Tuesday, 3 June 2025

भोजन हसत खेळत गप्पा मारत ?? ... की भोजनातील एकाग्रता आणि गोडवा जपत?!

 भोजन हसत खेळत गप्पा मारत ?? ... की भोजनातील एकाग्रता आणि गोडवा जपत?!

*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 195*

5 जून 2025, गुरुवार  

*उपविभाग 137*


✍️🏼 ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871




भोजनविधीचा मूलाधार असलेल्या श्लोकातील नियमांपेक्षा काही विशेष बाबी श्रीमद् वाग्भटाचार्य यांनी अष्टांग हृदय या ग्रंथात सांगितल्या आहेत. 


त्या "विशेष बाबी" पुढील श्लोकांमध्ये बोल्ड टाईप मध्ये व निळ्या रंगात दाखवल्या आहेत


काले सात्म्यं *शुचि हितं* स्निग्धोष्णं लघु *तन्मनाः*॥

*षड्रसं मधुरप्रायं नातिद्रुतविलम्बितम्।* 

*स्नातः* क्षुद्वान् *विविक्तस्थो धौतपादकराननः॥* 

*तर्पयित्वा पितॄन् देवानतिथीन् बालकान् गुरून्।*

*प्रत्यवेक्ष्य तिरश्चोऽपि प्रतिपन्नपरिग्रहान्॥*

*समीक्ष्य सम्यगात्मानमनिन्दन्नब्रुवन्* द्रवम्। 

*इष्टमिष्टैः सहाश्नीयाच्छुचिभक्तजनाहृतम्॥*


*आणि विशेष म्हणजे या वाग्भटाचार्यांनी सांगितलेल्या विशेष बाबी, आजच्या काळात अतिशय आवश्यक, उपयोगी आणि निश्चितपणे आचरणीय अशा "काल सुसंगत" आहेत*


यातील *शुचि* याविषयी आपण मागील लेखामध्ये पाहिले , आज त्या पुढील काही मुद्दे पाहूया


*हितकारक* = सुखकारक नसलं तरी आरोग्यासाठी शरीरासाठी आयुष्यासाठी जे "उपयोगी = हितकारक" आहे, ते भोजन घेतलं गेलं पाहिजे ! 


म्हणजे एखादा चविष्ट पदार्थ हा सुखकारक वाटला, तरी तो हितकारक असेल असं नाही. जसे की पिझ्झा बर्गर सामोसा वडापाव 


आणि एखादा चवीला न आवडणारा पदार्थ हा निश्चितपणे आरोग्यासाठी हितकारक असू शकेल, जसे फळभाज्या मूग मसूर चवळी साजूक तूप


*तन्मना* = एकाग्रता. भोजनासाठीचे अन्नपदार्थ तयार करणाराचेही , ते अन्नपदार्थ तयार करण्यामध्ये, स्वयंपाक करण्यामध्ये, मन एकाग्र पाहिजे ...


आणि *प्रत्यक्ष तो अन्न ते पदार्थ "खाणाऱ्याचे" मनही खाताना त्या अन्नामध्ये त्या पदार्थांमध्ये एकाग्र असायला हवे*. 


गप्पा मारत, फोनवर बोलत, स्मार्टफोन वरती रील बघत, टीव्ही वरती सिरीयल बघत, वाद घालत, विविध विषयांवर चर्चा करत, हसत खेळत; अन्नपदार्थ खाणे भोजन करणे, हे अत्यंत चुकीचे आहे! खेळीमेळीच्या वातावरणात जेवावे, हा सामाजिक गैरसमज आहे!!


जेवताना , तोंडातून "खालच्या दिशेने" अन्न पोटाकडे जात असताना, "हसणे आणि बोलणे, या नाभीकडून कंठाकडे तोंडाकडे वरच्या दिशेने म्हणजेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रिया" पूर्णपणे वर्ज्य केल्या पाहिजेत. 


गुरुचरित्रामध्ये भोजन करताना, मौन सुटले, एखादा शब्द बोलला गेला, तर ताट तसेच सोडून उठावे, असा निर्देश आहे !!!


"तन्मना" याचं कारण असं की, ते अन्नपदार्थ तुमच्या ताटात येण्यासाठी, शेतकऱ्यापासून ते स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीपर्यंत, अनेकांनी त्यासाठी खूप कष्ट केलेले असतात... त्यामुळे तो अन्नपदार्थ केवळ अन्नपदार्थ असा नसून, तो प्रसाद ... खरंतर "महाप्रसाद" असतो!!! त्यामुळे शेतकऱ्यापासून, तर घरच्या स्वयंपाक करणाऱ्या = गृहिणी सून आई बहीण बायको मुलगी या सर्वांच्या कष्टाचा "सन्मान आदर", त्यांच्या प्रति "कृतज्ञता" ... या अर्थाने सुद्धा आपण खात असलेल्या अन्नपदार्थावरतीच आपले मन एकाग्र असणे, हे आवश्यक, हितकारक आणि नैतिक आहे.


*षड्रस मधुरप्राय* = नवरात्राच्या देवीच्या आरती मध्ये "षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजने" असा उल्लेख येतो.

याचा अर्थ रोज आपल्या जेवणामध्ये सहाही चवींचे अन्नपदार्थ असावेत. 

जरी आपल्याला शाळेमध्ये चौरस आहार प्रोटीन कार्बोहायड्रेट मिनरल व्हिटॅमिन फायबर असे शिकवलं असलं, तरी प्रत्यक्षात भारतीय संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये मधुर गोड, अम्ल आंबट, लवण खारट, तिक्त कडू, कटु तिखट, कषाय तुरट अशा सहाही चवींचे अन्नपदार्थ आपल्या भोजनात असावेत, असा आरोग्य शास्त्रदृष्ट्या निर्देश आहे.


त्यातही मधुर रसाचे पदार्थ, पृथ्वी जल प्रधान अर्थात ज्याला आज आपण कार्बोहायड्रेट म्हणतो, ते अधिक प्रमाणात असावेत! कारण आपलं शरीर हे पार्थिव आहे आणि त्यात 70% पर्यंत जल आहे!!! म्हणजे पृथ्वी जल यापासून बनणारा, मधुर रसाचा = गोड चवीचा अर्थात कार्बोहायड्रेट प्रधान आहार, हा आपले जीवन शरीर याची ऊर्जा शक्ती बल एनर्जी इंधन fuel यासाठी आवश्यक असतो. 


जरी हल्ली प्रोटीन / प्रथिने यावर भर देत देण्यात असला, तरी प्रथिने प्रोटीन हे शरीराचा बांधा जडणघडण फ्रेम वर्क घडवतात, हे सत्य आहे ... परंतु प्रत्यक्ष शरीर "चालणे = सर्व प्रकारच्या गती हालचाली ... हात पाय पचन संस्था हृदय या सर्वांच्याच", त्याचा रोजचा सर्व व्यापार व्यवहार सुरळीत राहणे , यासाठी जे इंधन लागते ... ते कार्बोहायड्रेट मधूनच येते !!!


त्यामुळे प्रोटीन प्रथिन यांचा कितीही गवगवा केला , तरी मधुर रसप्रधान कार्बोहायड्रेट पुरेशा प्रमाणात, किंबहुना प्रोटीन पेक्षा दुप्पट प्रमाणात कार्बोहायड्रेट खाणं , हे शरीराचं चलन वलन इंधन फ्युएल एनर्जी ऊर्जा शक्ती मसल , यासाठी निश्चितपणे आवश्यक असतेच!!! त्यामुळे फळे दूध पोळी भाकरी भात यांचा समावेश रोजच्या आहारात असायलाच हवा.


रोज जेवढी हालचाल करणार (= शारीरिक वैचारिक बौद्धिक भावनिक) त्यासाठी लागणारी एनर्जी ऊर्जा पुरेशी मिळेल , इतका पुरवठा (कार्बोहायड्रेटचा) आहारातून होण्यासाठी मुख्यतः मधुर रसाचा म्हणजे गोड चवीचा समावेश रोजच्या अन्नामध्ये असायला पाहिजे. मधुर गोड याचा अर्थ प्रत्यक्ष साखर गूळ असा नसून, पृथ्वी जल प्रधान बल ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट स्वरूपातील , गहू तांदूळ ज्वारी बाजरी दूध फळ बटाटा यांचा आवश्यक तेवढा, पचवता येईल एवढा, पुरेसा अंश रोजच्या आहारात असायला हवा!!


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।४६५।। 

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


नमस्कार 🙏🏼 आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


1 comment: