Friday, 23 May 2025

कल्याणमित्र सखाभक्ती

मूळ पोस्ट दिनांक 23.12.2022 ... 

ब्लॉग पोस्ट दिनांक 23.05.2025

अष्टांगहृदय सद्वृत्त ... श्लोक 2

23.12.2022


*भक्त्या कल्याणमित्राणि सेवेतेतरदूरगः।*


भक्त्या ... भक्तीने म्हणजे प्रेमाने आदराने आपुलकीने जिव्हाळ्याने ममत्वाने


कल्याणमित्राणि ... कल्याण म्हणजे शुभ चांगलं भलं चांगभलं मंगल हित आपल्या बाबतीत हे साधून देणारा किंवा आपल्या कल्याणचं रक्षण करणारा तो कल्याणमित्र


सेवेत ... सांभाळावा जपावा वागावे


इतरदूरगः। (स्यात् / भवेत्) ... इतर म्हणजे कल्याण अ-मित्र म्हणजेच कल्याणाचा शत्रू किंवा अकल्याणमित्र म्हणजे आपलं अहित करेल असा मित्र, अशी संगत , कुसंगती!


दूरगः ... ग म्हणजे जाणारा. जसे खग म्हणजे आकाशात जाणारा तो पक्षी, नग म्हणजे कुठेही न जाणारा तो पर्वत, दुर्ग म्हणजे जाण्यासाठी कठीण अवघड तो दुर्ग किल्ला गड! तसे दूर-गः म्हणजे अशा अकल्याणकारक शत्रुसमान संगती पासून दूर जावे, दूर राहावे, अंतर ठेवावे, जवळ येऊ देऊ नये, आपण जवळीक साधू नये.


गः असा प्रत्येक सफिक्स प्रत्यय असणारे सुश्रुत वचन हे विद्यार्थ्यांसाठी किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहे त्यात सहा सोपान स्टेप्स आहेत


वाक्सौष्ठवेऽर्थविज्ञाने प्रागल्भ्ये कर्मनैपुणे । 

तदभ्यासे च सिद्धौ च यतेत *अध्ययनान्तगः* ।


अध्ययनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ज्याला जायचे आहे त्यांनी या क्रमाने जावे असे सुश्रुताचार्य म्हणतात यातही *अध्ययन अन्त गः* असा शब्द आलेला आहे. या श्लोकाबद्दल खूप विस्ताराने सांगण्याजोगे आहे, पण ते पुन्हा कधीतरी!


*इतर दूर गः* "स्यात् / भवेत्" म्हणजे व्हावे राहावे असे क्रियापद अभिप्रेत आहे. जसे कल्याण मित्र *सेवेत* असे क्रियापद लिहिलेले आहे तसे येथे स्यात् किंवा भवेत् म्हणजे असावे किंवा व्हावे / राहावे, असे क्रियापद आहे असे मानावे जाणावे.


याला *वाक्यशेष* असे म्हणतात म्हणजे जे शब्द प्रत्यक्षात लिहिलेले बोललेले नाहीत, ते अध्याहृत गृहीत धरणे. 


जसे ॐ नमः शिवाय, श्री गणेशाय नमः याच्यामध्ये *अस्तु* हा शब्द गृहीत आहे. त्याला वाक्यशेष म्हणावे. म्हणून नमोऽस्तु तस्मै। यामध्ये *अस्तु* हे क्रियापद प्रत्यक्षात आहे.


जरी आपणास तत्त्वज्ञान अध्यात्म यात *जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत!* किंवा सगळं ब्रह्म विश्व आपणच आहोत , असं शिकवलेलं असलं तरी , व्यवहारात प्रॅक्टिकली हे अवघड आणि अशक्य असतं!


संतांना अभिप्रेत वसुधैव कुटुम्बकम् किंवा जगातील प्रत्येक व्यक्ती ही एक सारखीच आहे, सर्व समभाव असं प्रत्यक्षात असतं तर, सीमा सैन्य पासपोर्ट यांची आवश्यकताच राहिली नसती!


पण व्यवहारांमध्ये *आपपरभाव* हा असतोच, म्हणूनच *अष्टांग हृदय सद्वृत्त* हा उपक्रम अलौकिक तत्त्वज्ञान, अव्यवहार्य म्हणजे इम्पॅक्टिकल बोजड तत्त्वज्ञान न सांगता ... व्यवहार कुशलता सांगतो!


आमच्या बालपणी आमच्या एका मित्राचे वडील त्याला रागावताना म्हणायचे , "अरे, जरा चांगले *मित्र पाळ!"* ... आता मित्र हा काय कुत्रा मांजर गाय घोडा आहे का, की ज्याचा ज्याला 'पाळायचे' आहे!?


परंतु पाळणे याचा अर्थ जोडणे सांभाळणे, असा त्यांना अभिप्रेत होता 

म्हणजे संगती मैत्री ही चांगल्या कल्याणकारक हितैषी लोकांशी असावी, असा त्यातील भावार्थ!


कल्याण मित्राला भक्तिने जपणे आणि इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे याचा अर्थ *त्या त्या व्यक्तीच्या, आपल्या जीवनात असणाऱ्या मूल्या प्रमाणे* आपण त्याला कुठल्या कक्षेत इयत्तेत / ऑर्बिट मध्ये ठेवायचे, हे ठरवावे.

प्रत्येकाला जर आपण तितक्याच एकसारख्याच जवळीकेने पाहिलं, तर ते उचित होत नाही आणि अनेकदा आपला अपेक्षाभंग मनोभंग होतो.


आपण समोरच्याशी कितीही चांगलं वागलं तरी, तो कदाचित आपल्याला टेकन फोर ग्रांटेड taken for granted गृहीत धरणे, वापरून घेणे, एक्सप्लाॅयटेशन exploitation करणे अशा दृष्टीने पहात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


आपणही *गळे पडू पणा* शक्यतो टाळावा. अन्यथा *अतिपरिचयात् अवज्ञा* असे होते.


आपण कुणाच्या कुठल्या ऑर्बिट मध्ये म्हणजे किती जवळ किंवा लांब आहोत 

आणि

आपण कुणाला आपल्या किती ऑर्बिट मध्ये आत येऊ द्यायचं किंवा बाहेरच्या कक्षेत ठेवायचं,

हे ठरवणं हे खरोखरच कौशल्याचं ... 

खरं तर जुगाराचं गॅम्बलिंगचं काम आहे.


ते कधी कधी जमतं साधतं आणि अनेकदा फसतंही !!


वेळ निघून गेल्यानंतर त्यातला खरा भाव लक्षात येतो, तेव्हा नैराश्य वैफल्य याशिवाय काहीच हाती उरत नाही.


कधी कधी नकळतपणे खूप चांगली माणसं ही आयुष्याला जोडली जातात, तो आपल्या सुकृताचा गुरुकृपेचा ईश्वरीवरदानाचा भाग समजावा.


प्रेम आदर भक्ती ही भावना/नातं हे mutual नसतं म्हणजे mutually equal म्हणजे परस्पर सममूल्य नसते


मला तेंडुलकर बद्दल प्रेम आहे म्हणजे तेंडुलकरला माझ्याबद्दल प्रेम असेलच असं नाही ... असलंच पाहिजे, असंही नाही!


अगदी 2 घट्ट मित्रांचंही परस्पर मैत्र हे सममूल्य same inensity affinity level ला असेल, असं नाही.


हे सर्व नात्यांबाबतीत असतं ...

अगदी मायलेक पितापुत्र गुरुशिष्य पतिपत्नी मित्र या सर्वच नात्यांबाबत !!!


मला एखाद्याबद्दल जितकं प्रेम आदर भक्ती आपुलकी जिव्हाळा सॉफ्ट कॉर्नर वाटतो ... 

"तेवढाच , तितक्याच" उत्कटतेने intensely समोरच्याला माझ्याबद्दल असेल / असेलच , असं नाही. 


"मी ते समोरचा (मी 👉🏼 समोरचा)" हे नातं जितकं उत्कट/intense किंवा उथळ/paleअसेल , 

तितकंच "समोरचा ते मी (समोरचा 👉🏼 मी)" हे नातं तसंच reciprocate असेल, असं नाही.


हे परस्पर mutual नातं हे reciprocative असेलच असं नसतं ... 


ते शून्य ते अनंत , 0 ते ∞ , zero to infinity अशा कोणत्याही उत्कटतेचं intensity चं असू शकतं !!!


नातं हे ... "नूर की बूँद है, सदियों से बहा करती है ...

सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो" असं असतं ... 


नातं हे ... "स्वसंवेद्या आत्मरूपा" असं असतं !!!


नातं कधीच

Mutual परस्परसापेक्ष

Reciprocative

Two way

नसतं


ते नेहमीच एकमार्गी one way स्वसापेक्ष असतं


म्हणून परतफेड सममूल्यता expectation अपेक्षा आसक्ती आस आशा ठेवू नये

🌹🪔❤️


आयुष्य ही एक विदाऊट कंडक्टर (विनावाहक) ST बस आहे 🚌


आपण ड्रायव्हर आहोत ... गाडी ST Bus हे जीवन आयुष्य आहे!


काही प्रवासी प्रथमपासून पण मधल्या कुठल्या तरी स्टेशन पर्यंतच : आई वडील


काही प्रवासी मधूनच, पण शेवटपर्यंत : बायको मुलं


बाकीचे अधेमधे चढ उतार करणारे : मित्र शेजारी नातेवाईक गणगोत सहकर्मी 


प्रवास संपला ... की ST बस गाडी डेपो मध्ये लावायची म्हणजे देहाचं विसर्जन करायचं आणि आपल्या घरी जायचं म्हणजे आत्मतत्त्व ब्रह्मतत्त्व यात वुलीन होऊन जायचं!


वो घर मेरे बाबुल का घर (म्हणजे माहेर / घर) ... 

ये दुनिया ससुराल


अपेक्षा कशी असावी प्रेमात ?.. 

समजुन घ्यावं लागतंय म्हणजे 

माझ्या अपेक्षेनुसार (मला हवं तसं) नसूनही,

मान्य करावं लागतंय ... 


आणि प्रेमाची व्याख्याच आहे की ..


Unconditional *Uni-lateral* declaration that, 'I' Love you ... 


same is for any/every relationship ... ... 

Unconditional *Uni-lateral* declaration that I *Relate* (myself with) you....


😊😊😊😊


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।


🙏🏼

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

www.MhetreAyurveda.com

www.YouTube.com/MhetreAyurved/





1 comment: