Friday, 3 October 2025

आयुर्वेद प्रॅक्टिस, क्रिकेट🏏 आणि लॉन टेनिस 🎾 !!!

 आयुर्वेद प्रॅक्टिस, क्रिकेट🏏 आणि लॉन टेनिस 🎾 !!!

Picture credit Google Gemini AI


डिस्क्लेमर : या लेखात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत, असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हा लेख लिहिला आहे.

फेडरर नदाल पेक्षा स्टेफी ग्राफ मारिया शारापोव्हा "पहायला" आवडते असे सांगणारे अनेक... पण लॉन टेनिस हा खेळ प्रत्यक्ष खेळलेली लोकं भारतात विरळा, कदाचित 0.0001%!


क्रिकेट हा भारतातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ! पण हा खेळ "पाहणारे म्हणजे प्रेक्षक" जास्त! प्रत्यक्ष "खेळणारे फार कमी" !! बहुतेक सगळ्यांनी लहानपणी कधीतरी क्रिकेट(?) खेळलेलं असतं!!! पण जितके लोक "क्रिकेट" खेळतात, त्यातल्या 99 टक्के लोकांनी, खरं पाहता, "क्रिकेट" ऐवजी "बॅट बॉल" खेळलेलं असतं🏏! 


म्हणजे काय? साधी कुठलीतरी बॅट आणि प्रायः लॉन टेनिस मध्ये वापरतात तशा साॅफ्ट/मऊ 🎾 किंवा रबरी बाॅलने हा खेळ खेळलेला असतो ... काही अति उत्साही लोकांनी तर प्लास्टिक बॉल, अंडर हॅन्ड, हाफ पीच असेही "क्रिकेट(?) नव्हे तर, बॅट बॉल" खेळलेले असते!!!🤣


क्रिकेट खेळणे म्हणजे खऱ्याखुऱ्या भव्य ग्राउंड वर, खास तयार केलेल्या 22 यार्ड पीचवर, लेदर बॉल किंवा सीझन बॉल (please Google) म्हणतात तो वापरून क्रिकेट खेळणे ... असा क्रिकेट खेळण्याचा प्रत्यक्ष अनुभव असलेली लोकं अत्यंत विरळा! हे "असलं अस्सल क्रिकेट" आपण फक्त टीव्हीवर किंवा ऑनलाईन, लाईव्ह टेलिकास्ट मॅच म्हणून "बघत" असतो!


त्यात पुन्हा हेल्मेट पॅड गार्ड ग्लोव्ह्ज या सगळ्या सहित, प्रोफेशनल क्रिकेट बॅट वापरून, खेळलेले तर अत्यंत दुर्लभ!!!


आयुर्वेदाची प्रॅक्टिस म्हणजे "खरोखर क्रिकेट" खेळणे म्हणजे किमान खरीखुरी बॅट आणि लेदर/सीझन बॉल हे दोन कंटेंट तरी अस्सल असणं आवश्यक!


लेदर किंवा सीजन बाॅलने, क्रिकेट खेळण्यासाठी, "धाडस आणि क्षमता , दोन्हीही" आवश्यक असते! त्या तुलनेत, क्षमता आणि धाडस याची आवश्यकता, "त्यांना अजिबातच नसते", ... की जे लोक, लॉन टेनिसचा मऊ किंवा साधा रबरी बॉल वापरून, क्रिकेट नव्हे तर, साधं "बॅट बॉल" खेळतात ...!


आयुर्वेदाची खरीखुरी शास्त्रीय सत्याधिष्ठित प्रॅक्टिस करण्यासाठी तशीच "क्षमता आणि धाडस", हे दोन्ही आवश्यक असतं ... जसं, क्रिकेट हे सीझन / लेदर बॉल वर खेळण्यासाठी लागते, तसं!!!


बाकी आयुर्वेदाच्या "नावाखाली" काहीही वापरून त्याला आयुर्वेद नाव देणे, याला धाडस, क्षमता आणि मुख्य म्हणजे अक्कल तर ; अजिबात लागत नाही... त्यासाठी फक्त लोकांना गंडवण्याची, दिशाभूल करण्याची आणि चलाखीने मार्केटिंग करण्याची "जुजबी कुवत" असली तरी पुरेशी असते! जसं, लॉन टेनिसचा मऊ किंवा साधा रबरी बॉल वापरून, साधं बॅट बॉल खेळतात ... तसं!!!


खऱ्या खऱ्या आयुर्वेदामध्ये, औषध हे पंचविध कषाय कल्पना (क्वाथ काढा , चूर्ण) & संयुक्त कल्पना (= सिद्धघृत सिद्धता अवलेह आसव अरिष्ट गुटी वटी) या स्वरूपात आणि योग्य त्या "शास्त्रीय मात्रेत scientific dose" द्यायचं असतं !!!


आयुर्वेदाच्या नावाखाली जी पुड्या बांधण्याची प्रॅक्टिस चालते! काही जण , त्याच्यामध्ये तळहाताच्या एक चतुर्थांश आकाराचे कागदात, काही आयुर्वेद संहितात लिहिलेली आणि बाकी सगळी रसशास्त्र नावाच्या एका वेगळ्याच शास्त्रात लिहिलेली औषधं, "सरमिसळ" करून, "पुडी" म्हणून बांधून देतात.


अशा पद्धतीने दोन वेगळ्या वेगळ्या स्वतंत्र परस्पर पूरक नसलेल्या परस्परावलंबी नसलेल्या शास्त्रातली औषध एकत्र करून एकाच पुडीत बांधून द्यावीत, असं आयुर्वेद शास्त्राच्या संहितांमध्ये कुठेही लिहिलेलं नाही आणि त्या पुडीत "जास्तीत जास्त" जितकी मावते/ बांधता येते/ देता येते ... इतकी कमी मात्रा आयुर्वेद संहितातल्या कुठल्याही औषधाची नाही!!!


एवढ्याशा कागदामध्ये आयुर्वेदातील संहितातील कोणतेच औषध, शास्त्रीय मात्रेमध्ये बांधणे, शक्य नसते! अगदी पुडीत बांधण्याजोग्या चूर्ण ची मात्रा सुद्धा शास्त्रात 1 कर्ष = दहा ग्रॅम इतकी दिलेली आहे आणि दहा ग्रॅम चूर्ण बसू शकेल, एवढी पुडी कोणाच्याही प्रॅक्टिस मध्ये बांधली जात नसते.

 

पंचविध कषाय कल्पना म्हणजे पाणी हे माध्यम म्हणून वापरून तयार केलेले औषध ... उदाहरणार्थ क्वाथ म्हणजे कषाय म्हणजे काढा ... कोणतीही नैसर्गिक वनस्पती पाण्यात उकळली की त्याचा औषधी अंश पाण्यात उतरतो, ज्याला मेडिसिनल वॉटर एक्सट्रॅक्ट असं म्हणतात. 


तसं रसशास्त्र या आयुर्वेदा पेक्षा वेगळ्या असलेल्या औषध पद्धतीमधील बहुतांश कंटेंट = धातू किंवा खनिज किंवा रत्न हे पाण्यात उकळले तर त्यांचा कोणताही मेडिसिन एक्सट्रॅक्ट = औषधी अंश पाण्यात येऊ शकत नाही. 


त्यामुळे त्यांच्या पंचविध कषाय कल्पना तयार होत नाहीत. त्यामुळे मुळातच ती आयुर्वेदीय औषधे नसतातच! 


रसशास्त्र हे एक स्वतंत्र औषध शास्त्र आहे. 


जसे नैसर्गिक वनस्पती अशीच घटक द्रव्य असली, तरी सुद्धा ... सिद्ध युनानी सोवारिग्पा ही तीन स्वतंत्र औषधी शास्त्रे, आयुर्वेदापेक्षा वेगळी , इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन या आयुष् नावाच्या मंत्रालयाच्या अखात्यारीत येतात. 


तसेच आयुर्वेदातही काही खनिज द्रव्य, वनस्पतींच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात, क्वचित उल्लेख केलेली आहेत. तीच खनिज द्रव्ये बहुतांश आणि प्राधान्याने, मोठ्या प्रमाणात रसशास्त्र नावाच्या, आयुर्वेदापेक्षा वेगळ्या, औषध शास्त्रात वापरली जातात. 


त्यामुळे सीजन लेदर बाॅलने 22 यार्ड पीचवर जे खेळलं जातं त्याला "क्रिकेट" म्हणतात ... लॉन टेनिस रबरी बॉल वापरून किंवा चक्क साधा प्लास्टिकचा बॉल वापरून, अंडर हॅन्ड , हाफ पिच यामध्ये जो "बॅट बॉल" खेळला जातो ... त्याला क्रिकेटच्या "नावाखाली" चाललेलं मनोरंजन/समजूत, असं फार फार तर म्हणता येतं! 


ते खरं खरं क्रिकेट नसतं, एवढं कळण्या एवढी बुद्धी सर्वसामान्य माणसांनाही असते !!!


त्यामुळे सावध राहा ... अस्सल आणि अस्सल च्या नावाखाली दुसरंच काहीतरी गळ्यात मारलं जाणं, याच्यामध्ये फार फरक असतो! 


त्यात आयुर्वेदाच्या नावाखाली, खरंतर मूलतः ॲक्युपंक्चर असलेलं असं विद्ध नावाचा एक प्रकार सर्रास चालतो! 


त्याचबरोबर सिद्ध या औषध शास्त्रातील वर्म या प्रकाराला मर्म थेरपी नाव देऊन , तेही आयुर्वेदाच्या नावाखाली खपवलं जातं ... 


याचप्रमाणे कायरोप्रॅक्टिक, गाल और बाल की सुंदरता के उपाय, याला सुद्धा आयुर्वेदाच्या नावाखाली विकलं जातं!


पंचकर्म ही निश्चितपणे आयुर्वेद शास्त्रात वर्णिलेली आहेत, परंतु आज "पंचकर्म" या "नावाखाली" जे मसाज मालिश स्पा वेलनेस हॅपेनिंग थेरपी & शिरोधारा कटी बस्ती हृद् बस्ती मन्या बस्ती जानु बस्ती हे चालतं, त्याचं प्रत्यक्ष वर्णन उल्लेख, शास्त्रीय उपचार या अर्थी, आयुर्वेदीय संहिता ग्रंथांमध्ये कुठेही उपलब्ध नाहीत.


उभ्या आयुष्यात एकदाही क्रिकेट न खेळता सुद्धा, फक्त क्रिकेट विषयी चर्चा लेख समालोचन, असं थेरॉटिकल करिअर सुद्धा, आपण क्रिकेटमध्ये काही जणांचं असतं, असं पाहिलेलं आहे ... त्यातील प्रसिद्ध नावं, क्रिकेट विषयी ज्यांना थोडं फार कळतं, त्यांना माहित असतातच! 


तसंच आयुर्वेद शास्त्रात / क्षेत्रात सुद्धा, एकही पेशंट कधीही आयुष्यात न तपासता, कसलाही क्लिनिकल म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव नसताना सुद्धा, फक्त स्टेजवर उभे राहून, समोर जमलेल्या/ जमवलेल्या 10, 20 ते 100, 200 ते 1000, 2000 अशा कितीही श्रोत्यांसमोर प्रेक्षकांसमोर विविध गोष्टींवरती विषयांवरती, लोकप्रिय प्रसिद्ध , राष्ट्रीय स्तरावरचे तज्ञ म्हणवून घेऊन, पेड किंवा अनपेड (पैसे घेऊन किंवा फुकट) , "शिकवतो / ट्रेनिंग देतो" या नावाखाली, फक्त भाषण ठोकणारे सुद्धा, ऑफलाइन ऑनलाईन, अनेक लोक या क्षेत्रात आहेत.


या सगळ्यापासून सावध रहा ... आयुर्वेदाच्या "नावाखाली" हे जे विकलं जातं, हे सगळं म्हणजे जसं खरोखर क्रिकेट खेळत असताना ... बाजूला चिअर गर्ल्स नाचत असतात किंवा स्टेडियम मध्ये नुसतेच बसलेले प्रेक्षक दहा नंबरची निळ्या कलरची तेंडुलकर लिहिलेली जर्सी टी-शर्ट घालून उगीचच आरडा ओरडा करत असतात. हा प्रत्यक्ष क्रिकेट या खेळाचा भाग नसतो. क्रिकेटच्या अनुषंगाने चाललेले अन्य उद्योग असतात की जे क्रिकेट या खेळाला पूरक कॉम्प्लिमेंटरी असे नसून, ते क्रिकेट या खेळावर उपजीव्य म्हणजे अवलंबून म्हणजे डिपेंडंट असे असतात ... तसंच आयुर्वेदाच्या "नावाखाली" आयुर्वेदातील औषधे सोडून, तिसरंच काहीतरी खपवलं जाणं, गळ्यात मारलं जाणं, मार्केटिंग केलं जाणं, विकलं जाणं ... यापासून ... 

सर्वसामान्य जनतेने, 

bams कोर्सला नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी,

त्यांच्या आशावादी पालकांनी आणि ...

आयुर्वेदाचे उपचार घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्यक्षात रोगग्रस्त असलेल्या सर्व पेशंटनी ... 

याबाबत योग्य ती सावधानता बाळगावी !!! जनहितासाठी प्रसारित !!!


डिस्क्लेमर : या लेखात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत, असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.


1 comment:

  1. खतरनाक... कडक 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    ReplyDelete