भाग 2 : केस गळणे केस पांढरे होणे; यासाठीचे निश्चित परिणामकारक लाभदायक संभाव्य उपाय
Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
सर्व अधिकार सुरक्षित म्हेत्रेआयुर्वेद
MhetreAyurveda 9422016871
www.MhetreAyurveda.com
www.YouTube.com/MhetreAyurved/
A.
केसांच्या समस्यांचं एक बाह्य कारण
👇🏼
केस गळणे केस पांढरे होणे हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो.
1.
केसांच्या या समस्यांचं एक बाह्य कारण म्हणजे ...
केस किंवा खरंतर डोकं हे "उघडं बोडकं" ठेवून सर्वत्र फिरणे , आपल्या देशात आपल्या संस्कृतीत किंवा तसं पाहिलं तर संपूर्ण जगभरात डोकं उघडं ठेवून केस झिंजा उघड्या मोकळ्या सोडून फिरणं हा प्रघात नाही!
2
पश्चिमात्य देशात सुद्धा विविध प्रकारच्या हॅट प्रचलित होत्या ...
3.
आणि अगदी स्वातंत्र्या पर्यंत आपल्या बहुतेक सर्व प्रसिद्ध लोकनेत्यांची ओळख, ही त्यांच्या शिरस्त्राण म्हणजे डोक्यावर घातलेल्या परिधानानुसार होत असे. लोकमान्य सावरकर नेहरू भगतसिंग राजगुरू या सर्वांच्या चित्र / छायाचित्र यामध्ये, आपल्याला परिचित असणारी डोक्यावरची परिधान दिसतात !
4.
मुळात आयुर्वेद शास्त्र सुद्धा "मौली" असा शब्द वापरते. मौली याचा अर्थ डोक्यावर काही ना काही परिधान घेतलेला!!!
5.
मागच्या पिढीतील बहुतेक सर्व पुरुष हे डोक्यावर, त्या त्या प्रदेशातील रूढीप्रमाणे, टोपी किंवा पटका फेटा कान टोपी असं घालत असत.
6.
शिवछत्रपतींचे मावळे हे त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या मुंडासे या शिरःपरिधानाच्या वरतून पुन्हा हनवटीच्या खाली गाठ मारलेला रुमाल किंवा वस्त्र बांधत असत, असा आपण काही चित्रांमध्ये किंवा काही चित्रपटांमध्ये पाहिलेले आहे ...
7.
आणि स्त्रिया तर मागील पिढी पर्यंत निश्चितपणे डोक्यावरून पदर घेत असतंच ... पंजाबात सुद्धा डोक्यावरून ओढणी चुनरी दुपट्टा लपेटून, तो मान खांदे छाती पाठ असा सगळीकडून "भरगच्च" घेतलेला असे.
8.
थोडक्यात जनसामान्य ते सेलेब्रिटी, असे सर्वच जण, डोकं उघडं ठेवून फिरत नसत !!!
9.
एक अपवाद, स्मशानामध्ये डोक्यावरची टोपी काढून जाणं , अशी रूढी होती ! त्यामुळे बोडके हिंडणं अर्थात डोक्यावर काहीही न घालता हिंडणं, हे असभ्यपणाचं लक्षण मागील पिढीपर्यंत मानले जाई!!
10.
तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण रयत शिक्षण संस्थेच्या, धायरी फाटा = वडगाव खुर्द येथील, नारायणराव सणस विद्यालय येथे, दहावी पास होईपर्यंत शिक्षणामध्ये, आम्ही प्रतिदिनी डोक्यावर टोपी घालूनच जात असू.
11.
आपल्या आईच्या आजीच्या पिढीपर्यंत बहुतेक सर्व स्त्रिया ह्या डोक्यावरून पदर घेत असत ... नंतर तो पदर हळूच खांद्यावर आला आणि मागील दहा वीस वर्षात साडी पदर या ऐवजी, पंजाबी ड्रेसच्या सोबत येणारी ओढणी चुनरी दुपट्टा हेही डोक्यावरून खांद्यावर आणि मग , खांद्यावरून चक्क गायबच झाले !!!
12.
आता तर जीन टॉप च्या जमान्यात, पदर चुनरी ओढणी पल्लू दुपट्टा हे कोणाला माहित देखील नाही. असो.
B.
केस गळणे केस पांढरे होणे; यासाठीचे निश्चित परिणामकारक लाभदायक संभाव्य उपाय
👇🏼
तर मूळ विषय असा की, आपल्याला आपल्या केसांचं आरोग्य दीर्घकाळपर्यंत जपायचं असेल, केसांना गळणं आणि पिकणं पांढरे होणं अशा प्रकारची समस्या येऊ द्यायची नसेल ... तर,
1.
आपण घराबाहेर असताना आणि शक्य झालं तर घरात सुद्धा आपल्या डोक्यावरून वस्त्र घेतलेलं असणं, हे हितकारक होईल !!!
2.
डोक्यावरून पदर घेणे, डोक्यावरून चुनरी ओढणी पल्लू दुपट्टा घेणे, हे स्त्रियांसाठी ... आणि पुरुषांनी टोपी कॅप हॅट आणि शक्य झालं तर पुन्हा एकदा फेटा फटका हे उपयोगात आणायला हवं!!!
3.
खरंतर मागील कित्येक पिढ्यांमध्ये, रस्त्यावर इतकी धूळ नसायची "आणि इतका धूरही नसायचा" , की ज्यासाठी डोके केस यांचे संरक्षण व्हावे, म्हणून त्यावर वस्त्र बांधण्याची आवश्यकता होती!!!
4
दुसरं असं की, त्या काळातील सर्व वाहनांची गती ही आजच्या वाहनांच्या तुलनेत "फारच कमी" होती, त्यामुळे जरी धूळ उडाली, तरी ती "जोरात येऊन" आपल्या शरीरावर डोक्यावर त्वचेवर केसांवर "आदळून चिकटत नव्हती".
5.
आज मात्र आपण 99.99% लोकं हे उघडे बोडके, डोक्यावर कसलेही वस्त्र धारण न करता ... सुसाट वेगाने, शहरी रहदारीतून ट्रॅफिक मधून , फिरत असतो ... आणि त्या वेळेला त्या गतीमध्ये, प्रचंड संख्येने असणाऱ्या वाहनांच्या येण्या जाण्यामुळे, रस्त्यावरनं "उडणारी धूळ आणि प्रत्येक वाहनाच्या सायलेन्सर मधून अतिशय सूक्ष्म कणांचे स्वरूपात बाहेर पडणारा धूर" हा "वेगाने" आपल्या त्वचेवरती कपड्यांवरती चेहऱ्यावरती केसां वरती येऊन, "आदळून चिकटतो". Collidal adherence
6.
मागील पिढीपर्यंत, तेल लावण्याची, वेणी घालण्याची पद्धत असल्यामुळे, ही येऊन पडणारी धूळ धूर, सहसा केसांना चिकटत नसे... पण आता मात्र तेल लावणं, हे चिपंचिपं बुरसटलेपणाचं काकूबाई असं ठरवलं गेल्यामुळे, केस कोरडे असतात ... त्यामुळे "रस्त्यावरून उडणारी धूळ आणि वाहनांचा धूर हे अतिशय वेगाने येऊन केसांवरती आदळतात आणि चिकटून राहतात"!
7.
केस झिंज्या मोकळे सोडून हिंडल्यामुळे, केसांचा उपलब्ध असलेला "सर्फेस एरिया surface area म्हणजे उघडा पृष्ठभाग" हा अधिक धूळ धूर यांना सहजपणे चिकटण्यास अजूनच सहाय्य करतो!
8.
डोकं धुणं , केस धुणं हा प्रकार स्त्रियांच्या बाबतीत रोज होऊ शकत नाही ... त्यामुळे या धुळीची धूलीकणांची धुरांच्या कणांची स्मोक पार्टिकलची केसांवरती नकळत पुटे coats layers चढत जातात ...
आणि केशभूमी म्हणजे जिथून केस उगवतो, त्या फॉलिकलचं बंद होणं असं संभवतं !
9.
आणि यामुळे तिथून उगवणारा/ वाढणारा केस हा हळूहळू दुर्बल होतो , कोरडा होतो, तुटतो , मुळापासून गळतो किंवा पांढरा होत जातो !!!
10.
केसांना त्यांच्या मुळाशी चांगले पोषण व रक्त संचारण सर्क्युलेशन मिळाले नाही, तर केसांचे गळणे तुटणे कोरडे होणे पातळ होणे पांढरे होणे अशा समस्या होतात.
11.
त्यामुळे सर्वांनी , कसोशीने , घरातून बाहेर पडताना, कोणते ना कोणते वस्त्र , आपल्या केसांवरती डोक्यावरती , धारण केलेले बांधलेले असणे , हिताचे आहे. असे केल्यास साधारणता 40 45 पर्यंत तरी केस हे निसर्गतः काळे आणि न गळता , लांब व घनदाट राहू शकतील
12.
सध्या अनेक शहरातील मुली तरुणी स्त्रिया या टू व्हीलरवर फिरताना , डोके कान चेहरा गळा असे सगळे झाकले जाईल, अशा पद्धतीने मोठा स्कार्फ रुमाल बांधतात , हे निश्चितच आरोग्याच्या दृष्टीने आणि केसांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयोगी आहे
C.
केसांच्या या समस्यांचं आहारातील कारण
👇🏼
केस पांढरे होणे, केस गळणे, केस तुटणे, केस कोरडे होणे, केस पातळ होणे ... यासाठी काही मुख्य आभ्यंतर म्हणजे आहार विषयक कारणे आहेत.
1.
त्यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे *मिठाचे प्रमाण आहारात अधिक असणे* ... अगदी प्रत्येक जण, ज्याला केसांच्या समस्या आहेत, तो मीठ जास्त खातो, असे नव्हे ... किंवा तो खारट खातो , असेही नव्हे किंवा तो प्रत्येक पदार्थात वरून मीठ घालून घेतो असेही नव्हे ...
पण मीठ ज्याच्यामध्ये अधिक आहे, असे पदार्थ त्याच्याकडून खाल्ले जातात!
त्यातील सगळ्यात नकळत खाल्ला जाणारा, मीठ जास्त असणारा पदार्थ म्हणजे *सर्व प्रकारचे बेकरी प्रॉडक्ट्स*, त्या खालोखाल
बटर, त्या खालोखाल
चीज ... त्यानंतर
सर्व नमकीन फरसाण चाट म्हणजे पाणीपुरी दाबेली वडापाव पावभाजी पिझ्झा बर्गर ...
थोडक्यात मैदा बेकरी पदार्थ पाव यापासून तयार होणारे अन्नपदार्थ ...
2.
मागील पिढीत खूप खाल्लं जाणार आवडीचं म्हणजे लोणचं
लोणचं जरी कैरी किंवा लिंबू यापासून बनत असलं , तरी ते चवीला आंबट असूनही , त्यात मीठ तेल आणि मोहरी यांचे प्रमाण खूप जास्त असतं ... कारण रिझर्वेटिव्ह किंवा लोणचं टिकण्यासाठी *मिठाचे प्रमाण त्यात अत्यधिक असणं आवश्यक असतं*.
3.
याच बरोबरीने वेफर्स किंवा त्याच प्रकारे तळलेले हवाबंद पॅक मध्ये मिळणारे विविध नावांचे पदार्थ
4.
त्याचबरोबर चायनीज की, ज्या पदार्थांमध्ये तयार करताना अजिनोमोटो नावाचं मीठ वापरले जाते.
5.
याचबरोबर रस्त्यावर विकले जाणारे भजी पाव असे तळलेले पदार्थ की ज्याचं पीठ भिजवताना त्यामध्ये सोडियम अधिक असलेले खाण्याचा/बेकिंग सोडा किंवा मार्केटमध्ये मिळणारी तथाकथित फसफसणारे ॲसिडिटी वरचे उपाय ( : यू नो you know) किंवा काही वेळेला चक्क कपडे धुण्याची पावडर डिटर्जंट मिसळलेली असते.
6.
दारू पिणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ला जाणारा चकणा , फरसाण हाही मीठ अत्यधिक असलेल्या पदार्थांचे उदाहरण आहे
7.
केस पांढरे होण्याचे, गळण्याचे, तुटण्याचं ... तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ... उष्णता पित्त अग्नी बिघडवणारी व रक्त दूषित करणारी कारणे ...
ज्याच्यामध्ये ...
उपास करणे
तिखट खाणे
अम्लपित्त ॲसिडिटी असणे किंवा होईल असे पदार्थ खाणे
खूप रात्री उशिरापर्यंत *जागरण* करणे
दोन-तीन कपापेक्षा जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणे
चिडचिड करणे
त्रागा आदळ आपट आत्मक्लेश करणे
अति संवेदनशील असणे ओव्हर रिऍक्ट होणे
सतत चिंता शोक भय नैराश्य फ्रस्ट्रेशन डिप्रेशन भीती दैन्य न्यूनगंड भयगंड फोबिया इन्फिनिटी कॉम्प्लेक्स यामध्ये असणे
👆🏼
या आता सांगितलेल्या सर्व कारणांनी शरीरामध्ये,
अग्नी पित्त उष्णता हिट वाढते ...
की जे केस गळणे केस तुटणे केस पातळ होणे केस पांढरे होणे याचे मुख्य कारण आहे !!!
8.
अजून एक ... अनेकांना माहित नसलेले, केसांच्या समस्यांचे मूळ कारण म्हणजे रोज किंवा वारंवार केसांना साबण लावणे किंवा शाम्पू करणे ... कारण साबण शाम्पू या "फेस होणाऱ्या" पदार्थांमध्ये "सोडियमचे प्रमाण म्हणजे खारटपणाचे प्रमाण जास्त असते"!
9.
जरी केमिस्ट्री मध्ये खारट पदार्थांच्या विरुद्ध आंबट पदार्थ खावेत, जेणेकरून त्यांचे टायट्रेशन होते,असे सांगितलेले असले ... तरीही आयुर्वेद शास्त्रानुसार लवण म्हणजे खारट या रसाचा म्हणजे चवीचा अँटॅगॉनिस्ट म्हणजे प्रतिगामी म्हणजे विरुद्ध किंवा उतारा हा , "आंबट चवीचे पदार्थ नसून" ... तो "तुरट रसाचे चवीचे पदार्थ" असा आहे.
10.
आंबट चवीच्या पदार्थांनीही ,
शरीरात अग्नि उष्णता पित्त रक्त यांची वाढ बिघाड दुष्टी होतच असते
आणि आंबट चवीच्या पदार्थांच्या विरोधी उतारा प्रतिगामी ॲन्टिगोनिस्ट हा कडू रस कडू चवीचे पदार्थ असतात .
12.
त्यामुळे ज्यांना केस पिकणे गळणे तुटणे कोरडे होणे पातळ होणे अशा समस्या आहेत ...
त्यांनी, आपल्या आहारात, आवर्जून उष्णतेच्या विरुद्ध = थंड गार शीत अशा गुणांच्या अन्नपदार्थांचे उपायांचे आणि तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे तुरट अशा चवीच्या पदार्थांचा समावेश करावा ...
13.
तुरट पदार्थ म्हणजे सुपारी कात
आणि कडू चवीचे पदार्थ म्हणजे सर्व लांब वेलवर्गीय फळभाज्या ... ज्याच्यामध्ये, पडवळ दोडका घोसाळे गिलके दुधी भोपळा गवार भेंडी कारलं वांगे अशा सर्व वेलवर्गीय फळभाज्या समाविष्ट होतात.
अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या ....
केस पांढरे होणे , केस गळणे , केस तुटणे , केस पातळ होणे ... या समस्यांची मूळ कारणं ही प्रामुख्याने ...
👇🏼
1.
डोके केस उघडे बोडके ठेवून, केसांना डोक्यावर झाकण्यासाठी कोणतेही वस्त्र पदर ओढणी दुपट्टा चुनरी टोपी कॅप हॅट फेटा फटका रुमाल स्कार्फ "न वापरणे"
2.
दुसरे मुख्य कारण ... खारट पदार्थ खाणं
3.
तिसरं मुख्य कारण = उष्णता अग्नी हीट पित्त वाढवणारी रक्त बिघडवणारी आहारातील करणे
4.
किंवा उष्णता अग्नी हीट पित्त वाढवणारी रक्त बिघडवणारी , वागणूक विहार लाईफस्टाईल असणं, जसे की जागरण उपास चिडचिड
4
आणि आंबट पदार्थ किंवा उष्णता वाढवणारे पदार्थ खाणं ... आंबट पदार्थांमध्ये सर्वांना अतिशय प्रिय असलेलं आणि कितीही सांगितलं तरी सोडावसं न वाटणारं म्हणजे दही , ताक, टोमॅटो, सॉस, लिंबू, लोणचं, पोहे इडली, डोसा उत्तप्पा ढोकळा असे साउथ इंडियन पदार्थ जे की आंबवलेल्या फर्मेंट केलेल्या पिठापासून बनवले जातात, संत्री मोसंबी असे स्पष्टपणे आंबट असणारे पदार्थ, अननस केळी सफरचंद की जे कापल्यानंतर काळे पडतात, सफरचंदाचे तर विनेगरच तयार केले जाते ... अशा सर्व आंबट पदार्थांचा ,
केस गळणे तुटणे पांढरे होणे पातळ होणे असा दुष्परिणाम होतो
केस गळणे केस पांढरे होणे; यासाठीचे निश्चित परिणामकारक लाभदायक संभाव्य उपाय
👇🏼
वरील पोस्टमध्ये सांगितलेल्या या सर्व कारणांच्या विरुद्ध काम करेल ,
असा सकारात्मक पॉझिटिव्ह होकारात्मक करण्याजोगे डू-एबल Do-able अशा अर्थाचे उपाय म्हणजे ...
1.
रोज रात्री झोपताना ,
दोन्ही नाकपुड्यांमध्ये ,
0.5ml = अर्धा मिलिलीटर म्हणजे साधारणतः 15 ते 16 थेंब , वॉटर बाथ मध्ये पातळ केलेले , घरात तयार केलेले , शुद्ध देशी लोणकढी "साजूक तूप" सोडणे ... विकतचे तूप वापरू नये.
साजूक तूप ऐवजी शुद्ध निर्भेळ "दूध सुद्धा उपयोगी असते".
2.
याच बरोबरीने, रात्री झोपताना, अशा प्रकारचे लोणकढी तूप एक चमचा & अर्धा कप गरम पाण्यात गरम दुधासोबत घेऊन झोपणे
3.
आणि याच लोणकढी तुपात बुडवलेला, सुपारी एवढ्या आकाराचा कापसाचा बोळा, नाका जवळच्या डोळ्यांच्या खोबणीत ठेवून झोपणे.
6.
केस हे निर्जीव अवयव आहेत.
त्यामुळे एकदा डोक्याच्या त्वचेतून फॉलिकल मधून केस वरती आला की, तो निर्जीव भाग आहे.
जसे वाढलेले नख, बोटाच्या पुढे आले की, आपण कापून टाकले तरी, वेदना होत नाहीत, रक्त येत नाही ... त्याच पद्धतीने ...
केस हा संपूर्णपणे निर्जीव अवयव आहे ...
केसाच्या आत मध्ये कुठल्याही प्रकारचे सर्क्युलेशन नसते !
त्यामुळे जाहिरातीत कितीही दाखवले की अमुक शाम्पू तमुक कंडिशनर अमुक तेल लावल्यामुळे केसांवर असा तसा परिणाम होतो , ही शास्त्रीय दृष्ट्या केलेली, शुद्ध फसवणूक आहे, खोटारडेपणा आहे दिशाभूल आहे त्यामुळे जे काही उपचार करायचे !!!
7.
ते केस जिथून उगवतो , त्या केसांच्या मुळाशी म्हणजे केशभूमीशी म्हणजे स्काल्प शी म्हणजे डोक्याच्या त्वचेची म्हणजे फॉलिकलशी करणे आवश्यक आहे!!!
8.
आणि कितीही म्हटलं तरी, बाह्य उपचारांचा लाभ होण्याच्या मर्यादा असतात ... शंभर थेंब तेल जरी केसांच्या मुळाशी घातले, तरी त्यातले फक्त दोन ते तीन थेंब, प्रत्यक्षात शरीरात ॲब्सॉर्ब होतात , शोषण होऊ शकतात !!!
त्यामुळे केसांना करण्याच्या "बाह्य उपचारांना अत्यंत मर्यादा आहेत".
9.
केसांना तुम्ही बहिरंग रंगरंगोटी करून तात्पुरते काळे तपकिरी अशा विविध छटांमध्ये रंगवू शकता ...
पण म्हणून जेवढा केस रंगवलेला आहे, त्याच्यानंतर पुढच्या दोन चार सहा दहा पंधरा दिवसात केशभूमीतून वरती येणारा केस, हा काळा असणार नाही ... तो पुन्हा तसाच पांढराच असतो!!!!
10.
म्हणून ज्यांना आपला केस मुळातून, पुन्हा काळा नैसर्गिक मजबूत घनदाट असा यावा , असे वाटत असेल , त्यांनी योग्य ते आभ्यंतर उपचार, हे ज्ञानी अनुभवी आयुर्वेदाचेच उपचार करणाऱ्या, (रसकल्प मेटल धातू पारा गंध केमिकल विषय उपविष असं न वापरणाऱ्या ) वैद्याकडून करून घ्यावेत ...
11.
आणि नुसते उपचार केले, बाह्य लेप, बाह्य तेल, नाकात तूप सोडले, डोळ्यात तूप ठेवणे, रात्री झोपताना तूप पिणे किंवा वैद्याने दिलेली औषधी गोळ्या टॅबलेट घेतल्या म्हणजे आपले केस पुन्हा कायमस्वरूपी काळे घनदाट मजबूत न तुटणारे होतील ... असे नव्हे तर ...
12.
त्या सोबतीने, आपण करत असलेल्या, आहारातील, आपल्या वागणुकीतील, चुका दुरुस्त करणे, सुधारणे ... "त्या चुका भविष्यात कायमस्वरूपी टाळणे" ... हे आवश्यक असते !!!
13.
अन्यथा केलेल्या उपचारांचा , अपेक्षित परिणाम लाभत नाही!!!
केस गळणे केस पांढरे होणे; या समस्यांचे एक महत्त्वाचे सामाजिक आणि वैयक्तिक कारण आणि त्यासाठीचे निश्चित परिणामकारक लाभदायक संभाव्य उपाय
👇🏼
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ...
आपले केस, हे किमान तारुण्यात, चाळीस-पंचेचाळीस पर्यंत, तरी ...
काळे घनदाट मजबूत लांब राहावेत
आणि ते पांढरे होऊ नयेत, गळू नयेत, तुटू नयेत, कोरडे होऊ नयेत, पातळ होऊ नयेत...
*यासाठी सर्व प्रकारची व्यसने निश्चितपणे कायमस्वरूपी बंद केलेली असावीत*!
1
तंबाखूचे सेवन कुठल्याही पद्धतीने करू नये ...
तंबाखू खाणे, चघळणे, गालात ठेवणे, तंबाखूची मिश्री लावणे, तपकीर ओढणे, तंबाखू असलेली टूथपेस्ट वापरणे, सिगरेट बिडी ओढणे, स्मोकिंग करणे किंवा तसे वारंवार करणाऱ्यांच्या निकट सहवासात असणे (passive smoking), गुटखा पान मसाला खाणे ... हे सर्व प्रकार कायमस्वरूपी निश्चितपणे तातडीने बंद करावे ह्या असल्या सवयी हळूहळू सुटत नाहीत त्या एक घाव दोन तुकडे अशा पद्धतीने त्या क्षणी सोडून द्याव्या लागतात त्यासाठी धुळे निर्धार आणि प्रचंड संयम लागतो
2.
आणि कोणत्याही प्रकारचे मद्य/दारु/अल्कोहोल सेवन करणे, हे निश्चितपणे केसांचे आरोग्य पूर्णतः बिघडवण्यासाठीचे फार मोठी कारण असते!!!
3.
म्हणून तंबाखू आणि मद्य यांचे व्यसन सोडणे, हेच केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते!!!
4.
तंबाखू आणि मद्य यांचे व्यसन चालू ठेवून ,
मला चांगल्या केसांचा लाभ होईल ,
ही अपेक्षा अजिबातच करू नये
5.
ज्यांना तंबाखू किंवा मद्य किंवा कुठल्याही प्रकारचे व्यसन सुरू ठेवून सुद्धा ,
आपले केस नीट राहतील किंवा एकूणच आपले आरोग्य नीट राहील, असे वाटते त्यांनी...
किंवा ज्यांना तंबाखू किंवा मद्य किंवा कुठल्याही प्रकारचे व्यसन सोडता येत नाही ...
त्यांनी प्रथमतः ती तंबाखू किंवा ते दारू ते मद्य, आपण सेवन करण्यापूर्वी आपण त्याचा आनंद घेण्यापूर्वी,
आपल्या पत्नीला आणि आपल्या घरातील लहान मुलांना आधी द्यावे ...
आणि त्यांनी ते घेतल्यानंतरच ,
आपण आपल्या इच्छेप्रमाणे तंबाखूचे दारूचे मनसोक्त सेवन/व्यसन करावे!!!
असे करता आले, तरच ते व्यसन कंटिन्यू करावे ...
अन्यथा त्या क्षणी सोडून द्यावे .
6.
आपल्या आरोग्य संपन्न शरीरामुळे आणि व्यसनमुक्त जीवना मुळेच ... आपल्यावर अवलंबून असलेल्या,
आपल्या जोडीदाराचे (=पत्नीचे / पतीचे) आणि
आपण या जगात जन्माला घातलेल्या, नव्या कोवळ्या निरागस अशा आपल्याच अपत्यांचे (= लहान मुलांचे) अस्तित्व , जीवन आणि कल्याण टिकून राहणार आहे, याची जाणीव एक क्षणभरही विसरू नये !!!
खुप अप्रतिम ,अभ्यासपूर्ण लेख आयुर्वेदाचार्य 🙏🏻 शतश: नमन. धन्यवाद.
ReplyDeleteEye opener !!!
ReplyDelete