कर्मनित्य =मांसगती= मसल मूव्हमेंट्स =शारीरिक हालचाल =फिजिकल एक्झरसाइज
Both the above pictures credit to Google Gemini AI
Testosterone levels - base line - depleted by 25% over two decades. From hunter gatherer men to urban men of Boston to daily labourers of Mumbai - data is consistent. So does the sperm count - it is declining over last two decades... पुरुषाचे पौरुषत्व दाखवणारे दोन घटक – टेस्टेस्टिरॉन आणि शुक्राणू ची संख्या याच्या पातळीमध्ये सातत्याने घट होत आहे. हे आकडे आदिवासी ते कामगार ते शहरी पुरुष यांच्यात समसमान पद्धतीने आढळली आहे. याचा परिणाम अजून तरी फर्टिलीटी quotients वर तरी दिसला नाही...पण खात्रीने भविष्याबाबत काही सांगता येणार नाही.
दीप्ताग्नयः खराहाराः *"कर्मनित्या"* महोदराः ।
ये नराः प्रति तांश्चिन्त्यं नावश्यं गुरुलाघवम् ॥
कर्मनित्या is the key ...
कर्म वह भी शारीर कर्म मस्क्युलर मूव्हमेंट श्रम व्यायाम मांसगती is the key to Health.
कर्मनित्या automatically assures दीप्ताग्नयः ... which can easily digest any type खराहार &
कर्मनित्या also triggers महोदर = larger portion size of food ...
even though then, there may not be it, as संतुलित सर्व रस अष्ट आहार विधी विशेषायतन इक्वलिब्रियम न्यूट्रियंट or so called balanced perfect & obsessed with nutrients etc.
पिंपळाच रोप कसं
कुठेही उगवतं
कुठेही उगवतं म्हणून
त्याचं कसंही निभावतं
मी माझा ✍🏼 चंद्रशेखर गोखले
ज्याची दणकून शारीरिक हालचाल होते
हात पाय पाठ कंबर मान इथले सर्व सांधे हाड आणि मुख्य म्हणजे स्नायू मसल्स मांस हे संपूर्ण क्षमतेने काम करतात
त्या माणसाचे प्रायः सर्व धातू आणि अग्नि हे उत्तम स्थितीत असतात
आजपासून दोन पिढ्यांपूर्वी यांत्रिकीकरण फार कमी होते
चालणे पळणे सायकलिंग पाणी भरणे पाणी वाहून आणणे सारवणे धुणं भांडी झाड लोट अंथरुणाच्या घड्या घालणे गोधड्या धुणे गुरं सांभाळणे गुरं चारायला नेणे
स्क्रीन आणि घर याच्या बाहेरचे खेळ बालपणी 99% मुलं खेळत असणे
खाली उठून बसून स्वयंपाक असणे
अंग मेहनतीनेच बहुतांश सर्व कामे करणे
असं असल्याने अग्नि आणि धातू हे उत्तम होते.
कर्मनित्य = नित्य कर्म शारीरिक कर्मे अपरिहार्य असल्यामुळे, त्याला लागणारी ऊर्जा एनर्जी मिळवण्यासाठी तेवढा दणकट आहार होता
तेवढी कडकडून 🔥भूक होती, दीप्ताग्नय
स्क्रीन टाईम टीव्ही मालिका क्रिकेट राजकारण हे नसल्यामुळे नऊ ते सहा अशी सुंदर झोप होती
त्यामुळे चटणी कांदा भाकरी असं खराहार खाणाऱ्या शेतकऱ्याचंही शरीर दणकट होतं
शहरात राबणारा गिरणी कामगारही तितकेच शारीरिक कष्ट करत होता
ऑफिसमध्ये जाऊन टेबलवर बसणारा माणूसही घरापासून ऑफिसपर्यंत सायकलिंग करत होता
मुलांना घरापासून शाळेपर्यंत चालत पळत जायला यायला लागत होतं
लिफ्ट नसल्यामुळे जिने चढणे उतरणे होतच होतं
अनेक ठिकाणी रांगा लावून
उभे राहणं यामुळे शरीराला सूर्यप्रकाशाचा स्पर्श होत असे.
माफक प्रमाणात का होईना पण शेळीचं मांस खाल्लं जात असे
दूध तूप हे सगळं खरं खरं होतं
फळं व भाज्या याही अस्सल होत्या
पण या सगळ्याचं "मूळ" हे अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागेल इथपर्यंत एक्झॉस्ट होईपर्यंत, दमणूक होईपर्यंत *शारीरिक हालचाल मांसगती मस्क्युलर मूव्हमेंट्स म्हणजेच कर्म नित्य हेच आरोग्याचं मूळ आहे*
म्हणून त्या पिढीमध्ये कधीही पीसीओडी इंफर्टिलिटी इम्पोर्टेन्सी इडी पी इ ओबेसिटी थायरॉईड डिप्रेशन फर्स्ट्रेशन असलं काहीही नव्हतं
त्यामुळे दोन पिढ्यांपूर्वी एकेका दंपतीला चार-पाच ते आठ दहा मुलांपर्यंत प्रजनन क्षमता होती
आणि इतकी बाळंतपण होऊ नये बाई चाळिशीला थकत नसे
प्रेग्नेंसीला बेडरेस्ट घेत नसे
जस्टेश्नल डायबिटीस होत नसे
पन्नाशीच्या आत सून जावई आल्यामुळे त्याच्या पुढची पिढी ही तितकीच आरोग्य संपन्न राहत होती
आज कर्मनित्याचे जागा सेडेंटरी/sedentary लाइफस्टाइल = बेड➡️ कमोड➡️ डायनिंग चेअर➡️ वाहनाचे सीट ➡️ऑफिस कॉलेज शाळा येथील बेंच खुर्ची ➡️परत येताना पुन्हा वाहनाचे सीट➡️ सोफा➡️ डायनिंग चेअर ... आणि बेड
असं संपूर्णपणे बैठे जीवनशैली असल्यामुळे "कर्मशून्य" ... त्यातही सर्व प्रकारच्या मशीन , उभे राहून स्वयंपाक ... आता तर स्वयंपाक न करता ही खाण्याची सोय ... या सगळ्यांमध्ये *"कर्मनित्या" हे आरोग्य मूळ नष्ट होऊन , "कर्म शून्य" हे रोगाचे मूळ कारण, फक्त भारतातच नव्हे तर जगभर दृष्टोत्पत्तीस येत आहे*
नैसर्गिक कर्मनित्य दैनंदिन कर्मनित्या सर्वांगीण कर्मनित्य अशी जीवनशैली हवी
एसीमध्ये एकेका मसल साठी पुन्हा एकेक मशीन वापरून हार्ट अटॅक येईपर्यंत जिम करणे
किंवा सायकलिंग, ऊर फुटेपर्यंत मॅरेथॉन मध्ये धावणे एसीएल पीसीएल लिगामेंट टेअर होईपर्यंत बॅडमिंटन खेळणे, हायरॉक्स सारखा राक्षसी प्रकार करणे, अज्ञान आणि हौसे पोटी डोंगर चढायला जाणे ... हे असलं अनियमित नित्य नसलेलं , अवसं पुनवेला करण्याचं कर्म शारीरिक हालचाल मस्क्युलर मुव्हमेंट मांसगती याचा काही उपयोग नाही... त्यांनी फार फार तर हार्ट अटॅक येऊन मरतील
पण आजपासून दोन पिढ्यांपूर्वी जी नैसर्गिकरित्या दिवसभर सर्वांगीण सर्वकालीन झेपेल इतकी "कर्मनित्यता =शारीरिक हालचाल =मस्क्युलर मूव्हमेंट= मांसगती होत होती,
*"तशी जीवनशैली परत आली"*
तर आज आपण जितक्या मोठ्या प्रमाणावर हा *"वेलनेस चा बाजार"* बघतोय तो नाहीसा होऊ शकतो
आणि एक खऱ्या अर्थाने सळसळतं चैतन्यपूर्ण उत्साही आरोग्य संपन्न जीवन ... जे दोन पिढ्यांपूर्वी होतं , आपल्या बालपणी होतं , ते निश्चितपणे पुन्हा दिसू शकेल ... घरची कामं करायची नाहीत आणि जॉगिंग ट्रॅक वर चालायला जायचं, ह्याच्या इतका बावळटपणा जगात दुसरा कुठलाच नाहीये ... स्वतःच्या घरची सर्व कामं करून दुसऱ्या चार घरची धुणी भांडी फरशी करणाऱ्या मोलकरणींची तब्येत "बऱ्याचदा" नीट असते , हे आपण पाहतो अर्थात त्याही आता स्कुटी अॅक्टिवा फ्लॅट मिक्सर अशा यंत्राधीन झाल्यामुळे, त्यांच्यातही ओबेसिटी थायरॉईड पीसीओडी या बाबीत दिसतात. नाही असे नाही
सर्वमन्यत् परित्यज्य शरीरमनुपालयेत् ।
तदभावे हि भावानां सर्वाभावः शरीरिणाम्
साहसं वर्जयेत् कर्म रक्षञ्जीवितमात्मनः ।
जीवन् हि पुरुषस्त्विष्टं कर्मणः फलमश्नुते
http://mhetreayurved.blogspot.com/2024/12/ban-marathon.html
के आया मौसम मॅरेथॉन का
आता पुढच्या महिन्यापासून दर रविवारी सकाळी सकाळी कुठल्या ना कुठल्या शहरात अनेक हौशे नवशे गवशे फी भरून पैसे भरून रस्त्यावर पर्पजलेस निष्प्रयोजन पळत सुटतील ... वाहतुकीचे तीन तेरा, ट्रॅफिक जॅम आणि संताप ... या सगळ्यांना रस्त्यावर वाकडं तिकडं पळायची परवानगी देणे ऐवजी, एखाद्या बंदिस्त ग्राउंड वर स्टेडियम मध्ये सोडा आणि तिथं आतल्या आत काय जितकं पळायचंय तितकं पळा ... 42 किलोमीटर कशाला ... 420 किलोमीटर पळा दिवसभर ...
काहीही खा! कसंही खा! कितीही खा! कधीही खा! मजा करा !! ऐश करा !!! 🙃😇😃
👇🏼
https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_23.html



No comments:
Post a Comment