Tuesday, 3 December 2024

भाग 1 : पांढरे केस ... काळे केस !!! ... उपाय आणि शक्यता !!!

भाग 1 : पांढरे केस ... काळे केस !!! ... उपाय आणि शक्यता !!!




1.

बाहेरून "काहीही" लावलं, तरी एकदा पांढरे झालेले केस पुन्हा "कायमचे काळे" होत नाहीत / होऊ शकत नाही, हे सत्य 35 ते 45 या वयात असलेल्या, "अजूनही तरुणच *दिसू* इच्छिणाऱ्या" लोकांनी लवकरात लवकर स्वीकारावे!

2.

नव्याने येणारे केस, "काळे उगवून येत नाहीत". बाहेरून काहीतरी लावलं तर, आहेत ते, पांढरे केस तेवढ्यापुरते काळे "दिसतात".

3.

परंतु पुढच्या काही दिवसात वाढ होऊन येणारा, खालचा केस, हा "पुन्हा पांढराच येतो"! 

4.

त्यामुळे ...आवळा , लोखंडाचा कीस, माका, सहचर= कोरंटी, उसाचा रस, कोरफड, मेथी ... असं "काहीही" बाहेरून लावलं, तरी केस "फक्त बाहेरूनच व तात्पुरतेच" काळे होतात✅️ ... जसं मेंदी काळी मेंदी लावल्यामुळे होतात, तसेच!!!

5.

पण काही/थोड्याच दिवसांनी ते "काळे केलेले" केस वाढ होऊन पुढे येतात आणि डोक्याच्या त्वचेतून म्हणजे केसांच्या मुळातून "येणारा केस पुन्हा पांढराच येतो".

6.

त्यामुळे असल्या तात्पुरत्या, रंगरंगोटीच्या उपायांच्या मागे , आपला "वेळ पैसा एनर्जी रिसोर्सेस" बरबाद करणे थांबवावे !!!

7.

पहिली गोष्ट म्हणजे सध्याच्या ...

पोल्युशन , हायब्रीडायझेशन, स्ट्रेस , जागरण , चुकीचे खाणे , शांपू साबणाचा अतिवापर , चीज, बटर, बेकरी/पाव, चाट अशा *"मीठ जास्त असलेल्या पदार्थांचा वापर"* ... 

यामुळे वय वर्ष 30 पासून पुढे लगेचच, अनेकांचे केस पांढरे होऊ लागतात !! 

(याबाबत जवळच्या विश्वासार्ह वैद्याचे मार्गदर्शन घ्यावे की जो वैद्य आहे निश्चितपणे म्हणजेच जो आयुर्वेदाचीच शास्त्रीय प्रॅक्टिस करतो ... रसकल्पांची प्रॅक्टिस करत नाही म्हणजे औषधांमध्ये मेटल भस्म सोने चांदी पारा गंधक विष उपविष केमिकल स्टेरॉईड वापरत नाही आणि आयुर्वेदाच्या नावाखाली नाडी योगा असले भंपक अशास्त्रीय प्रकार अवलंबत नाही)

8.

आहारातील या चुका न सुधारल्यास, ते पुढे उभ्या आयुष्यात "कधीही नव्याने पुन्हा काळे उगवून येत नाहीत" ...

9.

त्यामुळे आपण जर आहारातल्या चुका शोधणार नसू आणि त्या सुधारणार नसू, तर वय कितीही तरुण असले तरी ...

एकदा पांढरे झालेले केस, मुळातून पुन्हा काळे येऊ शकत नाहीत!

10.

फार फार तर तुम्ही त्यांना "काळे करू" शकता बाहेरची रंगरंगोटी करून , इतकंच !!!

11.

दुसरं असं की पुरुषांच्या बाबतीत 35 40 नंतर आणि स्त्रियांच्या बाबतीत 40-45 नंतर किंवा मेनोपॉजच्या आसपास , निसर्गतः केस पांढरे होणे, हे निश्चितपणे होऊ शकते ...

ते वय आणि वयाचा = काळाचा प्रभाव, म्हणून "स्वीकारावे" !!! ✅️

*ते लपवण्याचे काहीही कारण नाही* ...

12.

आणि त्यासाठी केमिकल युक्त अत्यंत महागडे हेअर "डाय" वापरू नयेत ...;कारण हे "डाय Dye" तुम्हाला प्रत्यक्ष "डाय Die" म्हणजे मरणाकडे नेऊ शकतात.

13.

अनेक केमिकल युक्त महागड्या हेअर डाय मध्ये "कॅन्सर निर्माण करणारे रासायनिक घटक= केमिकल" असतात, विशेषतः स्त्रियांना, ब्रेस्ट कॅन्सर होण्याच्या मुख्य कारणांमध्ये, मेकअप मध्ये वापरले जाणारे अनेक प्रकारचे केमिकल आहेत, हे जगभर "सिद्ध आणि स्वीकृत" झालेले आहे !!!

त्यामुळे जीव हवा, जीवन हवे, आयुष्य हवे ... की ब्रेस्ट कॅन्सर हवा कॅन्सर हवा आणि रंगवलेले बाहेरून काळे केलेले केस हवेत, हे स्वतःच ठरवावे!!!

14.

वयानुसार काळानुसार होणारे नैसर्गिक बदल हे निश्चितपणे स्वीकारावेत ... त्यात लाजिरवाणे काहीही नसते!!! उलट 35 40 45 नंतरही आपले केस "काळेभोर" "दिसत" असतील ... तर आपण स्वतःला / समाजाला फसवत आहोत आणि आपले स्वतःचे एक ढोंगी सोंगी रंगीबेरंगी विदूषक जोकर असे रूप , जगासमोर ठेवतो आहोत, याची जाणीव असू द्यावी.

15.

आपण 35 ते 45 या प्रौढ वयात असू आणि आपले केस पांढरे व्हायला लागले असतील , तर आहारातील चुका शोधून , "सुधारण्याचा संयम आणि प्रयत्न" असू द्यावेत ... तात्पुरते सोपे शॉर्टकटचे, बाहेरून रंगरंगोटी करून केस काळे करण्याचे उपाय अजिबात करत बसू नये!!! 

16.

35 ते 45 या वयात लग्न होऊन प्रायः पाच ते दहा वर्षे होऊन गेलेली असतात. आपल्या जोडीदाराशी आपले संबंध कसे आहेत, हे आतापर्यंत निश्चित झालेले असतात. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये; केस काळे असले काय, पांढरे झाले काय, गळले काय, तुटले काय, टक्कल पडले काय, केस आखूड झाले काय ... या सगळ्यांनी प्रत्यक्षात काहीही फरक पडत नाही! त्यामुळे अशा बहिरंगी... आणि जीवनाच्या अस्तित्वाशी आणि आरोग्याशी कसलाही सुतराम संबंध नसलेल्या,  केसांच्या रंगांच्या /लांबींच्या /संख्येच्या /विरळतेच्या /असण्याच्या /नसण्याच्या ... मागे लागून अकारण स्वतःचा वेळ एनर्जी पैसा रिसोर्सेस बरबाद करू नये आणि ... अकारण स्वतःला मनस्तापही करून घेऊ नये हे बरे!!!

17.

रोज लघवीला झाली, संडासला झाली, नाकातून मेकुड निघून गेला, वाढलेले नख कापून टाकले किंवा तुटले ... म्हणून आपण दुःख करतो का ... छाती बडवून घेतो का ... कपाळ आपटून घेतो का ... नाही !!! तर मग त्याच पद्धतीचा, शरीरातून बाहेर पडणारा, एक टाकाऊ पदार्थ असलेला = डोक्यावरचे केस, या बाबीला अनावश्यक महत्त्व देण्याचे टाळावे. त्या "केसांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला", तर केस गळणे पांढरे होणे, या समस्या(?) समस्याच राहत नाहीत. 


आशा आहे सुज्ञास अधिक सांगणे न लगे !!!

18.

तरीही ...

एक साधा सोपा सरळ उपाय म्हणजे नाकात रोज रात्री झोपण्यापूर्वी लोणी विरघळवून केलेले लोणकढी साजूक तूप सोडावे ... (विकतचे आयते तूप नकोच नको).

19.

तूप सोडणे ज्यांना आवडत नाही, त्यांनी चांगल्या प्रतीचे, (शक्यतो घरातच तयार करता आले तर बरे ... असे) खोबरेल तेल सोडावे ...

20.

ह्या दोन्ही गोष्टी ज्यांना जमणार पटणार आवडणार नसतील, त्यांनी चांगल्या प्रतीचे दूध नाकात सोडावे!!!

21.

साजूक तूप, खोबरेल तेल, निर्भेळ दूध नाकात सोडण्याचे प्रमाण हे एक संपूर्ण ड्रॉपर भरून म्हणजे अर्धा मिलि = 0.5ml (पॉईंट फाईव्ह एम एल) म्हणजे प्रत्यक्षात मोजले तर 14 ते 15 थेंब इतके ...

दोन्हीकडच्या नाकपुड्यांमध्ये, रात्री झोपण्यापूर्वी सोडावेत ... !!!


(याबाबत जवळच्या विश्वासार्ह वैद्याचे मार्गदर्शन घ्यावे की जो वैद्य आहे निश्चितपणे म्हणजेच जो आयुर्वेदाचीच शास्त्रीय प्रॅक्टिस करतो ... रसकल्पांची प्रॅक्टिस करत नाही म्हणजे औषधांमध्ये मेटल भस्म सोने चांदी पारा गंधक विष उपविष केमिकल स्टेरॉईड वापरत नाही आणि आयुर्वेदाच्या नावाखाली नाडी योगा असले भंपक अशास्त्रीय प्रकार अवलंबत नाही)

22.

वरील तेल तूप दूध हे उपचार करून पहावेत ... 

तुमचे सुदैव असले, 

शरीराने प्रतिसाद चांगला दिला, 

आहारातल्या चुका सुधारल्या असतील ... 

आरोग्य संपन्न असा ऋतू असेल तर ... 

साधारणतः दीड महिन्यात = 45 दिवसांत आणि स्त्रियांच्या बाबतीत दोन ते चार मेन्सेस पर्यंत ,

नाकात तूप तेल दूध सोडण्याचा उपाय सातत्याने निरंतरपणे आळस न करता केल्यास ...

अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता असते ... अर्थात ही शक्यताच असते, निश्चिती नव्हे !!!


✍️🏼 डिस्क्लेमर/Disclaimer : उपरोक्त उपाय उपचार कल्प क्वाथ योग टॅब्लेट का परिणाम; उसमे सम्मिलित द्रव्यों की क्वालिटी, दी हुई मात्रा, कालावधी, औषधिकाल, ऋतु, पेशंट की अवस्था इत्यादि अनेक घटकों पर निर्भर करता है. 


✍️🏼 Copyright © वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. एम डी आयुर्वेद एम ए संस्कृत.


सर्वाधिकार सुरक्षित All rights reserved. 

म्हेत्रेआयुर्वेद. MhetreAyurveda


आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे & नाशिक 


मोबाईल नंबर 9422016871


 MhetreAyurveda@gmail.com


 www.MhetreAyurveda.com


 www.YouTube.com/MhetreAyurved/

5 comments:

  1. वास्तविकता खूप छान मांडली आहे सर.

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणे,हा लेख सुद्धा खाडकन डोळे उघडणारा. थोडा आशा देणारा पण सत्यता युक्त. मला तुमचे सर्व लेख ,videos आवडतात.धन्यवाद Sirji 🙏🏻

    ReplyDelete
  3. Very well said sir. 🙏 Thank you for giving knowledge to us and whole society.

    ReplyDelete
  4. आमलकी चा सातत्याने दीर्घकालीन सेवनाने वयाच्या 70व्या वर्षी बाबांचे मुळापासून काळे नवीन आलेले मी पाहिले आहे.

    ReplyDelete
  5. धन्यवाद sir खूपच छान वेगळा माहिती दिली आहे 🙏🙏 .
    माझी शंका अशी आहे की, ह्या चिकित्सा चे काही limitations, योग्य, अयोग्य आहेत का.? कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete