घरचे / हॉटेलचे अन्नपदार्थ आणि भोजनाचे शुचित्व व कृतज्ञता
*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 194*
4 जून 2025, बुधवार
*उपविभाग 136*
✍️🏼 ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
काले सात्म्यं *शुचि हितं* स्निग्धोष्णं लघु *तन्मनाः*॥
*षड्रसं मधुरप्रायं नातिद्रुतविलम्बितम्।*
*स्नातः* क्षुद्वान् *विविक्तस्थो धौतपादकराननः॥*
*तर्पयित्वा पितॄन् देवानतिथीन् बालकान् गुरून्।*
*प्रत्यवेक्ष्य तिरश्चोऽपि प्रतिपन्नपरिग्रहान्॥*
*समीक्ष्य सम्यगात्मानमनिन्दन्नब्रुवन्* द्रवम्।
*इष्टमिष्टैः सहाश्नीयाच्छुचिभक्तजनाहृतम्॥*
भोजनविधीचा मूलाधार असलेल्या श्लोकातील नियमांपेक्षा काही विशेष बाबी श्रीमद् वाग्भटाचार्य यांनी अष्टांग हृदय या ग्रंथात सांगितल्या आहेत.
त्या वरील श्लोकांमध्ये बोल्ड टाईप मध्ये व निळ्या रंगात दाखवल्या आहेत
*आणि विशेष म्हणजे या वाग्भटाचार्यांनी सांगितलेल्या विशेष बाबी, आजच्या काळात अतिशय आवश्यक उपयोगी आणि निश्चितपणे आचरणीय अशा काल सुसंगत आहेत*
शुचि = बाह्यतः स्वच्छ आणि मूलतः त्या अन्नाचे घटक द्रव्य आणि कृती करतानाचे साहित्य, तसेच करणाऱ्याचे हात व शरीर हे तर स्वच्छ हवेच ...
आणि मुख्य म्हणजे आचार विचार भावना बुद्धी हे सर्व शुचि स्वच्छ पवित्र मंगल उदात्त असं असायला हवं!
हे असं बाह्य अभ्यंतर शारीरिक वैचारिक बौद्धिक भावनिक शुचित्व घरातील गृहिणी बाबत जी स्वयंपाक करून आपल्याला खायला घालते त्या आई पत्नी बहीण सून मुलगी वहिनी यांच्या बाबत शक्य असते,
परंतु अशा प्रकारचे बाह्य अभ्यंतर शारीरिक वैचारिक बौद्धिक भावनिक शुचित्व हे घराबाहेर हॉटेलमध्ये किंवा ऑनलाईन फूड मध्ये असणे कदापिही शक्य नाही!
म्हणून हॉटेलमध्ये खायला जाणे आणि ऑनलाईन फूड मागवणे, यापेक्षा जेव्हा घरच्या स्त्रीला शक्य नसेल तेव्हा किंवा खरंतर आठवड्यातून एकदा, घरच्या स्त्रीला स्वयंपाकातून सुट्टी देऊन, आपण स्वतः किमान वरण-भात मसालेभात एखादी भाजी हे तरी करणं निश्चितपणे शक्य आहे आणि थोडे प्रयत्न केले तर पोळी भाकरी हे ही फार अवघड नाही. पण त्यासाठी फक्त करण्याची तयारी / वृत्ती आणि मुख्य म्हणजे आपल्या घरच्या गृहिणीबद्दल प्रेम आदर आणि कृतज्ञता असणं आवश्यक आहे.
बाहेर हॉटेलमध्ये खायला जाणं किंवा ऑनलाईन फूड मागवणं ही श्रीमंती समृद्धी लक्झरी नसून, ते दरिद्रीपणाचे भणंगपणाचे भिकारडेपणाचे लक्षण आहे, असे संस्कार आपण आपल्या नव्या पिढीवरती लहान मुलांवरती करणं आवश्यक आहे. अन्यथा घरचा एखादा पदार्थ हॉटेल सारखा झालाय असं कौतुक करणं, ही मुळातच अभिरुची खालवल्याचं आणि संस्कारहीनतेचं लक्षण आहे. उलट हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथल्या पदार्थांची चव आईच्या गृहिणीच्या सुगरणीच्या हाताप्रमाणे आहे, अशी प्रशंसा होणं, हे हॉटेल साठी कॉम्प्लिमेंट आहे.
घरच्या स्त्रीला गृहिणीला स्वयंपाक करणे, अगदीच अशक्य असताना... केवळ गैरसोयी मधली सोय, अगतिकपणा अपरिहार्य विकल्प , म्हणूनच हॉटेलमध्ये जाणे , हा शेवटचा पर्याय असला पाहिजे.
दर वीकेंड ला घरात शिजवायचं नाही, म्हणून भिकाऱ्यांसारखे हॉटेलच्या दारात वेटिंग करत उभं राहायचं आणि कष्टाने कमावलेले पैसे , टुकार दर्जाहीन अन्ना साठी उधळायचे, हा निव्वळ मूर्खपणाच आहे!!!
काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।४६५।।
बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।
नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत!
*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।*
आणि
*न पीडयेत् इंद्रियाणि*
हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.
_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_
त्वदीय वस्तु गोविंद
तुभ्यम् एव समर्पये ।
तेरा तुझको अर्पण
क्या लागे मेरा ।
श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।
🙏🏼
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/
No comments:
Post a Comment