Tuesday, 3 June 2025

भोजन हसत खेळत गप्पा मारत ?? ... की भोजनातील एकाग्रता आणि गोडवा जपत?!

 भोजन हसत खेळत गप्पा मारत ?? ... की भोजनातील एकाग्रता आणि गोडवा जपत?!

*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 195*

5 जून 2025, गुरुवार  

*उपविभाग 137*


✍️🏼 ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871




भोजनविधीचा मूलाधार असलेल्या श्लोकातील नियमांपेक्षा काही विशेष बाबी श्रीमद् वाग्भटाचार्य यांनी अष्टांग हृदय या ग्रंथात सांगितल्या आहेत. 


त्या "विशेष बाबी" पुढील श्लोकांमध्ये बोल्ड टाईप मध्ये व निळ्या रंगात दाखवल्या आहेत


काले सात्म्यं *शुचि हितं* स्निग्धोष्णं लघु *तन्मनाः*॥

*षड्रसं मधुरप्रायं नातिद्रुतविलम्बितम्।* 

*स्नातः* क्षुद्वान् *विविक्तस्थो धौतपादकराननः॥* 

*तर्पयित्वा पितॄन् देवानतिथीन् बालकान् गुरून्।*

*प्रत्यवेक्ष्य तिरश्चोऽपि प्रतिपन्नपरिग्रहान्॥*

*समीक्ष्य सम्यगात्मानमनिन्दन्नब्रुवन्* द्रवम्। 

*इष्टमिष्टैः सहाश्नीयाच्छुचिभक्तजनाहृतम्॥*


*आणि विशेष म्हणजे या वाग्भटाचार्यांनी सांगितलेल्या विशेष बाबी, आजच्या काळात अतिशय आवश्यक, उपयोगी आणि निश्चितपणे आचरणीय अशा "काल सुसंगत" आहेत*


यातील *शुचि* याविषयी आपण मागील लेखामध्ये पाहिले , आज त्या पुढील काही मुद्दे पाहूया


*हितकारक* = सुखकारक नसलं तरी आरोग्यासाठी शरीरासाठी आयुष्यासाठी जे "उपयोगी = हितकारक" आहे, ते भोजन घेतलं गेलं पाहिजे ! 


म्हणजे एखादा चविष्ट पदार्थ हा सुखकारक वाटला, तरी तो हितकारक असेल असं नाही. जसे की पिझ्झा बर्गर सामोसा वडापाव 


आणि एखादा चवीला न आवडणारा पदार्थ हा निश्चितपणे आरोग्यासाठी हितकारक असू शकेल, जसे फळभाज्या मूग मसूर चवळी साजूक तूप


*तन्मना* = एकाग्रता. भोजनासाठीचे अन्नपदार्थ तयार करणाराचेही , ते अन्नपदार्थ तयार करण्यामध्ये, स्वयंपाक करण्यामध्ये, मन एकाग्र पाहिजे ...


आणि *प्रत्यक्ष तो अन्न ते पदार्थ "खाणाऱ्याचे" मनही खाताना त्या अन्नामध्ये त्या पदार्थांमध्ये एकाग्र असायला हवे*. 


गप्पा मारत, फोनवर बोलत, स्मार्टफोन वरती रील बघत, टीव्ही वरती सिरीयल बघत, वाद घालत, विविध विषयांवर चर्चा करत, हसत खेळत; अन्नपदार्थ खाणे भोजन करणे, हे अत्यंत चुकीचे आहे! खेळीमेळीच्या वातावरणात जेवावे, हा सामाजिक गैरसमज आहे!!


जेवताना , तोंडातून "खालच्या दिशेने" अन्न पोटाकडे जात असताना, "हसणे आणि बोलणे, या नाभीकडून कंठाकडे तोंडाकडे वरच्या दिशेने म्हणजेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रिया" पूर्णपणे वर्ज्य केल्या पाहिजेत. 


गुरुचरित्रामध्ये भोजन करताना, मौन सुटले, एखादा शब्द बोलला गेला, तर ताट तसेच सोडून उठावे, असा निर्देश आहे !!!


"तन्मना" याचं कारण असं की, ते अन्नपदार्थ तुमच्या ताटात येण्यासाठी, शेतकऱ्यापासून ते स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीपर्यंत, अनेकांनी त्यासाठी खूप कष्ट केलेले असतात... त्यामुळे तो अन्नपदार्थ केवळ अन्नपदार्थ असा नसून, तो प्रसाद ... खरंतर "महाप्रसाद" असतो!!! त्यामुळे शेतकऱ्यापासून, तर घरच्या स्वयंपाक करणाऱ्या = गृहिणी सून आई बहीण बायको मुलगी या सर्वांच्या कष्टाचा "सन्मान आदर", त्यांच्या प्रति "कृतज्ञता" ... या अर्थाने सुद्धा आपण खात असलेल्या अन्नपदार्थावरतीच आपले मन एकाग्र असणे, हे आवश्यक, हितकारक आणि नैतिक आहे.


*षड्रस मधुरप्राय* = नवरात्राच्या देवीच्या आरती मध्ये "षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजने" असा उल्लेख येतो.

याचा अर्थ रोज आपल्या जेवणामध्ये सहाही चवींचे अन्नपदार्थ असावेत. 

जरी आपल्याला शाळेमध्ये चौरस आहार प्रोटीन कार्बोहायड्रेट मिनरल व्हिटॅमिन फायबर असे शिकवलं असलं, तरी प्रत्यक्षात भारतीय संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये मधुर गोड, अम्ल आंबट, लवण खारट, तिक्त कडू, कटु तिखट, कषाय तुरट अशा सहाही चवींचे अन्नपदार्थ आपल्या भोजनात असावेत, असा आरोग्य शास्त्रदृष्ट्या निर्देश आहे.


त्यातही मधुर रसाचे पदार्थ, पृथ्वी जल प्रधान अर्थात ज्याला आज आपण कार्बोहायड्रेट म्हणतो, ते अधिक प्रमाणात असावेत! कारण आपलं शरीर हे पार्थिव आहे आणि त्यात 70% पर्यंत जल आहे!!! म्हणजे पृथ्वी जल यापासून बनणारा, मधुर रसाचा = गोड चवीचा अर्थात कार्बोहायड्रेट प्रधान आहार, हा आपले जीवन शरीर याची ऊर्जा शक्ती बल एनर्जी इंधन fuel यासाठी आवश्यक असतो. 


जरी हल्ली प्रोटीन / प्रथिने यावर भर देत देण्यात असला, तरी प्रथिने प्रोटीन हे शरीराचा बांधा जडणघडण फ्रेम वर्क घडवतात, हे सत्य आहे ... परंतु प्रत्यक्ष शरीर "चालणे = सर्व प्रकारच्या गती हालचाली ... हात पाय पचन संस्था हृदय या सर्वांच्याच", त्याचा रोजचा सर्व व्यापार व्यवहार सुरळीत राहणे , यासाठी जे इंधन लागते ... ते कार्बोहायड्रेट मधूनच येते !!!


त्यामुळे प्रोटीन प्रथिन यांचा कितीही गवगवा केला , तरी मधुर रसप्रधान कार्बोहायड्रेट पुरेशा प्रमाणात, किंबहुना प्रोटीन पेक्षा दुप्पट प्रमाणात कार्बोहायड्रेट खाणं , हे शरीराचं चलन वलन इंधन फ्युएल एनर्जी ऊर्जा शक्ती मसल , यासाठी निश्चितपणे आवश्यक असतेच!!! त्यामुळे फळे दूध पोळी भाकरी भात यांचा समावेश रोजच्या आहारात असायलाच हवा.


रोज जेवढी हालचाल करणार (= शारीरिक वैचारिक बौद्धिक भावनिक) त्यासाठी लागणारी एनर्जी ऊर्जा पुरेशी मिळेल , इतका पुरवठा (कार्बोहायड्रेटचा) आहारातून होण्यासाठी मुख्यतः मधुर रसाचा म्हणजे गोड चवीचा समावेश रोजच्या अन्नामध्ये असायला पाहिजे. मधुर गोड याचा अर्थ प्रत्यक्ष साखर गूळ असा नसून, पृथ्वी जल प्रधान बल ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट स्वरूपातील , गहू तांदूळ ज्वारी बाजरी दूध फळ बटाटा यांचा आवश्यक तेवढा, पचवता येईल एवढा, पुरेसा अंश रोजच्या आहारात असायला हवा!!


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।४६५।। 

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


नमस्कार 🙏🏼 आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


घरचे / हॉटेलचे अन्नपदार्थ आणि भोजनाचे शुचित्व व कृतज्ञता

घरचे / हॉटेलचे अन्नपदार्थ आणि भोजनाचे शुचित्व व कृतज्ञता

*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 194*

4 जून 2025, बुधवार 

*उपविभाग 136*



✍️🏼 ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871



काले सात्म्यं *शुचि हितं* स्निग्धोष्णं लघु *तन्मनाः*॥

*षड्रसं मधुरप्रायं नातिद्रुतविलम्बितम्।* 

*स्नातः* क्षुद्वान् *विविक्तस्थो धौतपादकराननः॥* 

*तर्पयित्वा पितॄन् देवानतिथीन् बालकान् गुरून्।*

*प्रत्यवेक्ष्य तिरश्चोऽपि प्रतिपन्नपरिग्रहान्॥*

*समीक्ष्य सम्यगात्मानमनिन्दन्नब्रुवन्* द्रवम्। 

*इष्टमिष्टैः सहाश्नीयाच्छुचिभक्तजनाहृतम्॥*


भोजनविधीचा मूलाधार असलेल्या श्लोकातील नियमांपेक्षा काही विशेष बाबी श्रीमद् वाग्भटाचार्य यांनी अष्टांग हृदय या ग्रंथात सांगितल्या आहेत. 


त्या वरील श्लोकांमध्ये बोल्ड टाईप मध्ये व निळ्या रंगात दाखवल्या आहेत


*आणि विशेष म्हणजे या वाग्भटाचार्यांनी सांगितलेल्या विशेष बाबी, आजच्या काळात अतिशय आवश्यक उपयोगी आणि निश्चितपणे आचरणीय अशा काल सुसंगत आहेत*


शुचि = बाह्यतः स्वच्छ आणि मूलतः त्या अन्नाचे घटक द्रव्य आणि कृती करतानाचे साहित्य, तसेच करणाऱ्याचे हात व शरीर हे तर स्वच्छ हवेच ... 


आणि मुख्य म्हणजे आचार विचार भावना बुद्धी हे सर्व शुचि स्वच्छ पवित्र मंगल उदात्त असं असायला हवं! 


हे असं बाह्य अभ्यंतर शारीरिक वैचारिक बौद्धिक भावनिक शुचित्व घरातील गृहिणी बाबत जी स्वयंपाक करून आपल्याला खायला घालते त्या आई पत्नी बहीण सून मुलगी वहिनी यांच्या बाबत शक्य असते,


परंतु अशा प्रकारचे बाह्य अभ्यंतर शारीरिक वैचारिक बौद्धिक भावनिक शुचित्व हे घराबाहेर हॉटेलमध्ये किंवा ऑनलाईन फूड मध्ये असणे कदापिही शक्य नाही!


म्हणून हॉटेलमध्ये खायला जाणे आणि ऑनलाईन फूड मागवणे, यापेक्षा जेव्हा घरच्या स्त्रीला शक्य नसेल तेव्हा किंवा खरंतर आठवड्यातून एकदा, घरच्या स्त्रीला स्वयंपाकातून सुट्टी देऊन, आपण स्वतः किमान वरण-भात मसालेभात एखादी भाजी हे तरी करणं निश्चितपणे शक्य आहे आणि थोडे प्रयत्न केले तर पोळी भाकरी हे ही फार अवघड नाही. पण त्यासाठी फक्त करण्याची तयारी / वृत्ती आणि मुख्य म्हणजे आपल्या घरच्या गृहिणीबद्दल प्रेम आदर आणि कृतज्ञता असणं आवश्यक आहे.


बाहेर हॉटेलमध्ये खायला जाणं किंवा ऑनलाईन फूड मागवणं ही श्रीमंती समृद्धी लक्झरी नसून, ते दरिद्रीपणाचे भणंगपणाचे भिकारडेपणाचे लक्षण आहे, असे संस्कार आपण आपल्या नव्या पिढीवरती लहान मुलांवरती करणं आवश्यक आहे. अन्यथा घरचा एखादा पदार्थ हॉटेल सारखा झालाय असं कौतुक करणं, ही मुळातच अभिरुची खालवल्याचं आणि संस्कारहीनतेचं लक्षण आहे. उलट हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथल्या पदार्थांची चव आईच्या गृहिणीच्या सुगरणीच्या हाताप्रमाणे आहे, अशी प्रशंसा होणं, हे हॉटेल साठी कॉम्प्लिमेंट आहे. 


घरच्या स्त्रीला गृहिणीला स्वयंपाक करणे, अगदीच अशक्य असताना... केवळ गैरसोयी मधली सोय, अगतिकपणा अपरिहार्य विकल्प , म्हणूनच हॉटेलमध्ये जाणे , हा शेवटचा पर्याय असला पाहिजे. 


दर वीकेंड ला घरात शिजवायचं नाही, म्हणून भिकाऱ्यांसारखे हॉटेलच्या दारात वेटिंग करत उभं राहायचं आणि कष्टाने कमावलेले पैसे , टुकार दर्जाहीन अन्ना साठी उधळायचे, हा निव्वळ मूर्खपणाच आहे!!!


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।४६५।। 

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

शास्त्रोक्त आयुर्वेदीय विधीनुसार भोजन केले असता, होणारे आरोग्यदायक लाभ

शास्त्रोक्त आयुर्वेदीय विधीनुसार भोजन केले असता, होणारे आरोग्यदायक लाभ

*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 193*

3 जून 2025, मंगळवार 

*उपविभाग 135*



✍️🏼 ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871


1.काले 2 सात्म्यं 3.लघु 4.स्निग्धम् 5.उष्णं 6.क्षिप्रं 7.द्रवोत्तरम् ।।

8.बुभुक्षितोऽन्नमश्नीयान् 9.मात्रावद् 10.विदितागमः ।


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


यामध्ये सांगितल्याप्रमाणे भोजन केले असता, काय लाभ होतात, हे पाहिले तर ... 


अर्थातच, याप्रमाणे भोजन नाही केले, तर काय हानी होईल, हेही त्यावरूनच सहज लक्षात येते!


1. काले प्रीणयते भुक्तं 

योग्य वेळी भोजन केले असता ते शरीराचे परिणाम करते म्हणजे क्षय झालेले बल भरून काढते एनर्जी टॉप अप करते


2. सात्म्यम् अन्नं न बाधते

सात्म्य म्हणजे सवयीचे परिचयाचे अन्न सहसा बाधत नाही


3. लघु शीघ्रं व्रजेत् पाकं

हलके अन्न लवकर पचते


4. & 5. स्निग्धोष्णं बलवह्निदम्

स्निग्ध अन्न शरीराला बल प्रदान करते तर 

उष्ण अन्न हे अग्नीची क्षमता वाढवते


6. क्षिप्रं भुक्तं समं पाकं याति

खूप उशीर न करता लवकर भोजन केले असता त्याचे पचन योग्य प्रकारे होते


7. अदोषं द्रवोत्तरम्

भोजनामध्ये द्रव पदार्थांचे पाण्याचे प्रमाण योग्य असेल तर अन्नपचन निर्दोष पणे होते


8. सुखं जीर्यति मात्रावद् धातुसाम्यं करोति च ।

क्षमतेपेक्षा चार खास कमी खाल्ले असता म्हणजेच अन्न सेवन भोजन योग्य प्रमाणात केले असता ते कुठलाही त्रास न होता सहजपणे पचते आणि शरीरातील सर्व शरीर घटक योग्य प्रकारे निर्माण होतात, मेटाबोलिकल इक्विलिब्रियम टिकून राहतो


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।। 

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

Friday, 30 May 2025

लाभदशक : शास्त्रोक्त विधियुक्त भोजनाचे आरोग्य विषयक चिरंतन लाभदशक

लाभदशक : शास्त्रोक्त विधियुक्त भोजनाचे आरोग्य विषयक चिरंतन लाभदशक 



*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 193*

31 मे 2025, शनिवार  

*उपविभाग 135*


✍️🏼 ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871


1.काले 2 सात्म्यं 3.लघु 4.स्निग्धम् 5.उष्णं 6.क्षिप्रं 7.द्रवोत्तरम् ।।

8.बुभुक्षितोऽन्नमश्नीयान् 9.मात्रावद् 10.विदितागमः ।


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


यामध्ये सांगितल्याप्रमाणे भोजन केले असता, काय लाभ होतात, हे पाहिले तर ... 


अर्थातच, याप्रमाणे भोजन नाही केले, तर काय हानी होईल, हेही त्यावरूनच सहज लक्षात येते!


1. काले प्रीणयते भुक्तं 

योग्य वेळी भोजन केले असता ते शरीराचे परिणाम करते म्हणजे क्षय झालेले बल भरून काढते एनर्जी टॉप अप करते


2. सात्म्यमन्नं न बाधते

सात्म्य म्हणजे सवयीचे परिचयाचे अन्न सहसा बाधत नाही


3. लघु शीघ्रं व्रजेत् पाकं

हलके अन्न लवकर पचते


4. & 5. स्निग्धोष्णं बलवह्निदम्

स्निग्ध अन्न शरीराला बल प्रदान करते तर 

उष्ण अन्न हे अग्नीची क्षमता वाढवते


6. क्षिप्रं भुक्तं समं पाकं याति

खूप उशीर न करता लवकर भोजन केले असता त्याचे पचन योग्य प्रकारे होते


7. अदोषं द्रवोत्तरम्

भोजनामध्ये द्रव पदार्थांचे पाण्याचे प्रमाण योग्य असेल तर अन्नपचन निर्दोष पणे होते


8. सुखं जीर्यति मात्रावद् धातुसाम्यं करोति च ।

क्षमतेपेक्षा चार खास कमी खाल्ले असता म्हणजेच अन्न सेवन भोजन योग्य प्रमाणात केले असता ते कुठलाही त्रास न होता सहजपणे पचते आणि शरीरातील सर्व शरीर घटक योग्य प्रकारे निर्माण होतात, मेटाबोलिकल इक्विलिब्रियम टिकून राहतो


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।४६५।। 

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

आरोग्यसंपन्न आनंदी आयुष्यासाठी भोजनाची दशसूत्री

आरोग्यसंपन्न आनंदी आयुष्यासाठी भोजनाची दशसूत्री

भोजनाची योग्य पद्धत विधि रीत कोणती? 

सर्वसामान्यतः , प्राथमिकतेने आणि प्राधान्याने , काय टाळावे आणि काय घ्यावे / खावे / प्यावे ??



*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 192*

30 मे 2025, शुक्रवार  

*उपविभाग 134*


✍️🏼 ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871


नमस्कार 🙏🏼💐


काले सात्म्यं लघु स्निग्धम् उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।

बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् मात्रावद् विदितागमः ॥


आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत होतो!


1.काले = योग्य वेळी. हे आपण मागील भागात सविस्तर पाहिले आहे


2. सात्म्यं = बालपणापासून नेहमीचे पिढ्यानुपिढ्या आपल्या प्रदेशात जे सवयीची आहे परिचयाचे आहे ते खावे उगीचच व्हरायटी फॅन्सी ट्राय या नावाखाली अपरिचित व सवयीचे नसलेले पदार्थ खाऊ नयेत जसे की मोमो बर्गर पिझ्झा पास्ता किंवा आपल्या प्रदेशापेक्षा खूप लांबचे दूरचे कॉन्टिनेन्टल पंजाबी दक्षिणात्य कोरियन असे पदार्थ टाळावेत


3. लघु = पचायला हलके सोपे अन्न खावे. पचायला जड अवघड असे अन्न खाऊ नये, जसे ... मांस मिठाई पनीर मैदा बेकरी वनस्पती तूप जमिनीखाली उगवणारे पदार्थ मशरूम अशा पदार्थांचे प्रमाण आणि वारंवारिता कॉन्टिटी आणि फ्रिक्वेन्सी ही कधीतरी केव्हातरी थोडेसे अशीच असावी किंवा खरंतर नसावीच


4. स्निग्धम् = तेलाचा तुपाचा पुरेसा अंश असलेले पुरेसे स्निग्ध पदार्थ खावेत.


तेलकट तुपकट खूप फॅटी असे पदार्थ खाऊ नयेत. 

चीज पनीर नियोनीज पीनट बटर बटर सॉस यांचा वापर करूच नये किंवा कधीतरी कमीत कमी थोड्याशाच प्रमाणात असावा, म्हणजेच गरजेपेक्षा अतिस्निग्ध पदार्थ टाळावेत


त्याचबरोबर अत्यंत कोरडे रूक्ष भरभरीत ड्राय असेही पदार्थ टाळावेत = अत्यंत रुक्ष असे सॅलड फायबर या नावाखाली वैरण कडबा चारा आंबवण पेंड असे गाईगुरे जनावरे खातात, तसे कच्चे न शिजलेले पदार्थ खाऊ नये. 


काहीतरी नवीन फॅड आले आहे म्हणून अत्यंत रुक्ष शुष्क भरभरीत कोरडे ड्राय अशा "मिलेट्स या धान्य प्रकारामागे" फार लागू नये.


5. उष्ण = शक्यतो ताजे... पॅन टू प्लेट = तव्यावरून गॅसवरून थेट ताटात, अशा पद्धतीने अन्नपदार्थ खावेत. शक्यतो पुन्हा गरम केलेले रि-हीटेड असे अन्नपदार्थ टाळावेत. गार झालेले, वेळ उलटून गेलेले, वातड झालेले, शिळे किंवा फ्रिज मधील अति थंड असे पदार्थ टाळावेत किंवा कमीत कमी वेळा कमीत कमी प्रमाणात कॉन्टिटी आणि फ्रिक्वेन्सी एस पॉसिबल लेस इतकेच खावेत


6. क्षिप्रं = भोजन शक्यतो लवकर करावे कमी वेळात अन्न खाऊन संपवावे म्हणजेच खूप वेळ रेंगाळत गप्पा मारत टाइमपास करत अन्न खाऊ नये. अन्यथा त्या अन्नाचे पचन मिश्रण घुसळण आणि अन्नमार्गातून पुढे जाणे प्रपोगेशन हे योग्य प्रकारे होत नाही जुन्या काळची माणसं, "पहिल्या घासाचा xxx होईपर्यंत खात बसू नये" असे म्हणायची. अर्थात वाघ मागे लागल्यासारखं कुत्र माग लागल्यासारखं खूप भरभर सुद्धा घेऊ नये सावकाश जेवावे याचा अर्थ दोन घासांमध्ये पुरेसा वेळ आणि पोटामध्ये पुरेशी जागा शिल्लक राहील असे जेवावे


7. द्रवोत्तरम् । = द्रव पदार्थांचे प्रमाण खूप कमीही नाही आणि खूप अधिकही नाही पण तरीही थोडेसे जास्तच म्हणजे घनपदार्थांच्या तुलनेत पुरेसे पाणी जेवताना प्यावे. 


*साधारण दर चार घासल्यानंतर एक घोट तरी पाणी प्यावे म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे आमाशयामध्ये योग्य पद्धतीने घुसळन मिश्रण पाचक रसांच्या सोबत अग्नी तत्वा सोबत व्यवस्थितपणे होते.* 


साधारणता आपल्या अमाशयाचे म्हणजे एका वेळचे जेवण करण्याच्या कपॅसिटीच्या क्षमतेच्या 50% अर्थात अंदाजे ½ प्रमाणात घनपदार्थ (solid भाजी भाकरी भात उसळ), ¼ = 25% द्रव पदार्थ (liquid = आमटी खीर कढी रस्सा आमरस पाणी) आणि 25% जागा अन्नाचे घुसळण होण्यासाठी रिकामी ठेवावी 


जेवण करताना अजिबातच पाणी न पिणे किंवा जेवण पूर्ण झाल्यानंतर पाऊण तासाने एक तासाने पाणी पिणे, या चुकीच्या सवयी आहेत आणि त्या शास्त्राचे अज्ञान आणि अपसमज यावर आधारलेले आहेत


8. बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् = निसर्गाच्या दृष्टीने सर्वात सोपा स्वाभाविक नैसर्गिक आरोग्यदायक नियम म्हणजे भूक लागली असेल तरच जेवण करावे. 


भूक लागलेली नसताना, केवळ वेळ झाली आहे म्हणून घड्याळाच्या वेळापत्रकाप्रमाणे जेवण करू नये.


भूक लागलेली असताना अन्नपदार्थ सोडून चहा पिणे पाणी पिणे किंवा वडापाव सामोसा असे जंक फूड खाणे टाळावे 


आणि भूक लागलेली नसताना काहीही खाऊच नये.


यात अजून एक सोपा नियम म्हणजे जेवणापूर्वी काहीही खाण्यापूर्वी = नाष्ट्यापूर्वी / लंच पूर्वी / डिनर पूर्वी; आपली जीभ आरशात पहावी. जर ती पांढरी अस्वच्छ कोटेड थर असलेली अशी दिसत असेल, तर एक कप कडकडीत गरम पाणी चहाइतके फुंकून फुंकून प्यावे आणि एक तासभर कुठलाही घनपदार्थ किंवा दुधासारखा द्रव पदार्थ घेऊ नये.

एक तासाने पुन्हा जीभ पहावी, ती जर स्वच्छ अनकोटेड लाल गुलाबी कुठलाही थर नसलेली अशी असेल, तर त्यावेळेला पुरेशा प्रमाणात जेवण घ्यावे


9. मात्रावद् = पुरेशा प्रमाणात जेवण घ्यावे. इच्छेच्या किंवा उपलब्धतेच्या नव्हे तर ... भुकेच्या, क्षमतेच्या, पोटात उपलब्ध असलेल्या जागेच्या तुलनेत, घास कमी प्रमाणात जेवण घ्यावे.


भोजनातील पदार्थ पचायला जड असतल तर नेहमीच्या क्षमतेच्या निम्म्याच प्रमाणात जेवण घ्यावे. 


तडस लागेल इतके जेवू नये. 


घशात बोट घातले तर बोटाला श्रीखंड लागेल इतकं चापून जेवू नये, अशी जुनी माणसं म्हणत असतात


10. विदितागमः ॥ = आगम म्हणजे शास्त्र! तर आरोग्य शास्त्राचे पुरेसे, किमान प्राथमिक तरी ज्ञान घेऊन, त्यानुसार आपला आहार घ्यावा. कुणीतरी काहीतरी सांगितलं ट्रेंड आहे फ्याड आहे नवीन आहे व्हाट्सअप युट्युब फेसबुक सोशल मीडियावर आलेला आहे म्हणून त्याप्रमाणे वागू नये त्याच्यामागे स्वतःची फरपट होऊ देऊ नये आपल्याला मिळालेल्या माहितीची पडताळणी योग्य अनुभवी ही ज्ञानी आरोग्य शास्त्राची माहिती असलेल्या पदवीधारक व प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्य डॉक्टर यांच्याकडून आपल्या प्रकृतीनुसार काय उचित आहे ते समजावून घेऊन त्यानुसार आपल्या आहारात योग्य त्या पदार्थांचं समावेश करावा आणि अयोग्य पदार्थांपासून संयमाने दूर राहावे ते पदार्थ टाळावेत त्याज्य मानावेत वर्ज्य करावेत. 


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।४६५।। 

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

Thursday, 29 May 2025

सेक्स स्त्री संग मैथुन याबाबत नियम : काय टाळावे, काय वर्ज्य / त्याज्य आहे? काय योग्य आहे?

अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग ५

26 12 2022



निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे ।

तव झालो प्रसंगी गुणातीत ॥

प्रसंग म्हणजे प्र खूप, संग जवळ समीप. प्रसंग म्हणजे एखाद्या गोष्टीच्या खूप जवळ येणे. 

पुण्यात शनिवार वाडा पाहायला आलोच आहे, तर तिथून अगदी जवळच (प्र संग खूप जवळ) लाल महाल , दगडू काय शेठ गणपती आहे त्याचेही दर्शन घेऊ या ...

प्रसंग म्हणजे स्मृतत्वे सति उपेक्षा अनर्हत्वम् ... आठवलं असता त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नव्हे


*अन्यथाकाम* म्हटलं तर, मग 'यथा' योग्य उचित काम म्हणजे काय असा प्रश्न येणारच. येथे थुंकू नये, असं का लिहावं लागतं, कारण तसा निषिद्ध व्यवहार/वागणूक होत असते इतरांकडून.


सेक्स स्त्री संग मैथुन याबाबत, पुढील नियम हे काय टाळावे, वर्ज्य / त्याज्य आहे, ते सांगतात, म्हणजेच काय योग्य आहे, ते आपोआपच कळेल.


जर स्त्रीसंग सेक्स मैथुन ही नैसर्गिक प्रेरणा असेल तर त्यावर सार्वजनिक व्यासपीठावर जाहीरपणे बोलण्याची काय अवश्यकता आहे? पशु पक्षी यांना शिकवावे लागते का? मागच्या पिढी पर्यंत यावर कुणी बोललं का असं मोठ्याने स्पष्टपणे?

बरोबर आहे. पण आहार मल मूत्र विसर्जन निद्रा चालणं पळणं याही नैसर्गिक प्रेरणा आहेत पण त्याच्यावर कितीतरी लिहिलं बोललं जातं! 


सेक्स मैथुन यातूनच गर्भ धारणा नवजीवन या बाबी होतात. गर्भ धारणा प्रसूती जन्म याही नैसर्गिक प्रेरणा घटना आहेत. गर्भ संस्कार चे कोर्स / पुस्तके सगळं उपलब्ध आहे. डोहाळजेवण हा कौतुक सोहळा किंवा अलीकडे बेबी बंप फोटोशूट करतात. मग या सगळ्याचा जो आरंभ आहे, त्या सेक्स मैथुन बद्दल शास्त्रीय आरोग्यकारक बोलणं , समजावून सांगणे, समजावून घेणे हे आवश्यक आहे.


ग्राम्यधर्मे त्यजेत् 


A.

नारीम् 

1.अनुत्तानां 

2.रजस्वलाम् 

3.अप्रियाम् 

4.अप्रियाचारां 

5.दुष्टसङ्कीर्णमेहनाम्

6.अतिस्थूलकृशां 

7.सूतां 

8.गर्भिणीम् 

9.अन्ययोषितम् 

10. वर्णिनीम् 

11. 11.अन्ययोनिं च ... 


B.

12.गुरुदेवनृपालयम् 

13.चैत्यश्मशानायतनचत्वाराम्बुचतुष्पथम् 

14.पर्वाणि 

15.अनङ्गं 

16.दिवसं 

17.शिरोहृदयताडनम् 

18.अत्याशितो

19. अधृतिः 

20. क्षुद्वान् 

21. दुःस्थिताङ्गः 

22. पिपासितः 

23. बालो 

24. वृद्धो

25. अन्यवेगार्त्तः

26. त्यजेद्रोगी च 

... मैथुनम् 


ग्राम्य धर्म म्हणजे स्त्रीसंग असे नको म्हणू या, कारण केवळ पुरुष हा स्त्रीच्यासंगतीत असतो, असे नसून ... स्त्री सुद्धा त्या पुरुषाच्या संगतीत असते, उभयतां परस्पर संग या स्थितीत असतात, म्हणून *मैथुन हा शब्द योग्य वाटतो*, सेक्स हा शब्द काहींना चीप cheap वाटण्याची शक्यता असते


कोणत्या प्रकारची स्त्री म्हणजे म्हणजे कोणत्या प्रकारचा स्त्री-देह म्हणजे कोणत्या प्रकारच्या शारीरिक स्थितीमध्ये स्त्रीसंग / मैथुन ही क्रिया करू नये हे *वर्णिनीम् अन्ययोनिं च* इथं पर्यंत सांगितलं आहे 

आणि त्या व्यतिरिक्त "*कोठे केव्हा कसे* हे मैथुन करू नये" हे निषेध नियम *गुरुदेवनृपालयम्* पासून पुढे सांगितले आहेत


होण्यासाठी पुढील शारीरिक स्थितीतली स्त्री वर्ज्य आहे 

1

*अनुत्ताना* : अन् उत्तान म्हणजे पोटावर झोपलेली, पालखी झोपलेली नसावी. याचाच अर्थ उत्तान म्हणजे पाठीवर झोपलेली, उताणी झोपलेली स्त्री ही शारीरिक स्थिती ही योग्य होय. म्हणूनच पॉर्न व्हिडिओ किंवा इंग्रजी चित्रपट किंवा काही वेब सिरीज यात दाखवल्या जाणार्‍या आचरट अवस्था या अयोग्य होत. Woman on Top हे शास्त्रीय/शारीरिक दृष्ट्या अयोग्य आहे. याविषयी अजून सविस्तर ॲनाटोमी शरीर रचना या दृष्टीने सांगता येईल पण आत्ता इतके पुरे. 


2

*रजस्वला* : प्रत्यक्ष रजस्राव मेंसेस पाळी ब्लीडिंग सुरू असताना मैथुन करू नये; कारण अशा रजस्राव सुरू असण्याच्या काळात, स्त्रीला रक्तस्राव होत असतो, त्यामुळे तिला विश्रांतीची गरज असते. साधी करंगळीला जखम झाली तरी, आपण त्या जखमेला करंगळीला खूप जपतो. येथे तर चार दिवस भळभळ रक्तस्राव होत असतो , त्यामुळे स्त्री ही, नाजूक अवयवाच्या ठिकाणी व्रणी म्हणजेच जखमी म्हणजे wounded असते, तर तिला त्यावेळी विश्रांती आवश्यक असते. म्हणूनच मागील पिढीपर्यंत शिवाशिव सोवळं शिवू नको पालथा तांब्या वगैरे रूढींनी तिला वेगळे ठेवले जात असे व तिच्यापर्यंत तिचे जेवणाचे ताट आयते पोहोचवले जात असे. या शिवाशिव सोवळे या निमित्ताने तिला महिन्यातील किमान तीन ते चार दिवस हक्काची विश्रांती लाभत होती. आताच्या स्त्रीमुक्ती बुद्धीप्रमाणे वादामध्ये तिचे ते हक्काचे तीन-चार दिवसही दर महिन्याचे काढून घेतले गेलेले आहेत. 12 ते 50 म्हणजे 38 वर्षे, 12 महिने , 4 दिवस म्हणजे 1824दिवस म्हणजे 5 वर्षे विश्रांती आता मिळत नाही, हीच 5 वर्षे मेनोपाॅज सिंड्रोम म्हणून स्त्री व तिच्या कुटुंबाला त्रास भोगावा लागतो. आजीच्या काळात पाळी कधी गेली हे कळत होते का? आजीच्या पिढीत दहा-बारा बाळंतपणे होत असत, तरी आजीची कंबर कधी खचली नाही. आताच्या पिढीत शून्य एक किंवा दोन बाळंतपणे होतात, पण तिसऱ्या चौथ्या महिन्यापासून स्त्री बेडरेस्टला असते आणि तिची कंबर खचते, सिझेरियन होते. या सगळ्याचा पाळीच्या काळात दरमहा चार दिवस मिळणाऱ्या विश्रांतीचा नक्कीच मोलाचा वाटा आहे. यावर समाजाने आणि स्त्रियांनी विचार करावा.


*स्त्री आणि पुरुष हे एकसमान नाहीतच आणि कधीच असू शकत नाहीत. दे आर नॉट इक्वल, दे आर कॉम्प्लिमेंटरी टू ईच आदर. ते परस्पर पूरक आहेत.*


थ्री पिनचा प्लग हा थ्री पिनच्या सॉकेटमध्ये बसू शकतो, पण थ्री पिनच्या प्लग मध्ये दुसरा थ्री पिनचा प्लग घालून इलेक्ट्रिसिटी चे वहन योग्य होऊ शकणार नाही. 


त्यामुळे *एकमेकांशी समान होण्यापेक्षा, एकमेकांना पूरक कॉम्प्लिमेंटरी होणं हे अधिक आवश्यक आहे*. समाजाच्या हितासाठी आणि निसर्गदत्त व्यवस्थेसाठी!!! *पाळीचे नियम असे का?* याविषयी एक सोपा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चैनल वर उपलब्ध आहे त्याची लिंक पुढीलप्रमाणे https://youtu.be/tgax3FQDt2w


3

*अप्रिय स्त्री आणि अप्रिय आचरण करणारी स्त्री*, याही मैथुन यासाठी वर्ज्य होत, कारण तिथे तेवढा भावोत्कट समर्पित असा प्रीती व्यवहार/प्रवाह/संगम असू शकत नाही. केवळ एक शारीरिक कृती असल्याने त्यात उभयतांना समाधान प्राप्त होऊ शकत नाही. जरी मैथुन ही क्रिया प्रजोत्पत्तीसाठी अपत्य लाभासाठी करणे योग्य आहे, तरीही ज्या अवयवांनी ही मैथुन क्रिया केली जाते, त्या अवयवांना शास्त्रामध्ये *उपस्थ* या नावाचं कर्मेंद्रिय म्हटलेलं आहे. आपण गणपतीची प्रतिष्ठापना करताना 11 इंद्रियांची नावे घेतो, त्यातील पहिली पाच ज्ञानेंद्रिय, पुढची पाच कर्मेंद्रिये आणि शेवटचं मन ... अशी ती 11 इंद्रिय होत. पाच कर्मेंद्रियांमध्ये हस्त पाय जिह्वा गुद आणि उपस्थ या पाचांचा समावेश होतो. पैकी उपस्थ म्हणजे जननेंद्रिय ज्याचे कर्म *आनंद* हे सांगितलेले आहे म्हणजे मैथुन क्रिया ही *आनंदासाठी होणे* आवश्यक आहे. त्यामुळे त्यामध्ये *अप्रिय अशा प्रकारची व्यक्ती किंवा अप्रिय अशा प्रकारचे आचरण करणारी व्यक्ती* ही "उभय बाजूंनी" वर्ज्य आहे. 


4

*दुष्ट संकीर्ण मेहना* : मेहन याचा अर्थ मूत्र करणारा अवयव त्याच अवयवाने किंवा त्या जवळील अवयवानेच मैथुन ही क्रिया होते तर हे मेहन म्हणजे मैथुन क्रियेचा अवयव, हा बिघडलेला असेल किंवा रोगग्रस्त असेल तर अशाही स्थितीत मैथुन वर्ज्य जाणावे. अनेकदा स्त्रियांना किंवा पुरुषांना काही संसर्गजन्य त्वचारोग किंवा काही जिवाणू विषाणू संसर्ग असू शकतात तर अशा वेळेला जोडीदारालाही ते होऊ नये, म्हणून मैथुन हे वर्ज्य जाणावे.


5

*अति स्थूल* या स्त्रीमध्ये अल्पेऽपि चेष्टिते श्वासन

म् म्हणजे अल्पशा शारीरिक कष्टांनीही दम लागणे अशी स्थिती होऊ शकते तर *अति कृश* स्त्रीला मैथुन ही क्रिया अबलत्वामुळे अशक्तपणामुळे सहनच होऊ शकत नाही.


6

*सूता* : सुता म्हणजे स्वतःची कन्या मुलगी. सूता याचा अर्थ सूतिका प्रसूती झालेली बाळंतीण, जिची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे. तर बाळाच्या जन्मापासून पुढे दीड महिना (45 दिवस) किमान किंवा तिची पुन्हा पाळी सुरू होईपर्यंत तिला सूता प्रसूता असे नाव आहे. तोपर्यंत तरी पुन्हा मैथुन करणे, हे लांबवावे टाळावे , कारण या काळात नवजात बालकाला वेळ देणे हे आवश्यक असते आणि मागील नऊ महिने गर्भाचे ओझे, गर्भाचे पोषण, प्रसूतीच्या काळात झालेल्या पराकोटीच्या वेदना, रक्तस्राव आणि तिथून पुढे प्रतिदिनी बाळाला स्तनपान करणे या सगळ्यांमध्ये त्या स्त्रीचा बलक्षय प्रतिदिनी होतच असतो. त्यातून तिला सावरण्यासाठी, रिकव्हर होण्यासाठी, पुन्हा मूळ सशक्त स्थितीला येण्यासाठी; विश्रांती व वेळ देणे आवश्यक असते. आताचा वेळ हा नवजात बालकासाठी आई म्हणून जास्त समर्पित होणे, नैसर्गिक स्वभाविक असते, म्हणून या काळात मैथुन हे टाळावे. 


7

*गर्भिणी* : गर्भिणी स्त्री ही आता नवीन जीवाला जन्म देणार असते, अशावेळी त्या आशयामध्ये अन्य प्रकारचा संसर्ग होऊ नये, म्हणून मैथुन टाळावे. तरीही एक महिना होईपर्यंत गर्भधारणा लक्षातच येत नाही आणि साधारणतः तीन महिन्यापर्यंत उदर वृद्धी दिसतच नाही आणि गर्भिणी किंवा होऊ घातलेली आई मदर टू बी बीइंग मदर या काळामध्ये नाजूक स्थितीत असते, म्हणून शक्यतो मैथुन ही क्रिया टाळणं हे प्रशस्त होय.


8

अन्य योषिता : अन्य दुसऱ्याची, योषिता स्त्री. परस्त्री हे मातेसमानच मानावी, हा आपला संस्कार आहे. मुळातच लग्न ही संस्था, समाजातील इतर स्त्रीवर दुसऱ्या पुरुषाचे अतिक्रमण होऊ नये, म्हणून सर्वांच्या साक्षीने केलेला समजूतीचा व्यवहार असतो. हे एकच नाते आपण निवडू शकतो आणि ते निवडताना समाजातील अनेकांच्या साक्षीने ते केले जाते. सर्वच पुरुष हे समर्थ नसतात तर दुर्बल पुरुषाची ही स्त्री सुरक्षित रहावी, त्याच्यासाठी राखीव राहावी, म्हणून अन्ययोषिता परस्त्री ही मैथुनासाठी वर्ज्य आहे किंवा परस्त्री ही मातेसमान असा सामाजिक संकेत आहे. 


9

वर्णिनी : काही कारणामुळे ब्रह्मचर्य स्वीकारून राहिलेल्या स्त्रीलाही मैथुनापासून वर्ज्य ठेवावे. जीवनात घडलेल्या काही प्रसंगांनी किंवा धार्मिक संस्कारामुळे किंवा काही व्रत धारणेमुळे आजन्म लग्न न करता राहणाऱ्या कितीतरी स्त्रिया, आज मी माझ्या वयाच्या पुढे मागे पाहत असतो. तर ज्या स्त्रियांनी असं अविवाहित राहणं किंवा ब्रह्मचर्य पालन करणे, हे मनापासून, समजून समजून स्वीकारलेलं आहे , त्या स्त्रिया मैथुनासाठी वर्ज्य आहेत.


10

अन्य योनी : ही ही सरळ सरळ विकृती आहे. अन्य योनी याचा अर्थ स्त्री वगळता अन्य प्राणी हे मैथुनासाठी उपयोगात आणणे. आपण अशा प्रकारच्या विकृत वार्ता वाचलेल्या असतात. गाय बकरी कुत्रा यांच्याशी मैथुन करणारे काही विकृत लोक समाजात असतात. हे सर्वत्र वर्ज्य आहे आणि कोणत्याही प्रकारे समर्थनीय नव्हेच नव्हे!


इथून पुढे काही सामाजिक संकेतानुसार काही स्थळे ही मैथुन क्रियेसाठी वर्ग सांगितलेली आहेत.


11

उदाहरणार्थ , गुरु आलय म्हणजे आपल्या गुरूंचे घर, देवालय म्हणजे मंदिर देऊळ, नृप म्हणजे आपल्या राजाचे घर किंवा आजच्या संदर्भानुसार शासक व्यक्तीचे, शासन करणाऱ्या व्यक्तीचे घर ... ह्या सर्व जागा या पवित्र मानण्याजोग्या किंवा त्यांचा आदर बाळगला पाहिजे , अशा आहेत तर अशा ठिकाणी शक्यतो मैथुन या क्रियेवरती निर्बंध संयम नियंत्रण असणे , हे सामाजिक संकेत म्हणून योग्य आहे.

चैत्य याचा अर्थ पवित्र वृक्ष किंवा बुद्धाचे स्थान असा घेतलेला आहे. स्मशान हे अप्रशस्त होय. आयतन म्हणजे कारागृह. चत्वर म्हणजेच चव्हाटा / तिकटी. चतुष्पथ म्हणजे चौक. अंबु याचा अर्थ नदी सरोवर तलाव तळं किंवा आजच्या काळात अगदी स्विमिंग टॅंक/पूल. ही सर्व ठिकाणे सार्वजनिक, अनेक लोक एकत्र येण्याची असल्यामुळे, तेथे एकांत मिळू शकत नाही, म्हणून अशा ठिकाणी मैथुन वर्ज्य सांगितले आहे.


12

पर्व : पर्व याचा अर्थ काही विशिष्ट मंगल शुभ दिवस जसे की साडेतीन मुहूर्त आषाढी महाशिवरात्र श्रावण गणपती नवरात्र 

किंवा 

पर्व याचा अर्थ दोन पक्ष एकत्र येतात ते दिवस म्हणजे अमावस्या पौर्णिमा , त्याच्या अलीकडची चतुर्दशी आणि त्याच्या पलीकडची प्रतिपदा, अष्टमी या तिथी पर्व या अर्थाने ओळखल्या जातात. अशा सर्व तिथींच्या वेळेला चंद्राची स्थिती बदलत असल्याने आणि चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे मनाचे चांचल्य अधिक होते आणि अशा वेळेला मैथुन ही क्रिया परस्पर समर्पण भावनेने होण्याची शक्यता नसते म्हणून पर्वकाळ टाळावा.


13

अनंग म्हणजे मैथुनासाठी दिलेला उपस्थ म्हणजे योनी हा अवयव वगळता, अन्य कुठल्याही शरीरछिद्रात, विशेषतः गुदमैथुन किंवा मुखमैथुन हे समाजात प्रचलित दिसतात. त्याला ॲनल सेक्स किंवा ओरल सेक्स असे म्हणतात. मुळात मैथुन या क्रियेचा उद्देश हा प्रजोत्पादन यापेक्षा, *आनंद* असल्याने अशा प्रकारचे विकल्प किंवा विकृती या समाजात दृढ मूल आहेत. पण हे फक्त आजच आहे असे नसून, अगदी चरक आणि सुश्रुत संहिता यातही मुखयोनी गुदयोनी नासायोनी या प्रकारची वर्णने आपल्याला सापडतात.

काही वेळा योनीगत मैथुन शक्य नसते, अशा वेळेला कडलिंग cudlling आलिंगन मिठी स्पर्शसुख यासाठी गुदयोनी किंवा मुखमैथुन हा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो. कंडोम या , पूर्वी उपलब्ध नसलेल्या, परंतु आता अगदीच सहज उपलब्ध असलेल्या, साधनांमुळे अशा प्रकारच्या विकृत अनैसर्गिक मैथुनाचे शारीरिक दुष्परिणाम होणार नाहीत व विकृत का होईना, पण त्या दांपत्याला हवा असणारा आनंद, त्यातून मिळू शकतो.


14

मैथुनासाठी रात्र हा योग्य काळ आहे कारण त्याला एकांत असतो व मैथुन क्रिये नन्तर झालेले श्रम परिहार होण्यासाठी विश्रांती मिळणे रात्री शक्य असते. म्हणून दिवसा मैथुन शक्यतो टाळावे


15

मैथुन क्रियेच्या वेळी अत्यंत उद्दीपित स्टिम्युलेट एक्साइट झाल्यामुळे मारहाण करणे नखांनी बोचकारणे चावणे अशा क्रिया टाळाव्यात.


16

खूप तुडुंब पोटाला तडस लागेपर्यंत ज्याने जेवण केलेले आहे असा अत्याशित किंवा ज्याला भूक लागलेली आहे असा क्षुधित यांनी मैथुन टाळावे.


17

अधृति म्हणजे ज्याला धीर नाही, तो मैथुन क्रियेमध्ये लवकरच स्खलित स्रवित होत असल्यामुळे जोडीदाराला समाधान लाभत नाही, म्हणून त्याने मैथुन टाळावे.


18

दुस्थितांग वाकड्या तिकड्या स्थितीमध्ये मैथुन करू नये. पिपासित म्हणजे तहान लागली असताना मैथुन करू नये कारण मैथुन क्रियेमध्ये एका मृदु अवयवाला अत्यंत स्थिर कठीण अशा स्थितीत परिवर्तित करण्यासाठी शरीराला त्या अवयवामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रक्त हे पुश push करायला लागते, त्यासाठी त्या काळापुरते हृदयाचे कार्य (बीपी) हे वाढते, म्हणून भूक लागलेली असताना, तहान लागलेली असताना, मुळातच बल हानी झालेली असताना, अशा प्रकारची पुन्हा शक्ती हानी करणारी क्रिया म्हणजे मैथुन हे करू नये.


19

बाल याचा अर्थ सोळा वर्षाच्या आधी, वृद्ध याचा अर्थ 60 ते 70 वर्षांच्या नंतर, मैथुन हे वर्ज्य जाणावे. अन्य वेग याचा अर्थ जसे तहानभूक त्याचप्रमाणे मूत्र मल याचे वेग विसर्जन करण्याची स्थिती call आलेली असताना मैथुन करू नये आणि रोगी म्हणज कुठलाही आजार असलेल्या स्थितीत, मुळातच बल हानी झालेली असते म्हणून मैथुनासारखा थकवणारा विधी (क्रिया) टाळावा


याच श्लोकांच्या बरोबरीने पुढील मुद्दे ही संक्षेपाने विचारात घेऊया ...

वाजीकरण अष्टांग आयुर्वेद , जसे अष्टांग योग हा आपल्याला माहिती असतो. तसेच आयुर्वेद हा सुद्धा अष्टांग आहे. त्यामध्ये काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य दंष्ट्रा जरा आणि वृष. वृष याचा अर्थ वाजीकरण. वाजीकरण याचा अर्थ मैथुन शक्ती वाढवण्यासाठीचे उपाय. मुळात वाजीकरणाची व्याख्या ही *वाजीकरणतन्त्रं नाम अल्पदुष्टक्षीणविशुष्करेतसाम् आप्यायनप्रसादोपचयजनननिमित्तं प्रहर्षजननार्थं च* अशी आलेली आहे म्हणजे प्रत्यक्षात अपत्य प्राप्तीसाठीचे जे बीज , त्या बीजाची स्थिती ही अधिकाधिक चांगली होण्यासाठीचे उपाय आणि त्याचबरोबरीने अपत्यप्राप्तीसाठी ही जी क्रिया त्या मैथुनाच्या क्रियेमध्ये सुद्धा सुलभता सुकरता आणि यशस्विता यावे, यासाठी उपाय ... असे एक स्वतंत्र अंग, ज्याला आपण स्पेशालिटी म्हणतो , तसे आयुर्वेदामध्ये पूर्वी होते.

योगरत्नाकर येथील अष्टविध मैथुन : स्मरणम् कीर्तनम् केली प्रेक्षण गुह्यभाषण संकल्प अध्यवसाय क्रियानिर्वृत्ती मैथुनम् 

पंचसायक अनंगरंग वात्स्यायन लिखित कामसूत्र खजुराहो येथील मंदिरात असलेल्या शिल्पाकृती : जेव्हा भारतात अतिशय राजकीय स्थैर्य हे प्रदीर्घ काळा करती होते, तेव्हा निर्माण झालेली आहेत. जेव्हा प्रदीर्घ काळ संघर्ष विरहित राजकीय स्थैर्य व शांतता समाजात असते, तेव्हा त्याचा संघर्षाचा पराक्रमाचा भाव हा हळूहळू लोप पावतो, मावळतो ... सगळं काही जेव्हा प्रचंड संपन्न स्थितीत उपलब्ध असतं , तेव्हा काहीतरी अपूर्ण आहे , म्हणून त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, त्यासाठी करावी लागणारी धडपड ही थांबते आणि मग कुठल्याच प्रकारची प्रेरणा स्टीम्युलेशन नसल्यामुळे, अहर्ष अनिच्छा ही सार्वत्रिक होते आणि म्हणून अशा वेळी शुक्र अहर्ष इरेक्टाईल डिस्फंक्षन नाॅन स्टिम्युलेशन अशा बाबी ह्या समाजात दिसू लागतात. कधीकाळी जेव्हा भारतीय राजे हे सम्राट होते, विश्वविजेते होते, तेव्हा येथील समाजात अशा प्रकारचा अहर्ष नॉनस्टीमिलेशन आले आणि म्हणून त्याकाळी कदाचित उद्दीपनासाठी या प्रकारचे साहित्य व शिल्प ही निर्माण झाली असावीत. आज याच प्रकारची प्रचंड संपन्नता ही अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया या समाजात प्रदीर्घकाळपर्यंत आहे होती. त्यामुळे आणि अगदी सहजपणे अल्पवस्त्रातील स्त्री देह दर्शन हे सुलभ झाल्यामुळे किंवा नित्याचे झाल्यामुळे त्याच्याकडे पाहून येऊ शकणारी शिरशिरी रोमांच हे नष्ट झाले आणि म्हणून तिथे व्हिडिओ पॉर्न या गोष्टी वाढीस लागल्या. त्याच प्रमाणे 4 क्लीब व 6 षंढ प्राचीन आयुर्वेद संहिता ग्रंथात वर्णन केलेले आहेत. सुशिक्षित समजूतदार आणि सुसंस्कृत समाजामध्ये जसे स्त्री विशिष्ट गायनॅकॉलॉजी माहिती असते तशीच पुरुष लैंगिक स्वास्थ्य व रोग विषयक अँड्रोलॉजी याबाबत शशांक सामक नवविवाहितांचे कामजीवन 40 नंतरचे कामजीवन या नावाने प्रदीर्घकाळ जाहीर कार्यक्रम प्रस्तुत केले. 


मैथुन क्रिया ही थंडीच्या काळात म्हणजे शिशिर व हेमंत ऋतू म्हणजे साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या काळात अगदी मनाप्रमाणे कितीही वेळा आठवड्यातून करणे आरोग्य शास्त्रास आयुर्वेदास मान्य आहे. परंतु त्यासोबत योग्य ते वाजीकरण औषध घ्यावे वैद्याला विचारून.


वसंत आणि शरद या काळात म्हणजे मार्च एप्रिल आणि सप्टेंबर ऑक्टोबर हिट शरीराचे बल हे मध्यम असते, त्यामुळे आठवड्यातून तीन वेळा (alternate) म्हणजे दिवसाआड मैथुन क्रिया करणे हे योग्य ठरते तर ... 


ग्रीष्म आणि वर्षा म्हणजे साधारणतः मे जून जुलै ऑगस्ट या काळात पंधरा दिवसातून एखादे वेळेस मैथुन क्रिया करावी 


या विषयाचा अजूनही विस्तार हा शक्य व आवश्यक आहे, परंतु आता पुरते एवढे पुरेसे आहे.


आपली पत्नी हीच आपली सखी , हीच आपली प्रिया आहे ... ही भावना मनात ठेवली तर मैथुन ही क्रिया निरंतर व चिरंतन आनंददायक असू शकते ... उभयतांसाठी !!!


WIFE चा long form हा Worries Invited For Ever असा न करता ... WIFE is LIFE असे जाणून, जर वागणूक ठेवली तर, संसार प्रपंच हा आनंददायक होईल. लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षातील, तू तू मै मै, द्वैत इथंपासून ... जसं जशी जशी वर्षे सरत जातील, जशी जशी पाच पाच दहा वर्षे पुढे जातील ... तसं तसं दो जिस्म मगर एक जान है हम असं साधता येतं आणि त्या क्रमाने झळो शारीरिक आकर्षण हे कमी होऊन जाते, मैथुन वारंवारता frequency घटते ...

आणि एक आश्वासक स्पर्श आणि न बोलताही मन समजून घेणे, हे दोन्ही व्यक्तींना एकमेकात विरघळवून अद्वैताकडे एकत्वाकडे घेऊन जाऊ शकतो


अवघाची संसार 

सुखाचा करीन 

आनंदे भरीन 

तिन्ही लोक


हे सर्व सद्वृत्त, हे तुमच्या आमच्या जीवनातल्या रोजच्या दैनंदिन व्यवहाराशी प्रॅक्टिकल बाबींशी निगडित आहे जोडलेले आहे , त्यामुळे यावर कितीही संवाद साधणं आणि कितीही विस्तार करणे हे शक्य आहे , म्हणूनच मागील दोन पोस्टमध्ये असे म्हटलेले होते ...

मनुष्य उतना कहता है 

जितना वो कह पाता है 

कहने को बहुत ज्यादा है 

अनकहा अधिक रह जाता है


उर्वरित सात पाप कर्मे (म्हणजे चार वाचिक आणि तीन मानसिक) याविषयी पुढील भागात ...


आपल्या संयम व सहकार्य आणि प्रतिसादाबद्दल निरंतर हार्दिक आभारी आहे 🙏🏼


आपल्या शंका सूचना प्रश्न अभिप्राय यांचे स्वागत आहे


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।


🙏🏼

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

www.MhetreAyurveda.com

www.YouTube.com/MhetreAyurved/

_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_

Sunday, 25 May 2025

भोजनाची योग्य वेळ कोणती? पहिले आणि दुसरे भोजन घेण्याची योग्य वेळ कोणती??

भोजनाची योग्य वेळ कोणती? पहिले आणि दुसरे भोजन घेण्याची योग्य वेळ कोणती?? 40 वयानंतर सायंकाळचे / रात्रीचे भोजन कसे असावे? 


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 191*

26 मे 2025, सोमवार  

*उपविभाग 133*


✍️🏼 ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871


नमस्कार 🙏🏼💐


काले सात्म्यं लघु स्निग्धम् उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।

बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् मात्रावद् विदितागमः ॥


आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत होतो!


आहार संभवं वस्तु ... रोगाश्च आहार संभवाः


वस्तु म्हणजे आरोग्य संपन्न शरीर, हे आहारातूनच निर्माण होते अर्थात योग्य आहारातून ! ... आणि रोग सुद्धा आहारातूनच निर्माण होतात अर्थात चुकीच्या आहारातून !!


योग्य आहाराचा उत्तम नियम पुढीलप्रमाणे


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


*काले* = 1. योग्य वेळी भोजन घेणे 2. अवेळी भोजन न घेणे


भोजनाची योग्य वेळ कोणती? 

1.

सर्वाधिक शास्त्रीय आणि नैसर्गिक उत्तर म्हणजे *"खरोखरीची" भूक लागेल तेव्हा* ...

घड्याळातील वेळेनुसार जेवणे, अन्न गार होईल म्हणून जेवणे, सगळेजण बसलेत म्हणून एकमेकांसोबत जेवणे, लंच टाईम झाला आहे म्हणून जेवण ... ही योग्य वेळ नसून ... "आता खाल्ले नाही, तर थकवा येईल, पोटात कलकल होईल, ती खरी भुकेची वेळ" ... खाण्याची इच्छा होणे म्हणजे भूक लागली, असे नाही. तरीही ...


2.

नैसर्गिक नियमानुसार मध्याह्न = सूर्य डोक्यावर आला असता = दुपारी 12 चे सुमारास जेवावे 


3.

याचा अर्थ सकाळी 10 ते दुपारी 2 हा पित्त दोषाचा म्हणजे पचनशक्ती चांगली असण्याचा काळ आहे.


या वेळात जेवणे हे चांगले त्यातही साडेदहा वाजता जेवले असता, दीड तासानंतर म्हणजे दुपारी बारा वाजता अर्थात पित्तदोषाचा सर्वोत्तम काळ असताना पचन उत्तम होते


4.

थंडीच्या दिवसात शक्यतो सकाळी दहा ते अकरा (10 ते 11) च्या सुमारास जेवावे. कारण या काळात भूक उत्तम स्ट्रॉंग असते


उन्हाळा पावसाळा ग्रीष्म वर्षा एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळात उशिरा म्हणजे दुपारी दीड दोन (130 ते 2) पर्यंत जेवावे कारण या काळात भूक खूप कमी असते 


वसंत शरद म्हणजे मार्च आणि ऑक्टोबर या काळात दुपारी सूर्य डोक्यावर असताना दुपारी बाराचे सुमारास जेवावे कारण या काळात भूक मध्यम असते 


5.

पहिल्या जेवणानंतर पुढे तीन तास काहीही खाऊ नये, कारण आधी घेतलेले अन्न अद्याप पचलेले नसते ... आणि सहा तासापेक्षा जास्त काळ शक्यतो उपाशी राहू नये कारण अधिक वेळ उपाशी राहिल्यास बलक्षय होऊन थकवा येतो 


6.

म्हणजेच दुसरे जेवण हे आदर्श रित्या सायंकाळी साडेचार पाच (4.30 ... 5) ते उशिरा उशिरा साडेसात आठ (730 ... 8) या वेळात करावे 


7.

रात्री आठ नंतर पुढे नऊ-साडेनऊ दहा-साडेदहा अकरा वाजता जेवणे, हे निश्चितपणे अन्नपचन व्यवस्थित न होणे आणि पोट पचन किंवा एकूणच सार्वदेहिक रोग होण्याचे कारण आहे


8.

सायंकाळचे किंवा रात्रीचे किंवा दुसरे जेवण, हे शक्यतो हलके म्हणजे पचायला हलके असावे (वजनाने हलके असा त्याचा अर्थ नाही) 


9.

म्हणून चाळीशी नंतर तरी, रात्रीच्या जेवणात, शक्यतो साळीच्या/ज्वारीच्या लाह्या (नुसत्या कोरड्या किंवा धने जिरे चटणी मीठ याची फोडणी देऊन) किंवा मुगाचे डाळीचे पिठाचे डोसे धिरडे किंवा शिजलेले हिरवे मूग किंवा अगदीच भूक भागत नसेल तर कमी तांदूळ आणि जास्त मुगाची डाळ या पद्धतीने केलेले मुगाची खिचडी; त्यासोबत चटणी मेतकूट पापड लोणचे इतकेच असावे!!!


10.

रात्रीचे जेवण हे पोळी भाजी वरण भात स्वीट डिश फळे दूध असे चारीठाव आणि पचायला जड अशा पद्धतीचे घेऊ नये


11.

रात्रीच्या जेवणानंतर माणूस पुढील सहा ते आठ तास झोपेमध्ये बेडवर काहीही हालचाल न करता पडू नसतो त्यामुळे चाळीशी नंतर रात्रीचे जेवण हे पोळी भाजी वरण भात असे चारी ठाव घेतले असता, त्यातून मिळणारी ऊर्जा शुगर याचा त्या वयात शरीराकडून वापर होत नसल्यामुळे, हळूहळू ते शरीरात साठत राहून स्थाव्य कोलेस्टेटॉल बीपी शुगर डायबिटीस ऍसिडिटी थायरॉईड असे आजार होऊ शकतात.


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।४६५।। 

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/