Sunday, 25 May 2025

भोजनाची योग्य वेळ कोणती? पहिले आणि दुसरे भोजन घेण्याची योग्य वेळ कोणती??

भोजनाची योग्य वेळ कोणती? पहिले आणि दुसरे भोजन घेण्याची योग्य वेळ कोणती?? 40 वयानंतर सायंकाळचे / रात्रीचे भोजन कसे असावे? 


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 191*

26 मे 2025, सोमवार  

*उपविभाग 133*


✍️🏼 ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871


नमस्कार 🙏🏼💐


काले सात्म्यं लघु स्निग्धम् उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।

बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् मात्रावद् विदितागमः ॥


आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत होतो!


आहार संभवं वस्तु ... रोगाश्च आहार संभवाः


वस्तु म्हणजे आरोग्य संपन्न शरीर, हे आहारातूनच निर्माण होते अर्थात योग्य आहारातून ! ... आणि रोग सुद्धा आहारातूनच निर्माण होतात अर्थात चुकीच्या आहारातून !!


योग्य आहाराचा उत्तम नियम पुढीलप्रमाणे


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


*काले* = 1. योग्य वेळी भोजन घेणे 2. अवेळी भोजन न घेणे


भोजनाची योग्य वेळ कोणती? 

1.

सर्वाधिक शास्त्रीय आणि नैसर्गिक उत्तर म्हणजे *"खरोखरीची" भूक लागेल तेव्हा* ...

घड्याळातील वेळेनुसार जेवणे, अन्न गार होईल म्हणून जेवणे, सगळेजण बसलेत म्हणून एकमेकांसोबत जेवणे, लंच टाईम झाला आहे म्हणून जेवण ... ही योग्य वेळ नसून ... "आता खाल्ले नाही, तर थकवा येईल, पोटात कलकल होईल, ती खरी भुकेची वेळ" ... खाण्याची इच्छा होणे म्हणजे भूक लागली, असे नाही. तरीही ...


2.

नैसर्गिक नियमानुसार मध्याह्न = सूर्य डोक्यावर आला असता = दुपारी 12 चे सुमारास जेवावे 


3.

याचा अर्थ सकाळी 10 ते दुपारी 2 हा पित्त दोषाचा म्हणजे पचनशक्ती चांगली असण्याचा काळ आहे.


या वेळात जेवणे हे चांगले त्यातही साडेदहा वाजता जेवले असता, दीड तासानंतर म्हणजे दुपारी बारा वाजता अर्थात पित्तदोषाचा सर्वोत्तम काळ असताना पचन उत्तम होते


4.

थंडीच्या दिवसात शक्यतो सकाळी दहा ते अकरा (10 ते 11) च्या सुमारास जेवावे. कारण या काळात भूक उत्तम स्ट्रॉंग असते


उन्हाळा पावसाळा ग्रीष्म वर्षा एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळात उशिरा म्हणजे दुपारी दीड दोन (130 ते 2) पर्यंत जेवावे कारण या काळात भूक खूप कमी असते 


वसंत शरद म्हणजे मार्च आणि ऑक्टोबर या काळात दुपारी सूर्य डोक्यावर असताना दुपारी बाराचे सुमारास जेवावे कारण या काळात भूक मध्यम असते 


5.

पहिल्या जेवणानंतर पुढे तीन तास काहीही खाऊ नये, कारण आधी घेतलेले अन्न अद्याप पचलेले नसते ... आणि सहा तासापेक्षा जास्त काळ शक्यतो उपाशी राहू नये कारण अधिक वेळ उपाशी राहिल्यास बलक्षय होऊन थकवा येतो 


6.

म्हणजेच दुसरे जेवण हे आदर्श रित्या सायंकाळी साडेचार पाच (4.30 ... 5) ते उशिरा उशिरा साडेसात आठ (730 ... 8) या वेळात करावे 


7.

रात्री आठ नंतर पुढे नऊ-साडेनऊ दहा-साडेदहा अकरा वाजता जेवणे, हे निश्चितपणे अन्नपचन व्यवस्थित न होणे आणि पोट पचन किंवा एकूणच सार्वदेहिक रोग होण्याचे कारण आहे


8.

सायंकाळचे किंवा रात्रीचे किंवा दुसरे जेवण, हे शक्यतो हलके म्हणजे पचायला हलके असावे (वजनाने हलके असा त्याचा अर्थ नाही) 


9.

म्हणून चाळीशी नंतर तरी, रात्रीच्या जेवणात, शक्यतो साळीच्या/ज्वारीच्या लाह्या (नुसत्या कोरड्या किंवा धने जिरे चटणी मीठ याची फोडणी देऊन) किंवा मुगाचे डाळीचे पिठाचे डोसे धिरडे किंवा शिजलेले हिरवे मूग किंवा अगदीच भूक भागत नसेल तर कमी तांदूळ आणि जास्त मुगाची डाळ या पद्धतीने केलेले मुगाची खिचडी; त्यासोबत चटणी मेतकूट पापड लोणचे इतकेच असावे!!!


10.

रात्रीचे जेवण हे पोळी भाजी वरण भात स्वीट डिश फळे दूध असे चारीठाव आणि पचायला जड अशा पद्धतीचे घेऊ नये


11.

रात्रीच्या जेवणानंतर माणूस पुढील सहा ते आठ तास झोपेमध्ये बेडवर काहीही हालचाल न करता पडू नसतो त्यामुळे चाळीशी नंतर रात्रीचे जेवण हे पोळी भाजी वरण भात असे चारी ठाव घेतले असता, त्यातून मिळणारी ऊर्जा शुगर याचा त्या वयात शरीराकडून वापर होत नसल्यामुळे, हळूहळू ते शरीरात साठत राहून स्थाव्य कोलेस्टेटॉल बीपी शुगर डायबिटीस ऍसिडिटी थायरॉईड असे आजार होऊ शकतात.


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।४६५।। 

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

No comments:

Post a Comment