पूर्वीही एकदा थेरपीस्ट या विषयावरती काही मुद्दे मांडले होते.
पुन्हा एकदा त्याची संक्षिप्त उजळणी करतो .
मुळात हा थेरपीस्ट का गरजेचा वाटतो?
थेरपीस्टचे मुख्य काम काय असते?
जर पेशंटला सर्वांगाला तेल लावणे, हेच त्याचे सगळ्यात मुख्य काम असेल तर, थेरपीस्ट ज्या प्रकारे "पाऊण तास त्याला मसाज मालिश फील गुड स्पा ट्रीटमेंट हॅपनिंग ट्रीटमेंट करून पेशंटच्या सर्वांगाला तेल लावतो" ...
तसं करणं शास्त्राला अभिप्रेत आहे का ??
अभ्यंग याचा अर्थ मसाज मालिश मर्दन असा होतच नाही. स्वेदनाच्यापूर्वी, संपूर्ण शरीराला, केवळ "ऑइल पेंटिंग" होणे पुरेसे आहे ... ते पेशंट स्वतःही करू शकतो ... पाठीचा काही भाग वगळता. पेशंटच्या सोबत आलेला त्याचा समलिंगी/विश्वासू नातेवाईकही ते काम करू शकतो किंवा दोन मिनिटं काढली तर आपण स्वतःही ते काम करू शकतो, समलिंगी पेशंटच्या बाबतीत.
भिंत रंगवणारे पेंटर वापरतात, तो स्पंजचा फोम चा रोलर पेंटिंग ब्रश वापरला किंवा फूट पट्टीला किंवा एखाद्या हातभर लांबीच्या वेळूच्या काठीला फोम किंवा सुती फडके किंवा एखादा कापडाचा बोळा गुंडाळला तर त्यानेही तेल लावणे शक्य होते , जिथे पाठीला हात पुरत नाही तिथे सुद्धा स्वतःच स्वतःला तेल लावता येणे शक्य असते. थेरपीस्ट वरती अवलंबून राहायचंच नाही, असं ठरवलं तर काहीही अशक्य नाही. अशा परिस्थितीत "पाऊण तास त्याला मसाज मालिश फील गुड स्पा ट्रीटमेंट हॅपनिंग ट्रीटमेंट आपण का करावी"??? आणि fancy fad fantacy साठी थेरपीस्टवर अवलंबून का राहावे???
बाकी जी कर्मे आहेत ती थेरपीस्ट ने करावीत, असे नाही ना??? जसे की तर्पण नस्य, बस्ती देणे, जलौका लावणे, व्रण कर्म करणे, अग्नि कर्म करणे याबाबी थेरपीस्टने कराव्यात ... असे "बहुधा अभिप्रेत नसावे ... *तर्पण नस्य, बस्ती देणे, जलौका लावणे, व्रण कर्म करणे, अग्नि कर्म करणे, ही सर्व कर्मे, स्वतः वैद्यानेच करणे, शास्त्रालाही अभिप्रेत आणि पेशंटसाठीही योग्य आणि आवश्यक आहे*"
थेरपीस्टमुळे काही शास्त्रबाह्य लोकांच्या हातात नको त्या महत्त्वाच्या गोष्टी पोहोचत असतील,
त्यांचे अवमूल्यन होत असेल ...
आणि आपली डिपेंडन्सी अवलंबिता अशा बेभरवशाच्या लोकांवर वाढत असेल
आणि त्या पोटी पेशंटची असुविधा होत असेल ...
तर ...
जे आपले नव्याने प्रॅक्टिस करणारे ज्युनिअर मित्र स्टुडन्ट आहेत, त्यांच्याकडे अशा प्रकारची कर्मे करण्यासाठी पेशंट पाठवणे, हे अधिक सोयीचे विश्वासाचे आणि परिणामकारक होऊ शकते.
जिथे आवश्यक/शक्य असेल, तिथे यासाठी त्याकर्माच्या सेवा मूल्याचे परसेंटेज वाईज , योग्य त्या प्रपोर्शनमध्ये विभाजन सुद्धा, एकमेकांच्या समजुतीने , शक्य आहे
थेरपीस्ट ला मुंहमांगे चार्जेस देऊन, त्याची वाट बघून, त्याच्या लहरी सांभाळण्यापेक्षा...
हे परस्पर सहकार्य अधिक उपकारक होऊ शकते
सगळीच कर्मे "मीच, माझ्याच क्लिनिकमध्ये करणार" हा अट्टाहास कशासाठी हवा ???
सहकारी तत्त्वावर, त्या त्या परिसरात राहणाऱ्या पाच दहा पंधरा वीस वैद्यांनी ठरवले की, आपल्यापैकीच अमुक वैद्याकडेच अमुक कर्मासाठी "सर्वांनी पेशंट पाठवायचा" ... तर एकमेकां साह्य करू, या धोरणाने सर्व पेशंट आणि सर्वच वैद्य यांचे हित सुरक्षितपणे निश्चितच साधले जाऊ शकते
पूर्वीच्या काळी अगदी निवडक क्वचित काही घरांमध्ये कुटुंबांमध्ये मोलकरीण कामवाली बाई असे. *मोलकरीण कामवाली बाई ही संज्ञा आताच्या सर्व घरांमध्ये एक सन्माननीय गृह व्यवस्थापन सहाय्यक या आदरयुक्त अर्थाने वापरली आहे. कृपया त्याचा अवमान जनक संबोधन आहे, असा अर्थ काढू नये ही नम्र विनंती* 🙏🏼
आता ती साधारणतः मध्यमवर्गीय आर्थिक स्तरापासून सर्वत्र प्रत्येक घरामधली "परिहार्य किंवा अपरिहार्य" आवश्यकता झालेली आहे. या सर्व मोलकरीण किंवा कामवाली बाई या कशा प्रकारे कामे करतात आणि त्यांच्याशी जमवून जुळवून घेताना घरातील स्त्रीला किंवा सर्वच कुटुंबाला काय प्रकारचे कष्ट त्रास असतात होतात हे सर्वांचे परिचयाचे असते. कुठलीच मोलकरीण किंवा कामवाली बाई कुणाकडेच कधीच प्रदीर्घकाळ टिकत नाही हाही प्रायः अनेकांचा अनुभव असतो
मुळात मागच्या पिढीमध्ये किंवा त्याआधी मोलकरीण किंवा कामवाली बाई यांना "कामाची गरज" होती
आता परिस्थिती उलट आहे, की प्रत्येक मध्यमवर्गीय पासून वरच्या सर्व आर्थिक स्तरातील "प्रत्येक घराला कुटुंबाला" मोलकरीण कामवाली बाई हिची "गरज" आहे
आणि *गरजवंताला अक्कल नसते*
त्यामुळे दोन संस्थांच्या मध्ये "गरजू कोण", याच्यावर सहन कोण करणार आणि मुस्कटदाबी/ वर्चस्व कोण गाजवणार, हे ठरते!
तरी नशीब अजून मोलकरीण कामवाली बाई यांची संघटना/ युनियन कोणी बांधली नाहीये.
तसे झाले तर मग ते अजूनच अवघड होईल
हे जसे घरात आहे, अगदी तसेच *वैद्य आणि थेरपीस्ट* यांच्या बाबतीत आहे
आज थेरपीस्टला भरपूर काम उपलब्ध आहे
त्यांना केवळ वैद्याच्याच रेफरन्स ने नव्हे , तर इतर पेशंटच्या परस्पर म्युच्युअल रेफरन्सने सुद्धा, पेशंट क्लाइंट मिळू शकतात
त्यामुळे थेरपीस्टला जितकी वैद्याची गरज आहे त्याच्या कित्येक पटीने वैद्याला थेरपीस्ट ची गरज आहे
ही गरज किंवा अवलंबित्व जेवढे कमी, तेवढे ... अडला नारायण धरी xxxचे पाय ही स्थिती टाळणे शक्य आहे
थेरपीस्ट ची संघटना होऊन त्यांनी सर्व वैद्यांना त्यांच्या डोमिनन्स प्रमाणे वागायला लावण्यापूर्वी वैद्यांनी संघटना बांधून काही कठोर निर्णय घेतले , तरच या प्रश्नाची काही प्रमाणात सोडवणूक होईल
पण तरीही यामध्ये गरजवंत हा वैद्य असल्याने त्याची बाजू पडती राहणार, हे निःसंशय!
सुसरबाई तुझी पाठ मऊ... या धोरणा व्यतिरिक्त यात कुठलाच आपल्याला हितकारक असा अन्य मार्ग नसतो. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार हे ओघानेच आले.
पूर्वीच्या काळी इर्जिक नावाची पद्धती होती तेव्हा शेतकरी बंधू एकमेकांच्या शेतात राबायला जायचे आणि परस्पर सहकार्याने खरोखरच्या सहकारी तत्त्वाने (आजची को-ऑपरेटिव्ह सिस्टीम नव्हे) परस्परांची कामे चांगल्या प्रतीची विश्वासाने वेळेत होत असत
मागच्या पिढीपर्यंत सर्व घरातील बायका एकमेकींच्या घरी जाऊन पापड लाटणे कुरडया सांडगे लोणची शेवया यामध्ये सहभाग घेत असत आणि सर्वांच्या घरची ही काम विश्वासाने स्वच्छतेने आपुलकीने खेळीमेळीने वेळेत उत्तम दर्जाचे होत असत
तसं वैद्यांनी आपल्या सर्व कर्मंसाठी इर्जिक ही पद्धती अवलंबली पाहिजे
इर्जिक म्हणजे सहकार परस्पर सहकार्य को ऑपरेशन
एकमेका साह्य करू
अवघे धरू सुपंथ
आपल्यातील जे वैद्य
ज्या कर्मामध्ये पारंगत आहेत कुशल आहेत निपुण आहेत
किंवा त्यांच्याकडे त्या पद्धतीची सुविधा सेटअप आहे
किंवा आपल्यापैकी जे वैद्य नवीन प्रॅक्टिस सुरू केलेले आहेत विद्यार्थी आहेत
त्यांना प्रशिक्षणाची किंवा पैसे मिळवण्याची किंवा दोन्हीची आवश्यकता आहे
अशा नवतरुण वैद्यांकडे विद्यार्थ्यांकडे
किंवा ठरवून
त्या त्या कर्मासाठी समवयस्क अशा
त्या त्या वैद्याकडे
त्या त्या कामासाठी
*"सर्वांनी पेशंट पाठवणे"*
त्या त्या स्थानिक = व्हिसिनिटी= जवळीक= क्षेत्र मर्यादा ,
पेशंटच्या सुविधेनुसार
हे जर अवलंबले तर हे जराही अवघड नाही
कुठेही उभ्या असलेल्या रिक्षा किंवा क्याबला ओलाद्वारे जर कुठेही उभा असलेल्या ग्राहक मिळू शकत असेल तर
अशा प्रकारची एक ऑनलाईन व्यवस्था किंवा ॲप आपण तयार करू शकतो की
ज्याच्यामध्ये माझ्या
या पेशंटला
या प्रकारचं कर्म
या दिवशी
या वेळात करणे आवश्यक आहे
तर ते कोण करेल याचा
एआय द्वारे
ऑटो ऑनलाईन डाटा स्कॅन होऊन
आपल्याला त्या समवयस्क वैद्याचा किंवा जवळच्या विद्यार्थ्यांच्या नवतरुण प्रॅक्टिशनरचा
संपर्क मिळाला पाहिजे
आणि
यामध्ये पेशंट पाठवणारा वैद्य आणि
प्रत्यक्ष कर्म करणारा वैद्य
यांना योग्य त्या ठराविक न्याय्य पद्धतीने
कोणावरही अन्याय होणार नाही
या पद्धतीने
त्यातून मिळणारे पैसे हे परसेंटेज वाईज वाटले गेले पाहिजेत
असे झाले तर हे आयुर्वेद, पेशंट आणि वैद्य या दोघांच्याही हिताचे होईल
आणि यातून थेरपीस्ट नावाची आगंतुक अनावश्यक अप्रशिक्षित अशास्त्रीय हा घटक किंवा हे सिस्टीमच पूर्णतः वगळता येईल डिलीट करता येईल बायपास करता येईल
No comments:
Post a Comment