काही सन्माननीय अपवाद वगळता अनेक वैद्य (डॉक्टर) हे सोशल मीडियावरती घरगुती औषधे झटपट उपचार, होम रेमेडीज, ड्रग & डिसीज अशा पद्धतीने व्यक्त होत असतात. त्यातून त्यांना लाखो व्ह्यूज, हजारो सबस्क्रायबर्स मिळतात, काहीजण तर त्यामुळे "समाज गुरु(?), राष्ट्रीय गुरु" इथंपर्यंतही पोहोचतात ... असो. त्यांच्या या निर्विवाद(?) कर्तृत्वा(?)बद्दल निश्चितपणे अभिनंदन💐🏆 करायलाच हवं
पण तरीही ... कोणत्याही वैद्यकीय पदवीधर (म्हणजेच डॉक्टर) माणसाने आणि नीतिमत्ता आणि समाजप्रबोधनाचे उत्तरदायित्व याबद्दल सारासार विवेक आणि सदसद विवेक बुद्धी जागृत असलेल्या डॉक्टर वैद्य यांनी (mbbs डॉक्टर हे सहसा असं करतच नाहीत) "घरगुती औषधे" अशाप्रकारे सोशल मीडिया किंवा प्रिंट मीडिया किंवा ऑडिओ व्हिज्युअल मीडिया किंवा स्थानिक पातळीवर किंवा जाहीर व्यासपीठावर व्यक्त होऊ नये , हे नम्र आवाहन !!!🙏🏼
त्या संदर्भात योग्य वाटल्यास उत्सुकता असल्यास जिज्ञासा असल्यास कुतूहल असल्यास घरगुती औषधे या संदर्भातील खालील पोस्ट अवश्य वाचावी हे नम्र आवाहन🙏🏼
👇🏼
सोशल मीडिया वरती घरगुती औषधे सांगणे, हा झटपट लोकप्रियता मिळवण्याचा, सोपा मार्ग असला ... तरी तो शास्त्राचे आणि समाजाचे निश्चितपणे नुकसान करणाराच आहे. कारण अशा प्रकारे शॉर्टकट / घरगुती उपाय सांगून, आपण सेल्फ मेडिकेशन अशा बेजबाबदार वृत्तीला खतपाणी घालतो ... आणि समाजाची दिशाभूल फसवणूक वंचना प्रतारणा करतो, याची जाणीव सर्व डॉक्टर/ वैद्य यांनी सोशल मीडियावर नियतकालिकांमध्ये प्रसार माध्यमावर सार्वजनिक ठिकाणी लेख लिहिताना भाषण करताना ठेवलीच पाहिजे. तीच आपली शास्त्राशी आणि समाज रुपी भगवंताशी व अन्नदात्या पेशंटशी असलेली, नैतिक बांधिलकी आहे ... याचे भान कधीही सुटू देऊ नये.
🔥आजपर्यंत कधीतरी, एकातरी, ऍलोपॅथी डॉक्टरांनी मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांनी एमबीबीएस डॉक्टरांनी, एकदा तरी ... असे घरगुती औषध घेण्यासाठी, कुठेतरी मासिकात सोशल मीडियावर व्हाट्सअप वर फेसबुक वर युट्युब वर वर्तमानपत्रात लेख लिहिलाय किंवा कुठल्याही सार्वजनिक व्यासपीठावर भाषण केले आणि त्याच्यामध्ये "घरच्या घरी अमुक औषध घ्या" असं कधी सांगितलंय का?! कधीच नाही !!
मॉडर्न मेडिसिन ऍलोपॅथी एमबीबीएस डॉक्टर हे तुम्हाला आजारांची कारणे , लक्षणे , ते टाळण्यासाठीचे वागणुकीतले उपाय याबद्दल सांगतील ... पण ते कधीही कुठलेही औषध , हे लेख किंवा भाषण या स्वरूपात , प्रत्यक्ष सार्वजनिक व्यासपीठावरून किंवा सोशल मीडिया वरून किंवा वर्तमानपत्रात मासिकात कधीही सांगत नाहीत...
मग नेमकी आयुर्वेदाचीच माणसं असं सगळीकडे, चीप cheap प्रकारे, आयुर्वेदाला असं स्वस्त हलकं कमी दर्जाचं करून ... आजीबाईचा बटवा पारंपरिक ज्ञान ट्रॅडिशनल नॉलेज या नावाखाली, शेवटच्या पायरीवर उभे राहून, घरगुती औषधं, या शास्त्राचा अपमान अवमूल्यन करणाऱ्या, निम्न खालच्या स्तराला का बरं आणतात??? असे करताना त्यांना कोणत्याही प्रकारची खेद खंत संकोच का बरे वाटत नाही??? असा प्रश्न मला गेली 35 वर्ष पडलेला आहे ... पण अशा वृत्तीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली अद्याप पर्यंत आयुर्वेदाच्या लोकां बाबत मला दिसलेली नाही ... ☹️😔
घरगुती उपाय सांगून , कोणीतरी वैद्य किंवा कोणीतरी बोगस आयुर्वेदिक डॉक्टर भोंदू , हा युट्युब वर लाखांनी सब्स्क्राईबर्स आणि व्ह्यूज मिळवतो ... म्हणून आपणही त्याच फसव्या घसरणीच्या मार्गावर लोळावे, असा त्याचा अर्थ होत नाही. अशा प्रवृत्तींचे समर्थन कधीही सुजाण नागरिकांनी आणि आयुर्वेद शास्त्राच्या पदवीधरांनी प्रॅक्टिशनर्सनी विद्यार्थ्यांनी कदापिही करू नये. एकाने गाय मारली, म्हणून आपण वासरू मारू नये. त्याने सरी घातली, म्हणून आपण दोरी घालू नये.
झटपट रिझल्ट देणारी घरगुती औषधे सांगण्यापेक्षा ...
दिनचर्या ऋतुचर्या व्यायाम आहारातील बदल नित्यसेवनीय द्रव्य नित्य वर्ज्य द्रव्य अशा कितीतरी चांगल्या समाजप्रबोधन पर आरोग्य रक्षक बाबींचे मार्गदर्शन करणे, हे शक्य आवश्यक उपयोगी आणि एका सुजाण वैद्याचे कर्तव्य सुद्धा आहे.
अशा प्रकारच्या प्रबोधनाने लाईक व्ह्यूज सबस्क्राईबर्स नवीन पेशंट लीड्स गिऱ्हाईक कस्टमर क्लायंट यात वृद्धी होणार नाही, हे मान्य आहे!! कदाचित youtube चे सिल्वर स्टार गोल्डन स्टार हे मिळणार नाही!! कदाचित राष्ट्रीय गुरु होता येणार नाही!!!
पण मी काही चुकीचे केले नाही, मी स्वस्त चीप आणि अनीतीपूर्ण अशा प्रकारच्या मार्गाने जाऊन, ही स्वस्त सवंग लोकप्रियता मिळवलेली नाही ... इतका तरी स्वाभिमान सेल्फ रिस्पेक्ट स्वतःबद्दल निश्चितपणे राहील ... आणि आरशामध्ये स्वतःकडे बघताना स्वतःचीच लाज वाटणार नाही! अर्थात घरगुती औषधे सांगणे, हे शास्त्र विरोधी आहे, अशी नीतीपूर्ण जाणीव ज्यांना आहे, त्यांनाच हे पटेल समजेल कळेल!!! अन्यथा घरगुती औषधे सांगणारे पैशाला पासरी व्हिडिओ आणि लाखो views हजारो सबस्क्राईबर्स असणारे कितीतरी व्हिडिओ चॅनल सहजपणे मिळतात. घरगुती औषध असं गुगल करून पहा, वैद्यच काय, पण आयुर्वेदाची डिग्री नसलेलेही अनेक जण यामध्ये लोकप्रियता आणि ऑनलाइन समृद्धी मिळवून आहेत.
परंतु अनेकजण करतात म्हणजे ते बरोबर असते, असे नव्हे !!!
शांतपणे स्वतःलाच प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला खरोखरच असे पटले की, हो ही घरगुती औषधे सांगणे हे माझ्या चरकाला वाग्भटाला आप्तांना भगवंताला समाज पुरुषाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नदात्या पेशंटला खरोखरच उपयोगी आवश्यक आरोग्य रक्षक असे आहे का??? तर मग तुम्ही तुम्हाला वाटेल ते करत राहावे
सुज्ञास अधिक सांगणे न लगे
वैद्यकीय क्षेत्रातील नसूनही समाज प्रबोधनासाठी नैतिक उत्तरदायित्व स्वीकारून कुठल्याही प्रकारची मार्केटिंग स्पॉन्सरशिप असा व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता आरोग्य हिताचे मार्गदर्शन करणाऱ्या पोस्ट किती चांगल्या प्रकारे लिहिता येऊ शकतात, याची खालील दोन पोस्ट चांगली उदाहरणं आहेत
https://www.facebook.com/share/p/16iTTJqRKg/
https://www.facebook.com/share/p/1RMNeTA2gh/
No comments:
Post a Comment