Friday, 28 November 2025

आर्युववेदाचा, "शास्त्र" या अर्थाने, सुखद उदय, टळटळीत दुपार आणि भयानक/भयाण सूर्यास्त Rise, rein & ruin of Aryuwaweda "as Shaastra"

आर्युववेदाचा, "शास्त्र" या अर्थाने, सुखद उदय, टळटळीत दुपार आणि भयानक/भयाण सूर्यास्त 

Rise, rein & ruin of Aryuwaweda "as Shaastra"

Picture credit Google Gemini AI

हा लेख आर्युववेद नावाच्या एका काल्पनिक बाबीबाबत आहे.  ज्याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. जर काही प्रासंगिकता किंवा साम्य आढळले, तर कृपया तो केवळ योगायोग समजावा. या लेखातील सर्व विधाने काल्पनिक आहेत आणि ती सदोष असू शकतात किंवा त्यात चुका असू शकतात. या लेखामधील प्रत्येक विधानामध्ये लिहिलेल्या परिस्थितीला नोंदवलेल्या निरीक्षणाला सन्माननीय अपवाद निश्चितपणे असू शकतात

This article is about an imaginary non existent thing called as Aryuwaweda, it has no relation with real life. If any relevance or resemblance found, please consider it as megre coincidence. All the statements in this article are fictitious and those may be wrong or contain mistakes. There may certainly be honorable exceptions to the observations made & situations reported each statement in this article.

23

 सर्वात वाईट भाग असा आहे की जी आर्युववेदातली मेरिट मधली मुलं होती, त्यांना ऑबवीअसली आणि पॅशनेटली प्रॅक्टिसचंच आकर्षण होतं ... त्यामुळे ही सगळी आर्युववेदातली त्या त्या बॅचची सगळ्यात हुशार, सगळ्यात बुद्धिमान, सगळ्यात सक्षम, अशी तरुण मंडळी, त्यांच्या त्यांच्या वेळी, प्रत्यक्ष व्यवहारात प्रॅक्टिस मध्ये आली ...


24

आणि त्यांच्या बॅचमध्ये ज्यांना शास्त्रातला ओ का ठो कळत नव्हतं, ज्यांची कुवत कॅपॅसिटी ही दुय्यम तिय्यम किंवा खरंतर निकम्मे, अशा प्रकारातली होती, अशी लोकं प्रॅक्टिस मध्ये येऊ शकली नाहीत... कारण त्यांच्यामध्ये ती हिम्मत धमक क्षमता कुवत औकात नव्हतीच 


25

त्यामुळे ही मेरिट नसलेली, प्रॅक्टिस करण्याची क्षमता नसलेली, लोकं ... अकॅडमी मध्ये आणि गव्हर्नमेंट मध्ये वरच्या पदांवरती जाऊन स्थिरावली!


27

ज्यांना मुळात शास्त्र मधलं मेरिट नाही, शास्त्राबद्दल कुठल्या प्रकारची निष्ठा समर्पण आपुलकी नाही ... अशी आर्युववेदातली काडीचीही अक्कल नसणारी माणसं, आर्युववेद बद्दल कुठल्या प्रकारचा जिव्हाळा नसलेली माणसं , ही एकतर अकॅडमी मध्ये शिक्षक प्रोफेसर रीडर लेक्चरर झाली किंवा गव्हर्मेंट मध्ये जिथे धोरण ठरते पॉलिसीमेकर्स ऑफिस बिययर अशा अर्थाने आर्युववेदाच्या क्षेत्रात शैक्षणिक/ व्यावसायिक आणि औषधीकरण या तीनही क्षेत्रांचे "भवितव्य ठरवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जागेवर" अशी माणसं बसली की ज्यांना शास्त्र विषयी आपुलकी नाही, शास्त्राबद्दलचं मूळ सखोल खरंखरं ज्ञान नाही! त्यामुळे शिकवणारे आणि शैक्षणिक व्यावसायिक धोरण ठरवणारे लोक, हे आर्युववेद न जाणणारे , आर्युववेदातले अजाणते किंवा आर्युववेदाची बुद्धी नसलेले , असेच लोक अधिकारी झाले. कारण त्या जागांसाठी जे खरे सत्पात्र सक्षम सुयोग्य लोक होते ते प्रॅक्टिस मध्ये गेले ते शैक्षणिक किंवा धोरणात्मक शासकीय पदांवरती आले नाहीत


28

 गव्हर्मेंट किंवा ग्रांटेड कॉलेजच्या तुलनेत , मेरिट मधल्या मुलांच्या पेक्षा जास्त संख्येने बाहेर पडणारे , प्रायव्हेट कॉलेज यातले आर्युववेदाची डिग्री विकत घेऊ शकणारे, असे व्यापारी दृष्टिकोन असणारे , "पैसेवाले" लोक समाजामध्ये बहुसंख्येने बाहेर पडले ... या सगळ्यांनी मिळून आर्युववेदाचा व्यवसायिक पसारा खूप चतुराईने वाढवला... 


29

आणि त्याला आळा घालता येईल, इतकी ताकत, जी मुळातली गव्हर्मेंट / ग्रांटेड कॉलेज मधली मेरिट मधली मुलं होती, बुद्धिमान मुलं होती, ज्यांना शास्त्र निष्ठा, शास्त्र समर्पण, शास्त्र विषयी आपुलकी जिव्हाळा नातं शास्त्र बद्दल होतं...

त्यांच्यामध्ये तेवढा संघटितपणा, तेवढी क्षमता, तेवढी दूरदृष्टी, तेवढा रीच ॲप्रोच तेवढी पोहोच तेवढा प्रभाव आणि मुख्य म्हणजे स्वतःची प्रॅक्टिस सेट करण्यासाठी त्यांचे तारुण्यातल्या गेलेल्या वेळानंतर त्यांच्याकडे तितकी उमेद आणि सामर्थ्य उरलं नाही ...


की हा जो सगळा अधःपतनाचा भाग चालू आहे, त्याला रोखता येईल, त्याच्यावर आक्षेप घेता येईल, हे चुकीचं चाललंय असं म्हणता येईल , अशी कुठल्याही प्रकारची परिस्थिती शिल्लक राहिली नाही 


त्यामुळे ...

A.

मेरिट मधल्या शास्त्रनिष्ठ आणि शास्त्र समर्पित शास्त्रज्ञान असलेल्या लोकांचा शांतपणा मौन निष्क्रियता अप्रतिकार 

B.

गव्हर्मेंट मधील पॉलिसी मेकर्स ऑफिस बेअरर्स अशा अधिकाऱ्यांच्या ठिकाणी आर्युववेदाचं ज्ञान नसलेले, आर्युववेद बद्दल आपुलकी जवळीक निष्ठा नसलेले, संहिता श्लोक यातलं काही कळत नसलेले, लोक जाऊन बसणे 

C.

याच्याहीपेक्षा दुय्यम दर्जाचे किंवा करत खरं तर दर्जाहीन = गुणवत्ता नसलेले लोक प्रॅक्टिस करण्याची कुवत क्षमता नसलेले लोक, शिक्षणाच्या क्षेत्रात घुसणे 

D.

आणि शास्त्र निष्ठा शास्त्र समर्पण यापेक्षा, मी आर्युववेदाची डिग्री "विकत घेताना" , "लावलेला पैसा" मला "वसूल" कसा करता येईल, अशा "व्यापारी , नफेखोर वृत्तीने" आर्युववेद क्षेत्रात, शास्त्रीय ट्रीटमेंट सोडून , बाकीच्या अनेक गोष्टींचे नॅरेटीव्ह आणि ट्रेंड यांनी सेट केले ती लोक 

E.

आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे सोशल मीडिया वरती घरगुती औषधे सांगून, आर्युववेदाचं सगळं मूल्य पायदळी तुडवणारे, आर्युववेदाचा कचरा करणारे लोक 

F. कुवत क्षमता योग्यता लायकी औकात नसलेल्या नवतरुण विद्यार्थ्यांच्या हातात, शास्त्रीय आर्युववेद, गरजेपेक्षा सोपा, युजर फ्रेंडली, रेडी टू यूज, स्पून फीडिंग करून, ज्या लोकप्रिय विद्यार्थीप्रिय वैद्यांनी, कसलाही भेदभाव न करता, कसलीही शहानिशा न करता, कसलेही ज्ञानदानाचे निकष न लावता, मुक्तहस्ताने सोपा सोपा आर्युववेद, समोर येईल त्याला, वाटून टाकला, तेही या परिस्थितीला कारणीभूत आहेत

👆🏼

हे सर्वजण आजच्या आर्युववेदाच्या प्रचंड पसाऱ्याचे जनक आहेत ... की ज्यांनी आर्युववेदाचा पसारा हा खूप वाढवला ... पण शास्त्र म्हणून त्याचा गळा दाबून त्याची ह*त्*या केलेली आहे


1

साधारण 90 च्या दशकापर्यंत महाराष्ट्रात आर्युववेदाची गव्हर्मेंट कॉलेज तीन आणि ग्रॅंटेड कॉलेज दहा-बारा अशी परिस्थिती होती 


2

पण 2005 पर्यंत प्रायव्हेट कॉलेजेस ची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली 


3

जोपर्यंत विद्यार्थ्यांना आर्युववेद मध्ये प्रवेश घेण्यासाठी सीट फार कमी होत्या , तोपर्यंत मेरिट असलेले विद्यार्थी त्यात येत असत किंवा काही कायदेशीर सोयींमुळे कमी मेरिट असलेले विद्यार्थी सुद्धा त्यात येत असत


4

पण मेरिट नसताना आणि कायद्याची सोय नसताना, फक्त "पैसे आहेत" म्हणून आर्युववेद प्रवेश घेता येईल अशी "व्यवस्था नव्हती"!


5

त्यामुळे जे काही विद्यार्थी येत होते ते दोन प्रकारचे होते की 


A. ज्या फारच अल्पसंख्य, नगण्य, थोड्या थोडक्या विद्यार्थ्यांना ... खरंच आर्युववेदशास्त्र हे, पॅशन आवड समर्पण देशनिष्ठा राष्ट्रनिष्ठा संस्कृती बद्दलचा अभिमान अस्मिता किंवा परंपरा, यापैकी कोणतेतरी कारणामुळे, शिकावयाचे असायचे ✅️ आणि ...


B. याव्यतिरिक्त, बहुसंख्य = 95% to 99% विद्यार्थी हे , "आर्युववेद या शास्त्रातलं" , "काहीही न समजल्यामुळे", मॉडर्न मेडिसिन ची जीपी करत असत 


6.

हे चित्र 2000 पर्यंत सार्वत्रिक होतं पण जसे जसे प्रायव्हेट कॉलेजची संख्या वाढत गेली आणि त्या कॉलेजची भरमसाठ म्हणजे गव्हर्मेंट आणि ग्रांटेड कॉलेजच्या तुलनेत , "कित्येक पट असलेली फी भरू शकणारे विद्यार्थी" , या कॉलेजेस मधून जसे जसे बाहेर पडू लागले ...

तशी तशी "मेरिट कमी असताना सुद्धा" आर्युववेद लर्न LEarn करण्यापेक्षा "अर्न Earn करू शकणारी म्हणजे पर्चेस purchase करू शकणारी विकत घेऊ शकणारी", अशी "खरेदी" करण्याची "वृत्ती आणि क्षमता आणि वारसा" असणारी लोकं, या क्षेत्रामध्ये "दाखल होऊ लागली"!


7.

जोपर्यंत पैसे नसलेले लोक, केवळ बुद्धीच्या जोरावर किंवा स्वतःच्या पॅशनच्या समर्पणाच्या निष्ठेच्या जोरावर या शास्त्रामध्ये काम करत होती, तोपर्यंत हे शास्त्र , शास्त्र समजून घेणे , शास्त्र प्रमाणे प्रॅक्टिस करणे ... एवढ्या पुरतंच "मर्यादित होतं !"


8.

परंतु जसजशी मेरिट नाही, पण "पैसा आहे", त्यामुळे या शास्त्रातली डिग्री "विकत घेणे" शक्य आहे , अशा "वृत्तीची" माणसं , अशा "क्षमतेची" माणसं या क्षेत्रात यायला लागली ...

तसं तसं शास्त्र निष्ठा संस्कार जीवनमूल्य "नीतिमत्ता हे बाजूला पडून" ...

"मालमत्ता" हाच ज्यांच्या आर्युववेद प्रवेशाचा मुख्य मार्ग होता, 

त्यांनी आर्युववेदाच्या प्रॅक्टिसच्या व्यावसायिक क्षेत्रात आल्यानंतर, "तीच गुंतवलेली ( invest केलेली ) मालमत्ता, कशी दाम दुपटीने किंवा अनेक पटीने वसूल करता येईल" यासाठी "मार्ग शोधले, मार्ग तयार केले, ट्रेंड सेट केले, तशा प्रकारचे narrative सेट केले" 


9.

आणि बघता बघता... हा हा म्हणता ... आर्युववेद हे "शास्त्रदृष्ट्या प्रॅक्टिस करण्याचं वैद्यकीय क्षेत्र न राहता", ते ... तुफान धंदेवाईक मार्केट बनलं!!

औषध खपवण्याचं ...

हॅपनिंग 

फील गुड 

स्पा 

रिसॉर्ट ट्रीटमेंट देणारं ...

तथाकथित महागडं राजेशाही केरळीय पंचकर्म करणारं

मसाज मालिश करणारं 

सुगंधी उटणं 

तथाकथित आर्युववेदिक मेकअपचे सामान 

अभ्यंग तेल 

शतावरी कल्प 

चवनप्राश 

गर्भसंस्कार 

सुवर्णप्राशन 

"Show धन" साठी केलेली पंचकर्म

शिरोधारा 

जिथे शरीराला छिद्रच नाही , त्या कटी जानू हृदय मन्या अशा ठिकाणी, बस्ती करणे

मुळात ॲक्युपंक्चर असलेलं विद्ध 

आर्युववेदिक निवासी गुरुखूळ 

पेड सेमिनार 

पेड वेबिनार 

पेड ऑनलाईन कोर्सेस 

आर्युववेद शास्त्राची ... नाडी परीक्षा रसशास्त्र मॉडर्न मेडिसिन योगा नॅचरोपॅथी असं कशाबरोबरही मोट बांधून, सरमिसळ करून, 

त्याचं आलेल्या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने,

 भरमसाठ बेसुमार ,

पण आकर्षक मार्केटिंग करून ,

मागच्या पिढीच्या तुलनेत, अतिशय वेगाने आणि कित्येक पटीने पैसा मिळवणे हे सुरू झालं ...


10.

आणि एकदा अशा गोष्टींचं पेव फुटलं आणि मूल्यांचा अधःपतन = नीतिमत्तेचा त्याग = ह*त्या हे झालं, की मग बाजार मार्केट धंदा दुकान दलदल कीचड चिखल हे पसरायला वेळ लागत नाही 


11.

आणि दुर्दैवाने अशा प्रकारच्या वृत्ती, ह्या शास्त्रनिष्ठ समर्पण ध्येयवाद पॅशन याच्यापेक्षा, फार प्रचंड गतीने पसरतात 


12

यामध्ये आर्युववेद आवश्यकतेपेक्षा जास्त सोपा सोपा करून सांगणारे, मागच्या पिढीतील वैद्यही याला काही प्रमाणात जबाबदार आहेत ... आपण काय कुवतीच्या, कुठल्या बुद्धिमत्तेच्या स्तरातील लोकांच्या हातात, "शास्त्र easily वापरणेबल" करून देतोय याचं भान त्यांना ज्ञानदान करताना राहिले नाही


13

आर्युववेद क्षेत्राच्या बाहेरील काही लोकांनी अतिशय चलाखीने वेगाने लोकप्रिय प्रसारमाध्यमांचा आधार घेऊन आर्युववेदाचे हॅपेनिंग ट्रीटमेंटचे आणि चकचकीत प्रॉडक्टचे मार्केट सेलिब्रिटींपासून ते थेट जनसामान्यांपर्यंत तळागाळापर्यंत पसरवले पोहोचवले यात तालाजीबांबे मार देव तपंजली धाबवमाग अशासारख्या उद्योगपतींचा = industrialists चा सिंहाचा वाटा आहे


14

"संस्कृत मध्ये असलेले, शास्त्र संहिता टीका हे न वाचता सुद्धा" पेशंट बरा करता येतो, पेशंट "बरा न करताही" अन्य "विविध मार्गाने" आर्युववेदात पैसा मिळवता येऊ शकतो ... असं दाखवून देणारे , ज्यांना संस्कृत शास्त्र श्लोक संहिता टीका आणि मूळचा वारसा यातलं आर्युववेदाच्या दृष्टीने काहीही जवळ नव्हतं ... अशा लोकांनी आर्युववेद सोपा, सेलेबल, मार्केटेबल, यूजर फ्रेंडली केला ... ज्यांना मूळ शास्त्रातलं ओ का ठो कळत नाही, 

अशा नव्या, तरुण, "पैसे भरून डिग्री विकत घेतलेल्या", विद्यार्थ्यांच्या, नववैद्यांच्या हातात, सोपा केलेला , रेडी टू युज पॅकेज , फॉर्म्युलेटेड आर्युववेद दिला 


15.

आणि हॉटेलचे मेनू कार्ड छापावं, त्याप्रमाणे लोकांनी बोर्ड वरती रोगांची नावं आणि दिल्या जाणाऱ्या तथाकथित पंचकर्म सुविधांची नावे छापली आणि "नोटा मिळवण्याचा" उद्योग सुरू केला 


16.

आणि मग , अनेकांनी हेच केल्यामुळे, "हाच आर्युववेद आहे" असा नव्याने तरुण झालेल्या समाजातील सर्वसामान्य लोकांचाही "समज झाला" 


17

त्यामुळे खरा आर्युववेद काय असतो?

आपल्याला जे विकले जाते, तो आर्युववेद आहे का

खरंच मूळ आर्युववेदात नाडी परीक्षा असते का

खरोखरच मूळ आर्युववेदामध्ये पारद गंधक सोनं चांदी हिरा मोती बचनाग कुचला अशा विषांचा धातूंचा खनिजांचा औषध म्हणून उपयोग केलेला आहे का?

खरंच, आर्युववेदामध्ये गर्भसंस्कार स्वर्णप्राशन मसाज मालिश शिरोधारा, 

जिथे शरीराला छिद्रच नाही , त्या कटी जानू हृदय मन्या अशा ठिकाणी, बस्ती करणे, 

जे स्पष्टपणे एक्यूपंक्चर आहे, त्याला विद्ध म्हणणे, 

केमिकल शिवाय जे बनूच शकत नाही 

आणि आर्युववेदाच्या ग्रंथांमध्ये ज्या शब्दांचा उल्लेख असू शकत नाही ,

अशी हर्बल मेकअपची साधने लिपस्टिक सोप शांपू कंडिशनर जेल मॉइश्चरायझर याची विक्री म्हणजे आर्युववेद नाही

हे समजणे इतपत, उमज कुवत बुद्धी माहिती ओपनिंग्ज , सोर्स हे जनसामान्यांना... एक्सेसिबल नाहीत, ज्ञात नाहीत, आवश्यक नाहीत 


18

ज्यांना मेरिटच नाही, त्यांना मूळ शास्त्रात काय लिहिलेला आहे, हे कळणं शक्य नाही आणि ते न कळताही आपण जे काही करतोय, त्यातनं पेशंट बरा होतो ... किंवा तो बरा झालाय , असं त्याला पटवून देता येतं ... किंवा बरा नाही झाला, तरी तोपर्यंत होणाऱ्या गर्दीमुळे , पुढचे तसेच "बळीचे बकरे" या "पैसे मिळवून देणाऱ्या चक्रामध्ये प्रवेश करत राहतात" 


19

आणि 140 कोटीचे जनतेमध्ये कुणालाही यातला कावेबाजपणा फोलपणा फसवणूक लूट लुबाडून दिशाभूल भ्रांती गोंधळ मिसगाइडिंग हे लक्षात येऊ शकत नाही, हे स्पष्ट झाले. 


20

त्यात 2015 पासून प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे हजारोंचे सबस्क्राईबर्स आणि लाखोंचे व्ह्यूज असलेल्या संधिसाधू दीडशहाण्या आर्युववेदिक डॉक्टरांनी "घरगुती उपाय" सांगण्याचा नवाच मूर्खपणा भंकसपणा बावळटपणा चालू केला 


21

किंवा दीड दोन लाख रुपये भरून, प्रायव्हेट टीव्ही चॅनेलवर, स्वतःच्या फुशारकीचा, विकत घेतलेला एपिसोड, रियल शो म्हणून लावायचा, असाही एक अभिनव उद्योग सुरू झाला ...


22

जगातला कुठलाच मॉडर्न मेडिसिनचा डॉक्टर, घरगुती औषधे, अशा प्रकारचा उपदेश, सार्वजनिक व्यासपीठावर किंवा प्रिंट मिडीया मध्ये किंवा सोशल मीडियामध्ये करत नाही, हे स्पष्ट दिसत असतानाही ...

आर्युववेदातली घरगुती औषध सांगून , आर्युववेदाचं अत्यंत अवमूल्यन करण्याचं काम, आर्युववेदाला चीप बनवण्याचे काम , आर्युववेदाला हलक्यात घेण्याचं काम , आर्युववेदाची रया घालवण्याचे काम जर कोणी केला असेल तर ते या घरगुती औषधे सांगणाऱ्या लोकप्रिय आचरट लोकांनी केलं!!!


23

 सर्वात वाईट भाग असा आहे की जी आर्युववेदातली मेरिट मधली मुलं होती, त्यांना ऑबवीअसली आणि पॅशनेटली प्रॅक्टिसचंच आकर्षण होतं ... त्यामुळे ही सगळी आर्युववेदातली त्या त्या बॅचची सगळ्यात हुशार, सगळ्यात बुद्धिमान, सगळ्यात सक्षम, अशी तरुण मंडळी, त्यांच्या त्यांच्या वेळी, प्रत्यक्ष व्यवहारात प्रॅक्टिस मध्ये आली ...


24

आणि त्यांच्या बॅचमध्ये ज्यांना शास्त्रातला ओ का ठो कळत नव्हतं, ज्यांची कुवत कॅपॅसिटी ही दुय्यम तिय्यम किंवा खरंतर निकम्मे, अशा प्रकारातली होती, अशी लोकं प्रॅक्टिस मध्ये येऊ शकली नाहीत... कारण त्यांच्यामध्ये ती हिम्मत धमक क्षमता कुवत औकात नव्हतीच 


25

त्यामुळे ही मेरिट नसलेली, प्रॅक्टिस करण्याची क्षमता नसलेली, लोकं ... अकॅडमी मध्ये आणि गव्हर्नमेंट मध्ये वरच्या पदांवरती जाऊन स्थिरावली!


27

ज्यांना मुळात शास्त्र मधलं मेरिट नाही, शास्त्राबद्दल कुठल्या प्रकारची निष्ठा समर्पण आपुलकी नाही ... अशी आर्युववेदातली काडीचीही अक्कल नसणारी माणसं, आर्युववेद बद्दल कुठल्या प्रकारचा जिव्हाळा नसलेली माणसं , ही एकतर अकॅडमी मध्ये शिक्षक प्रोफेसर रीडर लेक्चरर झाली किंवा गव्हर्मेंट मध्ये जिथे धोरण ठरते पॉलिसीमेकर्स ऑफिस बिययर अशा अर्थाने आर्युववेदाच्या क्षेत्रात शैक्षणिक/ व्यावसायिक आणि औषधीकरण या तीनही क्षेत्रांचे "भवितव्य ठरवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जागेवर" अशी माणसं बसली की ज्यांना शास्त्र विषयी आपुलकी नाही, शास्त्राबद्दलचं मूळ सखोल खरंखरं ज्ञान नाही, त्यामुळे शिकवणारे आणि शैक्षणिक व्यावसायिक धोरण ठरवणारे लोक, हे आर्युववेद न जाणणारे , आर्युववेदातले अजाणते किंवा आर्युववेदाची बुद्धी नसलेले असेच झाले


28

समाजामध्ये बहुसंख्येने गव्हर्मेंट किंवा ग्रांटेड कॉलेजच्या तुलनेत , मेरिट मधल्या मुलांच्या पेक्षा जास्त संख्येने बाहेर पडणारे , प्रायव्हेट कॉलेज यातले आर्युववेदाची डिग्री विकत घेऊ शकणारे, असे व्यापारी दृष्टिकोन असणारे , "पैसेवाले" लोक बाहेर पडले ... या सगळ्यांनी मिळून आर्युववेदाचा व्यवसायिक पसारा खूप चतुराईने वाढवला... 


29

आणि त्याला आळा घालता येईल, इतकी ताकत, जी मुळातली गव्हर्मेंट / ग्रांटेड कॉलेज मधली मेरिट मधली मुलं होती, बुद्धिमान मुलं होती, ज्यांना शास्त्र निष्ठा शास्त्र समर्पण शास्त्र विषयी आपुलकी जिव्हाळा घेणं शास्त्र बद्दल होतं...


 त्यांच्यामध्ये तेवढा संघटितपणा, तेवढी क्षमता, तेवढी दूरदृष्टी, तेवढा रीच ॲप्रोच तेवढी पोहोच तेवढा प्रभाव आणि मुख्य म्हणजे स्वतःची प्रॅक्टिस सेट करण्यासाठी त्यांचे तारुण्यातल्या गेलेल्या वेळानंतर त्यांच्याकडे तितकी उमेद आणि सामर्थ्य उरलं नाही ...


की हा जो सगळा अधःपतनाचा भाग चालू आहे, त्याला रोखता येईल, त्याच्यावर आक्षेप घेता येईल, हे चुकीचं चाललंय असं म्हणता येईल , अशी कुठल्याही प्रकारची परिस्थिती शिल्लक राहिली नाही 


त्यामुळे 

A.

मेरिट मधल्या शास्त्रनिष्ठ आणि शास्त्र समर्पित शास्त्रज्ञान असलेल्या लोकांचा शांतपणा मौन निष्क्रियता अप्रतिकार 

B.

गव्हर्मेंट मधील पॉलिसी मेकर्स ऑफिस बेअरर्स अशा अधिकाऱ्यांच्या ठिकाणी आर्युववेदाचं ज्ञान नसलेले, आर्युववेद बद्दल आपुलकी जवळीक निष्ठा नसलेले, संहिता श्लोक यातलं काही कळत नसलेले, लोक जाऊन बसणे 

C.

याच्यापेक्षा दुय्यम दर्जाचे किंवा करत खरं तर दर्जाहीन = गुणवत्ता नसलेले लोक प्रॅक्टिस करण्याची कुवत क्षमता नसलेले लोक, शिक्षणाच्या क्षेत्रात घुसणे 

D.

आणि शास्त्र निष्ठा शास्त्र समर्पण यापेक्षा, मी आर्युववेदाची डिग्री "विकत घेताना" , "लावलेला पैसा" मला "वसूल" कसा करता येईल अशा "व्यापारी , नफेखोर वृत्तीने" आर्युववेद क्षेत्रात, शास्त्रीय ट्रीटमेंट सोडून , बाकीच्या अनेक गोष्टींचे नॅरेटीव्ह आणि ट्रेंड यांनी सेट केले ती लोक 

E.

आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे सोशल मीडिया वरती घरगुती औषधे सांगून, आर्युववेदाचं सगळं मूल्य पायदळी तुडवणारे, आर्युववेदाचा कचरा करणारे लोक 

F. कुवत क्षमता योग्यता लायकी औकात नसलेल्या नवतरुण विद्यार्थ्यांच्या हातात, शास्त्रीय आर्युववेद, गरजेपेक्षा सोपा, युजर फ्रेंडली, रेडी टू यूज, स्पून फीडिंग करून, ज्या लोकप्रिय विद्यार्थीप्रिय वैद्यांनी, कसलाही भेदभाव न करता, कसलीही शहानिशा न करता, कसलेही ज्ञानदानाचे निकष न लावता, मुक्तहस्ताने सोपा सोपा आर्युववेद, समोर येईल त्याला, वाटून टाकला, तेही या परिस्थितीला कारणीभूत आहेत

👆🏼

हे सर्वजण आजच्या आर्युववेदाच्या प्रचंड पसाऱ्याचे जनक आहेत ... की ज्यांनी आर्युववेदाचा पसारा हा खूप वाढवला ... पण शास्त्र म्हणून त्याचा गळा दाबून त्याची ह*त्*या केलेली आहे


No comments:

Post a Comment