Friday, 20 June 2025

संहिता आणि टीका यांच्यावरील प्रेमाची खरी खरी गोष्ट !!!

 आपण आपल्या "कल्पनांचे लाड" करायचे, मग सर्व सोपं होतं! प्रेमाची गोष्ट ... संहिता आणि टीका यांच्यावरील प्रेमाची खरी खरी गोष्ट !!!

https://www.facebook.com/share/v/16g3RUaki5/


हा 3 मिनिट 12 सेकंदाचा रील खूप छान मनोरंजक आणि श्रवणीय व चिंतनीय आहे ... पहिलं 1 मिनिट संपल्यानंतर, पुढे असं "समजायचं" की ही दोन पात्रं जे बोलतायत, ते त्यांच्या लिखाणा विषयी बोलत नसून ...


✍🏼 वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे, आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे & नाशिक 9422016871 


... आपण संस्कृत भाषेतली संहिता + टीका (सोबत भाषांतराची कुबडी 🩼 नसलेलं) वाचायला बसलो आहोत आणि कुठल्याही अध्यायाची सुरुवात अमुक अमुक अध्यायं "व्याख्यास्यामः" अशी होते ... 



आणि मग जर ते "व्याख्यान" 🎙🔊📢🗣देत असतील तर आपण "वाचतो का?📖" 


खरंतर ते व्याख्यान देतायेत असं म्हटलं म्हणजे ते जे काही व्याख्यान देतायेत, ते जे काही "बोलतायत", ते आपल्याला "ऐकू 👂🏼यायला" पाहिजे! 

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः।

म्हणजे जर "अध्यायं 🗣व्याख्यास्यामः" असेल, तर आपण "श्रुणुयामः👂🏼" असं असायला हवं !!!


जर त्यांनी लिखिष्यामः✍🏼 लिहिलं असतं , तर आपण पठिष्यामः म्हणजे 📖 वाचलं 👀 असतं !!


या रील मध्ये जसं म्हटलंय, तसं "हळूहळू" त्या संहिताकाराशी त्या टीकाकारांशी आपली ओळख होत जाते !!!


आणि मग ते "आपल्याशी बोलू" लागतात आणि मग "ते जे बोलतायत", ते आपल्याला "ऐकू यायला लागतं"! 


अरुण दत्ताची भाषा म्हणजे एखाद्या यंत्राचे सगळे नट🔩⚙️🔧🪛बोल्ट ढिले करून पार्ट न् पार्ट समोर मांडणे, अशा प्रकारची आहे !


डह्लणाची भाषा समवयस्क सलगीच्या मित्राप्रमाणे आहे की जो खांद्यावर हात टाकून समजुतीच्या भाषेत बोलतो.


चक्रपाणि ची भाषा म्हणजे मी एकटाच काय तो हुशार आहे आणि मी तिसऱ्या मजल्यावर उभा राहून बोलणार, तुम्ही जमिनीवर खाली तळमजल्यावर उभा राहून ऐकायचं ... अशी थोडीशी elite किंवा खरं तर जराशी आढ्यतेखोर आहे 


... आणि सर्वात सुंदर अशी भाषा हेमाद्री यांची आहे, की जी आपल्या लाडक्या नातवाला जगाची जाण यावी म्हणून त्याला मांडीवर बसवून, आजोबांच्या वात्सल्याने आणि अनुभवाच्या परिपक्वतेने ते बोलतात!!!🙏🏼


वाग्भट यांची भाषा त्यांच्या नावाप्रमाणे अतिशय प्रगल्भ अशी आहे 


सुश्रुताची भाषा ही स्पष्ट आणि नेमकी अशी आहे!


... तर चरकांची भाषा ही नाही म्हणलं तरी बऱ्यापैकी अघळपघळ आणि विषय सोडून थोडी इकडे तिकडे जाणारी अशी आहे !!!


त्याला कारणंही तशीच असावीत कदाचित !

त्यांचे ते स्वभाव असतील किंवा तत्कालीन सामाजिक परिस्थिती तशी असेल !!!


पण हे "ऐकू येतं", असं माझं फक्त वैयक्तिक "मत" नसून, तो वैयक्तिक "अनुभव" आहे.


अर्थात माझे हे वैयक्तिक अनुभव कथन मत आकलन, हे चुकीचं एककल्ली बायस्ड पूर्वग्रहदूषित असेही काही जणांना वाटू शकेल ! त्यात त्यांची काही चूक किंवा दोष नाही.


पण हा "अनुभव" प्रत्येकाने घेऊन पाहण्याजोगा आहे, की संहिताकार आणि टीकाकार "बोलतात" कसे आणि "ते" आपल्याला "ऐकू कसे येते"


ही जी आयुर्वेदाच्या संहितांची टीकांची संस्कृत भाषा आहे , ती ग्रॅमॅटिकल टेक्निकल सायंटिफिक कॉम्प्लिकेटेड अशी संस्कृत भाषा नाहीये . ती "बोली" संस्कृत भाषा आहे, आपण ज्याला आजच्या भाषेत "स्पोकन" संस्कृत म्हणतो तशी आहे !!!


हे रील शेवटची 2 मिनिटं 12 सेकंद (म्हणजे पहिलं 1 मिनिट झाल्यानंतर) वरती दिलेल्या "दृष्टिकोनाने" आधी तसं 👁👁 पहा ...


✍🏼 वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे, आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे & नाशिक 9422016871 


आणि मग तुम्हाला जी संहिता आवडत असेल, खरं तर ... "आवडत नसेल, अवघड वाटत असेल" अशा संहितेतल्या , अवघड स्थानातला, न आवडणाऱ्या स्थानातला, अवघड वाटणारा, न आवडणारा अध्याय उघडून, तो वाचायला लागा ... प्रयत्न करा तर !!!


कदाचित पहिले दोन-तीन दिवस , कदाचित दहा-बारा दिवस काहीच कळणार नाही 🤔⁉️😇😵‍💫 ... पण मग असं खरोखर "ठरवून" अगदी रोज "10 मिनिटं किंवा 5च मिनिटं", सलग "100 दिवस", "खंड न पडू देता", "निष्ठेने निर्धाराने" ते वाचत राहायलात ना ... की 100 व्या दिवशी तुम्हाला संहिता आणि टीका हे "वाचता येणार नाही" ... ते तुम्हाला "ऐकू येऊ लागतील"!!!🙂 


हा एक खूप सुंदर अनुभव असतो ... ज्याला चरक "तत्त्वावबोधो हर्षणानाम्" असं म्हणतो !!!


ही एक स्वसंवेद्य अशी बाब आहे, स्वसंवेद्य अशी घटना आहे, स्वसंवेद्य असा अनुभव आहे ... एक "स्वसंवेद्य भावना feel आहे. जस्ट गो थ्रू इट ... ऑल द बेस्ट ...


आपण आपल्या "कल्पनांचे लाड" करायचे, मग सर्व सोपं होत - प्रेमाची गोष्ट ... संहिता आणि टीका यांच्यावरील प्रेमाची खरी खरी गोष्ट !!!


✍🏼 वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे, आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे & नाशिक 9422016871 


फक्त लाल कापडात गुंडाळून संहितेच्या प्रिंटेड पुस्तकाला छातीशी घट्ट धरून फोटोची पोज दिली किंवा तीन बोटं संहितेच्या छापील पुस्तकांच्या ओळीवरनं फिरवली म्हणजे त्याचं रापायणी वैद्य होत नाही आणि ते मेंदूमध्ये इन्स्टस्टॉल होत नाही!!! 


असल्या भाकडकथा, भावनिक मिसगाईड, इमोशनल दिशाभूल याच्यामागे भरकटू नका!!!


शास्त्र हे सत्य आहे तथ्य आहे!!! अभिनय करण्याचं नाटक नाही !!!


आणि संहिता टीका हा त्या पुण्यात्म्यांनी महात्म्यांनी "तुमच्याशी केलेला संवाद" आहे ... या हृदयीचे, त्या हृदयी ... असा !!!


म्हणून चरक वाचा सुश्रुत वाचा ... 

पण अष्टांग हृदय नक्की वाचा !!!


कारण वागभट त्याच्या हृदयातून आयुर्वेद आपल्या हृदयामध्ये खरोखर इन्स्टॉल करतो 


आणि ही शाब्दिक पोकळ बडबड नाही ... हा सलग 35 वर्ष घेतलेला आनंदानुभव आहे !!!


Welcome to True Ayurveda Real Arurveda !!! 


Let us LISTEN to Samhitaa !!!


संहितोक्त आयुर्वेदामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे !!!


✍🏼 वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे, आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे & नाशिक 9422016871

1 comment:

  1. संहिता टीका या त्या पुण्यात्म्यांनी महात्म्यांनी तुमच्याशी केलेला संवाद आहे.... वाह 🙏🙏🙏

    शास्त्र हे सत्य असून अभिनय करण्याचं नाटक नाही....🙏🙏🙏

    खूप खूप आभार.

    ReplyDelete