Friday, 1 August 2025

स्त्री : आयुर्वेदात 'नवांग' म्हणजे 'नववे' अंग किंवा एक 'नवीन' अंग! ... स्त्री !!!

आयुर्वेदात 'नवांग' म्हणजे 'नववे' अंग किंवा एक 'नवीन' अंग! ... स्त्री !!!

जसे काय चिकित्सा या मुख्य आणि व्यवहारात अस्तित्वात असलेल्या अंगाप्रमाणेच, बाल आणि वृद्ध यांच्यासाठीही अष्टांगांमध्ये स्थान आहे, तसेच खरंतर ते "स्त्री" साठी सुद्धा असायला हवे! 



हेमाद्रि 

👇🏼

*1. कायशब्देन "सर्वावस्थं + सर्वावयवं" च शरीरं गृह्यते, ... 

2. बालादिशब्दैः तस्य एव "अवस्था"विशेषा लक्ष्यन्ते। ... 

3. ऊर्ध्वाङ्गं तु "अवयव"विशेषः।* 


बालः प्रथमं "वयः"

जरा पश्चिमं "वयः" !!

वृषः स्त्रीप्रसङ्गित्वम्। 

👆🏼हेमाद्रि 


काय चिकित्सा म्हणजे सर्व अवस्था आणि सर्व अवयव!


उर्ध्वांग म्हणजे एक अवयवविशेष. 


बाल आणि वृद्ध (म्हणजे जरा म्हणजे रसायन) हे अवस्था विशेष किंवा वयोविशेष ...


तसं स्त्री हे 'अवस्था' विशेष, 'अवयव' विशेष आणि वय विशेष अशा सर्वार्थांनी *एक स्वतंत्र अंग* असायला हवं म्हणजे खरंतर अष्टांग ऐवजी नवांग आयुर्वेद असायला हवा ... पण नाही 'अष्टांगच' असायला हवेत, असं थोडं orthodox असेल तर मग आताच्या प्रस्थापित आठ अंगण पैकी अन्य कुठल्यातरी एका अंगाचा समावेश, दुसऱ्या कुठल्यातरी अंगात, आताच्या काळात तरी समावेश/inclusion करायला हवा 

किंवा 

एखादे अंग जे व्यवहारात अस्तित्वात नाही, ते "वगळायला" हवं ...

म्हणजे स्त्री = (/योनि/स्तन/गर्भाशय/प्रसूति/सूतिका) हे खऱ्या अर्थाने "अस्तित्वात असलेले आवश्यक असलेले" ... एक 'नवांग' म्हणजे 'नववे' अंग किंवा 'नवीन' अंग आयुर्वेद क्षेत्रात प्रस्थापित होईल ! आणि या अंगाचे मुख्य औषध मुस्तादि गण सप्तधा बलाधान टॅबलेट हे असेल "योनिस्तन्यामयघ्ना" ... 😀


मुस्तादि गण : स्त्री विशिष्ट विकारों में उपयोगी अत्यंत वीर्यवान कल्प!

Invictus : earnest Hemingway 

I am the captain of my soulमुस्तावचाग्निद्विनिशाद्वितिक्ता


भल्लातपाठात्रिफलाविषाख्याः। 


कुष्ठं त्रुटिं हैमवती च योनि ...


स्तन्यामयघ्ना मलपाचनाश्च॥


विशेष रूप से कफ प्रधान या शीतगुणजन्य स्निग्ध गुरु गुणजन्य क्लेद प्रधान पृथ्वी जल प्रधान स्त्री विशिष्ट विकारोमे उपयोगी अत्यंत वीर्यवान कल्प! 


https://mhetreayurved.blogspot.com/2024/10/blog-post_26.html

अष्टांग म्हणजे अवयव विशेष किंवा अवस्था विशेष या संदर्भाने सांगितलेली चिकित्सा काय चिकित्सा म्हणजे सर्व अवयव आणि सर्व अवस्था किंवा उपरोक्त विशेष अवयव विशेष अवस्था सोडून अन्य सर्व चिकित्सा


मग स्त्री अवयव विशेष किंवा अवस्था विशेष म्हणून वेगळं अंग स्वीकारणे, नव्यानेच स्थापन करणे, उचित व आवश्यक आहे ...जर बाल आणि वृद्ध हे सुद्धा विशेष अंग म्हणून सांगितले आहेत, तर ... 


एखाद्या विषयाबाबत मतभेद असले, तरी त्या विषयामध्ये त्या क्षेत्रामध्ये निपुणतेने कुशलतेने सक्षमपणे यशस्वीपणे कार्यरत असणाऱ्या व्यक्ती/संस्था या बद्दल निरंतर आदर आहेच!💐