आहे, तो अनेकांना माहित नसतो.
नकळत काढून घेणे ही चोरी ...
बलपूर्वक हिसकावून घेणे ही लूट / दरोडा.
जे आपलं नाही ते मिळवण्यासाठी चा प्रयत्न म्हणजे चौर्य होय. याच्यामध्ये धन व स्त्री यांची ओरबाडणी लुबाडणूक ही शतकानुशतके चालूच आहे. बळी तो कान पिळी, या न्यायाने दुर्बलांकडून त्यांचं धन किंवा त्यांचे स्त्री-धन हिसकावून घेणे हे चालूच आहे. बलपूर्वक शक्य नसेल तर, नकळत जाणवू न देता या गोष्टी लांबवणे पळवणे, असेही आपण शतकानुशतके पाहत आलो आहोत, त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.
परंतु वशिला लावून ॲडमिशन किंवा नोकरी मिळवणे आणि ज्याचा त्या (पद जागा वेकन्सी) वर नैतिक हक्क आहे, त्याचा अधिकार स्वतः बळकावणे.
दुसऱ्याच्या पार्किंग मध्ये गाडी लावणे, दुसऱ्याच्या जागेवर अतिक्रमण करणे, दुसऱ्याने लिहिलेले लेख गाणे कविता थिसिस पुस्तक किंवा बौद्धिक संपदा स्वतःच्या नावावर खपवणे, एडिट करून फॉरवर्ड करणे ... हेही चौर्य / स्तेय याच्यामध्ये येतात. ही डिजिटल चोरी soft steal हा आता नव्यानेच कळलेला प्रकार आहे.
जे माझं आहे, तेही सोडून देण्याची तयारी म्हणजे रामायण!
आणि
जे माझं नाही, तेही बळकवण्याची वृत्ती म्हणजे महाभारत!!
जे माझं नाही ... त्याला मी हात लावणार नाही, त्याचा मी स्वीकार करणार नाही ... ही वृत्ती म्हणजे अस्तेय.
अहिंसा अस्तेय हे अष्टांग योगातील यम या मध्ये समाविष्ट आहेत.
जसे हिंसा ही क्रोधजन्य आहे , तसेच चौर्य = स्तेय हे काम किंवा लोभजन्य आहे. म्हणून षड्रिपुं-वरती विजय मिळवणे, हे सदाचरणाचं सद्वृत्ताचं पहिलं पाऊल आहे.
अन्यथा काम ... इथे काम हा शब्द स्त्री संग, मैथुन, रतिक्रीडा, संभोग, सेक्षुअल प्लेजर या अर्थी आलेला आहे.
था हा प्रत्यय suffix , पद्धत रीत दर्शवतो, असं आपण पूर्वी पाहिलं आहे. जसे यथा तथा कथम् सर्वथा ... तसं अन्यथा!
अन्यथा म्हणजे जसं असायला हवं , त्यापेक्षा वेगळं विपरीत विलक्षण विसंगत विचित्र.
वस्तुतः ब्रह्मचर्य हेही यम या योग अंगात आलेलं आहेच.
याविषयी सविस्तर पुढील भागात पाहू या.
अब्रह्मचर्य हे सरळ सरळ काम या षड्रिपु मुळेच असते. जन्मापासून पहिली आठ वर्षे पित्याच्या घरी, तिथून पुढची बारा वर्षे उपनयनानंतर गुरुगृही ... तेथे अध्ययन आणि मग 25 व्या वर्षी गृहस्थाश्रमात प्रवेश म्हणजे पहिली पंचवीस वर्षे ही ब्रह्मचर्याश्रम म्हणजे आयुष्यासाठी ज्ञान/कौशल्य रूपी पाया तयार करण्यासाठी, फाउंडेशन मेकिंग च्या ज्ञानार्जनासाठी, कौशल्य शिकण्यासाठी ... *एकाग्रतेने* द्यायची आहेत. त्या वयात काम / स्त्रीसंग अशा गोष्टींकडे मनाला धावू द्यायचे नाही, म्हणूनच ग्रामातून गृहातून , वनामध्ये गुरुगृहात शिकायला जाणे , अशी व्यवस्था त्यावेळी होती.
विशेष म्हणजे 25 ते 50 हा गृहस्थाश्रम पूर्ण केल्यानंतर, वानप्रस्थाश्रम म्हणजे स्वेच्छा निवृत्ती! आता, हा संसार माझा नसून, माझ्या मुलाचा / सुनेचा आहे, हे वास्तव स्वीकारून, खुलेपणाने मनमोकळेपणाने आनंदाने सहजपणे , तो संसार सोडून, वनाकडे प्रस्थान करणे ... म्हणजे राहते घर सोडून , आसक्ती सोडून, खऱ्या अर्थाने विरक्त होऊन, स्वतःच्या पारलौकिक सद्गति साठी तत्त्वचिंतनासाठी आत्मकल्याणासाठी वनात जाऊन राहणे. इतकी ती सहज निवृत्तीची व्यवस्था, त्याकाळी समाजात होती.
आणि यदा कदाचित 50 ते 75 ही 25 वर्ष जिवंत राहणं जमलंच, तर 75 च्या पुढे वनातही न राहता, संन्यासाश्रम स्वीकारणे!!!
संन्यास याचा अर्थ तीन दिवसांपेक्षा अधिक काळ एका जागी न राहणे. वानप्रस्थाश्रमात तुम्ही वनात का होईना, एखादी झोपडी / आश्रम बांधून दीर्घकाळ राहू शकत असता. पण संन्यासाश्रमामध्ये मात्र त्रि-रात्र झाल्यानंतर ते स्थान सोडून, अन्यत्र निघून जायचे असते. इतकी पराकोटीची अनासक्ती निःसंगता विरक्ती, ही आपल्या संस्कृतीने सदाचरण म्हणून स्वीकारलेली होती.
असो.
आपण आता सध्या गृहस्थाश्रमातील विहित / मान्य अशा काम स्त्रीसंग ग्राम्यधर्म मैथुन अब्रह्मचर्य म्हणजे आज परिचित असलेल्या सेक्स या विषयाबाबत बोलूया.
ब्रह्मचर्य किंवा अब्रह्मचर्य हे आयुर्वेदामध्ये जीवनाच्या तीन उपस्तंभांपैकी एक आहेत. आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य किंवा अब्रह्मचर्य , हे तीन जीवनाचे आधार pillars आहेत.
*मध्येच एक साधा सरळ सोपा प्रश्न विचारतो.
Poll घेऊया.*
तिथे दिलेला विकल्प / ऑप्शन निवडावा.
*गृहस्थाश्रमामध्ये पती/पत्नी वगळता, सर्वात श्रेष्ठ वंदनीय असा अन्य नातेवाईक कोण कि, ज्यांच्या बद्दल सर्वाधिक कृतज्ञता असायला हवी ... असा/असे नातेवाईक कोण?*
या प्रश्नाचे उत्तर/प्रतिसाद म्हणून *कोण* यासोबतच, *का* असेही सांगावेसे किंवा इतरही अधिक काही सांगावेसे वाटले, तर वैयक्तिक पर्सनल व्हाट्सअप अकाउंट 9422016871 वर मला कळवा (प्रतिसाद सर्वांनी वाचण्यास योग्य आहे, असे वाटले तर, तो प्रतिसाद देणाऱ्याच्या अनुमतीने, तो इथे ग्रुप मध्ये नावासह किंवा नावाविना, जशी लिहिणाराची इच्छा असेल, त्यानुसार प्रसृत करूया)
काम म्हणजे लैंगिक आनंद हे गृहस्थाश्रमातील कर्तव्य आहे, आचरणीय आहे व ते समर्थनीयही आहे ... अर्थातच काही मर्यादेपर्यंत, काही नियमांच्या अधीन राहून!!!
कुठल्याही गोष्टीत, अति तेथे माती, हे ठरलेलेच असते. *मन मारू नये आणि अति करू नये*, या स्पेक्ट्रम मध्ये, या आवाक्यामध्ये, कोणतीही गोष्ट, ही उचित ठरू शकते.
*काम = लैंगिक आनंद ही प्रत्येक सजीवाची नैसर्गिक प्रेरणा व स्वाभाविक गरज आहे.*
काम असे म्हटल्यानंतर काम म्हणजे स्त्री संग = सेक्षुअल प्लेजर याचे, काहीतरी समाज मान्य व आरोग्यशास्त्र मान्य असे विधी / पद्धत / रीत / नियम / संकेत असायला हवेत. त्या नियमांच्या विपरीत जे , ते *अन्यथा काम* असे म्हणता येईल.
काम या शब्दाला जसे संभोग मैथुन स्त्री संग शरीर सुख सेक्स असे शब्द परिचयाचे आहेत, तसाच थोडासा अपरिचित शब्द/संज्ञा म्हणजे *ग्राम्यधर्म* असा एक शब्द आहे. पूर्वी मनुष्य किंवा ऋषीमुनी किंवा तपाचरण करणारे किंवा विद्यार्थी हे ब्रह्मचर्याश्रमात वनात राहत असत. ज्याला आज आपण गावरान असे म्हणतो आणि सर्वसामान्य जन पौरजन हे पुरात, नागरिक म्हणजे नगरात म्हणजे ग्राम म्हणजे गावात राहत असत. म्हणून गावात ग्रामात समाजात समूहात समुदायात राहून करायचे, जे वर्तन ... तो ग्राम्य धर्म, असा त्याचा साधा सरळ अर्थ. ग्राम्य धर्माचे नियम पुढीलप्रमाणे आहेत ... या मध्ये... स्त्री विषयक आणि संभोग = सेक्षुअल ॲक्ट या *कृती बाबतचे*, हेय उपादेय, स्वीकार्य त्याज्य, ग्राह्य वर्ज्य असे नियम दिलेले आहेत. ते आपण क्रमशः पाहूया.
*कारण, आपण या ग्रुपमध्ये जितके लोक आहोत, किंवा ज्या समूहांमध्ये पुढे इथल्या पोस्ट फॉरवर्ड होतील, त्याचेही वाचन करणारे लोक हे प्रायः हिंसा आणि स्तेय या कर्मांपासून दूर असतात. हिंसा आणि स्तेय या बाबी आपल्यासारख्यांच्या जीवनात पांढरपेशा मध्यमवर्गीय मिडल क्लास माणसांमध्ये सहसा येत नाहीत ... पण काम किंवा स्त्री संग सेक्स हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा पण स्पष्टपणे न बोलला जाणारा विषय असतो म्हणून आरोग्य शास्त्र आणि सामाजिक नीती नियम या दोघांनाही संमत असेल, अनुकूल होईल, अशा पद्धतीने त्याचे स्पष्टीकरण अष्टांग हृदय सूत्रस्थान 7 च्या आधारे समोर ठेवूया*
ग्राम्यधर्मे त्यजेन्नारीमनुत्तानां रजस्वलाम् अप्रियामप्रियाचारां दुष्टसङ्कीर्णमेहनाम् अतिस्थूलकृशां सूतां गर्भिणीमन्ययोषितम् वर्णिनीमन्ययोनिं च गुरुदेवनृपालयम्
चैत्यश्मशानायतनचत्वाराम्बुचतुष्पथम्
पर्वाण्यनङ्गं दिवसं शिरोहृदयताडनम्
अत्याशितोऽधृतिः क्षुद्वान् दुःस्थिताङ्गः पिपासितः बालो वृद्धोऽन्यवेगार्त्तस्त्यजेद्रोगी च मैथुनम्
याच श्लोकांच्या बरोबरीने पुढील मुद्दे ही संक्षेपाने विचारात घेऊया ...
वाजीकरण अष्टांग आयुर्वेद , योगरत्नाकर येथील अष्टविध मैथुन, पंचसायक अनंगरंग वात्स्यायन कामसूत्र खजुराहो राजकीय स्थैर्य शुक्र अहर्ष इरेक्टाईल डिस्फंक्षन नाॅन स्टिम्युलेशन व्हिडिओ पॉर्न क्लीब षंढ गायनॅकॉलॉजी अँड्रोलॉजी शशांक सामक नवविवाहितांचे कामजीवन 40 नंतरचे कामजीवन पत्नी सखी प्रिया ... आणि आणखी काही 🙂 पुढील भागात...
त्वदीय वस्तु गोविंद
तुभ्यम् एव समर्पये ।
तेरा तुझको अर्पण
क्या लागे मेरा ।
श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।
🙏🏼
वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
www.MhetreAyurveda.com
www.YouTube.com/MhetreAyurved/
प्रिया संग सुरभी जंगम पद्मिनी
No comments:
Post a Comment