व्यायाम कधी कुणी किती कशा पद्धतीने करावा & करू नये , याचे विधी निषेध ( = Do & Don't ) : संक्षिप्त नेमके आणि सुबोध ... Concise Precise & Easy to understand
✍️🏼
म्हेत्रेआयुर्वेद MhetreAyurveda
✍🏼 वैद्य हृषीकेश म्हेत्रे. एमडी आयुर्वेद, एम ए संस्कृत
आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे अँड नाशिक
Mobile Number 9422016871
व्यायामाचा चांगला परिणाम दिसण्यासाठी होण्यासाठी 6 ते 12 आठवडे नियमितपणे सातत्याने व्यायाम करणे आवश्यक असते ...
पण व्यायामाचा दुष्परिणाम मात्र तत्क्षणी होऊ शकतो आणि ते जीवावर बेतू शकते
लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदसः क्षयः।
विभक्तघनगात्रत्वं व्यायामादुपजायते॥
व्यायामाचे लाभ = चांगले परिणाम : शरीराला हलकेपणा/ चपळपणा, कार्यशक्ती = स्टॅमिना, पचनशक्ती यांचा लाभ होतो !!! अतिरिक्त मेदाचा क्षय (Fat Loss) होतो ... आणि सर्व शरीर पिळदार (सिक्स पॅक) श्री हनुमंता प्रमाणे असे होऊ शकते
अर्धशक्त्या निषेव्यस्तु बलिभिः स्निग्धभोजिभिः॥
व्यायाम हा अर्धशक्ती प्रमाणात करावा. आपण नाकाने घेत असलेला श्वास न पुरल्यामुळे, आपल्याला तोंडाने श्वास घेण्याची वेळ आली (आणि योग्य त्या ऋतूत कपाळ नाक आणि काख = axilla येथे घाम येऊ लागला) की व्यायाम थांबवावा ... आणि हा "अर्धशक्ती व्यायाम" सुद्धा त्यांनीच करावा की जे बलवान आहेत = ज्यांना व्यायाम सोसवतो आणि जे व्यायाम करण्याच्या काळात आहारामध्ये पुरेसे स्निग्ध पदार्थ घेत आहेत; जसे की दूध तूप लोणी पनीर ड्रायफ्रूट!
व्यायाम किती प्रमाणात करावा?
*शीतकाले वसन्ते च, मन्दमेव ततोऽन्यदा।*
आधी सांगितला त्याप्रमाणे आपल्या *अर्धशक्ती इतका* व्यायाम करावा; पण तोही केवळ हेमंत शिशिर आणि वसंत ऋतु म्हणजे नोव्हेंबर आरंभ ते एप्रिल संपेपर्यंतच!!! मे ते ऑक्टोबर अर्थात ग्रीष्म वर्षा शरद या ऋतूंमध्ये व्यायाम हा *अर्धशक्तीपेक्षाही कमी प्रमाणातच* करावा किंवा *न करावा* हे योग्य!!!
व्यायाम करण्यापूर्वी संपूर्ण शरीराला *अभ्यंग करावा* ! अभ्यंग म्हणजे फक्त संपूर्ण शरीराला तेल लावणे = *ऑइल पेंटिंग* ... अभ्यंग याचा अर्थ पाऊण तास मसाज मालिश करून घेणे, असा अजिबात होत नाही.
तं कृत्वाऽनुसुखं देहं मर्दयेच्च समन्ततः॥
व्यायाम झाल्यानंतर ... संपूर्ण शरीर दुसऱ्या कुणाकडून तरी पायांनी किंवा हाताने दाबून घ्यावे.
अभ्यंग ➡️व्यायाम➡️ मर्दन ✅
अभ्यंग ➡️मर्दन➡️ व्यायाम ❌
व्यायाम ➡️अभ्यंग ➡️मर्दन ❌
तृष्णा क्षयः प्रतमको रक्तपित्तं श्रमः क्लमः।
अतिव्यायामतः कासो ज्वरश्छर्दिश्च जायते॥
अर्धशक्ती पेक्षा अधिक व्यायाम केल्यास किंवा आधी सांगितलेले इतर नियम न पाळता व्यायाम केल्यास, तहान मांसक्षय बलक्षय अंधेरी येणे रक्त पडणे खूप थकवा येणे गळून जाणे कोरडा खोकला ताप उलटी; असे दुष्परिणाम संभवतात
व्यायामजागराध्वस्त्रीहास्यभाष्यादि साहसम्।
गजं सिंह इवाकर्षन् भजन्नति विनश्यति॥
साहस म्हणजे शक्तीचा सामर्थ्याचा अंदाज न घेता केलेले कर्म!!! व्यायाम , जागरण , चालणे / पळणे , स्त्री संभोग , हसणे , बोलणे ... ही *साहस कर्म* आहेत ... ती शक्तिनाश घडवू शकतात !!! जरी सिंह हा पराक्रमी सामर्थ्यशाली असला, तरी त्याने हत्तीला ओढून न्यायचे, असे ठरवले तर ... समर्थ पराक्रमी सिंह सुद्धा मरण पावू शकतो !!!
अतिरेकी व्यायामाप्रमाणेच ... अपरात्री दीड दोन वाजेपर्यंत जागरण करणे, कित्येक किलोमीटर कित्येक तास चालणे पळणे सायकलिंग करणे, मॅरेथॉन, ट्रेकिंग, गिर्यारोहण किल्ला चढणे,तरउड्या मारणे, आपल्या वयाला / ताकतीला झेपणार नाही, अशी वजने जिम मध्ये उचलणे, कपालभाती भस्रिका सूर्यभेदन असे नाभीला जर्क धक्के जोर देणारे प्राणायाम करणे, वारंवार स्त्री संभोग करणे, खूप मोठ्याने खूप वेळ हसणे (=हास्य क्लब) किंवा बोलणे भाषण देणे गायन करणे शिकवणे मीटिंगमध्ये असणे फोन ऑपरेटर रिसेप्शनिस्ट क्लासेस घेणे ... ही सर्व *साहस कर्म* आहेत. ही सर्व कामे सुद्धा *"अर्धशक्तीच्या आधीच"* थांबवावीत
देह-वाक्-चेतसाम् चेष्टाः प्राक श्रमात् विनिवर्तयेत्
सर्व प्रकारची शारीरिक वाचिक बौद्धिक कामे थकणे दमणे श्रम होणे यापूर्वीच थांबवावीत
#exercise #workout #gym #sixpack #running #jogging #pranayama #kapalabhati #कपालभाति #trekking #mountaineering #hasyaclub #laughter #coaching #receptionist #teaching #teacher #sex #walking #marathon #triathlon #cricket #badminton #tabletennis #football #saucer #soccer #volleyball #weightlifting #weighttraining #treadmill
www.YouTube.com/MhetreAyurved/
www.MhetreAyurveda.com
+91 94 220 16 871
MhetreAyurveda@gmail.com
www.Mixcloud.com/MhetreAyurved/
No comments:
Post a Comment