Thursday, 16 January 2020

मकर संक्रांती : तिळगूळ घ्या ... बोला गोड ! आरोग्याला द्या ... संस्कारांची जोड !!

मकर संक्रांती :
तिळगूळ घ्या ... बोला गोड !
आरोग्याला द्या ... संस्कारांची जोड !!

थंडीची सुरूवात होऊन आता दीडएक महिना झालाय. आताशा थंडीचा 'गुलाबीपणा' जाऊन ती आता 'बोचरी' होत चाललीये. हातपायचेहरा इथली त्वचा आणि ओठ फुटलेत. झाडंसुद्धा पानगळतीने उघडीबोडकी दिसताहेत. हाच तो 'शिशिर ऋतु'.


आयुर्वेदानुसार माघ व फाल्गुन महिने हे शिशिर ऋतुचे होत तर ज्योति:शास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर व कुंभ राशीत असतो तेव्हा शिशिर ऋतु होय. शिशिर हा उत्तरायणाचा आरंभ होय. कारण या काळात मकर संक्रांत येते म्हणजे सूर्य मकरवृत्त ओलांडून दक्षिणेकडून पुनः उत्तरेकडे येऊ लागतो. दिवस मोठा होऊ लागतो. भारतापासून ( उत्तरगोलार्ध) अधिकाधिक दूर दक्षिणेकडे गेलेला सूर्य या ऋतूत पुनः जवळ यायला आरंभ होतो. पण तूर्त तरी सूर्य खूप दूर असलेने आपल्याकडे मात्र कडाक्याची थंडी असते. आणि म्हणूनच ती बोचरी ठरते. थोडक्यात वातावरण कमालीचे 'शीत व रूक्ष' असते. आणि म्हणूनच याचे दुष्परिणाम टाळणेसाठी बरोबर याच्या विरूद्ध म्हणजे 'उष्ण व स्निग्ध' गुणांची गरज असते. आणि त्याचसाठी आपल्या पूर्वजांनी या ऋतूत आयोजिला सण मकर संक्रांतीचा अर्थात् 'तिळगूळ घ्या , गोड बोला'

तिळगूळच का?

तर तीळ हे 'उष्ण व स्निग्ध' आहेत आणि गूळ हा 'स्निग्ध गुरू व मधुर' होय.

शीत व रूक्ष वातावरणात शरीरातील वातदोष वाढतो. म्हणजे वायु व आकाश महाभूतप्रधान घटक. त्यामुळे धातुंची म्हणजे शरीरघटकांची झीज संभवते. पृथ्वी व जल महाभूते घटतात. ती भरून काढणेसाठीच थंडीत भूक अधिक लागते.म्हणूनच वायु आकाश कमी होऊन पृथ्वी जल महाभूते वाढतील अशा पदार्थाचे सेवन इष्ट ठरते. शिवाय वातदोष शीत व लघु गुणांचा आहे ग्हणून त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी उष्ण व गुरू गुणांची गरज असते. अशा प्रकारे उष्ण स्निग्ध गुरू मधुर पृथ्वी जल यांचा पुरवठा व्हावा म्हणूनच समाजातील सर्व आर्थिक थरांत सहज उपलब्ध होतील अशा पदार्थाची निवड करून त्यांची धार्मिक रूढींशी सांगड घातली गेली. ते दोन पदार्थ म्हणजेच तिळगूळ घ्या ....गोड बोला.


शिवाय जसे कफासाठी मध, पित्तासाठी घृत ( तूप ) , तसे वातासाठी तिलतैल हे परमौषध म्हणजे सर्वश्रेष्ठ उपाय होय.

गूळ हा उसापासून बनणारा पदार्थ म्हणून संक्रांतीच्या आदले दिवशी भोगीच्या भाजीत उसाचे तुकडे असतात.

अशा प्रकारे शिशिर ऋतूतील अत्यधिक शीतता व रूक्षता यांनी वातप्रकोप होऊन शरीरावर त्याचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून वातनाशक अशा तिळ व गूळ यांचा सणरूढींत समावेश आहे.

सध्या काही सुगृहिणी (सुगरण हा अपभ्रंश होय ) स्त्रिया तिळगुळाच्या वङ्या किंवा लाडू करताना त्यांत खोबरे घालतात, तेही योग्यच होय कारण नारळ हाही मधुर गुरू स्निग्ध याअर्थी वातशामक होय.

पण सध्या सणांचे बाजारीकरण होत असताना शास्त्रीय परंपरांपेक्षा 'उरकून टाकू उपचार रूढी असा भाग अधिक आहे, म्हणूनच तिळ व गूळ यांच्या वड्या करण्याऐवजी 'सोय व सुटसुटीत' म्हणून काटेरी पांढरा हलवा वापरला जातो. त्यात गूळ नसून साखर वापरली जाते, जी सध्या तरी कारखान्यात तयार होणारी म्हणजे रसायनयुक्त असू शकते. त्यामुळे रूढीतला मूळ शास्त्रीय उद्देश हरवून जातो.

संक्रांतीचे वेळी तिळाचा वापर हा फक्त तिळगूळ किंवा भोगीच्या भाकरीपुरता नसून तो तिलतैलाचा अभ्यंग व तिळाचे उद्वर्तन उटणे याअर्थीही करायचाय. तोही फक्त २ दिवस नव्हे तर थंडी व रूक्षता जोवर वातावरणात आहे तोवर अर्थात् पुढचा सण येईपर्यन्त म्हणजे होळी जळाली थंडी पळाली इथपर्यन्त!

...कारण त्या त्या सणांच्या रूढी, या त्या दिवसापुरत्या नसून, ते त्या संपूर्णऋतूचे आरोग्यनियम होत.

तिळगुळाला फक्त शारीरिक आरोग्यापुरते महत्त्व आहे असे नसून कौटुम्बिक सामाजिक आरोग्यदृष्ट्याही महत्त्व आहे.

'तिळगूळ घ्या ... गोड बोला' हा एकमेकांस देण्याचा संदेश म्हणून तर पिढ्यानुपिढ्या चालत आला आहे. जशी शिशिरामध्ये वातावरणात थंडपणा व रूक्षता येते , तशी ती आता समाजमनातही शिरून मूळ धरू लागली आहे. एक संवेदनाशून्य थंडपणा की षंढपणा आणि 'मला काय त्याचं' असा अलिप्त कोरडेपणा दिसतोय. कुणी विचारवंत म्हणाले होते... 'Men build walls instead of bridges ; so they became Miserable' ... माणसं सेतू बांधायचे सोडून भिंती बांधतात आणि म्हणूनच जीवन केविलवाणे होते.


हे सण "साजरं" करण्याचं वेड भारतीय माणसात उत्सवप्रियतेमुळं आहे का? की परंपरापालनाचा पगडा म्हणून?

की आज खरंच सणांना काही अर्थ राहीलाय का ?

की Just time pass? ...fun fair......?

खरं सांगू, धर्म ही अफूची गोळी आहे. म्हणूनच आपल्या 'शहाण्यासुरत्या' पूर्वजांनी अज्ञानी जनतेला सणांची शास्त्रीयता उलगडून सांगण्यापेक्षा, शास्त्रीय आरोग्यनियमांचे पालन सणांद्वारे कसे होईल, ते पाहीले. उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ ! धार्मिक नियम म्हणून का होईना , पण आरोग्यनियम पाळले गेले सणांद्वारे. आपले पूर्वज खरंच थोर होते.

आपल्या प्रत्येक सणाला वास्तव शास्त्रीय अधिष्ठान आहे आणि म्हणूनच आज बुद्धिप्रामाण्यवाद, तथाकथित वैज्ञानिक दृष्टीकोण, नास्तिकता, 'जुनं ते फेकून द्या', इन्स्टंट जमाना वगैरेंच्या धुरळ्यात सणांची शास्त्रीयता मांडणे योग्य ठरेल. धर्माशी आयुर्वेदाची आरोग्यशास्त्राची सांगड आहे. रूढी समजावून घ्या. त्या केवळ परंपरा नसून शास्त्रशुद्ध आरोग्यनियम होत.

आपले पूर्वज हे खरोखर शहाणे होते. "They were really BAAP"! त्यांना नावं ठेवणं सोपं आहे, पण नाव कमावणे खूप अवघड आहे.

आपल्या संस्कृतीने मनामनातला हा कोरडेपणा रूक्षता थंडपणा जावा म्हणूनच संक्रांतीची योजना केलीये की ज्यामुळे परस्परांबद्दल 'स्नेह' वाढून एकोपा राहील. मायेचा ओलावा (म्हणजेच 'स्नेहन' )  व आपुलकीची ऊब (म्हणजेच 'स्वेदन') हेच समाजाच्या आरोग्याचे मूलमंत्र होत. ज्या संस्कृतीने व्यक्तिच्या शारीरिक कौटुंबिक सामजिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्नेहाचे गोडी तिळगुळाचे सुसंस्कृत सण योजिले, त्याच समाजाला मनगटावर पट्टे बांधण्याचे 'फ्रेंडशिप डे' अधिक आवडावेत हे आमच्या मानसिक गुलामगिरीचे फळ आहे. पाश्चात्यांचे अंधानुकरण न करता आपण आपल्या सण उत्सव रूढी' यांकडे कधी शास्त्रीय व विधायक डोळस वृत्तीने पाहणार आहोत काय ? आपल्या पिढीचे सोडा पण उमलत्या निरागस पिढीच्या हाती आपण कोणता सांस्कृतिक ठेवा सोपवणार आहोत ? विस्मृतीत चाललेल्या सात्त्विक परंपरा की विकृत उथळ चवचाल पाश्चात्य फॅड फॅशन ?

आशा आहे ...

तिळगूळ घेऊन बोलू गोड

आरोग्याला देऊ संस्कारांची जोड ...

वैद्य हृषीकेश म्हेत्रे
एम डी आयुर्वेद , एम ए संस्कृत
पुणे (प्रत्येक रविवारी) , नाशिक (मंगळ ते शुक्र)

आरोग्यसम्पन्न आनंदी आयुष्यासाठी आश्वासक आयुर्वेदीय उपचार

Tuesday, 1 October 2019

सण उत्सव रूढी कशासाठी? उपास ? की उपवास? कशासाठी ? Upas or upvas ? Fasting ... Whats the purpose

वैद्य हृषीकेश म्हेत्रे Vaidya Hrishikesh B. Mhetre
© www.MhetreAyurved.com, 9422016871

उपास ? की उपवास? कशासाठी ?
"एकादशी आणि दुप्पट खाशी"...
“आज माझं वरत (व्रत) आन् दिवसभर चरत”.
खिचडी, वेफर्स, तळण, गुडदाणी हे खायला मिळतं म्हणून उपास करणारे अनेक आहेत.
सुटी कशासाठी? तर काम करून थकलेल्या शरीराला विसावा मिळावा, पुन: ताजंतवानं होता यावं म्हणून
किंवा राहिलेली काम पूर्ण करता यावी म्हणून !
( अनुशेष भरून काढणे) !
तसेच उपास कशासाठी ... तर पचनसंस्थेला विश्रांती मिळावी किंवा शरीरात असलेल्या अनेक अपाचित  (न पचलेल्या) गोष्टींचे पचन पूर्ण करता यावे म्हणून . लंघनाने अनेक विकार बरे होऊ शकतात . उपास करणारे किती लोक हा उद्देश सफल होऊ देतात ? मुळात अनेकांना उपास / भूक सहन होत नाही. बाकीचे खिचडीसाठी ... ... ... तर उरलेले रूढी धार्मिक नियम म्हणून .


वैद्य हृषीकेश म्हेत्रे Vaidya Hrishikesh B. Mhetre
© www.MhetreAyurved.com, 9422016871


खरंतर 'उपास' हा शब्द नव्हे . तो ‘उपाशन = उप अशन' हवा . म्हणजे मुख्य नेहमीचे जेवण सोडून काही उपपदार्थ खाणे . यालाच 'उप + आहार = उपाहार' म्हणावे .
म्हणून पूर्वी एस् . टी . स्टॅण्डवर 'उपाहारगृह' असायचे त्याचे बहुतेक सर्वत्र 'उपहारगृह' झाले . इंग्लीश स्पेलींग आम्ही कधीच चुकत नाही पण मराठी शब्द मात्र चुकूनही 'शुद्ध' लिहीत नाही . पहिलीपासून इंग्रजी ! व्वा!!
'उपाशन' चे 'उपोषण' झाले आणि 'उपास' बहुधा 'उपवास'चे अपभष्ट रूप होय .
उप = जवळ , वास = राहणे . देव संत सज्जन यांचा सहवास
म्हणजे उपवास . सत्संग!
श्रीचक्रपाणि (श्रीचरकसंहितेचे टीकाकार) म्हणतात ...
'उपावृतस्य/अपावृतस्य पापेभ्य:
सहवासो गुणैः हि यः
उपवासः स विज्ञेयः
न शरीरस्य शोषणम्'
अर्थात् पापांपासून दूर होऊन सदगुणांचा सहवास करणे म्हणजे उपवास होय . भुकेले राहून शरीराचे शोषण करणे हा उपवास नव्हे . धर्मशास्त्रात उपवासाचे वेळी दूध, तूप, मध, पाणी
यांनाच मान्यता आहे . फळे कंदमुळे नंतर घुसलेत. पचायला हलका, सत्त्वगुणपधान आहार हवा . दही, केळी, रताळी यांनी तमोगुणी सुस्तीच येणार .बरे आजचे 'उपासाचे पदार्थ ही
पळवाट,फसवणूक, सोय किंवा विनोद होय .

वैद्य हृषीकेश म्हेत्रे Vaidya Hrishikesh B. Mhetre
© www.MhetreAyurved.com, 9422016871

आज आम्ही साबुदाणा, बटाटा, शेंगदाणे, वनस्पती तूप, मिरची, चहा या बाबी खिचडी, वेफर्स या स्वरूपात 'उपासाचे पदार्थ म्हणून खातो . पण हे सारे पदार्थ भारतीय नव्हेतच .ते ब्रिटीशांनी आणलेत. पूर्वी विहीरीत ब्रेडचा तुकडा टाकून धर्म बाटत असे ! आणि आज हे सारे पदार्थ आमच्या धार्मिक उपासाचा आहार!!! बरे हे सर्व पदार्थ इतके जड व पित्तकर आहेत की पुढे २ दिवस पचनसंस्थेची वाट लागते! अम्लपित्त होते! गॅसेस होतात! पण इथे पोटासाठी खातो कोण?! सारे काही ओठासाठी! जिभेचे चोजले!?
जगण्यासाठी खात नाही, खाण्यासाठी जगतो!? ...... पौरूषाकडून पशुत्वाकडे!?!?
साबुदाणा हा स्टार्च होय . कपडे स्टार्चने कसे 'कडक होतात तसे आतडयांचे होते. आतडयांना याचा 'रबरी लेप' बसतो . मग ते पचवेपर्यन्त दमतात आतडी . कशाची भूक लागणार?  साबुदाण्याचे पांढरे शुभ दाणे; दलदलीत उगवणारया कंदाच्या लगद्यापासून कसे तयार करतात ते सविस्तर सांगितले तर पुनखायची इच्छा होणार नाही. शिंगाडेही थोडे जडच . भगर वरई पित्तकर .

वैद्य हृषीकेश म्हेत्रे Vaidya Hrishikesh B. Mhetre
© www.MhetreAyurved.com, 9422016871

मग उपासाचे खरे पदार्थ कोणते ?? ज्यांनी पचनसंस्थेला खरंच विश्रांती मिळेल व उभारी येईल असे पचायला हलके आणि सात्त्विक पदार्थ.
उदा.१. लाह्या ... ... राजगिरा, ज्वारी किंवा सर्वोत्तम म्हणजे साळीच्या लाह्या . मक्याच पॉपकॉर्न किंवा तांदळाचे चिरमुरे नव्हे.
२. मूग, मसूर यांचे कढण.
३.भाजलेल्या तांदळाची पेज / मांड.
४. भिजवलेल्या काळ्या मनुका . बेदाणे नव्हे . डाळिंब, अंजीर, आवळा ही फळे .
५. गरम पाणी.
६. पडवळ, दोडका, दुधी भोपळा, मुळा
हे ...  हे ... हे काय उपासाचे पदार्थ आहेत का? का ? इंग्रजांनी आणलेले 'जीवनाला अनावश्यक व आरोग्यनाशक असे चहा साबुदाणा मिरची बटाटा शेंगदाणे वनस्पती तूप हे
सगळं उपासाला चालतं ! *मग साळीच्या लाह्या आणि उकडलेल्या फळभाज्या का नाही चालत?*
आता उपवासाचेच महिने आहेत . गटारी आमुशाला खाटखुट म्हणजे नॉन व्हेज खाल्लं की चातुर्मासात मांसाहार बंद . का बरं? श्रावणी, सोमवार, शनिवार, जन्माष्टमी, नागपंचमी, ऋषिपंचमी, हरतालिका, पितृपक्ष, नवरात्र ... इतके उपास का?

वैद्य हृषीकेश म्हेत्रे Vaidya Hrishikesh B. Mhetre
© www.MhetreAyurved.com, 9422016871


 कारण वर्षाऋतुतील कुंद दमट आर्द्र वातावरणात 'अग्नि पचनशक्ति' अतिशय क्षीण होतो . त्यावेळी आहार जितका कमी जाईल तेवढं बरं . म्हणजे अपचन व तज्जन्य आम, ज्वर, अतिसार उलट्या इ. विकार व्हायला नकोत. पावसाळा म्हणजे रोग होण्यास अनुकूल काळ . अग्नि मंद . पित्ताचा चय . वाताचा प्रकोप . बिघडलेले वातावरण दूषित जल . म्हणूनच अग्नि टिकवायचा सांभाळायचा . त्यासाठी ढीगभर व्रतं . उपास . खाऊ नका . हलकं खा . म्हणून पंचमीला लाह्या . आणि मांस पचायला खूप जड म्हणून बंद.
धर्माशी आयुर्वेदाची आरोग्यशास्त्राची सांगड आहे .
रूढी समजावून घ्या. त्या परंपरा नसून शास्त्रशुद्ध आरोग्यनियम होत.
आपले पूर्वज हे खरोखर शहाणे होते.
"They were really BAAP"
नावं ठेवणं सोपं आहे, नाव कमावणं खूप अवघड आहे.
.... ... ... मग उद्याच्या उपासाला ... छे छे उपाशनाला / उपवासाला काय खाणार ?
सा सा साबु ... अं अं ... सा सा साळीच्या लाह्या ... ... हं . त्याने उपवास 'मोडत' नाही ... ... "उपवास घडतो”... ... आणि देवाला काय सांगणार? ...
'अविरत ओठी यावे नाम ... ... ...
श्रीराम जय राम जय जय राम'
© Vaidya Hrishikesh B. Mhetre
www.MhetreAyurved.com, 9422016871

उपास उपवास आयुर्वेद वजन मेद स्थौल्य स्थूलता चरबी fat mhetre ayurved upas upavas upvas diabetes diabetes डायबिटिस डायबेटीस मधुमेह

Thursday, 26 September 2019

दरमहा ४ दिवस पाळीची रजा Menstruation Leave 4 days per month

दरमहा ४ दिवस पाळीची रजा Menstruation Leave 4 days per month


https://youtu.be/tgax3FQDt2w

इथे क्लिक करा ↑ click here 

मागच्या पिढीतील स्त्रीला पाळीच्या दिवसांत कोणत्याच कामाला हात लावू देत नसत. कारण अजिबात तिला कुणी स्पर्श करायचा नाही आणि तिनेही कुणाला स्पर्श करायचा नाही. त्यामुळे अन्नपाणीसुद्धा तिला जागेवर मिळत असे. यामागे तिला पूर्ण विश्रांती मिळावी हाच हेतू होता. अन्यथा घरातल्या नणंद जाऊ सासू या अन्य स्त्रियांनी तिला अशी सुखासुखी विश्रांती घेऊ दिली असती का? इतकेच काय तर स्नानसुद्धा चौथ्या दिवशीच कारण रज:स्रावाचे काळात स्नानाचेसुद्धा श्रमच होतात.
आज विभक्त कुटुंबात किंवा कामावर जाणाऱ्या स्त्रीला सुद्धा कुणी अशी विश्रांती घेऊ देतंय का? का नवरा / मुलं असं म्हणतात की हे ४दिवस तू फक्त ऑफिसचे काम बघ. बाकी घरातले संपूर्ण स्वयंपाक नाश्ता आवराआवर आम्ही बघतो. खरंतर आजच्या स्त्री मुक्तीव स्त्री पुरूषसमानतेच्या जमान्यातील 'मुक्त स्त्री'वरच जास्त अत्याचार होतो. कारण तिला आज अर्थार्जनासाठी पुरूषाइतकेच राबावे लागते आणि शिवाय 'गृहिणी' म्हणून सगळी कामे आहेतच. त्यात कुठेही पुरूष मदत करत नाहीतच.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की साधारणपणे १२ ते ५० या वयात म्हणजे ३८ वर्षे पाळी नियमितपणे दरमहा ४ दिवस येतेच. थोडेफार अपवाद वगळता आपण हिशोबासाठी ३५ वर्षे धरू. म्हणजे ३५ वर्षे x १२ महिने X ४ दिवस = १६८० दिवस हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हक्काच्या नैसर्गिक आवश्यक विश्रांतीचे आहेत. पण आज आपण ते तिला मिळू देत नाही. आणि म्हणूनच सावधान... १६८० भागिले ३६५ = ४.६ वर्षे ... जवळपास इतकाच काळ ती सध्या मेनोपॉझचे (रजोनिवृत्ती Menopause) त्रास भोगते. पूर्वी मेनोपॉझचे एवढे विचित्र स्वरूप का नव्हते. कारण दरमहाची विश्रांती मिळत असे. आता निसर्ग तेवढे दिवस केलेल्या निष्काळजीपणाची व्याजासहित वसुली करतो.
म्हणूनच प्रत्येक स्त्रीने ‘पाळीचे ४ दिवस' हे माझे हक्काचे विश्रांतीचे दिवस आहेत आणि नैसर्गिकरीत्या ते मला मिळालेच पाहिजेत याचा हट्ट धरावा. म्हणूनच आताच चला आयाबहिणींनो आपल्या न्याय्य हक्कासाठीएकत्र म्हणू या ... 'होय आम्हाला आमच्या निसर्गदत्त विश्रांतीसाठी दरमहा ४ दिवस पाळीची रजा द्या.' ... आणि तमाम पुरूषांनीही आपल्या मायभगिनींच्या कल्याणासाठी या संकल्पनेला यथाशीघ्र मूर्त रूप द्यावे. आणि आपल्या पूर्वजांच्या प्रत्येक सण उत्सव रूढी नियम व्रतवैकल्ये या सर्वामागची तर्कसंगती शास्त्रीयता यथार्थता आपणच शोधून काढायची आहे आणि त्याची युगानुरूपता आपणच साकारायची आहे.
लेखक : वैद्य हृषीकेश बा. म्हेत्रे.
एम्. डी. आयुर्वेद, एम्. ए. संस्कृत..
97 A, पाटील प्लाझा, सारसबाग जवळ, मित्रमंडळ चौक, पुणे 411009.
मोबाइल : 9422016871
www.MhetreAyurved.com

#पाळी
#पिरियड

#mc
#प्रॉब्लेम

#स्त्री

#आरोग्य

#आयुर्वेद

#Menstruation
#Period
#Problem
#Women health
#Woman
#Health
#Gynecology
#Mhetre
#Ayurved
#DoctorInPune
#DoctorInNashik
#Pune
#Nashik
#पुणे

#नाशिक

आपल्या लिव्हर (Liver) पॅनक्रियाज (Pancreas) यांना प्रशिक्षण देऊ या व डायबिटीस पासून मुक्ती मिळवू या






आपल्या लिव्हर (Liver) पॅनक्रियाज (Pancreas) यांना प्रशिक्षण देऊ या व डायबिटीस पासून मुक्ती मिळवू या
https://youtu.be/KaU8xQ2wWnY
Click here ↑ इथे क्लिक करा ↑
आपल्या जन्मापासून आपल्याला डायबिटीस होईपर्यंत लिव्हर (Liver) पॅनक्रियाज (Pancreas) हे आपली शुगर नियंत्रण व व्यवस्थापन (control & management) करत असतात, मग डायबिटीस झाल्यानन्तर लगेच तेच काम गोळ्यांना देऊन टाकण्यापेक्षा आणि आपल्या लिव्हर (Liver) पॅनक्रियाज (Pancreas) यांना रिटायर करण्यापेक्षा त्यांना त्यांची शुगर नियंत्रण व व्यवस्थापन (control & management) क्षमता पुन्हा प्राप्त करून देणे हीच खरी योग्य ट्रीटमेंट होय! चला , आपल्यालिव्हर (Liver) पॅनक्रियाज (Pancreas) यांना पुन्हा पूर्वीसारखं सक्षम बनवू या आणि डायबिटीस पासून मुक्ती मिळवू या #शुगर #डायबिटीस #डायबेटीस #आयुर्वेद #mhetreayurved #sugar #insulin #diabetes Vaidya Hrishikesh Mhetre 9422016871 Pune Clinic : ONLY on SUNDAY Avanti Ayurved 97 A Patil Plaza Mitramandal Chauk Near Sarasbag Pune Only Sunday 9am to 1pm & 5 to 7.30 pm Nashik Clinic : Avanti Ayurveda DK Nagar Chauk, behind Nirmala Convent Highschool, Next to Prasad Mangal Karyalaya, Near Shantiniketan Hall, Old Gangapur Road. Nashik. Monday to Friday 11am to 1pm & 6 to 8 pm

डायबिटीसमुक्त जीवन भाग 2 (एकूण 4 पैकी) Diabetes free life Part 2 of 4







डायबिटीसमुक्त जीवन भाग 2 (एकूण 4 पैकी) Diabetes free life Part 2 of 4



अभिनंदन



1 रिपोर्ट :

              रक्त तपासणी (ब्लड टेस्ट) :

              ब्लड शुगर/रक्तातील साखर/Blood Sugar

              दरमहा BSL Fasting & PP  व

              दर 3 महिन्यांनी HbA1C



2 नियमित व्यायाम   प्रतिदिन 1 तास



3 आहार नियंत्रण



4 औषधे







चालणं सलग 1 तास

पाऊस असल्यास घरात चालावे

स्पोर्ट्स शूज घालावे

अन्यथा गुडघेदुखी होते

संकल्प / वचन



गवत/माती यांवर अनवाणी चालू शकतं



पोट रिकामे असताना सकाळी किंवा सायंकाळी



© www.MhetreAyurved.com





सूर्यनमस्कार



सर्वांगीण व्यायाम



पाठ मागे वाकवणे



मोजू नये



तोंडाने श्वास घ्यावे लागतील इतके



वयाइतके



© www.MhetreAyurved.com



हवेत सायकल Air Cycle

3 वेळा पुढे, 3 वेळा मागे, असं 10 वेळा



मांडी व नितम्ब/कुल्हे येथील मेद 15 दिवसांत 5% कमी



© www.MhetreAyurved.com



Spinal Twist



पाठीला पाठ, सरळ L / काटकोन बसावं, गुडघे सरळ



छोटी वस्तु बॉल/चेंडू/पातेले



पोटाचा घेर 5% कमी



© www.MhetreAyurved.com



Alternate Toe Touch

कमरेत पुढे/खाली वाकून, गुडघे न वाकवता, पायाचा अंगठा विरुद्ध बाजूच्या हाताने धरणे



कम्बर पोट नितम्ब येथील मेद 15 दिवसांत 5% कमी



© www.MhetreAyurved.com



व्यायाम नक्की करावाच



दगदग व व्यायाम यांत फरक आहे



योगासन प्राणायाम हे स्टॅमिना वाढवतात, शुगर वापरणे होत नाही



योगी ... भोगी ... रोगी



नाभिवर आतड्यावर जोर ताण धक्का देऊ नये



© www.MhetreAyurved.com



परिश्रम व मिताहार

औषधे व रिपोर्ट



90 ते 180 दिवस

3 ते 6 महिने



© www.MhetreAyurved.com





बरं वाटणं ... बरं होणं ... बरं राहणं



शुभेच्छा



धन्यवाद



© www.MhetreAyurved.com



www.MhetreAyurved.com

#शुगर #डायबिटीस #डायबेटीस #आयुर्वेद #mhetreayurved #sugar #insulin #diabetes #सूर्यनमस्कार #व्यायाम





डायबिटीसमुक्त जीवन भाग 1 (एकूण 4 पैकी) Diabetes free life Part 1 of 4

https://youtu.be/KaU8xQ2wWnY