Friday, 30 May 2025

आरोग्यसंपन्न आनंदी आयुष्यासाठी भोजनाची दशसूत्री

आरोग्यसंपन्न आनंदी आयुष्यासाठी भोजनाची दशसूत्री

भोजनाची योग्य पद्धत विधि रीत कोणती? 

सर्वसामान्यतः , प्राथमिकतेने आणि प्राधान्याने , काय टाळावे आणि काय घ्यावे / खावे / प्यावे ??



*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 192*

30 मे 2025, शुक्रवार  

*उपविभाग 134*


✍️🏼 ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871


नमस्कार 🙏🏼💐


काले सात्म्यं लघु स्निग्धम् उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।

बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् मात्रावद् विदितागमः ॥


आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत होतो!


1.काले = योग्य वेळी. हे आपण मागील भागात सविस्तर पाहिले आहे


2. सात्म्यं = बालपणापासून नेहमीचे पिढ्यानुपिढ्या आपल्या प्रदेशात जे सवयीची आहे परिचयाचे आहे ते खावे उगीचच व्हरायटी फॅन्सी ट्राय या नावाखाली अपरिचित व सवयीचे नसलेले पदार्थ खाऊ नयेत जसे की मोमो बर्गर पिझ्झा पास्ता किंवा आपल्या प्रदेशापेक्षा खूप लांबचे दूरचे कॉन्टिनेन्टल पंजाबी दक्षिणात्य कोरियन असे पदार्थ टाळावेत


3. लघु = पचायला हलके सोपे अन्न खावे. पचायला जड अवघड असे अन्न खाऊ नये, जसे ... मांस मिठाई पनीर मैदा बेकरी वनस्पती तूप जमिनीखाली उगवणारे पदार्थ मशरूम अशा पदार्थांचे प्रमाण आणि वारंवारिता कॉन्टिटी आणि फ्रिक्वेन्सी ही कधीतरी केव्हातरी थोडेसे अशीच असावी किंवा खरंतर नसावीच


4. स्निग्धम् = तेलाचा तुपाचा पुरेसा अंश असलेले पुरेसे स्निग्ध पदार्थ खावेत.


तेलकट तुपकट खूप फॅटी असे पदार्थ खाऊ नयेत. 

चीज पनीर नियोनीज पीनट बटर बटर सॉस यांचा वापर करूच नये किंवा कधीतरी कमीत कमी थोड्याशाच प्रमाणात असावा, म्हणजेच गरजेपेक्षा अतिस्निग्ध पदार्थ टाळावेत


त्याचबरोबर अत्यंत कोरडे रूक्ष भरभरीत ड्राय असेही पदार्थ टाळावेत = अत्यंत रुक्ष असे सॅलड फायबर या नावाखाली वैरण कडबा चारा आंबवण पेंड असे गाईगुरे जनावरे खातात, तसे कच्चे न शिजलेले पदार्थ खाऊ नये. 


काहीतरी नवीन फॅड आले आहे म्हणून अत्यंत रुक्ष शुष्क भरभरीत कोरडे ड्राय अशा "मिलेट्स या धान्य प्रकारामागे" फार लागू नये.


5. उष्ण = शक्यतो ताजे... पॅन टू प्लेट = तव्यावरून गॅसवरून थेट ताटात, अशा पद्धतीने अन्नपदार्थ खावेत. शक्यतो पुन्हा गरम केलेले रि-हीटेड असे अन्नपदार्थ टाळावेत. गार झालेले, वेळ उलटून गेलेले, वातड झालेले, शिळे किंवा फ्रिज मधील अति थंड असे पदार्थ टाळावेत किंवा कमीत कमी वेळा कमीत कमी प्रमाणात कॉन्टिटी आणि फ्रिक्वेन्सी एस पॉसिबल लेस इतकेच खावेत


6. क्षिप्रं = भोजन शक्यतो लवकर करावे कमी वेळात अन्न खाऊन संपवावे म्हणजेच खूप वेळ रेंगाळत गप्पा मारत टाइमपास करत अन्न खाऊ नये. अन्यथा त्या अन्नाचे पचन मिश्रण घुसळण आणि अन्नमार्गातून पुढे जाणे प्रपोगेशन हे योग्य प्रकारे होत नाही जुन्या काळची माणसं, "पहिल्या घासाचा xxx होईपर्यंत खात बसू नये" असे म्हणायची. अर्थात वाघ मागे लागल्यासारखं कुत्र माग लागल्यासारखं खूप भरभर सुद्धा घेऊ नये सावकाश जेवावे याचा अर्थ दोन घासांमध्ये पुरेसा वेळ आणि पोटामध्ये पुरेशी जागा शिल्लक राहील असे जेवावे


7. द्रवोत्तरम् । = द्रव पदार्थांचे प्रमाण खूप कमीही नाही आणि खूप अधिकही नाही पण तरीही थोडेसे जास्तच म्हणजे घनपदार्थांच्या तुलनेत पुरेसे पाणी जेवताना प्यावे. 


*साधारण दर चार घासल्यानंतर एक घोट तरी पाणी प्यावे म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे आमाशयामध्ये योग्य पद्धतीने घुसळन मिश्रण पाचक रसांच्या सोबत अग्नी तत्वा सोबत व्यवस्थितपणे होते.* 


साधारणता आपल्या अमाशयाचे म्हणजे एका वेळचे जेवण करण्याच्या कपॅसिटीच्या क्षमतेच्या 50% अर्थात अंदाजे ½ प्रमाणात घनपदार्थ (solid भाजी भाकरी भात उसळ), ¼ = 25% द्रव पदार्थ (liquid = आमटी खीर कढी रस्सा आमरस पाणी) आणि 25% जागा अन्नाचे घुसळण होण्यासाठी रिकामी ठेवावी 


जेवण करताना अजिबातच पाणी न पिणे किंवा जेवण पूर्ण झाल्यानंतर पाऊण तासाने एक तासाने पाणी पिणे, या चुकीच्या सवयी आहेत आणि त्या शास्त्राचे अज्ञान आणि अपसमज यावर आधारलेले आहेत


8. बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् = निसर्गाच्या दृष्टीने सर्वात सोपा स्वाभाविक नैसर्गिक आरोग्यदायक नियम म्हणजे भूक लागली असेल तरच जेवण करावे. 


भूक लागलेली नसताना, केवळ वेळ झाली आहे म्हणून घड्याळाच्या वेळापत्रकाप्रमाणे जेवण करू नये.


भूक लागलेली असताना अन्नपदार्थ सोडून चहा पिणे पाणी पिणे किंवा वडापाव सामोसा असे जंक फूड खाणे टाळावे 


आणि भूक लागलेली नसताना काहीही खाऊच नये.


यात अजून एक सोपा नियम म्हणजे जेवणापूर्वी काहीही खाण्यापूर्वी = नाष्ट्यापूर्वी / लंच पूर्वी / डिनर पूर्वी; आपली जीभ आरशात पहावी. जर ती पांढरी अस्वच्छ कोटेड थर असलेली अशी दिसत असेल, तर एक कप कडकडीत गरम पाणी चहाइतके फुंकून फुंकून प्यावे आणि एक तासभर कुठलाही घनपदार्थ किंवा दुधासारखा द्रव पदार्थ घेऊ नये.

एक तासाने पुन्हा जीभ पहावी, ती जर स्वच्छ अनकोटेड लाल गुलाबी कुठलाही थर नसलेली अशी असेल, तर त्यावेळेला पुरेशा प्रमाणात जेवण घ्यावे


9. मात्रावद् = पुरेशा प्रमाणात जेवण घ्यावे. इच्छेच्या किंवा उपलब्धतेच्या नव्हे तर ... भुकेच्या, क्षमतेच्या, पोटात उपलब्ध असलेल्या जागेच्या तुलनेत, घास कमी प्रमाणात जेवण घ्यावे.


भोजनातील पदार्थ पचायला जड असतल तर नेहमीच्या क्षमतेच्या निम्म्याच प्रमाणात जेवण घ्यावे. 


तडस लागेल इतके जेवू नये. 


घशात बोट घातले तर बोटाला श्रीखंड लागेल इतकं चापून जेवू नये, अशी जुनी माणसं म्हणत असतात


10. विदितागमः ॥ = आगम म्हणजे शास्त्र! तर आरोग्य शास्त्राचे पुरेसे, किमान प्राथमिक तरी ज्ञान घेऊन, त्यानुसार आपला आहार घ्यावा. कुणीतरी काहीतरी सांगितलं ट्रेंड आहे फ्याड आहे नवीन आहे व्हाट्सअप युट्युब फेसबुक सोशल मीडियावर आलेला आहे म्हणून त्याप्रमाणे वागू नये त्याच्यामागे स्वतःची फरपट होऊ देऊ नये आपल्याला मिळालेल्या माहितीची पडताळणी योग्य अनुभवी ही ज्ञानी आरोग्य शास्त्राची माहिती असलेल्या पदवीधारक व प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्य डॉक्टर यांच्याकडून आपल्या प्रकृतीनुसार काय उचित आहे ते समजावून घेऊन त्यानुसार आपल्या आहारात योग्य त्या पदार्थांचं समावेश करावा आणि अयोग्य पदार्थांपासून संयमाने दूर राहावे ते पदार्थ टाळावेत त्याज्य मानावेत वर्ज्य करावेत. 


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।४६५।। 

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

No comments:

Post a Comment