मकर संक्रांती :
तिळगूळ घ्या ... बोला गोड !
आरोग्याला द्या ... संस्कारांची जोड !!
थंडीची सुरूवात होऊन आता दीडएक महिना झालाय. आताशा थंडीचा 'गुलाबीपणा' जाऊन ती आता 'बोचरी' होत चाललीये. हातपायचेहरा इथली त्वचा आणि ओठ फुटलेत. झाडंसुद्धा पानगळतीने उघडीबोडकी दिसताहेत. हाच तो 'शिशिर ऋतु'.
आयुर्वेदानुसार माघ व फाल्गुन महिने हे शिशिर ऋतुचे होत तर ज्योति:शास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर व कुंभ राशीत असतो तेव्हा शिशिर ऋतु होय. शिशिर हा उत्तरायणाचा आरंभ होय. कारण या काळात मकर संक्रांत येते म्हणजे सूर्य मकरवृत्त ओलांडून दक्षिणेकडून पुनः उत्तरेकडे येऊ लागतो. दिवस मोठा होऊ लागतो. भारतापासून ( उत्तरगोलार्ध) अधिकाधिक दूर दक्षिणेकडे गेलेला सूर्य या ऋतूत पुनः जवळ यायला आरंभ होतो. पण तूर्त तरी सूर्य खूप दूर असलेने आपल्याकडे मात्र कडाक्याची थंडी असते. आणि म्हणूनच ती बोचरी ठरते. थोडक्यात वातावरण कमालीचे 'शीत व रूक्ष' असते. आणि म्हणूनच याचे दुष्परिणाम टाळणेसाठी बरोबर याच्या विरूद्ध म्हणजे 'उष्ण व स्निग्ध' गुणांची गरज असते. आणि त्याचसाठी आपल्या पूर्वजांनी या ऋतूत आयोजिला सण मकर संक्रांतीचा अर्थात् 'तिळगूळ घ्या , गोड बोला'
तिळगूळच का?
तर तीळ हे 'उष्ण व स्निग्ध' आहेत आणि गूळ हा 'स्निग्ध गुरू व मधुर' होय.
शीत व रूक्ष वातावरणात शरीरातील वातदोष वाढतो. म्हणजे वायु व आकाश महाभूतप्रधान घटक. त्यामुळे धातुंची म्हणजे शरीरघटकांची झीज संभवते. पृथ्वी व जल महाभूते घटतात. ती भरून काढणेसाठीच थंडीत भूक अधिक लागते.म्हणूनच वायु आकाश कमी होऊन पृथ्वी जल महाभूते वाढतील अशा पदार्थाचे सेवन इष्ट ठरते. शिवाय वातदोष शीत व लघु गुणांचा आहे ग्हणून त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी उष्ण व गुरू गुणांची गरज असते. अशा प्रकारे उष्ण स्निग्ध गुरू मधुर पृथ्वी जल यांचा पुरवठा व्हावा म्हणूनच समाजातील सर्व आर्थिक थरांत सहज उपलब्ध होतील अशा पदार्थाची निवड करून त्यांची धार्मिक रूढींशी सांगड घातली गेली. ते दोन पदार्थ म्हणजेच तिळगूळ घ्या ....गोड बोला.
शिवाय जसे कफासाठी मध, पित्तासाठी घृत ( तूप ) , तसे वातासाठी तिलतैल हे परमौषध म्हणजे सर्वश्रेष्ठ उपाय होय.
गूळ हा उसापासून बनणारा पदार्थ म्हणून संक्रांतीच्या आदले दिवशी भोगीच्या भाजीत उसाचे तुकडे असतात.
अशा प्रकारे शिशिर ऋतूतील अत्यधिक शीतता व रूक्षता यांनी वातप्रकोप होऊन शरीरावर त्याचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून वातनाशक अशा तिळ व गूळ यांचा सणरूढींत समावेश आहे.
सध्या काही सुगृहिणी (सुगरण हा अपभ्रंश होय ) स्त्रिया तिळगुळाच्या वङ्या किंवा लाडू करताना त्यांत खोबरे घालतात, तेही योग्यच होय कारण नारळ हाही मधुर गुरू स्निग्ध याअर्थी वातशामक होय.
पण सध्या सणांचे बाजारीकरण होत असताना शास्त्रीय परंपरांपेक्षा 'उरकून टाकू उपचार रूढी असा भाग अधिक आहे, म्हणूनच तिळ व गूळ यांच्या वड्या करण्याऐवजी 'सोय व सुटसुटीत' म्हणून काटेरी पांढरा हलवा वापरला जातो. त्यात गूळ नसून साखर वापरली जाते, जी सध्या तरी कारखान्यात तयार होणारी म्हणजे रसायनयुक्त असू शकते. त्यामुळे रूढीतला मूळ शास्त्रीय उद्देश हरवून जातो.
संक्रांतीचे वेळी तिळाचा वापर हा फक्त तिळगूळ किंवा भोगीच्या भाकरीपुरता नसून तो तिलतैलाचा अभ्यंग व तिळाचे उद्वर्तन उटणे याअर्थीही करायचाय. तोही फक्त २ दिवस नव्हे तर थंडी व रूक्षता जोवर वातावरणात आहे तोवर अर्थात् पुढचा सण येईपर्यन्त म्हणजे होळी जळाली थंडी पळाली इथपर्यन्त!
...कारण त्या त्या सणांच्या रूढी, या त्या दिवसापुरत्या नसून, ते त्या संपूर्णऋतूचे आरोग्यनियम होत.
तिळगुळाला फक्त शारीरिक आरोग्यापुरते महत्त्व आहे असे नसून कौटुम्बिक सामाजिक आरोग्यदृष्ट्याही महत्त्व आहे.
'तिळगूळ घ्या ... गोड बोला' हा एकमेकांस देण्याचा संदेश म्हणून तर पिढ्यानुपिढ्या चालत आला आहे. जशी शिशिरामध्ये वातावरणात थंडपणा व रूक्षता येते , तशी ती आता समाजमनातही शिरून मूळ धरू लागली आहे. एक संवेदनाशून्य थंडपणा की षंढपणा आणि 'मला काय त्याचं' असा अलिप्त कोरडेपणा दिसतोय. कुणी विचारवंत म्हणाले होते... 'Men build walls instead of bridges ; so they became Miserable' ... माणसं सेतू बांधायचे सोडून भिंती बांधतात आणि म्हणूनच जीवन केविलवाणे होते.
हे सण "साजरं" करण्याचं वेड भारतीय माणसात उत्सवप्रियतेमुळं आहे का? की परंपरापालनाचा पगडा म्हणून?
की आज खरंच सणांना काही अर्थ राहीलाय का ?
की Just time pass? ...fun fair......?
खरं सांगू, धर्म ही अफूची गोळी आहे. म्हणूनच आपल्या 'शहाण्यासुरत्या' पूर्वजांनी अज्ञानी जनतेला सणांची शास्त्रीयता उलगडून सांगण्यापेक्षा, शास्त्रीय आरोग्यनियमांचे पालन सणांद्वारे कसे होईल, ते पाहीले. उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ ! धार्मिक नियम म्हणून का होईना , पण आरोग्यनियम पाळले गेले सणांद्वारे. आपले पूर्वज खरंच थोर होते.
आपल्या प्रत्येक सणाला वास्तव शास्त्रीय अधिष्ठान आहे आणि म्हणूनच आज बुद्धिप्रामाण्यवाद, तथाकथित वैज्ञानिक दृष्टीकोण, नास्तिकता, 'जुनं ते फेकून द्या', इन्स्टंट जमाना वगैरेंच्या धुरळ्यात सणांची शास्त्रीयता मांडणे योग्य ठरेल. धर्माशी आयुर्वेदाची आरोग्यशास्त्राची सांगड आहे. रूढी समजावून घ्या. त्या केवळ परंपरा नसून शास्त्रशुद्ध आरोग्यनियम होत.
आपले पूर्वज हे खरोखर शहाणे होते. "They were really BAAP"! त्यांना नावं ठेवणं सोपं आहे, पण नाव कमावणे खूप अवघड आहे.
आपल्या संस्कृतीने मनामनातला हा कोरडेपणा रूक्षता थंडपणा जावा म्हणूनच संक्रांतीची योजना केलीये की ज्यामुळे परस्परांबद्दल 'स्नेह' वाढून एकोपा राहील. मायेचा ओलावा (म्हणजेच 'स्नेहन' ) व आपुलकीची ऊब (म्हणजेच 'स्वेदन') हेच समाजाच्या आरोग्याचे मूलमंत्र होत. ज्या संस्कृतीने व्यक्तिच्या शारीरिक कौटुंबिक सामजिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्नेहाचे गोडी तिळगुळाचे सुसंस्कृत सण योजिले, त्याच समाजाला मनगटावर पट्टे बांधण्याचे 'फ्रेंडशिप डे' अधिक आवडावेत हे आमच्या मानसिक गुलामगिरीचे फळ आहे. पाश्चात्यांचे अंधानुकरण न करता आपण आपल्या सण उत्सव रूढी' यांकडे कधी शास्त्रीय व विधायक डोळस वृत्तीने पाहणार आहोत काय ? आपल्या पिढीचे सोडा पण उमलत्या निरागस पिढीच्या हाती आपण कोणता सांस्कृतिक ठेवा सोपवणार आहोत ? विस्मृतीत चाललेल्या सात्त्विक परंपरा की विकृत उथळ चवचाल पाश्चात्य फॅड फॅशन ?
आशा आहे ...
तिळगूळ घेऊन बोलू गोड
आरोग्याला देऊ संस्कारांची जोड ...
वैद्य हृषीकेश म्हेत्रे
एम डी आयुर्वेद , एम ए संस्कृत
पुणे (प्रत्येक रविवारी) , नाशिक (मंगळ ते शुक्र)
आरोग्यसम्पन्न आनंदी आयुष्यासाठी आश्वासक आयुर्वेदीय उपचार

No comments:
Post a Comment