Wednesday, 23 July 2025

विरुद्धान्न : एक शास्त्रीय बोलबाला ! ... कि गोलमाल ?

 विरुद्धान्न : एक शास्त्रीय बोलबाला ! ... कि गोलमाल ?



[23/07, 11:00 am] +91 9xxxxxxxx8: अम्ल रस युक्त आंबा + दूध = विरुद्ध 

त्यात गुड/शर्करा इ टाकले तर चालेल??

किंवा आंबा गोड असेल तर चालेल??

Chakrapani नुसार असाच अर्थ होतोय??


[23/07, 12:48 pm] MhetreAyurveda:


 होय


 आंबा हा क्षीर मित्र आहे


[23/07, 12:55 pm] +91 9xxxxxxxx8: इतर फळांच्या बाबत असाच विचार असेल??(बृहत् त्रयी फक्त)



[23/07, 1:06 pm] MhetreAyurveda:

 फक्त फळ आणि दूध यांचा संयोग विरुद्ध आहे 

फक्त अम्ल पदार्थ आणि दूध यांचा संयोग ... विरुद्ध 


परंतु यात, "तिसरे अन्य काही टाकले" की त्याला विरुद्ध अशी संज्ञा नाही 😃


कारण तिसरे काही टाकल्यानंतर , "योगसंयोगजं फलं" नेमकं काय होईल , ते कोणालाच माहिती नाही 😵‍💫


 कदाचित बृहत्त्रयी नंतर असा सार्वत्रिक अनुभव आला असेल की असे एकत्र करून खाल्लं तरी फारसं काही बिघडत नाही म्हणून मग त्यांनी क्षीर मित्र या संज्ञेखाली काही अन्नपदार्थांची सूची तयार केली आहे 


शास्त्र हे प्रवाही असायला पाहिजे त्यामुळे एखाद्या गोष्टींमध्ये काही काळानंतर काही शतकानंतर प्रत्यक्ष व्यवहारात काही बदल/ वैपरीत्य ते दिसले तर ते "सहजपणे किंवा नवीन संज्ञा निर्मिती करून नवीन परिभाषा तयार करून मान्य करायला पाहिजे स्वीकार करायला पाहिजे"


 पण इतकी लवचिकता हल्लीच्या आयुर्वेदनिष्ठ भक्त मंडळींमध्ये नसते 


त्यांचा सगळा भर हा श्रद्धा आप्त प्रमाण यावर असतो 


त्यांना शास्त्र , सत्य यापुढे आप्त प्रमाणाने सांगितलेली पण "प्रमाणान्तरेण बाधित होऊ शकणारी बाब" ही शक्यता अजिबात मान्य नाही 


किंबहुना तसं काही सांगायला गेलं तर त्यांचा भयंकर मनोभंग तेजोभंग होतो 


आणि ते अतिशय टोकाच्या हिंस्र प्रतिक्रिया देतात 


असो 


विजय रक्षित असे म्हणतो की

👇🏼

मर्त्यैः असर्वविदुरैर्विहिते 

क्व नाम ग्रन्थेऽस्ति 

दोषविरहः सुचिरन्तनेऽपि||३||


पण विजय रक्षिताचं सुद्धा म्हणणं आम्हाला जरा सुद्धा मान्य नसतं हे दुर्दैवी आहे

[23/07, 1:09 pm] +91 9xxxxxxxx8: एकदम रास्त आणि परखड मत. 100% सहमत

[23/07, 1:13 pm] +91 9xxxxxxxx8: मधुर फळ आणि दुध??

उदा. केळी

[23/07, 1:21 pm] MhetreAyurveda: 

🤏🏼 & 📆

थोडसं आणि कधीतरी 


काहीही बिघडत नाही


मुळात खाल्ल्या जाणाऱ्या विरुद्धान्नाचं बल किती ? त्याला निदानत्व येईल , एवढं त्याचं हेतूबल आहे का? हे पाहायला हवं! 


चवीसाठी, कधीतरी, थोडसं ... विरुद्ध अन्न खाल्लं तर लगेच काही बिघडत नाही ... आणि त्याही पुढे जाऊन ज्याला ते तसं सातत्याने खाण्याची "सवय आहे" (सात्म्य आहे) ... त्याला हेतू बल येऊन, निदानत्व येऊन, रोगसंप्राप्ती घडवून, प्रत्यक्ष व्याधी व्हायला ... त्या विरुद्धान्नाचं सेवन "तितक्या मोठ्या प्रमाणात तितक्या सातत्याने" होत राहिलं ... तरच ते शक्य आहे, अन्यथा नाही !! म्हणूनच शास्त्रदृष्ट्या , "विरुद्धान्न अशी संज्ञा" आहे , असे पदार्थ अगदी नेहमी वारंवार खाऊनही अनेकांना विरुद्धान्न जन्य रोग झालेले नाहीत, असे प्रत्यक्ष व्यवहारात दिसते

उदाहरण...

चहा चपाती खाऊ नये, कारण ते विरुद्धान्न आहे, असं सांगणारे लोक आहेत !!! (या उदाहरणाचे श्रेय, एक ज्येष्ठ आदरणीय वैद्य @,पुणे ... यांना आहे)

ठीक आहे , अगदी चहा चपाती रोज खाणारे लोक आहेत. त्यामध्ये दूध कितीसं ? चपातीमध्ये मीठ कितीसं?? ते तितक्याशा दुधामध्ये, तितकसं मीठ पडलं, म्हणून असं कितीसं हेतूबल निर्माण होणार?? त्याला निदानत्व कधी येणार!?


त्यामुळे हे तत्वतः विरुद्धान्न असलं, 

तरी ते व्यभिचारी निदान आहे!!

चपातीतल्या मिठाबरोबर, चहातल्या दुधाचा संयोग हा विरुद्ध अन्न आहे ... असं म्हणणं म्हणजे बिरबलाची खिचडी शिजवल्यासारखा आहे ... राजमहालातल्या रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशाकडे पाहून, थंडीच्या रात्री यमुने मध्ये रात्रभर पाण्यात उभं राहणाऱ्याला ऊब मिळाली, असं म्हणण्यासारखं आहे !

शास्त्र आणि तारतम्य हे दोन्ही असायला हवेच की !!!

[23/07, 1:22 pm] MhetreAyurveda: परं त्वाहारविकाराणां *वैरोधिकानां लक्षणमनतिसङ्क्षेपेण* उपदिश्यमानं शुश्रूषामह इति ॥८०॥

डेफिनेशन बताओ😃

तमुवाच भगवानात्रेयः- *देहधातुप्रत्यनीकभूतानि द्रव्याणि देहधातुभिर्विरोधमापद्यन्ते;*

⬆️

This is definition 


 परस्परगुणविरुद्धानि कानिचित्, कानिचित् संयोगात्, संस्कारादपराणि, देशकालमात्रादिभिश्चापराणि, तथा स्वभावादपराणि ॥८१॥

[23/07, 1:22 pm] MhetreAyurveda: 

यत् किञ्चिद्दोषमास्राव्य न निर्हरति कायतः ।

आहारजातं तत् सर्वमहितायोपपद्यते ॥

⬆️

हे डेफिनेशन नाहीये ... हा त्याचा परिणाम आहे


[23/07, 1:25 pm] MhetreAyurveda: *सात्म्यतोऽल्पतया वाऽपि* दीप्ताग्नेस्तरुणस्य च ।

स्निग्धव्यायामबलिनां विरुद्धं वितथं भवेत् 


विरोध्यपि न पीडायै *सात्म्यमल्पं च* भोजनम्॥४७॥ 

 

थोडसं, कधीतरी *आणि सवयीचंही* 😃😉


दीप्ताग्नयः खराहाराः कर्मनित्या महोदराः ।

ये नराः प्रति तांश्चिन्त्यं नावश्यं गुरुलाघवम् ॥


🙃😇🤣

[23/07, 1:26 pm] MhetreAyurveda: 

काहीही खा! कसंही खा! कितीही खा! कधीही खा! मजा करा !! ऐश करा !!! 🙃😇😃

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_23.html


[23/07, 1:29 pm] MhetreAyurveda: 

अत ऊर्ध्वं रसद्वन्द्वानि रसतो वीर्यतो विपाकतश्च विरुद्धानि वक्ष्यामः- तत्र मधुराम्लौ रसवीर्यविरुद्धौ, मधुरलवणौ च, मधुरकटुकौ च सर्वतः, मधुरतिक्तौ रसविपाकाभ्यां, मधुरकषायौ च, अम्ललवणौ रसतः, अम्लकटुकौ रसविपाकाभ्याम्, अम्लतिक्तावम्लकषायौ च सर्वतः, लवणकटुकौ रसविपाकाभ्यां, लवणतिक्तौ लवणकषायौ च सर्वतः, कटुतिक्तौ रसवीर्याभ्यां कटुकषायौ च, तिक्तकषायौ रसतः ।।

सगळंच विरुद्धच आहे 🫢


तरतमयोगयुक्तांश्च भावानतिस्निग्धानतिरूक्षानत्युष्णानतिशीतानित्येवमादीन् विवर्जयेत् ।।


विरुद्धान्येवमादीनि वीर्यतो यानि कानिचित् । 

तान्येकान्ताहितान्येव


सगळंच विरुद्धच आहे 🫢


याबाबत एक विशेष व्हिडिओ आहे ... ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी तो पहावा Language English 

👇🏼

https://youtu.be/pb1l31ONZck?si=c9HCnPOn21BWpTI7

Friday, 18 July 2025

घरगुती औषधे झटपट उपचार, होम रेमेडीज, ड्रग & डिसीज




काही सन्माननीय अपवाद वगळता अनेक वैद्य (डॉक्टर) हे सोशल मीडियावरती घरगुती औषधे झटपट उपचार, होम रेमेडीज, ड्रग & डिसीज अशा पद्धतीने व्यक्त होत असतात. त्यातून त्यांना लाखो व्ह्यूज, हजारो सबस्क्रायबर्स मिळतात, काहीजण तर त्यामुळे "समाज गुरु(?), राष्ट्रीय गुरु" इथंपर्यंतही पोहोचतात ... असो. त्यांच्या या निर्विवाद(?) कर्तृत्वा(?)बद्दल निश्चितपणे अभिनंदन💐🏆 करायलाच हवं 


पण तरीही ... कोणत्याही वैद्यकीय पदवीधर (म्हणजेच डॉक्टर) माणसाने आणि नीतिमत्ता आणि समाजप्रबोधनाचे उत्तरदायित्व याबद्दल सारासार विवेक आणि सदसद विवेक बुद्धी जागृत असलेल्या डॉक्टर वैद्य यांनी (mbbs डॉक्टर हे सहसा असं करतच नाहीत) "घरगुती औषधे" अशाप्रकारे सोशल मीडिया किंवा प्रिंट मीडिया किंवा ऑडिओ व्हिज्युअल मीडिया किंवा स्थानिक पातळीवर किंवा जाहीर व्यासपीठावर व्यक्त होऊ नये , हे नम्र आवाहन !!!🙏🏼


त्या संदर्भात योग्य वाटल्यास उत्सुकता असल्यास जिज्ञासा असल्यास कुतूहल असल्यास घरगुती औषधे या संदर्भातील खालील पोस्ट अवश्य वाचावी हे नम्र आवाहन🙏🏼

👇🏼

सोशल मीडिया वरती घरगुती औषधे सांगणे, हा झटपट लोकप्रियता मिळवण्याचा, सोपा मार्ग असला ... तरी तो शास्त्राचे आणि समाजाचे निश्चितपणे नुकसान करणाराच आहे. कारण अशा प्रकारे शॉर्टकट / घरगुती उपाय सांगून, आपण सेल्फ मेडिकेशन अशा बेजबाबदार वृत्तीला खतपाणी घालतो ... आणि समाजाची दिशाभूल फसवणूक वंचना प्रतारणा करतो, याची जाणीव सर्व डॉक्टर/ वैद्य यांनी सोशल मीडियावर नियतकालिकांमध्ये प्रसार माध्यमावर सार्वजनिक ठिकाणी लेख लिहिताना भाषण करताना ठेवलीच पाहिजे. तीच आपली शास्त्राशी आणि समाज रुपी भगवंताशी व अन्नदात्या पेशंटशी असलेली, नैतिक बांधिलकी आहे ... याचे भान कधीही सुटू देऊ नये.


🔥आजपर्यंत कधीतरी, एकातरी, ऍलोपॅथी डॉक्टरांनी मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांनी एमबीबीएस डॉक्टरांनी, एकदा तरी ... असे घरगुती औषध घेण्यासाठी, कुठेतरी मासिकात सोशल मीडियावर व्हाट्सअप वर फेसबुक वर युट्युब वर वर्तमानपत्रात लेख लिहिलाय किंवा कुठल्याही सार्वजनिक व्यासपीठावर भाषण केले आणि त्याच्यामध्ये "घरच्या घरी अमुक औषध घ्या" असं कधी सांगितलंय का?! कधीच नाही !!  


मॉडर्न मेडिसिन ऍलोपॅथी एमबीबीएस डॉक्टर हे तुम्हाला आजारांची कारणे , लक्षणे , ते टाळण्यासाठीचे वागणुकीतले उपाय याबद्दल सांगतील ... पण ते कधीही कुठलेही औषध , हे लेख किंवा भाषण या स्वरूपात , प्रत्यक्ष सार्वजनिक व्यासपीठावरून किंवा सोशल मीडिया वरून किंवा वर्तमानपत्रात मासिकात कधीही सांगत नाहीत...


मग नेमकी आयुर्वेदाचीच माणसं असं सगळीकडे, चीप cheap प्रकारे, आयुर्वेदाला असं स्वस्त हलकं कमी दर्जाचं करून ... आजीबाईचा बटवा पारंपरिक ज्ञान ट्रॅडिशनल नॉलेज या नावाखाली, शेवटच्या पायरीवर उभे राहून, घरगुती औषधं, या शास्त्राचा अपमान अवमूल्यन करणाऱ्या, निम्न खालच्या स्तराला का बरं आणतात??? असे करताना त्यांना कोणत्याही प्रकारची खेद खंत संकोच का बरे वाटत नाही??? असा प्रश्न मला गेली 35 वर्ष पडलेला आहे ... पण अशा वृत्तीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली अद्याप पर्यंत आयुर्वेदाच्या लोकां बाबत मला दिसलेली नाही ... ☹️😔


घरगुती उपाय सांगून , कोणीतरी वैद्य किंवा कोणीतरी बोगस आयुर्वेदिक डॉक्टर भोंदू , हा युट्युब वर लाखांनी सब्स्क्राईबर्स आणि व्ह्यूज मिळवतो ... म्हणून आपणही त्याच फसव्या घसरणीच्या मार्गावर लोळावे, असा त्याचा अर्थ होत नाही. अशा प्रवृत्तींचे समर्थन कधीही सुजाण नागरिकांनी आणि आयुर्वेद शास्त्राच्या पदवीधरांनी प्रॅक्टिशनर्सनी विद्यार्थ्यांनी कदापिही करू नये. एकाने गाय मारली, म्हणून आपण वासरू मारू नये. त्याने सरी घातली, म्हणून आपण दोरी घालू नये.


झटपट रिझल्ट देणारी घरगुती औषधे सांगण्यापेक्षा ...

दिनचर्या ऋतुचर्या व्यायाम आहारातील बदल नित्यसेवनीय द्रव्य नित्य वर्ज्य द्रव्य अशा कितीतरी चांगल्या समाजप्रबोधन पर आरोग्य रक्षक बाबींचे मार्गदर्शन करणे, हे शक्य आवश्यक उपयोगी आणि एका सुजाण वैद्याचे कर्तव्य सुद्धा आहे. 

अशा प्रकारच्या प्रबोधनाने लाईक व्ह्यूज सबस्क्राईबर्स नवीन पेशंट लीड्स गिऱ्हाईक कस्टमर क्लायंट यात वृद्धी होणार नाही, हे मान्य आहे!! कदाचित youtube चे सिल्वर स्टार गोल्डन स्टार हे मिळणार नाही!! कदाचित राष्ट्रीय गुरु होता येणार नाही!!! 


पण मी काही चुकीचे केले नाही, मी स्वस्त चीप आणि अनीतीपूर्ण अशा प्रकारच्या मार्गाने जाऊन, ही स्वस्त सवंग लोकप्रियता मिळवलेली नाही ... इतका तरी स्वाभिमान सेल्फ रिस्पेक्ट स्वतःबद्दल निश्चितपणे राहील ... आणि आरशामध्ये स्वतःकडे बघताना स्वतःचीच लाज वाटणार नाही! अर्थात घरगुती औषधे सांगणे, हे शास्त्र विरोधी आहे, अशी नीतीपूर्ण जाणीव ज्यांना आहे, त्यांनाच हे पटेल समजेल कळेल!!! अन्यथा घरगुती औषधे सांगणारे पैशाला पासरी व्हिडिओ आणि लाखो views हजारो सबस्क्राईबर्स असणारे कितीतरी व्हिडिओ चॅनल सहजपणे मिळतात. घरगुती औषध असं गुगल करून पहा, वैद्यच काय, पण आयुर्वेदाची डिग्री नसलेलेही अनेक जण यामध्ये लोकप्रियता आणि ऑनलाइन समृद्धी मिळवून आहेत. 


परंतु अनेकजण करतात म्हणजे ते बरोबर असते, असे नव्हे !!!


शांतपणे स्वतःलाच प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला खरोखरच असे पटले की, हो ही घरगुती औषधे सांगणे हे माझ्या चरकाला वाग्भटाला आप्तांना भगवंताला समाज पुरुषाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नदात्या पेशंटला खरोखरच उपयोगी आवश्यक आरोग्य रक्षक असे आहे का??? तर मग तुम्ही तुम्हाला वाटेल ते करत राहावे


सुज्ञास अधिक सांगणे न लगे


वैद्यकीय क्षेत्रातील नसूनही समाज प्रबोधनासाठी नैतिक उत्तरदायित्व स्वीकारून कुठल्याही प्रकारची मार्केटिंग स्पॉन्सरशिप असा व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता आरोग्य हिताचे मार्गदर्शन करणाऱ्या पोस्ट किती चांगल्या प्रकारे लिहिता येऊ शकतात, याची खालील दोन पोस्ट चांगली उदाहरणं आहेत


https://www.facebook.com/share/p/16iTTJqRKg/


https://www.facebook.com/share/p/1RMNeTA2gh/